Maharashtra

Kolhapur

CC/11/165

Krushnat Bapu Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar

14 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/165
1. Krushnat Bapu PatilKodwade, Tal. Radhanagari.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Lokal Branch Manager, Kanchanganga,204 E Station Road, Kolhapur.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
N.D.Joshi, Advocate for Opp.Party

Dated : 14 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.14/09/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           तक्रारदाराचा पशु विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:-यातील तक्रारदार यांच्‍या म्‍हैशीचा श्री पी.एन.पाटील सह.दुध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. कोदवडे ता.राधानगरी यांचेमार्फत सामनेवालांकडे विमा उतरविलेला आहे. सदर पॉलीसीचा क्र.161600/48/2010/5092 असा असून म्‍हैशीच्‍या बिल्‍लयाचा क्र.OIC/161600/37372 असा आहे. सदर तक्रारदार यांची म्‍हैस दि.04/10/2010 रोजी व्‍यायली त्‍यानंतर दि.07/10/2010 रोजी मयत झाली. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदार यांनी सामनेवालांकडे रक्‍कम रु.10,000/- इतकी विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.28/02/2011 रोजी सामनेवाला यांनी ‘’ सदर म्‍हैस मागी वर्षभर श्री संतोष पांडरंग पाटील यांचे गोठयात होती व तेथेच मयत झाली आहे व सदर म्‍हैस मृत्‍यूपूर्वी संतोष पाटील यांना विकली असल्‍याने तक्रारदाराचा दावा देय नाही.’’ असे खोटे व चुकीचे उत्‍तर देऊन तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे.
 
           वास्‍तविक तक्रारदार व त्‍यांचा लहान भाऊ संजय बापू पाटील यांचेमध्‍ये भाऊबंदकीचा वाद व वैमनस्‍य असल्‍याने तक्रारदाराचे जनावरास भावाकडून धोका उत्‍पन्‍न झाल्‍याने तक्रारदाराने त्‍यांची सदर विमाधारक म्‍हैस स्‍वत:चे मित्र संतोष पांडरंग पाटील यांचे गोठयात बांधलेली होती. तसेच, तक्रारदार यांनी सदरची म्‍हैस कोणासही विकलेली नव्‍हती. सामनेवाला यांनी क्‍लेमकरिता आवश्‍यक आहे असे सांगून को-या कागदावर तक्रारदाराची सही घेतलेली आहे. परंतु सामनेवाला यांनी प्रत्‍यक्ष तक्रारदाराचा जबाब लिहून घेतलेला नव्‍हता व नाही. सामनेवाला यांनी अत्‍यंत चुकीच्‍या कारणाने तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.10,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. तसेच दि.18/07/2011 रोजी तक्रारदारतर्फे साक्षीदार म्‍हणून श्री संतोष पांडूरंग पाटील यांचे शपथपत्र दाखल केले आहे. 
 
(4)        सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला यांनी कोणत्‍याही प्रकारची सेवेमध्‍ये त्रुटी केलेली नाही म्‍हणून सदर तक्रार अर्ज मे.मंचात चालणेस पात्र नाही. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, सदर कामी सामनेवालातर्फे डॉ. अस्‍वले यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केलेले आहे. त्‍यांच्‍या अहवालानुसार मयत म्‍हैशीच्‍या उजव्‍या कानात टॅग होता आणि म्‍हैस मालक हे डाव्‍या कानात टॅग होता असे सांगतात. तसेच कृष्‍णात पाटील यांनी त्‍यांना सांगितले की, मयत म्‍हैस ही संतोष पाटील यांच्‍या गोठयात मयत झालेली आहे. संतोष पाटील यांचा गोठा हा कृष्‍णात पाटील यांच्‍या घरापासून दुर आहे. तसेच फोटो व पोस्‍ट मार्टेमसुध्‍दा संतोष पाटील यांचे गोठयातच झाले. मयत म्‍हैस ही संतोष पाटील यांचे गोठयात गेले वर्षापासून होती व तसा जबाब दि.22/01/2011 रोजी कृष्‍णात पाटील यांनी संतोष पांडूरंग पाटील, रामचंद्र विष्‍णू वाडकर, युवराज शंकर पाटील यांचेसमक्ष लिहून दिलेला आहे. यावरुन तक्रारदार कृष्‍णात पाटील यांनी आपली म्‍हैस संतोष पाटील यांना विकलेली असलेमुळे पॉलीसीच्‍या नियमानुसार मृत्‍यूच्‍या वेळी विमेदार श्री कृष्‍णात बापू पाटील यांचे इन्‍शुरेबल इन्‍टरेस्‍ट नसलेने योग्‍य कारणासाठीच तक्रारदाराचा सदर क्‍लेम नाकारलेला आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा. तसेच तक्रारदाराकडून सामनेवाला यांना रक्‍कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी देवविणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट व तक्रारदार श्री कृष्‍णात बापू पाटील यांचा जबाब इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र.1 चे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?            --- होय.
2. काय आदेश ?                                                    --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदारचे म्‍हैशीचा विमा सामनेवाला यांचेकडे उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा क्र.161600/48/2010/5092असा असून म्‍हैशीच्‍या बिल्‍लयाचा क्र.OIC/161600/37372 असा आहे. सदर तक्रारदार यांची म्‍हैस दि.04/10/2010 रोजी व्‍यायली त्‍यानंतर दि.07/10/2010 रोजी मयत झाली. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदार यांनी सामनेवालांकडे रक्‍कम रु.10,000/- इतकी विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.28/02/2011 रोजी सामनेवाला यांनी ‘’ सदर म्‍हैस मागील वर्षभर श्री संतोष पांडरंग पाटील यांचे गोठयात होती व तेथेच मयत झाली आहे व सदर म्‍हैस मृत्‍यूपूर्वी संतोष पाटील यांना विकली असल्‍याने पॉलीसीच्‍या नियमानुसार मृत्‍यूच्‍यावेळी विमेदार श्री कृष्‍णात बापू पाटील यांचे इन्‍शुरेबल इन्‍टरेस्‍ट  नसल्‍यामुळे तक्रारदाराचा क्‍लेम सामनेवालांनी नाकारला आहे ही वस्‍तुस्थिती तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे.
 
           पॉलीसीबाबत वाद नाही. मयत जनावर म्‍हैस ही विमा उतरविलेलीच म्‍हैस होती याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा आहे तो दि.28/02/2011 चे पत्राने सामनेवाला यांनी नमुद विमा उतरविलेली म्‍हैस ही मृत्‍यूपूर्वी संतोष पाटील यांना विकलेली असलेमुळे त्‍यामध्‍ये तक्रारदाराचा इन्‍शुरेबल इंटरेस्‍ट राहिला नसलेने क्‍लेम नाकारला आहे याबाबत आहे. सामनेवाला यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट तसेच तक्रारदाराचा घेतलेला जबाब  दाखल केलेला आहे.  सदर जबाबाचे अवलोकन केले असता सदर जबाबामध्‍ये तक्रारदाराची मयत झालेली म्हैस ही सुमारे वर्षभरापासून संतोष पाटील यांचे गोठयात बांधत असलेचे नमुद केले आहे. सदर जबाबासाठी रामचंद्र विष्‍णू वाडकर व युवराज शंकर पाटील हे साक्षीदार आहेत. सामनेवालांनी सदर म्‍हैस तक्रारदाराने संतोष पाटील यास विकली असलेने क्‍लेम नाकारला आहे. मात्र तक्रारदाराचे जबाबात सदर म्‍हैस नमुद संतोष पाटील यांना विकलेबाबतची बाब नमुद नाही. तसेच तक्रारदार तर्फे संतोष पांडूरंग पाटील यांनी तक्रारदार हे त्‍यांचे मित्र आहेत. तक्रारदार व त्‍यांचा लहान भाऊ संजय बापू पाटील यांचेमध्‍ये भाऊबंदकीचा वाद असलेने तक्रारदाराचे जनावरास भावाकडून धेाका उत्‍पन्‍न झालेने नमुद विमाधारक म्‍हैस त्‍यांचे गोठयात त्‍यांचे परवानगीने बांधलेली होती व नमुद म्‍हैस मयत झाली त्‍यावेळी सदर म्‍हैशीची मालकी तक्रारदाराकडेच होती असे शपथपत्र दाखल केले आहे.
 
           वरील विस्‍तृत विवेचन व कागदपत्रांचा विचार करता नमुद विमा उतरविलेली म्‍हैस ही तक्रारदाराची मालकीची होती हे निर्विवाद आहे. सदरची म्‍हैस मयत झालेली आहे. सबब तक्रारदार सदर पशुविमा दावा मंजूर होणेस पात्र असतानाही कोणत्‍याही आधाराशिवाय सदरची म्‍हैस तक्रारदाराचे मालकीची नाही त्‍यामुळे त्‍याला इन्‍शुरेबल इंटरेस्‍ट नाही या कारणाने क्‍लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदार विमा रक्‍कम रु.10,000/- क्‍लेम नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.28/02/2011 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेने तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्‍कम रु.10,000/- (रु.दहा हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.28/02/2011 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त)अदा करावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT