Maharashtra

Kolhapur

CC/10/598

Smti.Givakka Gangaji Sadake. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co Ltd.Through Local Branch Manager. - Opp.Party(s)

Shital M.Potdar.

19 Mar 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/598
1. Smti.Givakka Gangaji Sadake.A.P.Narewadi.Tal - Gadhinglaj.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co Ltd.Through Local Branch Manager.204 E, Kanchanganga.Station Road. Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital M.Potdar., Advocate for Complainant
A.R.Kadam , Advocate for Opp.Party

Dated : 19 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

निकालपत्र :- (दि.19/03/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) तक्रारदारचे पती गंगाजी सोमान्‍ना सडाके यांचा शासनामार्फत व्‍यक्‍तीगत शेतकरी अपघात योजनेखाली विमा उतरविलेला होता. त्‍याचा विमा पॉलीसी क्र.181200/48/2008/91 असा आहे. विमा कालावधीत तक्रारदाराचे पतीचा डॉगबाईट मुळे दि.28/02/2008 रोजी अपघाती मृत्‍यू झालेला आहे. मृत्‍यूपूर्वी काही दिवस अगोदर शेतामध्‍ये काम करत असताना तक्रारदाराचे पतीस कुत्रा चावला होता. त्‍याचेवर सी;पी.आर.हॉस्पिटल,कोल्‍हापूर येथे उपचार सुरु होते. त्‍यास रेब्‍बीज झालेचे निष्‍पन्‍न झाले होते. उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झालेला आहे. योग्‍य त्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.31/03/2009 रोजी क्‍लेमसोबत पोलीस रिपोर्ट पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट व प्रमाणित फेरफार जोडले नसलेने क्‍लेम नाकारलेचे कळवले आहे. तक्रारदार या अडाणी अशिक्षीत असून सदर योजनेच्‍या अटी व नियमांची माहिती सामनेवाला यांनी त्‍यांना कधीही दिलेली नव्‍हती. तिचेकडून पतीस कुत्रा चावलेनंतर पोलीसांत वर्दी देणेचे राहून गेले तसेच मयत विमाधारकास रेब्‍बीज झालेमुळे डॉक्‍टरांनी पोस्‍ट मार्टेम केलेले नाही. यामध्‍ये डॉक्‍टरांची कोणतीही चूक नाही. सामनेवाला कंपनीने अत्‍यंत चूकीच्‍या तांत्रिक कारणांचा आधार घेऊन तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य व पारदर्शी क्‍लेम नाकारुन सेवात्रुटी केलेमुळे प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह मंजूर व्‍हावा. तक्रारदारास सामनेवालांकडून क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- व सदर रक्‍कमेवर दि.28/05/2008 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(04)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र, सी.पी.आर.हॉस्पिटल डिस्‍चार्ज कार्ड, मृत्‍यूचा दाखला, मेडिकल केस रेकॉर्ड इत्‍यादी  कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(05)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवा त्रुटी केली नसलेने प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच सदर तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येत नाही. तक्रारदाराने कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोंकिंग सर्व्‍हीस प्रा. लि. यांना आवश्‍यक पक्षकार केलेले नाही.त्‍यामुळे प्रस्‍तुतचे तक्रारीस नॉन जॉइन्‍डर ऑफ नेसेसरी पार्टीजचा बाध येत असलेने चालणेस पात्र नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, क्‍लेम सोबत आलेल्‍या कागदपत्रांची छाननी केली असता प्रस्‍तुतचा विमा दावा हा गंगाजी सोमान्‍ना सडके याच्‍या अपघाती मृत्‍यू बाबत असून तक्रारदाराने अथवा कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने शवविच्‍छेदन अहवाल दिला नाही. बराच काळ वाट पाहूनही प्रस्‍तुतची कागदपत्रे न आलेने क्‍लेम नाकारलेला आहे. प्रस्‍तुतचा क्‍लेम योग्‍य कारणास्‍तव नाकारलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(06)       सामनेवाला यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(07)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?   --- होय.
2) तक्रारदार हा विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?       --- होय.
3) काय आदेश ?                                                             --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- तक्रारदारचे पती गंगाजी सोमान्‍ना सडाके यांचा शासनामार्फत व्‍यक्‍तीगत शेतकरी अपघात योजनेखाली विमा उतरविलेला होता. त्‍याचा विमा पॉलीसी क्र.181200/48/2008/91असा आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. विमा कालावधीत तक्रारदाराचे पतीचा डॉगबाईटमुळे दि.28/02/2008 रोजी अपघाती मृत्‍यू झालेला आहे.  अपघाती मृत्‍यू झालेचे दाखल वैद्यकीय कागदपत्रे व मृत्‍यूचा दाखला यावरुन निदर्शनास येते. तक्रारदाराचे पतीस कुत्रा चावलेमुळे दि.29/01/008 रोजी उपचारासाठी दाखल केलेले होते. दि.30/01/008 रोजी त्‍यांना डिस्‍चार्ज दिलेला आहे. तदनंतर वेळोवेळी फेरतपासणी केलेली आहे. उपचारादरम्‍यान नमुद तक्रारदाराचे पतीचा दि.28/02/2008 रोजी रेब्‍बीजमुळे मृत्‍यू झालेचा मृत्‍यू दाखला प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. तसेच मेडिकल केस रेकॉर्डवरुन सदर वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम पोलीस रिपोर्ट व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट कागदपत्रांची पूर्तता केली नसलेने तसेच प्रमाणीत फेरफाराची प्रत सादर केली नसलेने नाकारलेला आहे.
 
           तसेच कबाल इनशुरन्‍स कंपनी ही मध्‍यस्‍थीचे काम करत असलेने व त्‍यांनी त्‍यांचेकडील सर्व कागदपत्रे सामनेवालांकडे पाठविलेली आहेत. तसेच विमा रक्‍कम देणेची जबाबदारी सामनेवाला यांची असलेने तक्रारदाराने कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोंकिंग सर्व्‍हीस प्रा. लि. यांना आवश्‍यक पक्षकार केलेले नाही हा सामनेवालांचा मुद्दा हे मंच फेटाळत आहे.
 
           वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता रेब्‍बीज झालेल्‍या शवाचे कधीही शवविच्‍छेदन केले जात नाही. कारण सदर रोगग्रस्‍त व्‍यक्‍तीच्‍या शवामध्‍ये तसेच घाम, मल मुत्र व लाळ यामध्‍ये प्रस्‍तुत रेब्‍बीजचे जंतू जीवीत असतात. शवविच्‍छेदन केल्‍यास ते हवेमध्‍ये पसरु शकतात व निरोगी व्‍यक्तीस त्‍याची बाधा होऊ शकते. त्‍यामुळेच रेब्‍बीज होऊन मयत झालेल्‍या व्‍यक्‍तीचे शवाचे विच्‍छेदन केले जात नाही. यास वैद्यकीय शास्त्रीय आधार आहे. सामनेवाला विमा कंपनीकडे वैद्यकीय तज्ञांचे पॅनेल असते. ते याबाबत मत घेऊ शकले असते. अशी वस्‍तुस्थिती असतानाही शवविच्‍छेदन अहवालाची केलेली मागणीची पूर्तता करणे शक्‍यच नाही. तसेच तक्रारदाराचे पत्‍नीही पतीच्‍या मृत्‍यूनंतर असहाय्य व निराधार झालेली आहे तसेच ती अडाणी व अशिक्षीत आहे. कुत्रा चावलेनंतर फिर्याद देणे व पोलीस रेकॉर्ड करणे याबाबत अनभिज्ञ आहे. तसेच प्रस्‍तुत योजनेच्‍या अटी व शर्तीबद्दल तिला माहिती नाही. या परिस्थितीचा विचार करता फिर्याद ही अपघाताचे एकमेव सबळ पुरावा नाही. याबाबत कितीतरी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे पूर्वाधार आहेत. तसेच सामनेवालाने फेरफाराच्‍या प्रमाणीत प्रतीची मागणी केलेली आहे. याचा विचार करता प्रस्‍तुतचा विमा हा शासनामार्फत उतरविलेला व तो शेतकरी असलेची खात्री करुनच त्‍याचा विमा उतरविलेला आहे. सबब अशा परिस्थितीत सामनेवाला कंपनीने केलेल्‍या प्रस्‍तुत कागदपत्रांच्‍या पूर्ततीच्‍या मागण्‍या या निर्णायक स्‍वरुपाच्‍या नसून दिशादर्शक आहेत.   
 
           वरील विस्‍तृत विवेचन व वैद्यकीय परिक्षणांचा व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू रेब्‍बीजमुळे झालेला आहे. सबब प्रस्‍तुतचा मृत्‍यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच खालील पूर्वाधाराचा विचार घेत आहे.
I(2005) CPJ 523 UTTARANCHAL STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION DEHRADUN – Narendra Singh Bhasin Vs National Insurance Co. Ltd.-Appeal No.899-2003 Decided on 06.01.2005-Consumer Protection Act,1986-Section 15-Insurance-Accident policy-Insured fell in bathroom, received severe head injury, died-Claim repudiated by company treating death as natural death-Non-lodging of FIR and not conducting post mortem not fatal for case-Information to company delayed as complainant did not know about policy-No deliberate intention on part of complainant proved- FIR and post mortem report necessary only to prove accident-Contention right to declare death as accidental or natural on judicial body or authorized medical institution, not acceptable-Any doctor can see haemorrhage, excessive bleeding and possibility of death due to accident-Insured died in accidental death, proved-Risk fully covered under policy-Company liable.       
 
           विमा योजनेचा मूळ हेतू विचारात न घेता तसेच दाखल वैद्यकीय पुरावा व परिस्थितीचा विचार न करता निव्‍वळ तांत्रिक कारणास्‍तव प्रस्‍तुतचा विमा दावा नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
 
मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारला आहे. तसेच तक्रारदार या विमाधारकाच्‍या पत्‍नी असलेचे त्‍या बेनेफिशरी आहेत. सबब तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.1,00,000/-क्‍लेम नाकारले तारखे पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासहीत मिळणेस पात्र आहेत.
 
मुद्दा क्र.3 :- सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्‍याय व योग्‍य क्‍लेम चुकीच्‍या कारणास्‍तव नाकारलेमुळे तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.31/03/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT