Maharashtra

Kolhapur

CC/10/599

Ranba Rukmana Gade. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co Ltd.Through Local Branch Manager. - Opp.Party(s)

Shital M.Potdar.

07 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/599
1. Ranba Rukmana Gade.A/p,Satawane.Tal - Chandgad.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co Ltd.Through Local Branch Manager.204 E, Kanchanganga.Station Road. Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital M.Potdar., Advocate for Complainant
Sou N.D.Joshi, Advocate for Opp.Party

Dated : 07 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.07/02/2011)  (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(01)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे..  तक्रारदारचे वकील व सामनेवालांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
                          
(02)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) प्रस्‍तुत सामनेवाला ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून तक्रारदाराचे म्‍हैशीचा विमा सामनेवालांकडे पॉलीसी क्र.181100/48/2008/2238 असून बिल्‍ला क्र.OIC/KOP/103207असा आहे. प्रस्‍तुतची म्‍हैस दि.22/05/2008 रोजी आजारी पडून मयत झाली. आवश्‍यक ती सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे रक्‍कम रु.12,0000/- इतक्‍या विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.28/08/2009रोजी सामनेवाला यांनी ‘’जनावरांच्‍या कानातील बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासोब नाही, विमा करताना जनावराचा फोटो दिलेला नाही व ओरिजनल पी.एम.रिसीट नाही. त्‍यामुळे क्‍लेम नाकारत आहे.’’ असे खोटे व चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेला आहे. तसेच प्रस्‍तुत क्‍लेम बाबत निर्णय घेणेसाठी सामनेवालांनी जवळजवळ एक वर्षाचा कालावधी घेतलेला आहे. सबब सामनेवालांच्‍या या सेवात्रुटीमुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन क्‍लेम रक्‍कम रु.12,000/- दि.22/08/2008 पासून ते संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/-सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.  
 
(03)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ क्‍लेम नाकारलेचे पत्र, जनावराचा शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यूचे प्रमाणपत्र, क्‍लेम फॉर्म, पॉलीसी रिसीट, पंचनामा, गजानन दुध संस्‍थेचा तसेच गोकूळ दुध संघाचा दाखल इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(04)        सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही हे दाखल वस्‍तुस्थितीवरुन निर्विवाद आहे. कलम 1 मधील मजकूर मान्‍य केलेला आहे. तक्रारदाराचे जनावराचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. त्‍याचा पॉलीसी क्र.181100/48/2008/2238 असून बिल्‍ला क्र.OIC/KOP/103207 असा आहे. कलम 2 व 3 मधील मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम योग्‍य कारणास्‍तव नाकारुन क्‍लेम फाईल बंद केलेली आहे. कारण जनावराच्‍या कानाचा बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासहीत नव्‍हता. तसेच प्रपोजल फॉर्मवेळी नमुद म्‍हैशीचा फोटो दिलेला नव्‍हता व जनावराचा मूळ शवविच्‍छेदन अहवालही दिलेला नव्‍हता. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा क्‍लेम हा योग्‍य कारणास्‍तव नाकारलेला असलेने सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्‍य करता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराकडून सामनेवालांना कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विंनती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेले नाहीत.
 
(06)        तक्रारदाराची तक्रार दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?        --- होय.
2) तक्रारदार हा विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?          --- होय.
3) तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय? --- होय.
4) काय आदेश ?                                        --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराचे म्‍हैशीचा विमा त्‍यांचेकडे उतरविलेचे मान्‍य केलेले आहे. तसेच प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारलेचेही प्रतिपादन केलेले आहे. सबब विमा पॉलीसीबाबत वाद नाही. दाखल कागदपत्रांनुसार तक्रारदाराचे म्‍हैशीचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. त्‍याचा पॉलीसी क्र.181100/48/2008/ 2238 असून बिल्‍ला क्र.OIC/KOP/103207 असा आहे.
 
           नमुद म्‍हैस दि.22/05/2008 रोजी आजारी पडून मयत झालेली आहे. त्‍याबाबत मयत म्‍हैशीचा शवविच्‍छेदन अहवाल व मृत्‍यूचे प्रमाणपत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. प्रस्‍तुतची म्‍हैस Severe pneumonia and Acute typaney  या कारणाने मयत झालेचे प्रस्‍तुत शवविच्‍छेदन अहवालावर नमुद केलेले आहे. तसेच मृत्‍यू दाखल्‍यावरही नमुद केलेले आहे. शवविच्‍छेदन अहवाल तसेच कॅटल व्‍हॅल्‍युएशन सर्टीफिकेट व मृत्‍यू दाखल्‍यावर नमुद म्‍हैशीचे वर्णन व नमुद म्‍हैस मयत झाली त्‍यावेळी तिच्‍या कानामध्‍ये बिल्‍ला क्र.OIC/KOP/103207असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. तसेच नमुद म्‍हैशीची किंमत रु.12,000/- नमुद केलेली आहे. नमुद टॅग हा म्‍हैशीच्‍या डाव्‍या कानात होता. तसेच प्रस्‍तुतची म्‍हैस ही सात वर्षे वयाची व काळया रंगाची शिंगे पाठमोरे बाहेर कडून आत वळलेली, शेपूट गोंडा पांढरा अशा वर्णनाची होती. नमुद वर्णन हे मृत्‍यू दाखला, शवविच्‍छेदन अहवाल तसेच विमा दावा व पॉलीसी रिसीट तसेच पंचनामा व गजानन सह.दुध संस्‍था, गोकुळ दुध संघ यांचा दाखला यावर नोंद आहे. सबब वर्णनाबाबत कोणताही वाद नाही.
 
           दाखल पशु विमा दावा फॉर्मवरील नोंद तारखेनुसार तक्रारदाराने दि.06/06/2008 रोजी सामनेवालांकडे विमा रक्‍कमेची मागणी केलेली होती. सामनेवाला यांनी दि.28/08/2009 रोजी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेला आहे. प्रस्‍तुत क्‍लेम नाकारणे जनावराच्‍या कानातील बिल्‍ला हा कानाच्‍या तुकडयासहीत नव्‍हता, विमा उतरवितेवेळी जनावराचा फोटो दिलेला नव्‍हता. व ओरिजनल पी.एम.रिसीट नव्‍हती या कारणास्‍तव नाकारलेला आहे.
 
           याचा विचार करता तक्रारदाराने क्‍लेम दाखल केल्‍यानंतर कागदपत्रांच्‍या अनुषंगाने जर काही त्रुटी असतील तर सदर कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत विमा कंपनीकडून कळवले जाते. तसे सामनेवाला विमा कंपनीने कळवलेचे कागदपत्र प्रस्‍तुत प्रकरणी दिसून आलेले नाही व युक्‍तीवादाच्‍या वेळेस सामनेवालांच्‍या वकीलांनी तोडी कळवलेचे प्रतिपादन केलेले आहे. तसेच सदरची बाब लेखी कळवले नसलेचे मान्‍य केलेले आहे. सामनेवाला यांनी प्रस्‍तुत ओरिजनल पी.एम.रिसीट या कागदपत्रांची मागणी करुन प्रस्‍तुंतचा क्‍लेम निर्णीत करता आला असता तसे सामनेवालांनी केलेले नाही. तसेच प्रस्‍तुत प्रकरणी शवविच्‍छेदन अहवालाची सत्‍यप्रत दाखल केलेली आहे व त्‍यावरुन सदर म्‍हैस Severe pneumonia and Acute typaney  या कारणाने मयत झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. नमुद विमामागील मूळ हेतू विचारात न घेता निव्‍वळ तांत्रिक कारणास्‍तव विमा नाकारणे ही सामनेवालांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. विमा उतरवितेवेळी जनावराचा फोटो घेऊनच तसेच नमुद जनावराचे वर्णन इत्‍यादी बाबींची खात्री करुनच विमा पॉलीसी दिली जाते. विमा उतरवितेवेळी सदर बाबींची दखल घेणे हे सामनेवाला विमा कंपनीचे कर्तव्‍य होते. ते त्‍यांनी पार पाडलेले नाही व नमुद विमा उतरविलेले जनावर मयत झालेनंतर विमा उतरवितेवेळी जनावराचा फोटो नसलेचे कारणास्‍तव क्‍लेम नाकारणे ही सामनेवालांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे.  
 
           सामनेवाला यांनी मयत जनावराच्‍या कानातील बिल्‍ला हा कानाच्‍या तुकडयासहीत नसलेने विमा दावा नाकारलेला आहे. याचा विचार करता काया मानवी असो वा जनावराची असो त्‍याचे मृत शरीर नाशवंत आहेत. सडण्‍याची/कुजण्‍याची प्रक्रिया लगेच सुरु होते. जनावर मृत झाले तर त्‍याचा पंचनामा त्‍वरीत करुन सदर मृत शरीराची पुरुन ताबडतोब विल्‍हेवाट लावली जाते. अशा परिस्थितीत जनावराचे कानासहीत बिल्‍ला नसल्‍याने विमा दावा रक्‍कम नाकारणे हे आजच्‍या आधुनिक युगात जिथे आरोग्‍याच्‍या बाबतीत विविध रोग स्‍वाईन फल्‍यू, चिकन गुनीया, डेंग्‍यू व मलेरिया व इतर संसर्गजन्‍य रोगाचा प्रसार रोखनेसाठी शासन विविध स्‍तरावर प्रयत्‍न करीत असताना विमा कंपनी मात्र जनावराच्‍या कानासहीत बिल्‍ला पाठवणेचे अटीबाबत आग्रही राहून विमा दावा नाकारत आहे. सदरची अट ही अयोग्‍य, आरोग्‍यास घातक आहे. तसेच सदरची अट ही निर्णायक नसून मार्गदर्शक स्‍वरुपाची आहे. अशा ब-याच प्रकरणामध्‍ये सामनेवाला वकीलांनी सदर विमा दाव्‍यात जनावराच्‍या कानासहीत बिल्‍ला पाठवला असता सदर कान कुजून त्‍यात अळया पडत असलेचे प्रतिपादन केले  जाते व त्‍यामुळे काही विमा कंपन्‍यांनी प्रस्‍तुत बिल्‍ला हा मयत जनावराच्‍या कानात असलेबाबतचा फोटो व बिल्‍ला क्‍लेम फॉर्मसोबत पाठवणेबाबत आग्रही राहिलेले आहेत. नमुद सामनेवाला कंपनी विरुध्‍द असलेल्‍या ब-याच प्रकरणामध्‍ये मे. मंचाने याबाबतचे मत नोंदविलेले आहे. सदरची न्‍यायीक नोंद हे मंच घेत आहे. म्‍हैशीच्‍या वर्णनाबाबत आक्षेप नाही मात्र सर्वसाधारण इतर पशु विमा मध्‍ये मृत जनावराचा कानात बिल्‍ला असलेचा फोटो व बिल्‍ला, पंचनामा, पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, संस्‍थेचा दाखला, इत्‍यादी कागदपत्रांच्‍या आधारे विमा दावा ठरविला जातो. सबब सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           तक्रारदाराने क्‍लेम दाखल केले नंतर प्रस्‍तुत क्‍लेमबाबत तीन महिन्‍याचे आत  निर्णय घेणे क्रमप्राप्‍त असताना प्रस्‍तुत प्रकरणी निर्णय घेणेस तब्‍बल एक वर्षाचा कालावधी घेतलेला आहे. सामनेवाला यांनी मूळ विमा योजनेच्‍या हेतूस बाधा आणलेली आहे ही सामनेवालांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र. 1 मधील विस्‍तृत विवेचनानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा रक्‍कम रु.12,000/- क्‍लेम नाकारले तारखेपासून म्‍हणजेच दि.28/08/2009 पासून  ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के वयाजासह मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.3 :- सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्‍याय व योग्‍य क्‍लेम चुकीच्‍या कारणास्‍तव नाकारलेमुळे तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्‍कम रु.12,000/-(रु.बारा हजार फक्‍त) त्‍वरीत अदा करावी.सदर रक्‍कमेवर दि.28/8/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.                       
 
3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT