Maharashtra

Kolhapur

CC/11/31

Dagdu Dnyanu Satpute - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

D.L.Chechar

26 Jul 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/31
1. Dagdu Dnyanu SatputePorle Tarf Thane, Tal. PanhalaKolhapurMaharashtra. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.204 E Station Road, Kanchanganga,KolhapurKolhapurMaharashtra.2. Chairman/Manager, Uday Sahakari Dudh Vyavsayik Sanstha Porle Tarf Thane, Tal. PanhalaKolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :D.L.Chechar, Advocate for Complainant
Chaya Jadhav , Advocate for Opp.Party

Dated : 26 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

      

 
निकालपत्र :- (दि.26/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           तक्रारदाराचा पशु विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार यांचे गोठयात रेडी तयार केलेली होती. सदर रेडीचा रंग काळा होता. गायीची शिंगे लहान टोकी होती. शेपूट गोंडा काळा होता. रेडीचे वय 17 ते 18 महिनेचे होते. सदर रेडीची कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दुध उत्‍पादक संघ लि. कोल्‍हापूर अंतर्गत किसान पॅकेज विमा पॉलीसी सामनेवाला क्र.1 कंपनीकडे सामनेवाला क्र.2 मार्फत उतरविलेली होती. सदर रेडीच्‍या कानात 7821/7017 या नंबरचा टॅग होता. सदरची रेडी तक्रारदार यांचे ताब्‍यात होती व ती दूध धंदयासाठी वापरली जाणार होती. तसेच तिचे वेळोवेळी औषधपाणीही पाहिले जात होते. सदरची रेडी ही अचानक तिचे पोट फुगलेने दि.17/04/2010 रोजी मयत झाली. मयत झालेनंतर तक्रारदार यांनी ही बाब सामनेवाला क्र.2 यांना कळविली त्‍यानंतर मयत रेडीच्‍या वस्‍तुस्थितीचा रितसर पंचनामा करणेत आला. त्‍यानंतर सामनेवाला क्र.1 यांना सदर रेडी मयत झालेचे कळवले. व गोकूळ दूध संघाचे डॉ. एस.डी.बोबडे यांनी मयत रेडीचे पोस्‍ट मार्टेम केले व रिपोर्ट दिला. त्‍यानंतर सदर रेडीची तक्रारदार यांनी गायरानात विल्हेवाट लावण्‍यात आली.
 
           त्‍यानंतर सदर रेडीची विम्‍याची रक्‍कम पॉलीसीप्रमाणे तक्रारदार यांना मिळावी म्‍हणून तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे अर्ज केला व त्‍यासोबत सर्व कागदपत्रे हजर केली. परंतु सामनेवाला क्र;1 यांनी कोणताही विचार न करता तक्रारदार यांना दि.10/12/2010 रोजी पत्र पाठवून मयत रेडीच्‍या कानात टॅग 7821/7017 हा पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, पंचनामा, व्‍हॅल्‍यूएशन, सर्टीफिकेट व क्‍लेम फॉर्म या सर्वांवर लिहीलेला नाही. मयत वासरु हया पॉलीसीमध्‍ये कव्‍हर होत नाही त्‍यामुळे क्‍लेम बंद केल्‍याचे कळवले. सदर क्‍लेम नामंजूर केलेल्‍या पत्रात मयत रेडीचे कागदपत्र तपासून पाहता मयत झालेल्‍या रेडीचे वर्णन विमा उतरवतेवेळी दिलेल्‍या साऊंडनेस सर्टीफिकेटशी जुळते आहे. तसेच विमा कंपनीकडील फोटो, कागदपत्रे तसेच मयत रेडीचा पंचनामा, पोस्‍ट मार्टेम वगैरे कागदपत्र पाहता मयत रेडी ही विमा पॉलीसीमध्‍ये वर्णन केलेली रेडी आहे हे स्‍पष्‍ट होते. सदरचा बिल्‍ला नंबर वरीलप्रमाणे पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट व क्‍लेम फॉर्म यावर डॉक्‍टरांचे नजरचुकीमुळे लिहीणेचा राहून गेला आहे. परंतु सदर बिल्‍लयाचे वर्णन, पंचनामा, पोलीस पाटील यांचा विल्‍हेवाट दाखला, पंचनाम्‍याचे फोटो, रेडीचा मृत्‍यू दाखला व गोकूळ वासरु संगोपन कार्डावर नमुद आहे. त्‍यामुळे मयत रेडी ही पॉलीसी उतरविलेली रेडीच असलेचे सिध्‍द होते. तसेच डॉ. एस.डी.बोबडे यांनी वरीलप्रमाणे नजरचुकीने झालेली चूक सामनेवाला क्र.1 यांचे अधिका-यांची समक्ष भेट घेऊन तोंडी कबूल करुनही सामनेवाला यांनी कोणतीही दाद दिलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा क्‍लेम रक्‍कम रु.5,000/-द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज, खर्चाची रक्‍कम रु.3,000/-, प्रवास खर्च व इतर खर्चाची रक्‍कम रु.1,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ रेडीच्‍या वर्णनाचे सर्टीफिकेट, पोस्‍ट मार्टेम सर्टीफिकेट, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट, गोकुळ दूध संघाचे वासरु संगोपन कार्ड, पंचनामा, डॉ. एस.डी.बोबडे यांचे सर्टीफिकेट, पशु विम्‍याबद्दल दाव्‍याचे पत्र, क्‍लेम फॉर्म मिळणेबाबतचा अर्ज, कागदपत्रे जोडलेबाबतचा अर्ज, रेडीचे पोस्‍ट मार्टेम करतेवेळचे फोटो, रेडीची विल्‍हेवाट लावलेबद्दलचा पोलीस पाटील यांचा दाखला, सामनेवाला क्र.2 दूध संस्‍थेचा दाखला, सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील मजकूर खोटा व चुकीचा असलेने सामनेवालांना मान्‍य व कबूल नाही. सदरची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नाही. सामनेवालांनी सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.
 
           वस्‍तुत: मयत वासरु हे पॉलीसीमध्‍ये कव्‍हर होत नाही. तसेच तक्रारदारांनी हजर केलेल्‍या पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, पंचनामा, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट व क्‍लेम फॉर्ममध्‍ये तक्रारदार यांनी वासरुचा बिल्‍ला नंबर लिहीलेला नाही. बिल्‍ला नंबरशिवाय वासरु किंवा इतर कोणत्‍याही जनावरांची ओळख करता येत नाही. बिल्‍ला नंबर हा आयडेन्‍टीफिकेशन करीताच असते आणि तक्रारदार यांनी मयत वासरुचे बिल्‍ला नंबर लिहीलेला नसलेने सदर क्‍लेम नामंजूर केलेला आहे. सदरची सामनेवाला यांची कृती ही कायदेशीर आहे. तक्रारदार यांनी मे. अध्‍यक्षांची दिशाभूल करणेकरिता सर्व कागदपत्रात बिल्‍ला नंबर नमुद करुन सदर कागदपत्रे मे.कोर्टात सादर केलेली आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार बेकायदेशीर व खोटी असलेने खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत किसान विकास पॅकेज पॉलीसी, क्‍लेम फॉर्म, डॉ.एस.बी.बोबडे यांनी दिलेले सर्टीफिकेट, मृत्‍यूचा दाखला, पोस्‍ट मार्टेम सर्टीफिकेट, डॉ.बोबडे यांनी दिलेले व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. दि.11/05/2011 रोजी किसान विकास पॅकेज विमा योजनेत सहभागी सभासदांची यादी, किसान विकास पॅकेज पॉलीसी, वस्‍तुस्थितीबद्दलचा पंचनामा, विल्‍हेवाट लावलेबद्दल पोलीस पाटील यांचा दाखला, मयत रेडीचे फोटो, उदय दूध संस्‍थेचा दाखला, उदय दूध संस्‍थेने क्‍लेम फॉर्म मिळणेबाबत दिलेला अर्ज, गोकूळ दूध संघाचे रेडी संगोपन कार्ड इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र.1 चे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?            --- होय.
2. काय आदेश ?                                        --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदाराचे रेडीचा विमा उतरविलेला होता. त्‍याचा पॉलीसी क्र.48/10/4052 आहे. सदर रेडी मयत झालेनंतर तक्रारदाराने दावा क्र.161600/48/11 /000286 अन्‍वये विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. सदर विमा दावा दि.10/12/2010 चे पत्राने सामनेवाला विमा कंपनीने नाकारलेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे हे दाखल व्हिजीट दिलेली पावती, सामनेवाला यांनी दाखल केलेले उदय सहकारी दूध संस्‍थेचा दाखला यावर अनुक्रमांक 17 तक्रारदाराचे नमुद असणारे नांवावरुन निदर्शनास येते. पॉलीसी दाखल आहे. पंचनामा व व्हिलेवाट दाखला यामध्‍ये नमुद रेडीचे वर्णन व टॅग नंबर 7821/7017 नमुद आहे. यावरुन तक्रारदाराचे रेडीचे पॉलीसी सामनेवालांकडे उतरविलेली होती हे सिध्‍द होते. तर सदर विमा उतरविलेली रेडी ही दि.17/04/2010 रोजी मयत झालेली आहे हे सामनेवाला यांनी दाखल केलेले फोटोग्राफ व वर नमुद कागदपत्रे तसेच क्‍लेम फॉर्म, डॉ. बोबडे यांनी दिलेले प्रमाणपत्र, मृत्‍यूचा दाखला, शवविच्‍छेदन अहवाल, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट या कागदपत्रांमध्‍ये मयत झालेल्‍या रेडीचे वर्णन व पॉलीसीमधील रेडीचे वर्णन यामध्‍ये फरक नाही. तसेच व्हिजीट पावती,पंचनामा, व्हिलेवाट दाखला,दूध संस्‍थेचा दाखला व वर नमुद कागदपत्रांवरुन विमा उतरविलेलीच रेडी मयत झालेली आहे हे निर्विवाद दिसून येते.
 
           सदर रेडीच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचा क्रमांक 7821/7017 असा आहे. सदर रेडी दि.17/04/2010 रोजी मयत झाली. रेडी मयत झालेनंतर क्‍लेमची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. दि.10/12/2010 रोजी सामनेवाला यांनी ‘’ मयत रेडीचे कानात टॅग 7821/7017 हा पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, पंचनामा, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट व क्‍लेम फॉर्म या सर्वांवर लिहीलेला नाही. मयत वासरु पॉलीसीमध्‍ये कव्‍हर होत नाही.’’ अशा कारणाने क्‍लेम नाकारला आहे. सदर बाबींचा विचार करता तक्रारदाराचे वकील श्री चेचर यांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस सदर कागदपत्रांवर नजरचुकीने बिल्‍लयाची नोंद करणेच राहून गेलेचे मान्‍य केले आहे. तसेच नंतर डॉक्‍टरांनी सदरीच बाब सामनेवाला यांना सांगितलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच नमुद रेडीच्‍या कानातील बिल्‍ला सामनेवाला यांना पाठवलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच सदर बिल्‍ला दाखल करणेबाबत तक्रारदाराने अर्ज दिलेला होता. मात्र अशाप्रकारचा बिल्‍ला दाखलच केलेला नाही त्‍यामुळे तो हजर करु शकत नसलेचे सामनेवाला यांनी म्‍हणणे दिलेले आहे. युक्‍तीवादाच्‍या वेळेस अॅड. चेचर यांनी प्रस्‍तुत बिल्‍ला सामनेवालांनी मे. मंचात आणलेला होता. मात्र सामनेवाला हे मंचाची दिशाभूल करीत असलेचे प्रतिपादन केलेले आहे. सदर बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेचे पत्राचे अवलोकन केले असता सदर पत्रामध्‍ये बिल्‍ला मिळाला नाही असे कुठेही नमुद केलेले नाही. केवळ बिल्‍ल्‍याचा नंबर वर नमुद काही कागदपत्रांवर राहून गेलेचे दिसून येते. मात्र सामनेवाला यांनी दि.11/05/2011 रोजीचे दाखल केलेले कागदपत्रांनुसार पंचनामा, विल्‍हेवाट दाखला यामध्‍ये टॅग नंबर नमुद आहे. तसेच दाखल केलेल्‍या फोटोमध्‍ये रेडीच्‍या डाव्‍या कानात बिल्‍ला दिसून येतो. याचा विचार करता केवळ डॉक्‍टरांचे चुकीमुळे बिल्‍ला नोंद करणेचे राहून गेले असले तरी अन्‍य कागदपत्रांमध्‍ये बिल्‍लयाची नोंद होती तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये नमुद विमा उतरविलेल्‍या मयत रेडीच्‍या वर्णनामध्‍ये फरक नाही. सदर कागदपत्रांआधारे सामनेवाला कंपनी प्रस्‍तुत क्‍लेम निर्णित करु शकले असते. मात्र सामनेवाला यांनी प्रस्‍तूत कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन न करता सदर त्रुटीवर बोट ठेवून तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           सबब तक्रारदाराची विमा उतरविलेली रेडी मयत झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्‍कम रु.5,000/-  (रु.पाच हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.10/12/2010 पासून ते      संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त)     अदा करावेत.
 
 
 
                          
           
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT