Maharashtra

Kolhapur

CC/11/128

Smt. Baykka Rajaram Mulik (Killedar) - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar

16 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/128
1. Smt. Baykka Rajaram Mulik (Killedar)Sarambalwadi, Tal. Aajra.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Local Branch Manager, Kanchanganga, 204 E Station Road,Kolhapur.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
Prasanna R. Kolekar, Advocate for Opp.Party

Dated : 16 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

नि का ल प त्र :- (दि.16/08/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
(1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
      तक्रारदारांचे मयत पती राजाराम रामु मुळीक यांची शासनामार्फत 'शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने' अंतर्गत सामनेवाला विमा कंपनीकडे पॉलिसी उतरविली आहे. सदर पॉलिसीचा क्र. 181200/48/2008/1348 असा आहे. पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍ये तक्रारदारांचे पती दि. 20/07/2008 रोजी लघवीसाठी घरातून बाहेर पडत असताना दारातील पायरीवरुन अचानक तोल जावून त्‍यांचा पाय घसरलेने ते खाली पडले व त्‍यांचे डोके पायरीवर अत्‍यंत जोरात आपटलेने त्‍यांना डोकीस जोरदार मार लागला व त्‍यांना उपजिल्‍हा रुग्‍णालय, गडहिंग्‍लज येथे नेले असता त्‍यांचेवर उपचार चालू असतानाच त्‍यांचा मृत्‍यू झाला. तक्रारदारांचे पती हे अपघातापूर्वी मानसिक व शारिरीकदृष्‍टया सक्षम होते. त्‍यांना कोणताही आजार व औषधोपचार चालू नव्‍हते.    सामनेवाला विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवून तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला व सेवा त्रुटी ठेवलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर करुन विमा क्‍लेम रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदार यांचा क्‍लेम  नाकारलेचे पत्र, वर्दी जबाब, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, अडव्‍हान्‍स सर्टीफीकेट, पंचनामा, जबाब व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्‍या पतीचा पाय घसरुन पडलेने उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल केलेले होते. तथापि, तक्रारदारांचे पतीना अधून मधून चक्‍कर येत होती. शारिरीक अस्‍वास्‍थामुळे चक्‍कर येऊन पडून मृत्‍यू झालेला आहे. पोस्‍ट मार्टेम रिपोर्टमध्‍ये मृत्‍यू हा हृदयक्रिया बंद पडलेने नमूद केले आहे.   त्‍यामुळे सदरचा मृत्‍यू हा अपघाती नसून नैसर्गिक आहे. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे क्‍लेम देय होत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.   
 
(5)   या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे.  प्रस्‍तुत प्रकरणी वर्दी जबाब, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल यांचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे पतीस डोकीस मार लागून जखम झालेली आहे. व रुग्‍णालयाच्‍या उपचारासाठी दाखल केलेले असताना औषधोपचार चालू असताना मयत झाले आहेत असा उल्‍लेख असल्‍याचे दिसून येते. तसेच त्‍या अनुषंगाने पोलिस अथॉरिटी पुढे झालेला पंचनामा यांचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पतीस पडल्‍याने त्‍यांचे डोक्‍यास मार लागल्‍याने मृत्‍यू झाला असलेबाबतचे दिसून येते. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचे पतीस शारिरीक सक्षम नव्‍हते. त्‍यांना चक्‍कर अथवा इतर आजार होता याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत कामी दाखल केलेला नाही. तसेच त्‍या अनुषंगाने कोणतेही मेडीकल पेपर्स अथवा वैद्यकीय मत यावरुन निष्‍कर्ष काढलेला नाही. कोणत्‍याही सबळ कागदपत्राअभावी सामनेवाला यांनी काढलेले निष्‍कर्ष हा अयोग्‍य असल्‍याचे दिसून येते.   या बाबींचा विचार करता तक्रारदार हे विमा क्‍लेम रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.                    
                            - आ दे श -
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 24/03/2009 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍केप्रमाणे व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला विमा  कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
          
          
 
 
 
 
 ‍
         
 
 
 
 
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT