Maharashtra

Kolhapur

CC/11/49

Smt. Savita Dilip Borge - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar

13 May 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/49
1. Smt. Savita Dilip BorgeYavluj Tal. PanhalakolhapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Local Br. Manager Kanchanganga 204 E Station Road KolhapurKolhapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
P.R.Ingale , Advocate for Opp.Party

Dated : 13 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

 

निकालपत्र :- (दि.13/05/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत दिलीप हिंदूराव बोरगे यांची शासनामार्फत सामनेवालांकडे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2009/939 असा आहे. सदर पॉलीसीच्‍या कालावधीतच दि.17/10/2008 रोजी तक्रारदारांचे पती दिलीप हिंदूराव बोरगे हे त्‍यांचे पडळ गावचे हद्दीतील कुरण नावाचे शेतामध्‍ये बैलगाडी जात नसलेने त्‍यांनी बैलगाडी रोडवरच थांबवून लोखंडी खाट डोक्‍यावर घेऊन शेताकडे निघाले असता जवळचे शेत हे त्‍यांचे शेतापेक्षा 5 फुट उंचावर असलेने खाली उतरताना पाय निसटून ते खाट अंगावर घेऊन खाली पडले. यामध्‍ये त्‍यांचे मानेवर लोखंडी खाटेचा जोरदार तडाखा बसलेने मानेपासून खालचे पूर्ण अंग सुंद व निष्‍क्रीय झाल्‍याने खालच्‍या शरीराची हालचालच बंद पडली. त्‍यानंतर त्‍यांना सिटी हॉस्पिटल कोल्‍हापूर येथे उपचाराकरिता दाखल करण्‍यात आले.  परंतु बरेच उपचार केलेनंतर डॉक्‍टरांनी कोणताही उपयोग होणार नाही असे सांगितलेने त्‍यांना सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे हलविण्‍यात आले व तेथे दि.25/10/2008 ते 11/11/2008दरम्‍यान उपचार चालू होते. परंतु सदर उपचारांचा आता कोणताही परिणाम रुग्‍णावर होणार नाही असे डॉक्‍टरांनी सांगितलेने नाईलाजास्‍तव त्‍यांना घरी आणले असता त्‍याच दिवशी मध्‍यरात्रीचे सुमारास त्‍यांचा मृत्‍यू झाला.   तदनंतर तक्रारदारांनी योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे न्‍याययोग्‍य क्‍लेमची मागणी केली तेव्‍हापासून सामनेवाला यांनी सदर क्‍लेमबाबत कोणतेही उत्‍तर कळविलेले नव्‍हते व नाही. तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केलेनंतर दि.22/10/2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट हे कागदपत्र 10 दिवसांमध्‍ये जमा करावे अन्‍यथा क्‍लेम फाईल बंद करणेत येईल असे तक्रारदारास कळवले.
 
           वास्‍तविक तक्रारदार या अडाणी, अशिक्षीत विधवा स्‍त्री असून त्‍यांना सामनेवाला अथवा शासकीय अधिका-यांमार्फत शेतकरी विमा योजनेच्‍या अटी व नियमांची कोणतीही माहिती कधीही देण्‍यात आलेली नव्‍हती व नाही. तसेच त्‍यांचे पती मयत दिलीप हिंदूराव बोरगे हे दवाखान्‍यामधून घरी आणल्‍यानंतर मध्‍यरात्री मयत झाले. अशा परिस्थितीमध्‍ये गावीच त्‍यांचे अंत्‍यसंस्‍कार केलेने त्‍यांचे इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट असे करणे जमले नाही. परंतु दिलीप हिंदूराव बोरगे यांचा मृत्‍यू अपघाती असलेबाबतचे आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे क्‍लेम फॉर्मसोबत जोडून वेळेत क्‍लेम सामनेवालांकडे दाखल केला होता. पंरतु सामनेवाला यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य व पारदर्शी क्‍लेम नाकारलेने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत मंजूर करुन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ क्‍लेम कागदपत्रांची कंपनीकडून मागणी केलेचे पत्र, त्‍यास तक्रारदाराचे खुलाशाचे पत्र युपीसी पोहोचसहीत, दिलीप बोरगे(मयत) यांचा जबाबाचा पोलीस रिपोर्ट, दिलीप बोरगे यांचा जबाब, सिटी हॉस्पिटल कोल्‍हापूर यांचे राजारामपूरी पोलीस स्‍टेशन ला अपघात विषयी पत्र, मृत्‍यूचे कारणाचा दाखला, ट्रिटमेंट समरी इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(04)       सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी,शुल्‍लक(तुच्‍छ,किरकोळ)व कोणत्‍याही कारणाशिवाय दाखल केलली असलेमुळे खर्चासह नामंजूर करणेत यावी. प्रस्‍तुतची तक्रार कायदयाचे दृष्‍टीने तसेच वस्‍तुस्थितीचा विचार करता चालणेस पात्र नाही. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कलम 2 व 3 मधील सर्व मजकूराचा सामनेवाला इन्‍कार करतात. तक्रारदाराने क्‍लेम दाखल केल्‍यावर त्‍याचे अवलोकन केले असता त्‍यात पंचनामा, पी.एम.रिपोर्ट इत्‍यादी आवश्‍यक कागदपत्रे नसलेचे आढळून आले. सदरची कागदपत्रे तक्रारदाराकडे मागणी केले असता त्‍यांनी सदरची कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्‍यामुळे सदरचा तक्रारदाराचा क्‍लेम अदयाप नाकारलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवालांना तक्रारदाराकडून रक्‍कम रु.5,000/- कॉम्‍पेंसेंटरी कॉस्‍ट देणेबाबतचा हुकूम व्‍हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?    -- होय.
2) तक्रारदार विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय?            -- होय.
3) काय आदेश?                                                              -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने दाखल केलेले दि.22/10/2010 चे सामनेवालांचे क्‍लेम नाकारलेचे पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पती दिलीप हिंदूराव बोरगे यांचा शेतकरी अपघात विमायोजनेअंतर्गत पॉलीसी क्र.1812000/48/2009/939 अन्‍वये सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविलेला होता. तक्रारदाराचे पती दि.17/10/2008 रोजी त्‍यांचे पडळ गावचे हद्दीत असणारे कुरण नावाचे शेतामध्‍ये भात झोडपणेसाठी लोखंडी कॉट डोक्‍यावरुन घेऊन जात असताना बांधावरुन पाय घसरुन पडल्‍याने लोखंडी कॉटचा मानेवर जोराचा तडाखा बसलेने जखमी झाले. त्‍यामुळे त्‍यांना प्रथम सिटी हॉस्पिटल कोल्‍हापूर व तदनंतर सी.पी.आर.हॉस्पिटल येथे नेले.
 
           सदर अपघातामुळे तक्रारदाराचे पतीचे मानेपासून खालचे अंग सुंद व निष्क्रिय झाले. सिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिका-यांने सहीशिक्‍क्‍यानिशी दिलेले ट्रिटमेंट समरीचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पतीचा MIR केलेला आहे. MRI Showed c/s :- Retrolisthesis of C5 over C6 Vertibral body signal at C5-C6 IVD C3, C7 cord oedema असे नमुद केले आहे. यावरुन तक्रारदाराचे पतीचे मानेमध्‍ये असणारे मणके C5-C6, C3-C7 यांना प्रस्‍तुत अपघातमुळे मार बसलेला आहे. तसेच मज्‍जातंतूसही मार बसलेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच पुढील उपचार करणे नातेवाईकांना शक्‍य नसलेने डॉक्‍टरांनी पेशंटला हॉस्पिटलमधून सोडले असलेचे नमुद केले आहे.
 
           तक्रारदाराची पत्‍नी ही विधवा अडाणी असून आर्थिक परिस्थिती बेताची असलेने त्‍यांनी पेशंटला सिटी हॉस्पिटलमधून हलवून सी.पी.आर.हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले. दि.25/0/2008 ते 11/11/2008 अखेर उपचार करुनही तक्रारदाराचे पती उपचारास प्रतिसाद देत नसलेने त्‍यास घरी आणलेनंतर त्‍याच दिवशी मध्‍यरात्रीचे सुमारास तक्रारदाराचे पती मयत झाले. डॉ.डी.के.हंगळे यांनी मृत्‍यू प्रमाणपत्र दिलेले आहे. त्‍यामध्‍ये Cause of death 1. Respiratory failure 2. Quadri parasis c¯Retrolisthesis of C5-6. विमाधारक सिटी हॉस्पिटलमध्‍ये असतानाच अपघाताची वर्दी राजारामपूरी पोलीस ठाणेस दिली आहे; विमाधारक जखमी दिलीप बोरगे याचा जबाब, पंचनामा दाखल प्रस्‍तुत कामी दाखल आहे.
 
           वरील विस्‍तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा घरी झाला असला तरी तो वर नमुद अपघातामूळेच झाला आहे ही वस्‍तुस्थिती दाखल वस्‍तुस्थितीजन्‍य व वैद्यकीय पुराव्‍यावरुन निर्विवाद आहे. सबब नमुद विमाधारकाचा मृत्‍यू अपघाती झाला असलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           दि.22/10/2010 चे पत्राने सामनेवाला विमा कंपनीने मरणोत्‍तर पंचनामा व शवविच्‍छेदन अहवालाची मागणी केली आहे. 10 दिवसात नमुद कागदपत्रे न दिल्‍यास दावा बंद करणेबाबत कळवले आहे.
 
           वरील परिस्थितीचा विचार करता मध्‍यरात्री तक्रारदाराचे पती मयत झालेने पी.एम.रिपोर्ट व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा झालेला नाही. तसेच तक्रारदारचे पतीचा मृत्‍यूबाबत त्‍यांचा कुणावरही वहीम नसलेने तसेच प्रस्‍तत अपघातामध्‍ये जखमी होऊन मयत झाला असलेने त्‍यांनी पी.एम.केलेला नाही ही वस्‍तुस्थिती नाकारता येत नाही. तसेच तक्रारदाराचे पतीची पॉलीसी असून त्‍यासाठी पी.एम.रिपोर्ट व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा लागतो याबाबत त्‍यांची विधवा व अडाणी पत्‍नी अनभिज्ञ आहे.तसेच सदर बाब नातेवाईकांचे अडाणीपणाने झालेली आहे ही वस्‍तुस्थिती नाकारता येत नाही.
 
           सदर कागदपत्रे अपघात सिध्‍द करणेसाठी आवश्‍यक असली तरी ती अपघात सिध्‍द करणारी एकमेव कागदपत्रे नाहीत. डॉ. हंगळे व सिटी हॉस्पिटल यांचे कागदपत्रावरुन तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यू सिध्‍द होतो.
 
           सामनेवाला यांचे दि.22/10/2010 चे पत्रास तक्रारदाराने दि.15/11/2010 रोजी पत्र पाठवून खुलासा केला आहे. तरीही वस्तुस्थितीजन्‍य पुरावा, वैद्यकीय पुरावा व पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे. तसेच तक्रारदाराचा दावा क्र.181200/48/2010/1213 प्रस्‍तुत पत्राने नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यू झालेने तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.1,00,000/- क्‍लेम नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.22/10/2010 रोजीपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.
 
मुद्दा क्र.3 :- सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत ठेवलेल्‍या त्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
                           आदेश
 
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते. 
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्‍कम    रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.22/10/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे. 
 
3)  तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT