Maharashtra

Kolhapur

CC/11/245

Smt. Yashoda Shripati Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar

17 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/245
1. Smt. Yashoda Shripati PatilBhuyewadi, Tal. Karveer,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Local Branch Manager, Kanchanganga, 204 E, Station road,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
Mrs.N.D. Joshi, Advocate for Opp.Party

Dated : 17 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

नि का ल प त्र :- (दि.17.08.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला यांचे वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
     तक्रारदार हे श्री.राम वि.का.स. (विकास) सेवा संस्‍था मर्यादीत, भुयेवाडी, ता. करवीर, जि. कोल्‍हापूर या संस्‍थेचे सदस्‍य असून सदर संस्‍थेमार्फत त्‍यांचे सदस्‍यांसाठी जनता वैयक्‍तीक अपघात (J.P.A.) विमा योजनेअंतर्गत पॉलिसी उतरविलेली असून पॉलिसीचा क्र. 161600/47/2008/3542 असा आहे. सदर पॉलिसीच्‍या कालावधीतच तक्रारदारांचे पती श्रीपती येसबा पाटील हे शेतामध्‍ये तणनाशक औषध फवारण्‍याकरीता गेले होते. सदर औषध फवारणी करीत असताना झालेल्‍या इन्‍फेक्‍शनमध्‍ये ते अत्‍यवस्‍थ झाले. त्‍यांना त्‍वरीत सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे उपचारासाठी नेले असता औषधोपचार सुरु असतानाच दि. 17/06/2010 रोजी त्‍यांचा मृत्‍यू झाला. सामनेवाला कंपनीकडे योग्‍य त्‍या कागदपत्रासह क्‍लेमची मागणी केली असता दि. 31/03/2011 रोजी च्‍या पत्राने तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघाती नसून त्‍यांनी आत्‍महत्‍या केलली आहे  असे चुकीचे व विपर्यास्‍त कारण देऊन तक्रारदारांचा विमा क्‍लेम चुकीचे कारण देऊन नाकारला आहे व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब,  विमा क्‍लेम रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत क्‍लेम नाकारलेचे पत्र, फायनल ओपीनियम - कॉज ऑफ डेथ, वर्दी जबाब, अडमिट कार्ड, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टेमकरिता शवासोबत पाठवावयाचा पोलिस अहवाल, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, कॉज ऑफ डेथ सर्टीफीकेट (व्हिसेरा रिझर्व्‍ह) फोरेनसिक रिपोर्ट इत्‍यादींच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या आहेत.
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याअन्‍वये  तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात,  पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे क्‍लेम नियमात बसत नाही असे प्रतिपादन केलेले आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. 
 
(5)   या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा सविस्‍तर व विस्‍तृत युक्‍तीवाद ऐकला आहे. प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले पोलिस अथोरिटीकडील कागदपत्र व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादीचे अवलोकन केले असता औषध फवारणी करीत असताना त्‍याचा संसर्ग होऊन तक्रारदारांचे पतीचा मृत्‍यू झाल्‍याची वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा अपघाती नसून आत्‍महत्‍या असल्‍याचे कारण देऊन नाकारला आहे. तक्रारदारांचे वकीलांनी सामनेवाला विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन विमा क्‍लेम नाकारला असल्‍याचे या मंचाचे निदर्शनास आणून दिलेले आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचे पतीने आत्‍महत्‍या केलेली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत कामी दाखल केलेला नाही. आत्‍महत्‍तेबाबतचा कोणताही पुरावा नसताना विमा कंपनीने नाकारलेला विमा क्‍लेम हा त्‍यांचे सेवेमध्‍ये त्रुटी असल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे.  तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.                    
  
                               - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 31/03/2011 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT