जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 103/2008. प्रकरण दाखल तारीख - 11/03/2008 प्रकरण निकाल तारीख - 24/07/2008 समक्ष - मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष.(प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. चंद्रकांत गणेशराव देशमुख अर्जदार. वय वर्षे 50, धंदा मजुरी, रा.सुनिल नगर बळीरामपुर ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. दि. ओरिएन्टंल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक संत कृपा मार्केट नांदेड गैरअर्जदार 2. दि. ओरिएन्टंल इन्शुरन्स कंपनी लि. क्षेञिय कार्यालय मेफेअर टॉवर, पहिला मजला वाकडेवाडी पूणे-मुंबई रोड, शिवाजी नगर, पूणे 411005. अर्जदारा तर्फे वकील - अड. अभय चौधरी गैरअर्जदारा तर्फे वकील - अड. जी.एस. औढेंकर निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिल्याबददल अर्जदाराने ही प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे नांदेड येथे राहत असून त्यांचा मयत मूलगा कूणाल चंद्रकांत देशमूख हा शिवाजी विद्यालय नांदेड येथे शिक्षण घेत होता. विद्यार्थीचा गैरअर्जदार यांच्याकडे राजीव गांधी विद्यार्थी सूरक्षा योजने अंतर्गत रु.30,000/- चा विमा काढलेला होता. तो मिञासोबत गोदावरी नदीच्या काठावर पोहायला गेला असता दि.27.6.2005 रोजी अपघाताने मृत्यू पावला. त्यांची खबर पोलिसांना देण्यात आली, त्यांनी पंचनामा केला व मयताचे पोस्ट मार्टम केले. परंतु अर्जदार यांना विमा सूरक्षा योजने अंतर्गत माहीती नसल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांना कळविले नाही. पण त्यांना यांची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना दि.23.5.2006 रोजी लेखी अर्ज देऊन सदर घटनेची माहीती दिली व विमा खर्च मिळावा अशी मागणी केली. परंतु गैरअर्जदारानी त्याची फारसी दखल घेतली नाही. नंतर दि.19.9.2007 रोजी गैरअर्जदारानी आवश्यक त्या कागदपञाची पूर्तता न केल्यामुळे दावा रदद केला असल्याचे कळविले. अर्जदाराने सर्व कागदपञ घेऊन गैरअर्जदाराना दिली व विमा रक्कम मिळावी अशी मागणी केली परंतु गैरअर्जदारानी कोणतीच काळजी घेतली नाही. त्यामुळे सर्व कागदपञ देऊनही गैरअर्जदारानी दावा मंजूर केला नाही त्यामुळे त्यानी सेवेत ञूटी केली आहे याबददल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांची मागणी अशी आहे की, विमा रक्कम रु.30,000/- गैरअर्जदाराकडून व्याजासहीत मिळावेत, तसेच मानसिक ञासाबाबत व नूकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व तक्रार खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी त्यांनी विनंती केली. गैरअर्जदार यांना मंचाने नोटीस पाठविल्यावर ते वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपला लेखी जवाब दाख केला. त्यांचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज चूकीचा असून खोटया आहे. त्यांची तक्रार ही मूदतीत नाही त्यामुळे ती फेटाळावी. घटना दि.27.5.2005 रोजी घडली असून दावा हा दि.13.3.2008 रोजी दाखल केलेला आहे, त्यामूळे दावा मूदतीअभावी फेटाळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने दिलेले कारण हे कायदयाची माहीती नाही हे काही सबळ कारण नाही. अर्जदाराने दाव्याची कागदपञ वेळेवर दिली नाही त्यामुळे त्यांचा दावा नामंजूर करण्यात आलेला आहे. अर्जदाराने घटना घडल्यानंतर दावा हा सात दिवसांच्या आंत दाखल करणे आवश्यक होते तसेच कागदपञ दाखल करणे आवश्यक होते ते अर्जदाराने केलेले नाही म्हणून दावा नामंजूर केलेला आहे. तसेच गैरअर्जदार म्हणतात की तक्रार अर्ज जनतेच्या पैशाशी संबंधीत असल्यामुळे तक्रार अर्ज खर्चासहीत नामंजूर करावा. त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिली नाही म्हणून तक्रार अर्ज फेटाळावा. अर्जदारांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ दाखल केले आहे, तसेच मयताचे मृत्यूपञ, कंपनीला पञव्यवहार केल्याची पञ, अपघाती विमा योजना, एफ.आय. आर., पोस्ट मार्टम रिपोर्ट, हजेरी पट, पेपरमध्ये वृत, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत.गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून श्री. प्रकाशसिंग राजपूत यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली तसेच त्यांनी मेमोरन्डंम ऑफ अंडरस्टडींग, अर्जदाराने दिलेले पञ दि.19.9.2007, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले कागदपञ बारकाईने तपासून व दोन्ही पक्षकारांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय होय 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय होय. 3. अर्जदार हे गैरअर्जदाराकडून आर्थिक नूकसानी पोटी रक्कम मिळण्यास पाञ आहेत काय होय. 4. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले कागदपञ, व गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जवाबासोबत दाखल केलेली विमा पॉलिसी व इतर कागदपञे यांचा विचार करता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचा मूलगा कूणाल चंद्रकांत देशमूख हा शिवाजी विद्यालय नांदेड येथे शिक्षण घेत होता. दि.27.6.2005 रोजी साईबाबा मंदीर येथे दर्शनासाठी व खेळण्यासाठी गेला असता तेथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे अर्जदार यांनी दाखल केलेला मृत्यू दाखल्यावरुन स्पष्ट होत आहे. सदरची घटना घडल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे वेळोवेळी पञ पाठवून विद्यार्थासाठी राजीव गांधी विद्यार्थी सूरक्षा योजने अंतर्गत येणा-या विमा रक्कमेची मागणी केली. त्यावेळी गैरअर्जदार यांनी दि.19.9.2007 रोजी अर्जदार यांना सात दिवसांत गैरअर्जदार यांच्याकडे क्लेम फॉर्म न पाठविल्यामूळे त्यांची फाईल बंद करण्यात आली असे अर्जदार यांना कळविले आहे ही बाब दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत त्यांचा प्रस्तूत प्रकरण सादर करण्यासाठी एक वर्ष उशिर का झाला या बाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी दि.7.9.2006 रोजीचे शपथपञ दाखल केलेले आहे. त्यानुसार अर्जदार यांचा एक मूलगा सदरची घटना घडण्यापूर्वी अचानक जळून वारला. त्यानंतरही दूसरी घटना घडल्यानंतर शासनाची मदत मिळणार किंवा नाही ही बाब अर्जदार हे निरक्षर असल्याने त्यांना माहीती नव्हती. त्यामुळे गैरअर्जदार यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यास एक वर्ष उशिर झाला आहे असे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या शपथपञाचा विचार केला असता अर्जदार यांच्या घरामध्ये लागोपाठ त्यांच्या मूलाचे मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे. तसेच अर्जदार हे निरक्षर असल्याने त्यांनी शपथपञामध्ये नमूद केलेली कारणे योग्य व वास्तव असेच आहेत.गैरअर्जदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये अर्जदार यांनी घटना घडल्यानंतर सात दिवसाचे आंत त्यांच्याकडे क्लेम करणे आवश्यक होते परंतु अर्जदार यांनी तसे न केल्याने त्यांचा दावा नामंजूर केलेला आहे असे म्हटले आहे. तसेच दाव्याची पडताळणी करण्याकरिता शाळेने हजेरीपट, बोनाफाईड, पी. एम. रिपोर्ट, मृत्यूचे प्रमाणपञ, दिलेले नाही असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत अर्जदार यांनी राजीव गांधी विद्यार्थी सूरक्षा योजना क्लेम फॉर्म, शाळा सोडल्याचा दाखला, हजेरी पट, पी. एम. रिपोर्ट, मृत्यूचा दाखला इत्यादी कागदपञे दाखल केलेली आहेत. त्यामुळे गैरअर्जदार यांच्या म्हणण्यामध्ये काहीही अर्थ उरत नाही. अर्जदार यांनी आवश्यक ती कागदपञ गैरअर्जदार यांच्याकडे विमा रक्कम मिळण्यासाठी देऊनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम दिलेली नाही म्हणजेच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये ञूटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र. 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.3 ः- अर्जदार यांनी उपलब्ध कागदपञाची पूर्तता गैरअर्जदार यांच्याकडे करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा क्लेम दि.19.9.2007 रोजी कोणतेही योग्य व पूरेसे कारण नसताना क्लेल नाकारला आहे. त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांच्याकडून मंजूर विमा क्लेम रक्कमेवर दि.19.9.2007 पासून आर्थिक नूकसानीपोटी 9% दराने व्याज मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र. 4 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे सर्व कागदपञाची पूर्तता करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्लेमची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी सदरच्या मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली आहे. त्याप्रमाणे खर्चही करावा लागला आहे. त्यामुळे अर्जदार हे मानसिक ञासापोटी व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ, व त्यांनी दाखल केलेले कागदपञ, त्यांनी दाखल केलेले वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ व त्यांच्या तर्फे केलेला यूक्तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व त्यांची कागदपञ आणि त्यांचे वकिलांनी केलेला यूक्तीवाद यांचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. आजपासून 30 दिवसांचे आंत, 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम रु.30,000/- दयावी. 2. सदर विमा मंजूर रक्कमेवर दि.19.9.2007 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9% दराने व्याज दयावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक ञासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च म्हणून रु.1000/- दयावेत. 4. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती सुजाता पाटणकर ) ( श्री.सतीश सामते ) सदस्या प्रभारी अध्यक्ष जे.यू.पारवेकर लघूलेखक |