Maharashtra

Gondia

CC/13/9

MANRAJ GANA THAKARE - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE CO. LTD. THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI ARUNKUMAR JAISWAL - Opp.Party(s)

MR. UDAY KSHIRSAGAR

23 Jul 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/13/9
 
1. MANRAJ GANA THAKARE
R/o. KAWALEWADA, TAH. TIRORA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE CO. LTD. THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI ARUNKUMAR JAISWAL
DIVISIONAL OFFICE NO. 2, PLOT NO. 8, HINDUSTHAN COLONY, NEAR AJNI CHOWK, WARDHA ROAD, NAGPUR-15.
NAGPUR
MAHARASHTRA
2. M/S. KABAL INSURANCE BROKING SERVICES LTD. THROUGH MR. SANDEEP KHAIRNAR
FLAT NO. 1, PARIJAT APARTMENT, PLOT NO. 135, SURENDRA NAGAR, NAGPUR-15
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI THROUGH SHRI PREMESH SUKHRAM CHIMALWAR
TIRORA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)

(पारित दि. 23 जुलै, 2014)

         तक्रारकर्ता हा विद्यमान न्‍याय मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात राहात असून तक्रार दाखल करण्‍याकरिता Cause of action ही मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात घडल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वडील गणा फकीर ठाकरे यांच्‍या अपघाती मृत्‍युबद्दलचा विमा दावा विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे सादर केला असता तो मंजूर अथवा नामंजूर केल्‍याचे विरूध्‍द पक्ष यांनी न कळविल्‍यामुळे सदरहू प्रकरण नुकसानभरपाई मिळण्‍याकरिता तक्रारकर्त्याने दाखल केलेले आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्त्‍याचे वडील गणा फकीर ठाकरे यांच्‍या मालकीची मौजे कवलेवाडा, तालुका तिरोडा, जिल्‍हा गोंदीया येथे गट नंबर 698, एकूण क्षेत्रफळ 0.17 हे.आर. जमा 0.95 या वर्णनाची शेतजमीन असल्‍यामुळे ते शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये समाविष्‍ट होतात व त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नावरच कुटुंबाचे पालनपोषण होत होते. 

3.    विरूध्‍द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 2 ही विमा सल्‍लागार कंपनी आहे.  विरूध्‍द पक्ष 3 हे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्‍याचे काम करतात.

4.    दिनांक 18/12/2008 रोजी तक्रारकर्त्‍याचे वडील विहीरीतून पाणी काढत असतांना पाय घसरून विहीरीत पडले व त्‍यात त्‍यांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला.   

5.    तक्रारकर्त्‍याने वडिलांच्‍या अपघाती मृत्‍युनंतर शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी सर्व कागदपत्रांसह विमा दावा विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे सादर केला.  विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर अ‍थवा नामंजूर केल्‍याचे तक्रारकर्त्‍याला न कळविता तो प्रलंबित ठेवला.   दरम्‍यान विमा दावा प्रलंबित असतांनाच तक्रारकर्त्‍याच्‍या आईचा दिनांक 24/08/2009 ला मृत्‍यु झाला.  तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा अपघाती मृत्‍युबद्दलचा विमा दावा विरूध्‍द पक्ष यांनी निकाली न काढल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विमा दावा रक्‍कम रू. 1,00,000/- मिळण्‍यासाठी तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रू. 30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्‍यासाठी दिनांक 21/01/2013 रोजी न्‍याय मंचात तक्रार दाखल केली आहे.  

6.    तक्रारकर्त्‍याची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 22/01/2013 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 24/01/2013 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1 व 2, 3 यांनी हजर होऊन त्‍यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. 

      विरूध्‍द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा जबाब दिनांक 24/03/2013 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या जबाबात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केली असून तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा झालेला मृत्‍यु हा अपघात नसून त्‍यांनी आत्‍महत्‍या केलेली आहे असे पोलीस पेपर्सवरून सिध्‍द होते.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा अर्ज दिनांक 22/03/2010 रोजी खारीज केल्‍याचे पत्र तक्रारकर्त्‍याला पाठविले.  करिता विरूध्‍द पक्ष 1 यांनी सेवेतील कुठलीही त्रुटी न केल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द प्रकरण खारीज करण्‍यात यावे.    

      विरूध्‍द पक्ष 2 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा जबाब  दाखल केला असून तो पृष्‍ठ क्र. 67 वर आहे.  विरूध्‍द पक्ष 2 यांनी त्‍यांच्‍या जबाबात असे म्‍हटले आहे की,  विरूध्‍द पक्ष 2 ही सल्‍लागार कंपनी शासनाकडून कुठलाही मोबदला न घेता ते काम करतात.  विरूध्‍द पक्ष 2 यांनी त्‍यांच्‍या जबाबातील परिच्‍छेद क्र. 4 मध्‍ये असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍यामुळे त्‍याचा विमा दावा नामंजूर केला व तसे पत्र दिनांक 22/03/2010 रोजी वारसदारास पाठविले.  करिता सदरहू प्रकरण त्‍यांच्‍याविरूध्‍द खारीज करण्‍यात यावे.   

      विरूध्‍द पक्ष 3 यांनी त्‍यांचा जबाब दिनांक 04/03/2013 रोजी दाखल केला असून त्‍यात त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, विरूध्‍द पक्ष 2 यांनी सदरहू प्रकरण आत्‍महत्‍येचे असल्‍याने नामंजूर झाल्‍याचे जिल्‍हा कृषि अधिकारी, गोंदीया यांना पाठविलेल्‍या यादीमध्‍ये देण्‍यात आलेले आहे.  त्‍यानुसार शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचा प्रस्‍ताव नामंजूर करण्‍यात आला.

7.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेचे परिपत्रक  पृष्‍ठ क्र. 15 वर दाखल केलेले असून विमा पॉलीसीची प्रत पृष्‍ठ क्र. 27 वर दाखल केलेली आहे.  त्‍याचप्रमाणे विमा दावा अर्ज पृष्‍ठ क्र. 28 वर, अकस्‍मात मृत्‍यु खबरी बुक पृष्‍ठ क्र. 34 वर, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा पृष्‍ठ क्र. 36 वर, घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 38 वर, पोस्‍टमार्टेम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 40 वर, मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 48 वर, 7/12 चा उतारा पृष्‍ठ क्र. 49 वर, फेरफार नोंदवही पृष्‍ठ क्र. 53 वर, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्‍ठ क्र. 54 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.  

      तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी तक्रारकर्त्‍याचे शपथपत्र दिनांक 17/06/2014 ला दाखल केले असून त्‍यात त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍यामुळे दावा फेटाळल्‍याचे पत्र न मिळाल्‍याचे म्‍हटले आहे.  तसेच पोलीस दस्‍तऐवजात तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे सांगितले नाही असे म्‍हटले आहे.             

8.    तक्रारकर्त्‍याचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद मंचासमोर सादर केला.  तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याने विमा दावा खारीज केल्‍याबद्दल कुठलाही पुरावा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही तसेच विरूध्‍द पक्ष यांनी पोलीसांच्‍या दस्‍तऐवजानुसार आत्‍महत्‍येचा निष्‍कर्ष काढणे चुकीचे आहे व संपूर्ण कागदपत्रासह रितसर दावा दाखल करून सुध्‍दा तक्रारकर्त्‍याचा दावा अर्ज फेटाळणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे सदरहू प्रकरण मंजूर करण्‍यात यावे.   

9.    विरूध्‍द पक्ष 1 चे वकील ऍड. आय. के. होतचंदानी यांनी दिनांक 17/06/2014 रोजी पुरसिस दाखल केली की, विरूध्‍द पक्ष 1 यांचा जबाब हाच लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावा.  तसेच त्‍यांनी दिनांक 17/06/2014 रोजी तोंडी युक्तिवाद केला.  युक्तिवादात त्‍यांनी असे म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे F.I.R. तसेच घटनास्‍थळ पंचनाम्‍यामध्‍ये पोलीसांना तक्रारकर्त्‍याने सांगितले होते.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍याची प्रथमदर्शनी कबुली दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍याचा सबळ पुरावा ग्राह्य धरून विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा खारीज करणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी नाही. 

10.   तक्रारकर्त्‍याचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्‍ही पक्षांनी केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे काय?

नाही

2.

तक्रारकर्ता शेतकरी वैयक्तिक अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

नाही

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

- कारणमिमांसा

11.   तक्रारकर्त्‍याने पोलीस स्‍टेशन तिरोडा येथील F.I.R. ची प्रत पृष्‍ठ क्र. 34 वर दाखल केली आहे.  तक्रारकर्त्‍याने घटना झाल्‍यानंतर लगेचच दिलेल्‍या F.I.R. मध्‍ये पोलीसांना असे सांगितले की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांना पोटाचा गंभीर आजार होता व त्‍यामुळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे.  तक्रारकर्त्‍याने सदरहू F.I.R. वर सही सुध्‍दा केलेली आहे.  तक्रारकर्त्‍याने घटना घडल्‍यानंतर लगेचच F.I.R. देणे व त्‍यात केलेले कथन हे प्रथमदर्शनी कथन असल्‍यामुळे तसेच F.I.R. हा चौकशीचा मुख्‍य आधार असल्‍यामुळे व त्‍या आधारेच संपूर्ण पोलीस यंत्रणा व फौजदारी प्रक्रियेद्वारे तपास केल्‍या जातो.  तक्रारकर्त्‍याने F.I.R. मध्‍ये त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे कथन हे सकृतदर्शनी पुरावा म्‍हणून ग्राह्य धरल्‍या जाऊ शकते.  F.I.R. हा Substantive Evidence असून त्‍यामध्‍ये समाविष्‍ठ असलेली माहिती ही विरूध्‍द पक्ष यांनी Independent Evidence द्वारे जर Rebut केल्‍या गेली नसेल तर F.I.R. मधील कथन केलेली fact ही relevant fact मानल्‍या जाऊन ती Admission धरल्‍या जाऊन त्‍या आधारावर ती घटना मान्‍य केल्‍याचे सिध्‍द होते.       

12.   तक्रारकर्त्‍याने पोलीसांनी दिनांक 19/12/2008 रोजी तयार केलेला घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 38 वर दाखल केलेला आहे.  त्‍यामध्‍ये सुध्‍दा मृतकाने पोटाच्‍या त्रासामुळे आत्‍महत्‍या केल्‍याचे फिर्यादीने पंचासमक्ष सांगितले असे नमूद केले आहे.  तक्रारीमध्‍ये दाखल केलेले पोलीस स्‍टेशनचा F.I.R. व घटनास्‍थळ पंचनामा हे Public document असल्‍यामुळे ते पुरावा म्‍हणून ग्राह्य धरल्‍या जाऊ शकतात.  तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ क्र. 40 वर दाखल केलेल्‍या पोस्‍ट मार्टेम रिपोर्टमध्‍ये Cause of death ही drowning अशी दाखविलेली असल्‍यामुळे सदरहू document हे corroborative असल्‍यामुळे  या सर्व कागदपत्रांवरून असे सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आजाराला कंटाळून आत्‍महत्‍या केलेली आहे.     

13.   तक्रारकर्त्‍याने अकस्‍मात मृत्‍यु खबर कलम 174 फौजदारी प्रक्रिया यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांना पोटाचा आजार होता व ते नेहमी औषधे घेत होते तसेच तक्रारकर्त्‍याचे वडील हे पोटाच्‍या आजाराने खूप त्रासले होते.  त्‍यामुळे पोटाच्‍या गंभीर आजारामुळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केली हे त्‍यांच्‍या मरणाचे कारण आहे असा रिपोर्ट व जबाब तक्रारकर्त्‍याचे त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या स्‍वाक्षरीने पोलीस स्‍टेशनमध्‍ये दिलेला आहे.  फौजदारी प्रकरणामध्‍ये एखाद्या व्‍यक्‍तीने दिलेली Admission ही दिवाणी स्‍वरूपाच्‍या दाव्‍यामध्‍ये admissible आहे.  Indian Evidence Act च्‍या Sec. 17 व 18 प्रमाणेः-      Admission  म्‍हणजे

(1)  “An admission is best form of evidence of facts admitted & requires no further  Proof.”

(2)  “Admitted fact need not be proved”.

            Where in a case the party produces documents containing admissions the documents can be permitted to use them as substantive evidence in the case and then the onus would be on opposite parties to establish that the admissions are not binding on them.

(3)   What party himself admits to be true may reasonably be presumed to be so and until the presumption is rebutted, the fact admitted must be taken to be established (SC) AIR 1977 SC 1724 –

            The burden of proving that the admission is wrong is on the party making it.

(4)  Admission is substantive evidence even though the parties are not confronted with the statement its weights however is a matter of consideration of the leno. 

(5)      माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या Mh.L.J. (SC) 2008 (3) 531 या न्‍यायनिवाड्यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, “Admission is best evidence against person giving it”.

14.   तक्रारकर्त्‍याने दिलेला F.I.R. हा प्रथमदर्शनी रिपोर्ट असून तो substantive evidence ग्राह्य धरल्‍या जातो.  तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा मृत्‍यु ज्‍या परिस्थितीत झालेला आहे त्‍याबाबत पोलीस यंत्रणेचा घटना घडल्‍याचा तपशील व घटनाक्रम नमूद करणे हे प्रमुख कर्तव्‍य पोलीस यंत्रणेचेआहे व पोलीसांनी लावलेला गुन्‍हा हा अंतिम नसून त्‍यामध्‍ये Amendment करण्‍याचा अधिकार Code of Criminal Procedure नुसार Judicial Authority ला कायद्याने दिलेला आहे  पोलीस यंत्रणेने आत्‍महत्‍या केल्‍याचा गुन्‍हा सदरहू प्रकरणामध्‍ये न नोंदविणे म्‍हणजे ती आत्‍महत्‍या होत नाही हे म्‍हणणे चुकीचे ठरेल.  पोलीस यंत्रणेने दाखल केलेल्‍या चार्जशीटमधील चार्ज हा Trial सुरू असतांना किंवा संपण्‍यापूर्वी केव्‍हा पण Amendment केल्‍या जाऊ शकतो.  तसेच पोलीसांनी पोलीस पेपर्समध्‍ये लावलेला चार्ज हा संपूर्णतः final  व  conclusive नसतो.  सदरहू प्रकरणामध्‍ये परिस्थितीजन्‍य पुराव्‍यानुसार तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी आत्‍महत्‍या केली हे म्‍हणणे सिध्‍द होत असल्‍यामुळे तसेच विरूध्‍द पक्ष यांना सदरहू प्रकरणात कुठलाही Independent Evidence देण्‍याची आवश्‍यकता नसल्‍यामुळे तसेच पोलीस स्‍टेशनच्‍या कागदपत्राद्वारे सकृतदर्शनी आत्‍महत्‍या आहे हे सिध्‍द होत असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा मृत्‍यु हा आत्‍महत्‍या केल्‍याने झाला असून तो अपघात नाही असे मंचाचे मत आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्ता शासनाच्‍या शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र नाही.     

      करिता खालील आदेश.             

-// अंतिम आदेश //-

1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.    खर्चाबाबत कुठलाही आदेश नाही. 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.