Maharashtra

Kolhapur

CC/10/560

Smt. Jijabai Janardan Mane. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar.

07 Apr 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/560
1. Smt. Jijabai Janardan Mane.A/p Khadkewada, Tal. kagalKolhapur.Maharashtra. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Branch manager, Kanchanganga, 204 E Station Road,Kolhapur.Kolhapur.Maharashtra. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar., Advocate for Complainant
P.R.Ingle., Advocate for Opp.Party

Dated : 07 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.07/04/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.  

(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत जनार्दन गणपती माने यांची शासनामार्फत सामनेवालांकडे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2008/00091 असा आहे. सदर पॉलीसीच्‍या कालावधीतच दि.17/03/2008 रोजी तक्रारदारांचे पती जनार्दन गणपती माने यांना संकेश्‍वर जवळ पुणे बेंगलोर महामार्गावरुन मोटरसायकलवरुन जात असताना भरधाव वेगाने व बेजबाबदारपणे जाणा-या ट्रकचालकाने अचानक कोणताही थांबण्‍याचा इशारा न करता ट्रक धोकादायकरित्‍या थांबविलेने ट्रकवर मागून जोरात आदळून जागीच अपघाती मृत्‍यू झाला. तदनंतर तक्रारदारांनी आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे न्‍याययोग्‍य क्‍लेमची मागणी केली असता दि.28/01/2009 रोजी अपघातावेळी तक्रारदाराचे पतीकडे वाहन चालविणेचा अधिकृत परवाना नसलेने क्‍लेम नाकारत असलेचे कळविले आहे. 
           ब) तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, वास्‍तविक तक्रारदाराचे पती हे वाहन चालविताना नेहमी स्‍वत:जवळ वाहनाचा अधिकृत परवाना बाळगत होते व सदर अपघातावेळी देखील त्‍यांचेजवळ वाहनाचा अधिकृत परवाना होता. परंतु सदर अपघातामध्‍ये तो गहाळ झाला व तक्रारदारांना मिळून आला नाही. सामनेवाला यांनी क्‍लेम फॉर्ममध्‍ये वाहनाच्‍या परवान्‍याची मागणी केलेली नसलेने शासन प्राधिकृत अधिका-यांमार्फत तक्रारदाराकडेदेखील वाहनाच्‍या परवान्‍याची मागणी झालेली नाही. असे असतानाही सामनेवालांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेले पत्र, दाखल केले आहे.
 
(04)       सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार खोटी,शुल्‍लक(तुच्‍छ,किरकोळ)व कोणत्‍याही कारणाशिवाय दाखल केलली असलेमुळे खर्चासह नामंजूर करणेत यावी. प्रस्‍तुतची तक्रार कायदयाचे दृष्‍टीने तसेच वस्‍तुसिथ्‍तीचा विचार करता चालणेस पात्र नाही. तक्रारदाराचे पती जनार्दन गणपती माने हे दि.17/03/2008 रोजी मोटरसायकल चालवत असताना पुणे-बेंगलोर हायवे संकेश्‍वरजवळ एका ट्रक डा्यव्‍हरने वाहन चालवत असताना वेगात असताना ट्रक निष्‍काळजीपणाने अचानक थांबवल्‍यामुळे तसेच त्‍याबाबतचा कोणताही हात इशारा न दिलेने मागून येणारा तक्रारदाराचे पती नमुद ट्रकवर आदळून जागीच मृत्‍यू पावला. नमुद अपघाताबाबतची कागदपत्रे घेऊन सामनेवालांकडे क्‍लेम मागणी केली मात्र तक्रारदाराचे पतीचे वैद्य वाहन परावाना नसलेने प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारलेला आहे व प्रस्‍तुतचा क्‍लेम हा पॉलीसीच्‍या अटी व शर्ती तसेच सरकारच्‍या जी.आर.च्‍या अटी व शर्तीनुसार योग्‍य कारणास्‍तव नाकारला असलेने कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही; सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवालांना तक्रारदाराकडून रक्‍कम रु.5,000/- कॉम्‍पेंसेंटरी कॉस्‍ट देणेबाबतचा हुकूम व्‍हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ महाराष्‍ट्र शासनाचा जी.आर. क्‍लेम फॉर्म, वर्दी जबाब, एफ.आय.आर. पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादीच्‍या सत्‍यप्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?  -- होय.
2) काय आदेश?                                                           -- शेवटी दिलेप्रमाणे 
मुद्दा क्र.1:-तक्रारदाराचे पतीचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता.त्‍याचा पॉलीसी क्र.181200/42/2008/00091 असून क्‍लेम नंबर181200/42/ 2008/0001207 आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. अपघाताबाबतसुध्‍दा वाद नाही. तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघाती झालेला आहे हे क्‍लेम फॉर्म, वर्दी जबाब,एफ.आय.आर.,पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा,शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादी दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. त्‍याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो सामनेवाला यांनी दि.28/01/2009 चे पत्राने तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू वाहन चालवताना अपघात होऊन झाला. मात्र त्‍यावेळी त्‍याचेजवळ वाहन चालविणेचा अधिकृत परवाना नव्‍हता. असे दाखल कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा विमा दावा अस्विकृत करुन फाईंल बंद केलेचे कळवले आहे. 
             सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या महाराष्‍ट्र शासनाचा नमुद अपघात योजनेअंतर्गत जी.आर. चे अवलोकन केले असता दि.06/09/2008 च्‍या शासन निर्णयामध्‍ये 23(ई)(7) नंतर शासन शुध्‍दीपत्र 23(ई)(8) म्हणून नव्‍याने समाविष्‍ट करणेत येत आहे. 23 (ई) (8) जर शेतक-याचा मृत्‍यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्‍त शेतकरी स्‍वत: वाहन चालवत असेल अशा प्रकरणी वैद्य वाहन चालविणेचा परवाना सादर करणे आवश्‍यक राहीत.सदरची सुधारणा राज्‍यात सन 2008-09 करीत कार्यन्‍वयीत झालेच्‍या दिनांकापासून राहील. 
           तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यू हा दि.17/03/2008 रोजी झालेला आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवालांकडे दि.18/05/2008 रोजी क्‍लेम फॉर्म भरुन तहसिल कार्यालयाकडे दिलेला आहे. सदरचा प्रस्‍ताव दि.22/8/2008 रोजी आवक नं.1542 नुसार दाखल झालेला आहे. तसेच संकेश्‍वर पोलीस ठाणे यांचेकडून दि.17/03/008 रोजी झालेल्‍या अपघाताची तसेच एफ.आय.आर. पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा इत्‍यादीचे कन्‍नड भाषेतून मराठीत अनुवादीत केलेली प्रत दि.29/07/2008 रोजी घेतलेली आहे.  
           वरील वस्‍तुस्थितीचा विचार करता शासन निर्णय हा दि.06/09/2008 चे निर्णयानुसार वर नमुद सुधारीत अट क्र;23(ई)(8) समाविष्‍ट करणेत आलेली आहे व सदरचे शुध्‍दीपत्र दि.29/05/2009 रोजी प्रसिध्‍द करणेत आलेले आहे. प्रस्‍तुतचा जी.आर. सामनेवाला विमा कंपनीला दि.09/06/2009 रोजी प्राप्‍त झालेला आहे. तसेच प्रस्‍तुतचा वादा हा दि.28/01/2009 रोजी नाकारलेला आहे. वरील वस्‍तुस्थितीचा विचार करता प्रस्‍तुतची अट ही सामनेवाला यांनी विमा दावा नाकारलेनंतर प्रभावीत झालेली आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. 
           सामनेवाला यांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या विमा पॉलीसी व पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता नमुद पॉलीसीचया Clause VI (A) नुसार रस्‍ते अथवा रेल्‍वे अपघात झाल्‍यास एफ.आय.आर., स्‍पॉट पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, व शवविच्‍छेदन अहवाल क्‍लेमसोबत दाखल करणे आवश्‍यक आहे. सदर कागदपत्रे सामनेवालांकडे दाखल केलेली आहेत. तसेच नमुद Clause VI (A)-3 मध्‍ये Accident occurring where the motor vehicle does not have proper permit. All farmers except the one who is driving without holding proper permit should be eligible for claim. चा विचार करता वाहन चालवतेवेळी शेतक-याकडे अपघातावेळी वाहन परवान असणे गरजेचे आहे.  
           वरील अटीचा विचार करता तक्रारदाराचे पतीकडे वाहन चालवणेचा वैध परवाना होता. मात्र अपघातावेळी वाहन चालवतेवेळी प्रस्‍तुतचा परवाना त्‍याचे ताब्‍यातच होता. सदर अपघातावेळी नमुदचा परवाना गहाळ झालेला आहे.तसेच सामनेवाला यांनी नमुद वाहन परवाना पूर्ततेबाबत कधीही तक्रारदारास कळवलेले नाही. तक्रारदार ही अडाणी, अशिक्षीत, विधवा आहे. तिला सदर गहाळ झालेला वाहन परवाना दाखल करणे ही अशक्‍यप्राय गोष्‍ट आहे. तसेच आर.टी.ओ. ऑफिसकडून डुप्‍लीकेट परवाना मागणीकरता परवाना नंबर लागतो. तो नंबर असलेशिवाय नमुद परवाना उपलब्‍ध होऊ शकत नाही. वादाकरिता तक्रारदार अथवा सामनेवाला यांना आर.टी.ओ. कडून नमुद परवान्‍याची सत्‍यप्रत उपलब्‍ध होऊ शकते मात्र त्‍यासाठी परवाना नंबर आवश्‍यक असतो.प्रस्‍तुत अपघातामध्‍ये नमुद विमाधारकाचा परवाना गहाळ झालेला आहे ही वस्‍तुस्थिती नाकारता येत नाही. तसेच परवाना नंबरशिवाय आर.टी.ओ.कडून नमुद परवान्‍याची सत्‍यप्रत उपलब्‍ध होऊ शकत नाही हीही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. 
           वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीकडे वाहन चालविणेचा अधिकृत परवानाच नव्‍हता अशी वस्‍तुस्थिती दिसून येत नाही. अपघातावेळी प्रस्‍तुतचा परवाना गहाळ झालेला आहे व त्‍याचा नंबर तक्रारदारास माहिती असेल असे नाही. तसेच सदर परवान्‍याची दुबार प्रत आर.टी.ओ. कडून प्राप्‍त होण्‍यासारखी परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत सामनेवालांनी पॉलीसीचा मूळ हेतू तसेच अपघातामध्‍ये परवाना गहाळ झालेचे गृहीत धरुन तक्रारदाराचा क्‍लेम मंजूर करावयास हवा होता. तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदाराचा पारदर्शी व न्‍याययोग्‍य क्‍लेम तांत्रिक कारणास्‍तव नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यू झालेने तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.1,00,000/-क्‍लेम नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.28/01/2009रोजीपासून द.सा.द.शे.9टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्‍या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते. 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.28/01/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.  
3)  तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT