Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/10/30

Jagdishchandra V Khajuria - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co Ltd - Opp.Party(s)

27 Jun 2011

ORDER


ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
Complaint Case No. CC/10/30
1. Jagdishchandra V Khajuria2, Alap, Nehru Road, Vileparle (E), Mumbai 57 ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co LtdShreepal Complex, 2nd Floor, M G Road, Ghatkopar (W), Mumbai 86 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. S P Mahajan ,PRESIDENTHONABLE MR. G L Chavan ,Member
PRESENT :

Dated : 27 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्‍हाण, सदस्‍य                   ठिकाणः बांद्रा
 
 
निकालपत्र
 
तक्रारीचे संक्षिप्‍त स्‍वरुप खालीलप्रमाणेः-
 
           तक्रारदार हे मेसर्स जस्‍मीन इंपेक्‍स एजन्‍सीचे मालक आहेत. हा व्‍यवसाय कमिशन एजंट म्‍हणून स्‍वतःचा उदरनिर्वाह चालविण्‍यासाठी करतात. या व्‍यवसायात त्‍यांना फार मोठा नफा किंवा उत्‍पन्‍न मिळत नाही. कमिशन एजंट हा कमी उत्‍पन्‍न मिळणारा स्‍वयंरोजगार असल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. तक्रारदाराने त्‍याच्‍या स्‍वयंरोजगार व्‍यवसायाच्‍या संरक्षणासाठी सामनेवाले विमा कंपनीकडून शॉपकिपर पॉलीसी घेतली. ही पॉलीसी दि.31.07.2005 पर्यंत वैध होती, त्‍याचा क्र.2005-1939 असा होता. या पॉलीसीचे वेळोवेळी नूतनीकरण करण्‍यात आले होते. 
 
2          सन-2005 च्‍या 26 जुलैला मुंबईमध्‍ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्‍टी झाली होती, त्‍यामुळे संपूर्ण मुंबईत या अतिवृष्‍टीमुळे पूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली होती. तक्रारदार ज्‍या ठिकाणी त्‍याच्‍या मालाचा साठा करून ठेवला होता, त्‍या ठिकाणी अतिवृष्‍टीच्‍या पाऊसामुळे तुंबलेल्‍या पाण्‍यामुळे तक्रारदाराचा माल पाण्‍यामध्‍ये बुडून निकामी झाला. याप्रमाणे, तक्रारदाराचे लॉंडरी सोप, अगरबत्‍ती, इत्‍यादी माल पाण्‍यात बुडून राहिल्‍यामुळे त्‍याचे जबरदस्‍त नुकसान झाले. ही गोष्‍ट त्‍यांनी दि.04.08.2005 रोजी सामनेवाले यांच्‍या निर्दशनास आणली व एकूण मालाच्‍या नुकसानीची रक्‍कम रु.62,661/- असल्‍याचे त्‍यांना कळविले. या करिता, नुकसानभरपाईच्‍या मागणीपत्रासोबत आवश्‍यक ते कागदोपत्री दस्‍तऐवज दाखल केला. तक्रारदाराने मागणी क्र.122300/48/2006/ 454 अन्‍वये दि.10.10.2005 रोजी रितसर रु.54,290.12पैसेची मागणी यांचेकडे दाखल केली. तक्रारदारांच्‍या वरील मागणीनुसार सामनेवाले यांनी नुकसानभरपाईची रक्‍कम रु.28,377/- तक्रारदाराला देण्‍याचे प्रस्‍तावित /मान्‍य केले. परंतु तक्रारदाराला ही तुटपुंजी रक्‍कम मान्‍य नसल्‍यामुळे ती रक्‍कम घेण्‍याचे नाकारले. त्‍यांनी सामनेवाले यांची विनंती अमान्‍य केली. सामनेवाले यांनी पॉलीसीप्रमाणे नुकसानभरपाईची रक्‍कम तक्रारदाराला दिलेली नाही, यामध्‍ये त्‍यांच्‍या सेवेत कमतरता असल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे.
 
3          त्‍यानंतर, तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे संपर्क साधून सदर प्रकरण मार्गी लावण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न केले परंतु यासाठी तक्रारदाराला प्रतिसाद मिळालेला नाही. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास झाला. सामनेवाले यांना तक्रारदाराने वकीलामार्फत नोटीस पाठविली, त्‍याची प्रत सोबत जोडण्‍यात आली आहे. या नोटीसला सामनेवाले यांचेकडून प्रतिसाद न मिळाल्‍यामुळे आणि सामनेवाले यांचेकडून विमा पॉलीसीनुसार भरपाईची रक्‍कम न दिल्‍यामुळे तक्रारदाराने या प्रकरणी त्‍याला न्‍याय मिळावा म्‍हणून या मंचासमोर, दि.02.07.2008 रोजी तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे विनंत्‍या केल्‍या.
 
अ    सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाईपोटी रक्‍कम  रु.54,290.12पैसे व्‍याजासह मिळावी.
ब    सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रास, छळकरिता रक्‍कम रु.10,000/- मिळावी तसेच या अर्जाचा खर्च अनुषांगिक दाद आहे.
 
4          सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. सदरहू तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशिर व या मंचासमोर चालणारी नसल्‍यामुळे ती खर्चासह रद्द करण्‍यात यावी अशी सामनेवाले यांची विनंती आहे. तक्रारीत आरोपीत केल्‍याप्रमाणे, तक्रारदाराला फारसे नुकसान झालेले नाही व त्‍याकरिता, त्‍यांनी कोणताही कागदोपत्रीं पुरावा दाखल केला नाही. जे नुकसान झाले, त्‍यासाठी तक्रारदार स्‍वतः जबाबदार आहेत. सामनेवाले यांचे कामकाज विमा कायद्यातील तरतुदीनुसार करण्‍यात येते. त्‍यानुसार, तक्रारदाराच्‍या मागणीप्रमाणे नुकसानभरपाईची रक्‍कम रु.28,377/- सर्वेअरच्‍या अहवालाप्रमाणे देण्‍याचे मान्‍य करण्‍यात आले. परंतु ती रक्‍कम तक्रारदाराने स्विकारली नाही, यामध्‍ये सामनेवाले यांच्‍या सेवेत कमतरता नाही. तक्रारदाराने मागणी केलेली रक्‍कम रु.54,290/- सामनेवाले यांचेकडून नाकारण्‍यात आली, कारण सर्वेअरच्‍या अहवालानुसार, ही रक्‍कम सामनेवाले तक्रारदाराला देऊ शकत नाहीत. हा अहवाल सामनेवाले यांचेवर बंधनकारक आहे. त्‍यानुसार, रक्‍कम रु.28,377/- देण्‍याचे मान्‍य करण्‍यात आले. परंतु ती रक्‍कम तक्रारदाराने स्विकारलेली नाही. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून शॉप किपर्स् इन्‍शुरन्‍स पॉलीसी घेतली होती व ती त्‍या कालावधीत वैध होती हे त्‍यांनी नाकारले नाही. 
 
5          सामनेवाले यांनी सर्वेअरचा अहवाल लक्षात घेऊन, त्‍यांनी निर्देशित केल्‍याप्रमाणे, तक्रारदार यांच्‍याकडून आलेल्‍या मागणीची छाणणी व तपासणी करुन त्‍यानुसार, तक्रारदार यांना रु.28,377/- एवढीच रक्‍कम देण्‍यासाठी सामनेवाले यांची तयारी आहे. या व्‍यतिरिक्‍त अधिकची रक्‍कम सामनेवाले म्‍हणजे तक्रारदार यांना देण्‍यास असमर्थ आहेत. त्‍यामुळे सदर तक्रारीतील मागणी सामनेवाले यांचेकडून नाकारण्‍यात आली. त्‍यामुळे सदरहू तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी असे सामनेवाले यांची विनंती आहे. 
 
6          तक्रार अर्ज, त्‍यासोबत जोडण्‍यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, सामनेवाले यांची कैफियत, इत्‍यादी कागदपत्रांचे पाहणी व अवलोकन करुन पाहणी व वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकला.
 
7          तक्रारदाराने तक्रारीसोबत सामनेवाले यांचेकडून घेतलेल्‍या विमा पॉलीसीची प्रत जोडली आहे. विमा पॉलीसीचा कालावधी ऑगस्‍ट, 2004 ते जुलै, 2005 असा आहे. तक्रार अर्जात नमूद केलेली दुर्घटना ही दि.26.07.2005 रोजी अतिवृष्‍टीमुळे घडलेली आहे. तक्रारदाराने ज्‍या ठिकाणी त्‍याचा माल साठवून ठेवलेला होता, त्‍या ठिकाणी अतिवृष्‍टीमुळे साठलेल्‍या पाण्‍यात संबंधित माल बुडून तक्रारदाराचे बरेच नुकसान झाले. सामनेवाले यांचेकडून मालाच्‍या भरपाईच्‍या संरक्षणार्थ घेतलेल्‍या विमा पॉलीसीप्रमाणे, ही नुकसानभरपाई मिळावी, म्‍हणून तक्रारदाराने दि.10.10.2005 रोजी मागणी बिल सामनेवाले यांचेकडे दाखल केले. या मागणी बिलामध्‍ये नुकसानभरपाईची तपशीलवार माहिती अभिलेखीत केलेली आहे. त्‍याप्रमाणे, तक्रारदाराने विमा पॉलीसीला अनुसरुन, रक्‍कम रु.54,290.12पैसे एवढी रक्‍कम नुकसानभरपाईपोटी मिळावी अशी मागणी केली होती. परंतु सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाईची रक्‍कम रु.28,377/- देण्‍याचे प्रस्‍तावित केले ही रक्‍कम तक्रारदाराने नाकारली. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे, सामनेवाले यांनी त्‍यांची फसवणूक केलेली असून त्‍यांच्‍या सेवेत कमतरता आहे.
 
8          तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडून घेतलेल्‍या शॉपकिपर इन्‍शुरन्‍स पॉलीसीचा क्र.2005-1939 असा होता. या पॉलीसीचे वेळोवेळी नूतनीकरण करण्‍यात आले होते, म्‍हणजेच दि.26.07.2005 च्‍या अतिवृष्‍टीच्‍या साठलेल्‍या पाण्‍यात तक्रारदाराचा माल बुडल्‍यामुळे त्‍याचे जबरदस्‍त नुकसान झाले त्‍यावेळी विमा पॉलीसी अस्तित्‍वात होती. या नुकसानभरपाईसाठी तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून घेतलेल्‍या विमा संरक्षणाप्रमाणे, नुकसानभरपाईची रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदाराला देणे हे त्‍यांचेवर बंधनकारक आहे.
 
9          तक्रारदाराने तपशीलवार माहिती नमूद करुन दि.10.10.2005 रोजी मागणी देयक सामनेवाले यांना दाखल केले. या मागणी देयकात नुकसानभरपाईच्‍या रक्‍कमेची रु.54,290/- ची मागणी केलेली आहे. सामनेवाले यांनी या प्रकरणी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती करुन तक्रारदाराच्‍या अतिवृष्‍टीच्‍या साठलेल्‍या पाण्‍यामुळे जे नुकसान झाले त्‍याची छाननी व तपासणी करुन सर्व्‍हेअरकडून अहवाल घेतला. मात्र, या अहवालाची प्रत सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरासोबत दाखल केलेली नाही. या अहवालात सर्व्‍हेअरने तपशीलवार मुद्दे नमूद करुन निश्चित वस्‍तुस्थिती काय होती या विषयीचा अहवाल नमूद केला असल्‍याचे नाकारता येणार नाही, त्‍यामुळे हा अहवाल या मंचाच्‍या अवलोकनार्थ सामनेवाले यांनी दाखल करणे ही त्‍यांची जबाबदारी होती. या अहवालावर अवलंबून व या अहवालानुसार, तक्रारदाराला सामनेवाले यांचेकडून त्‍यांच्‍या दि.17.03.2006 च्‍या पत्रान्‍वये रक्‍कम रु.28,377/- देण्‍याचे मान्‍य केले आहे असे दिसून येते. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या दि.17.03.2006 च्‍या पत्रांत सर्व्‍हेअरने नुकसानीची रक्‍कम रु.61,169.03पैसे एवढी निर्धारीत केलेली आहे असे म्‍हटले आहे. या पत्रांत सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या कथित अहवालात नमूद केल्‍याप्रमाणे, रु.15,292/- व रु.10,000/- एवढयां रक्‍कमा वजाती केल्‍या आहेत व निव्‍वळ नुकसानभरपाई रु.28,377/- नमूद केलेली आहे. परंतु या रक्‍कमां कोणत्‍या कारणांस्‍तव वजाती कराव्‍या लागल्‍या, याबाबतची कारणमिमांसा व त्‍याचे स्‍पष्‍टीकरण या पत्रामंध्‍ये नमूद केलेले नाही आणि सर्व्‍हेअरने जो तपशीलवार अहवाल सामनेवाले यांना दिलेला आहे, त्‍याची प्रत मंचाच्‍या अवलोकनार्थ सामनेवाले यांनी दाखल केलेली नाही, त्‍यामुळे वजाती रक्‍कमा कोणत्‍या कारणामुळे दाखविण्‍यात आल्‍या. याचा स्‍वयंस्‍पष्‍ट खुलासा पत्रांवरुन कळून येत नाही. त्‍यामुळे त्‍याच्‍या योग्‍य-अयोग्‍यते बाबत योग्‍य तो खुलासा झालेला दिसून येत नाही. सर्व्‍हेअरने नुकसानभरपाईच्‍या रक्‍कमेचे निर्धारण केलेले असून त्‍याप्रमाणे ही रक्‍कम रु.61,169.03पैसे म्‍हणजेच रु.61,169/- एवढी आहे. वर नमूद केलेल्‍या वस्‍तुस्थितीनुसार सामनेवाले हे शॉपकिपर्स इन्‍शुरन्‍स वैध पॉलीसीनुसार, तक्रारदाराला त्‍याच्‍या नुकसानभरपाईपोटीची रक्‍कम रु.61,169/- या टप्‍प्‍यापर्यंत देऊ शकत होते. तक्रारदाराने दि.10.10.2005 च्‍या त्‍यांच्‍या मागणीपत्रांत मालाच्‍या नुकसान भरपाईपोटी रु.54,290/- ची मागणी केली आहे, त्‍यामुळे ही आकडेवारी व सर्व्‍हेअरने निर्धारित केलेली आकडेवारी लक्षात घेता, तक्रारदाराची संपूर्ण मागणी सामनेवाले यांनी मंजूर करायला पाहिजे होती परंतु त्‍यांनी त्‍यापेक्षा कमी मंजूर केली ही त्‍यांच्‍या सेवेत न्‍यूनता आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला रक्‍कम रु.28,377/- देऊ केली होती परंतु तक्रारदाराने ती घेण्‍याचे नाकारले व सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.        
                                     
10         मंचाचे मते, तक्रारदाराला रु.54,290/- ही योग्‍य नुकसानभरपाई आहे. त्‍यावर सामनेवाले यांनी वाजवी दराने व्‍याज द्यावे. खालील आदेश न्‍यायाच्या हिताच्‍या दृष्‍टीने योग्‍य आहे. तक्रारदाराला सामनेवाले यांच्‍या या कृतीमुळे मानसिक त्रास, छळ, शारिरीक त्रास झालेला नाही असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे या कारणांपोटी सामनेवाले यांनी तक्रारदाराला रक्‍कम रु.2,000/- द्यावेत व या अर्जाचा खर्च रु.1,000/- द्यावा असे मंच आदेश करीत आहे.
 
           उक्‍त विवेचन लक्षात घेता, या प्रकरणी मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)              तक्रार क्र.30/2010 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
 
(2)              सामनेवाले यांनी तक्रारदाराला रक्‍कम रु.54,290/- नुकसानभरपाई द्यावी व त्‍यावर द.सा.द.शे.9 दराने दि.17.03.2006 पासून रक्‍कम फिटेपावेतो त्‍याला व्‍याज द्यावे.
 
(3)              सामनेवाले यांनी तक्रारदाराला या तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा, या अर्जाचा खर्च रु.1,000/- द्यावा व स्‍वतःचा खर्च सोसावा.
 
(4)              आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं दोन्‍हीं पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

[HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT