Maharashtra

Kolhapur

CC/11/183

Smt. Shobha Rajaram Kambale. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

R.G.Shelke.

21 Jul 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/11/183
 
1. Smt. Shobha Rajaram Kambale.
Lingachiwadi, Tal. Radhanagari.
Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co. Ltd.
204 E Station road,Kanchanganga,Kolhapur.
2. Kabal General Insurance Services Pvt. Ltd.
101, Karandikar House,Near Mangala Theater, Shivajinagar, Pune.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:R.G.Shelke., Advocate for the Complainant 1
 M.S. Kulkarni, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

 
नि का ल प त्र :- (दि.21.07.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
(1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
      तक्रारदारांच्‍या पतीचा मुख्‍य व्‍यवसाय शेती हा आहे.  राज्‍यातील शेतक-यांसाठी  ’शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत पॉलिसी तक्रारदारांच्‍या पतीचा शासनामार्फत विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला होता.  तक्रारदाराचे पती दि. 07/12/2009 रोजी रात्री 11.30 वाजताच्‍या सुमारास लघुशंकेच्‍या निमित्‍ताने घराच्‍या दारात गेले असता दारातील गटाराचे दगडावरुन पाय घसरुन गटारीजवळ पडले असता, त्‍यांचे डोक्‍यास जबर मार लागला होता. त्‍यानंतर त्‍यांना सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे दाखल केले. परंतु उपचार चालू असताना त्‍यांचा मृत्‍यू दि. 9/12/2009 रोजी झाला. तक्रारदारांचे पतीचे शवविच्‍छेदन केले असता सदरचा मृत्‍यू हा डोक्‍यास मार लागून झाल्‍याचा दाखला डॉक्‍टरांनी दिलेला आहे. तसेच अपघाताची नोंद लक्ष्‍मीपुरी पोलिस स्‍टेशनमार्फत  0 नंबरने राधानगरी पोलिस स्‍टेशन यांचेकडे झालेली आहे व पोलिसांनी संपूर्ण तपास केलेला आहे.  
 
     तक्रारदार पुढे त्‍यांचे तक्रारीत सांगतात, तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा अपघाताने झालेने सामनेवाला कंपनीकडे दि. 29/03/2010 रोजी योग्‍य त्‍या कागदपत्रांची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी,राधानगरी यांचेमार्फत क्‍लेमची मागणी केली असता सामनेवाला कंपनीने दि. 9/02/2011 रोजी काही कागदपत्रांची मागणी केली. तथापि, सदर कागदपत्रे यापूर्वीच क्‍लेमसोबत दिलेली आहेत.   परंतु त्‍यानंतर सामनेवाला विमा कंपनीने  विमा क्‍लेमबाबत काहीही कळविलले नाही. सबब, विमा क्‍लेम रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदार यांचा क्‍लेम फॉर्म, खाते नं. 8 अ चा उतारा, गट नं. 12 चा 7/12 चा उतारा, लक्ष्‍मीपुरी पोलिसांनी राधानगरी पोलिसांना दिलेले पत्र, श्री. दिनकर गोविंद कांबळे, यांचा जबाब, घटना स्‍थळाचा पंचनामा, सी.पी. आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर यांचेकडील मृतू दाखला, पी.एम. रिपोर्ट, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, प्रेत ताबेत मिळालेचे पावती, गाव नमुना 8 अ चा जुना खाते उतारा, सामनेवाला कंपनीचे पत्र इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
(4)   सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांना अपघात होऊन त्‍यांना उपचार घ्‍यावे लागले व उपचारादरम्‍यान मयत झाले हा मजकूर मान्‍य नाही. तसेच सदरची कागदपत्रे देऊन क्‍लेमची मागणी केली हा मजकूर मान्‍य नाही.   तक्रारदारांनी  सामनेवाला कंपनीने मागणी केलेप्रमाणे कागदपत्रांची पुर्तता न केलेने सामनेवाला कंपनीने क्‍लेमबाबत निर्णय घेतलेला नाही यामुळे सामनेवाला विमा कंपनीने कोणतीही सेवा त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे.
 
 
(5)   सामनेवाला क्र.2 कंपनी यांनी पोस्‍टामार्फत त्‍यांचे म्‍हणणे दाखल केलेले आहे. परंतु ग्राहक सरंक्षण कायद्यातील तरतुदीचा विचार करता या मंचासमोरील असलेली प्रकरणे ही न्‍यायिक स्‍वरुपाची असतात. त्‍यामुळे सामनेवाला क्र. 2 यांनी पोस्‍टाने पाठविलेल्‍या म्‍हणण्‍याचा हे मंच विचार करत नाही.  
 
(6)   या मंचाने  तक्रारदारांची तक्रार, उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीस डोक्‍यास मार लागू त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाला असे प्रतिपादन तक्रारदारांचे वकिलांनी केलेले आहे. या अनुषंगाने प्रस्‍तुत प्रकरणी पोलिसांच्‍याकडे तक्रार झालेली आहे. त्‍याअनुषंगाने वर्दी, जबाब, पंचनामा इत्‍यादी कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्‍यांमध्‍ये तक्रारदारांचे पतीच्‍या मृत्‍यूचे कारण डोक्‍यास जखम असे दिलेले आहे. तसेच सी.पी.आर. हॉस्‍पीटल येथील मेडिकल ऑफीसरने त्‍या अनुषंगाने मृत्‍यू दाखला दिलेला आहे इत्‍यादीचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा अपघाती मृत्‍यू झाल्‍याचे दिसून येते.
 
     तक्रारदारांनी  विमा क्‍लेम मागणी ही तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत केलेली आहे. सदर क्‍लेम फॉर्म प्रपोजल हस्‍ते दिलेबाबत पोहच प्रस्‍तुत कामी दाखल केलेली आहे. त्‍याअनुषंगाने क्‍लेम फॉर्म व त्‍याचे सहपत्र यांचे अवलोकन केले असता सहपत्रामध्‍ये 7/12, गाव नमुना 8 अ, गाव नमुना- 7, गाव नमुना 6-, तलाठी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, वयाचा पुरावा, मृत्‍यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटना स्‍थळाचा पंचनामा, पी.एम. अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा, फॉर्म II-B, पोलिस पेपर्स, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. क्‍लेम फॉर्म हे सहपत्रासह सामनेवाला विमा कंपनीकडे पाठविलेले आहेत. ही वस्‍तुस्थिती विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार हे शेतकरी आहेत व त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झालेला आहे हे निश्चित करुन विमा क्‍लेम रक्‍कम देणे आवश्‍यक होते. परंतु सदर कागदपत्रांचा कोणताही विचार न करता विमा क्‍लेमबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही यामध्‍ये सामनेवाला विमा कंपनीची गंभीर सेवा त्रुटी असल्‍याचे दिसून येते. सबब, सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने सदरची क्‍लेम रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारांना द्यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.   
                 
                            - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 7.12.2009 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍केप्रमाणे व्‍याज द्यावे.
 
3.    सामनेवाला  विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या  खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
 
 
 
[HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.