Maharashtra

Kolhapur

CC/11/390

Smt. Aakatai Janardan Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

R G Shelke

02 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/390
1. Smt. Aakatai Janardan PatilVadkshivale Tal. Karveer Dist. Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Br. Manager 204 E Station Road Kanchanganga Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R G Shelke, Advocate for Complainant
P.R. Kolekar, Advocate for Opp.Party

Dated : 02 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

नि का ल प त्र :- (दि.02/09/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
     तक्रारदार यांचे पती जनार्दन लहू पाटील यांचा जनता व्‍यक्‍तीगत अपघात विमा या योजनेअंतर्गत विमा वटकेश्‍वर विकास सेवा संस्‍था मर्या, वडकशिवाले, ता. करवीर यांचे माध्‍यमातून सामनेवाला यांचेकडे उतरविलेला होता. विमा पॉलिसीचा क्र.  161600/47/2008/3542 असा आहे. तक्रारदारांचे पती दि. 16/05/2010 रोजी पाहुण्‍यांचे घरी जावून येतो असे सांगून कोणाशी न सांगता घरातून निघून गेले होते. त्‍यानंतर दि. 25/05/2010 रोजी तक्रारदारांचे पती हे बाचणी गावचे हद्दीतील बंगाली या नावाने ओळखणारे जवळील दुधगंगा नदीपात्रात त्‍यांचे प्रेत आढळले.   तक्रारदारांच्‍या पतीचा नदी पात्रात पाय घसरुन मृत्‍यू झाल्‍याचे कळून आले. तक्रारदारांच्‍या पतीच्‍या मृत्‍यूचे शवविच्‍छेदन केलेले आहे व त्‍यामध्‍ये पाण्‍यात बूडून मयत झाल्‍याचा दाखला ग्रामीण रुग्‍णालय, सिध्‍दनेर्ली यांनी दिलेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे मुदतीत योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रासह क्‍लेम फॉर्म भरुन दिलेला आहे. परंतु सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्‍लेम हा आत्‍महत्‍या या कारणास्‍तव बेकायदेशीरपणे दि. 10/02/2011 रोजीचे पत्राने नाकारलेला आहे. सबब, तक्रारदारांची विमा क्‍लेमची रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत  सामनेवाला कंपनीने क्‍लेम नाकारलेचे पत्र, श्री. विनायक जनार्दन पाटील यांचा वर्दी जबाब, घटना स्‍थळाचा पंचनामा,  तक्रारदार हिचे पतीचे मृत्‍यूचे अडव्‍हान्‍स सर्टीफीकेट, पी. एम. नोटस, मरणोत्‍तर पंचनामा, पोलिस अहवाल रिपोर्टस इत्‍यादींच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. 
 
(4)        सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याअन्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, पोलिस पेपर्सवरुन तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा पाण्‍यात बुडून झालेले नसून मुलाबरोबर झालेल्‍या मतभेदामुळे नदीत उडी मारुन आत्‍महत्‍या केलेली आहे. सदरचा मृत्‍यू हा आत्‍महत्‍या असल्‍याने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे. सबब, सदरची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. 
 
(5)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला तसेच उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला कंपनीचे जनता व्‍यक्‍तीगत अपघात विमा पॉलिसी ही तक्रारदारांच्‍या पतीना दिलेली होती ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा अपघाती मृत्‍यू असून सामनेवाला कंपनीने बेकायदेशीरपणे क्‍लेम नाकारला याबाबतचा उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी विहित मुदतीत क्‍लेमची मागणी केलेली आहे.   त्‍या अनुषंगाने पोलिस स्‍टेशनला एफ.आर. आय. दाखल झालेला आहे. तसेच प्रस्‍तुत प्रकरणी शवविच्‍छेदन दाखलाही दाखल झालेला आहे. या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पतीच्‍या मृत्‍यूचे कारण हे पाण्‍यात बुडून झालेला आहे ही वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा आत्‍महत्‍तेमुळे झालेला नाही यावर प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवाला कंपनीने त्‍यांचे म्‍हणणेशिवाय दुसरा कोणताही कागदोपत्री पुरावा म्‍हणून दाखल केलेला नाही. सामनेवाला विमा कंपनीने क्‍लेम निश्चित करीत असताना कोणत्‍याही प्रकारचा तपास केलेला नाही. केवळ तर्कावरुन वापर करुन तांत्रिकपणे निर्णय घेतलेला असल्‍याचे दिसून येते. यामध्‍ये सामनेवाला कंपनीची सेवा त्रुटी झाल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, तक्रारदार हे क्‍लेमची रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.                    
                           - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि.10/02/2011 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍केप्रमाणे व्‍याज द्यावे.
 
 
3.    सामनेवाला   विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT