Maharashtra

Kolhapur

CC/11/168

Smt. Satyawati Baburao Shetge. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar.

01 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/168
1. Smt. Satyawati Baburao Shetge.Parpoli, Tal. AajraKolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Lokal Branch Manager, Kanchanganga, 204 E station Road,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar., Advocate for Complainant
A.R. Kadam, Advocate for Opp.Party

Dated : 01 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 
नि का ल प त्र :- (दि.01.08.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
(1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
     तक्रारदार यांचे मयत पती बाबूराव विश्राम शेटगे यांची शासनामार्फत ’शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत पॉलिसी सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेली आहे. सदरच्‍या पॉलिसीचा क्र. 181200/42/2008/91 असा आहे. पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍ये दि. 02/06/2008 रोजी  सकाळी 12.30 वाजता तक्रारदारांचे पती शेतामध्‍ये काम करीत असताना तहान लागलेने प्‍लास्‍टीकची घागर घेऊन पिण्‍यासाठी पाणी आणण्‍यासाठी गेले असता अपघाताने पाय घसरुन पाण्‍यात बुडून मयत झाले. त्‍यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे विम्‍याची मागणी केली असता सदर विमा कंपनीने दि. 15/03/2010 रोजी ’मयताचे नावाचा जुना फेरफार नाही, 6-क, उतारा नाही व क्‍लेम कट ऑफ डेट नंतर सादर केला असलेने’  असे कारण दाखवून विमा क्‍लेम नाकारला आहे.
 
     तक्रारदार पुढे सांगतात की, तक्रारदार या अडाणी, अशिक्षित महिला असून पतीच्‍या आकस्मिक अपघाती मृत्‍यूमुळे त्‍यांचेवर मोठे संकट कोसळले आहे. सदर क्‍लेम हा शासकीय ऑफीसमधून विमा कंपनी यांचेकडे पाठविणेत आला आहे. विमा कंपनीने तांत्रिक कारण दाखवून विमा क्‍लेम नाकारला आहे. सबब,  विमा रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत विमा कंपनीने दि. 15/03/2010 रोजीचे विमा क्‍लेम नाकारलेल्‍या पत्राची प्रत व मेडीकल ऑफीसर, ग्रामीण रुग्‍णालय, आजरा यांचे सर्टीफीकेटच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्‍या तक्रारीमध्‍ये दि. 2/06/2008 रोजी सकाळी 12-30 वाजता तक्रारदारांच्‍या पतीचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला हे मान्‍य नाही. तसेच तक्रारदारांच्‍या तक्रारीमध्‍ये सामनेवाला विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवून क्‍लेम नाकारला आहे हे तक्रारदारांचे कथन मान्‍य नाही. तक्रारदारांचा क्‍लेम हा कट ऑफ डेट म्‍हणजेच दि. 15/03/2010 नंतर सामनेवाला कंपनीकडे दाखल केलेला आहे.  सदर कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे. यामध्‍ये सामनेवाला कंपनीची कोणतीही सेवा त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.        
 
(5)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला तसेच उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे.  युक्‍तीवादाचे वेळेस तक्रारदारांचे वकिलांनी तक्रारदारांचे पतीचा मृत्‍यू दि. 2/06/2008 रोजी सकाळी 12.30 वाजता  तक्रारदारांचे पती शेतामध्‍ये काम करीत असताना तहान लागलेने पिण्‍यासाठी पाणी आणण्‍यासाठी गेले असता अपघाती पाय घसरुन पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला आहे. त्‍या अनुषंगाने पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट­­­..... इत्‍यादी कागदपत्रे सामनेवाला कंपनीकडे दाखल केलेचे या मंचाचे निदर्शनास आणून दिलेले आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्‍लेम हा कट ऑफ डेट नंतर दाखल केलेला आहे या कारणास्‍तव नाकारलेला आहे. सदर वस्‍तुस्थिती विचारात घेता तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा दि. 2/06/2008 रोजी झालेला आहे. सामनेवाला कंपनीच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचा क्‍लेम हा दि. 15/11/2008 नंतर दाखल केलेला आहे. ’शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत राज्‍यातील शेतक-यांसाठी उतरविलेला आहे. महाराष्‍ट्र राज्‍यातील शेतक-यांचा अपघातामध्‍ये जखमी अथवा मृत्‍यू झाल्‍यास सामनेवाला विमा कंपनीकडून क्‍लेम रक्‍कम दिली जाते. सदरचा क्‍लेम हा राज्‍य शासनाच्‍या शेती खात्‍यामार्फत पाठविला जातो. विमा कंपनीने उल्‍लेख केलेले कट ऑफ डेट ही पॉलिसीची अट या मंचाच्‍या निदर्शनास आणून दिलेली आहे. परंतु सदरची अट ही Mandatoryनसून मार्गदर्शक स्‍वरुपाची आहे.  सबब, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्‍लेम न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्‍त विवेचनास हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे :-
 
2009 (1) CPR 302 - DELHI STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISION, NEW DELHI - General Insurance Co.Ltd. and Anr. Vs. Abhijit Saini and Anr.
 
Consumer Protection Act, 1986 - Sec.2(1)(g) - Deficiency in service - Insurance claim - Repudiation of - Vehicle insured covering risk of damage and theft - Fell into deep gorge - Plea of insurer that agent played fraud and did not deposit the premium repelled - Insurer directly liable for all acts of omission and commission of their agent - Another plea raised by appellant that report of accident was belatedly lodged - To expect a person to rush to insurer to inform about the accident in case of a serious accident beyond prudence of common man - Unless occurrence or information given by the claimant is found afflicted with mala fide or falsehood, claim cannot be rejected.
 
2010 (3) CPR 484 - CHHATTISGARH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, RAIPUR – ICICI Lombard General Insurance Co.Ltd. Vs. Smt. Rehmat Jahan & Ors.
 
Consumer Protection Act, 1986 – Sections 14(1)(d), 15 and 17 – Insurance – Damage to car in accident – Repudiation of insurance claim on the ground that damages were manipulated by insured as well as intimation was late – Appellant directed by District Forum to pay Rs.3,78,193/- with 6% interest and compensation of Rs.3,000/- and cost of Rs.700/- - Matter was reported to Police immediately after accident – Oral intimation was immediately given to Insurance Company and later on, written claim application was filed – Since registered owner of vehicle died after some time, defence taken by Insurance Company, in respect of late intimation is not tenable – Collusion between three vehicles stood proved – Award made by District Forum based on report of surveyor – No interference called for in impugned award.   पॉलिसीचा मुळ हेतू विचारात घेणे आवश्‍यक आहे. त्‍याचा मुळ हेतू विचारात न घेता सदरचा क्‍लेम नाकारलेला आहे. यामध्‍ये सामनेवाला विमा कपंनीच्‍या सेवेत त्रुटी झाल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे. तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.                    
    
                               - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि.15.03.2010 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
 
          
          
 
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT