Maharashtra

Kolhapur

CC/10/558

Smt. Shantabai Vasant Dhere - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

R.G. Shelake.

05 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/558
1. Smt. Shantabai Vasant DhereAt Kaneri Math, Tal. Karvir, Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Hindustan Colony,Nr.Bank of India, Vardha Road, Nagpur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R.G. Shelake., Advocate for Complainant
Sou.Chhaya Jadhav/Mrs.Mugdha M. Ranade, Advocate for Opp.Party

Dated : 05 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.05.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
 
 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी
           तक्रारारांच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत सामेनवाला विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. सदर पॉलीसीचा हप्‍ता सामनेवाला कंपनीकडे शासनामार्फत अदा केला होता. सदर पॉलीसीचा नं. 181200/48/2010/119 असा आहे. तक्रारदारांचे पती दि.15.07.2009 रोजी देवदर्शनासाठी पायी चालत जात असताना पाय घसरुन पडलेने त्‍यांचे डोक्‍यास गंभीर दुखापत झालेली होती. त्‍यावेळी त्‍यांना सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे दाखल केले असता ते उपचारादरम्‍यान मयत झाले आहेत. त्‍यावेळेस त्‍यांचे शवविच्‍छेदन केले असून त्‍यामध्‍ये डोक्‍यास गंभीर दुखापत होवून झाले जखमेमुळे मयत असे डॉक्‍टरांनी घोषित केले व तसा दाखला दिला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे दि.18.11.2009 रोजी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्‍लेम फॉर्म भरुन विमा क्‍लेमची मागणी केली असता सामनेवाला विमा कंपनीने सदर क्‍लेमबाबत आजअखेर काहीही कळविलेले नाही. क्‍लेम दाखल केलेनंतर सामनेवाल विमा कंपनीकडे वेळोवेळी फोनद्वारे तसेच ऑफिसमध्‍ये जावून चौकशी केली असता क्‍लेम मंजूर होईल असे आश्‍वासन दिले. परंतु, आजअखेर तक्रारदारांच्‍या क्‍लेमबाबत सामनेवाला यांनी काहीही कळविलेले नाही. सबब, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना विमा क्‍लेमची रक्‍कम रुपये 1 लाख द.सा.द.शे.15 टक्‍के व्‍याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा/वकिल फी रुपये 3,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत भरुन दिलेला क्‍लेम फॉर्म, 7/12 उतारा, वारसा डायरी उतारा, पोलीस पंचनामा, मृत्‍यू दाखला, श्‍वविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, सामनेवाला यांना दिलेले पत्र इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी मयत वसंत सदाशिव ढेरे यांचे मृत्‍युनंतर एक वर्षानी म्‍हणजेच मुदत संपलेनंतर क्‍लेमसंबंधी कागदपत्रे नगापूर ऑफिसला दि.16.07.2010 रोजी पाठविली आहेत. सदर क्‍लेमबाबत शहानिशा सुरु असताना असे दिसून आले की, मयत वसंत सदाशिव ढेरे यांना लिव्‍हर सिरॉसिसचा आजार होता. त्‍यामुळे पॉलीसीची अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर करणेत आला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(5)        या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचे युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकणेत आले. तक्रारदारांच्‍या पतीस दि.15.06.2009 रोजी दि.15.07.2009 रोजी अपघात होवून त्‍यांचे डोक्‍यास गंभीर दुखापत झाली व त्‍यांना सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे दाखल केले होते. त्‍याबाबत एफ.आय.आर. ही पोलीस स्‍टेशनला दिलेला आहे. त्‍याची प्रत प्रस्‍तुत कामी दाखल आहे. तसेच, सदरप्रमाणे सामनेवाला कंपनीस क्‍लेम पाठविलेबाबत क्‍लेम-फॉर्मची प्रतही दाखल केली आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता गांवकामगार तलाठी यांनी प्रमाणित करुन दि.01.07.2010 रोजी क्‍लेम फॉर्म पाठविलेचे दिसून येते. तसेच, तलाठयाचे प्रमाणपत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्‍लेम मंजूर केला किंवा कसे याबाबत कोणतेही कागदपत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली नाहीत. तसेच, तक्रारदारांना तसे कळविले असलेबाबतही कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. याचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना याबाबत कोणत्‍याही प्रकारे सुचना दिलेची दिसून येत नाही. प्रस्‍तुत प्रकरणी शवविच्‍छेदन अहवाल दाखल केलेला आहे. तसेच, सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्‍हापूर यांनी तक्रारदारांच्‍या पतीचा दिलेला मृत्‍युचा दाखला दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये मृत्‍यूचे कारण हे “Shock due to Head Injury with liver cirhosis” असे नमूद आहे. सामनेवाला विमा कंपनीने क्‍लेम निश्चित करीत असताना पॉलीसीचा मुळ हेतू विचारात घेणे आवश्‍यक असते. व्‍यापक दृष्‍टीकोन ठेवून पॉलीसीच्‍या मूळ हेतूस बाधा येणार नाही अशा पध्‍दतीने क्‍लेम निश्चित करणे आवश्‍यक होते. तक्रारदारांच्‍या पतीच्‍या मृत्‍युचे कारण केवळ लिव्‍हर सिरॉसिस असे नमूद नाही.   तक्रारदारांच्‍या पतीच्‍या मृत्‍यूचे कारणामध्‍ये डोक्‍यास मार लागून असाही अर्थ निघू शकतो. त्‍यामुळे सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना दिलेल्‍या पॉलीसीचा क्‍लेम नामंजूर करुन पॉलीसीच्‍या मुळ हेतूस बाधा आणलेली आहे व सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रक्‍कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्‍त) द्यावेत व सदर रक्‍कमेवर क्‍लेम दाखल दि. 01.07.2010 रोजीपासून द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.       

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT