Maharashtra

Kolhapur

CC/10/609

Smti.Sunanda Baburao Shinde. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar.

22 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/609
1. Smti.Sunanda Baburao Shinde.A/P,Kaulge.Tal - Kagal.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co Ltd.204 E,Kanchanganga Statio Road.Kolhapur2. Kolhapur Zilla Parishad Karmachari Sah Society Ltd.-Chairman C.S.No.1149 E Saiex Extention Shahupuri Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar., Advocate for Complainant
M.S.Kulkarni , Advocate for Opp.Party Digambar Patil and Pranshant Benke, Advocate for Opp.Party

Dated : 22 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.22/02/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी संधी देऊनही त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत बाबुराव दत्‍तात्रय शिंदे यांचा कोल्‍हापूर जिल्‍हा परिषद कर्मचारी सह.सोसायटी मर्या. मार्फत सामनेवालांकडे जनता पर्सनल अॅक्सिडेंट विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसी क्र.161600/47/2008/2671 असा आहे. सदर पॉलीसीच्‍या कालावधीतच दि.28/05/2008 रोजी सायंकाळी तक्रारदाराचे पती बाबुराव दत्‍तात्रय शिंदे हे स्‍वत:चे राहते घरात जिन्‍यावरुन खाली पडलेने त्‍यांचे डोक्‍यास गंभीर मार लागला. त्‍यामुळे त्‍यांना सिटी हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे उपचार सुरु केले. परंतु औषधोपचारास त्‍यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसलेने त्‍यांना दि.10/06/2008 रोजी घरी आणले असता दि.11/06/2008 रोजी ते मयत झाले. त्‍याबाबत तक्रारदार यांनी गावातील मेडीकल ऑफिसर यांना घरी बोलाविले तेव्‍हा त्‍यांनी बाबुराव दत्‍तात्रय शिंदे यांची तपासणी करुन मृत्‍यू दाखला तक्रारदारांना दिलेला आहे. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांसह सामनेवाला क्र.2 कडे क्‍लेम फॉर्म सादर केला. त्‍यांचेव्‍दारे सदरचा क्‍लेम सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठविणेचा होता. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचेकडे वारंवार क्‍लेमबाबत चौकशी केली असता क्‍लेम अदयाप प्रलंबीत असलेचे उत्‍तर सामनेवाला क्र.2 यांचेकडून मिळाले. तसेच तक्रारदाराचे पती जिन्‍यावरुन पडलेने त्‍यांचे डोक्‍यास मार लागलेला होता त्‍यामुळे सिटी हॉस्पिटल मधील उपचाराबाबतचे ट्रीटमेंट समरी, पोलीस स्‍टेशनला दिलेली वर्दी, डेथ सर्टीफिकेट, इत्‍यादी कागदपत्रे सामनेवाला क्र.2 यांचेकडे दिलेली आहेत. परंतु दि.11/08/2010 रोजी दावा कागदपत्रे मिळाली नसलेने दावा फाईल नो क्‍लेम म्‍हणून बंद करणेत आली असलेचे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने सामनेवाला क्र.2 यांना कळवलेले आहे.
 
           ब) वास्‍तविक, तक्रारदाराचे पतीस जिन्‍यावरुन पडून डोक्‍यास गंभीर मार लागलेने अपघाती मृत्‍यू आलेला आहे. तसा तक्रारदाराचे गावातील मेडीकल ऑफिसर यांनी मृत्‍यूचा दाखला दिलेला आहे. तसेच सदर पॉलीसी व पॉलीसीच्‍या अटी व नियमावली सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी केव्‍हाही तक्रारदार यांना दिलेली नव्‍हती व नाही. तसेच तक्रारदार या अशिक्षित असून पतीच्‍या अपघाती मृत्‍यूने त्‍यांचे मनावर फार मोठा आघात झालेला आहे. सदरची दुर्घटना घरात घडलेने त्‍याची पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंद केलेली नाही. परंतु उपचाराकरिता सिटी हॉस्पिटल येथे नेले असता सदर घटनेची नोंद राजारामपूरी पोलीस स्‍टेशनला केलेली आहे. समनेवालांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वसुल होऊन मिळणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र, राजारामपूरी पोलीस स्‍टेशन वर्दी नोंद, सिटी हॉस्पिटल यांची ट्रिटमेंट समरी, मेडीकल ऑफिसर सर्टीफिकेट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 
 
(04)       सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार खोटी व लबाडीची असून ती सामनेवालांचे विरुध्‍द चालणेस पात्र नाही. सामनेवाला क्र.2 चे तक्रारदार अथवा त्‍यांचे पती हे कधीही ग्राहक नव्‍हते व नाहीत. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराच्‍या तक्रार अर्जातील कलम 1 मधील मजकूर सर्वसाधारणपणे खरा व बरोबर आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे पतीची सामनेवाला क्र.1 यांचेकडे पॉलीसी उतरविलेली होती. तक्रार अर्जातील कलम 2 मधील मजकूर खोटा, लबाडीचा व साधनीभूत असून तो सामनेवालांना मान्‍य व कबूल नाही. तक्रारदार यांनी दि.01/08/2008 रोजी सामनेवालांना दिलेल्‍या अर्जामध्‍ये तक्रारदारांचे पतीच्‍या नावावर सामनेवाला संस्‍थेकडे असलेल्‍या शेअर्स, वर्गणी इत्‍यादी रक्‍कमा वारसा या नात्‍याने मागणी केल्‍या होत्‍या. त्‍यापूर्वी सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांच्‍या पतीचे जिन्‍यावरुन पडून निधन झालेचे समजले. प्रस्‍तुत सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे क्‍लेम फॉर्म मागणी केला होता व त्‍यानंतर दि.20/07/2008 रोजी क्‍लेम फॉर्म मिळालेनंतर तो तक्रारदार यांना दिला होता. तक्रारदार यांनी तो यथावकाश मुदतीनंतर भरुन प्रस्‍तुत सामनेवालांकडे आणून दिला. तथापि, सदर क्‍लेम फॉर्म सामनेवाला क्र.1 यांचेकडे देणेस प्रस्‍तुत सामनेवाला गेलेवर त्‍यांनी सदर फॉर्मसोबत प्रथम वर्दी रिपोर्ट(एफ.आय.आर.), पोलीस पंचनामा, मृत्‍यू दाखला, इंक्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे नसलेने तो क्‍लेम फॉर्म स्विकारला नाही. तक्रारदार यांना त्‍याची कल्‍पना देऊन सदरची कागदपत्रे आणून देणेस सांगितले होते. परंत तक्रारदार यांनी आजतागायत सदरची कागदपत्रे प्रस्‍तुत सामनेवालांकडे दिलेली नाहीत.
 
           ब) सामनेवाला आपल्‍या म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कलम 3 मधील मजकूर खोटा, लबाडीचा व साधनीभूत असून तो सामनेवालांना मान्‍य व कबूल नाही. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे आपल्‍या सभासदांसाठी एकत्रित विमा उतरविलेला होता व त्‍याच्‍या अटी व शर्ती त्‍याचवेळी सभासदांना सांगितलेल्‍या होत्‍या. तक्रारदारचे पतीचे निधन हे अपघाती असेल तर सामनेवाला क्र.1 यांचेकडे आवश्‍यक ती कागदपत्रे पुरविणेची जबाबदारी तक्रारदाराची होती. ती जबाबदारी तक्रारदार यांनी पार पाडलेली नाही. तसेच तक्रारदारचे तक्रार अर्जातील कलम 5 मधील मजकूर चुकीचा आहे तर कलम 7 मध्‍ये केलेली मागणी कायदयाने देता येणार नाही. सामनेवाला क्र.2 हे तक्रारदाराचे कोणतीही व कितीही रक्‍कम देणेस जबाबदार नाहीत. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी आपले सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्‍द फेटाळणेस पात्र आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचे सभासदांचे कल्‍याणाकरिता सदरची पॉलीसी एकत्रित उतरविलेली होती. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदार यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे मागणी करुनही सामनेवालांकडे पाठविलेली नाहीत. त्‍यामुळे यात सामनेवाला क्र.2 यांची जबाबदारी येत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे.         
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?         -- होय.
2) काय आदेश?                                         -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदार यांचे पती मयत बाबुराव दत्‍तात्रय शिंदे यांचा कोल्‍हापूर जिल्‍हा परिषद कर्मचारी सह.सोसायटी मर्या. मार्फत सामनेवालांकडे जनता पर्सनल अॅक्सिडेंट विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसी क्र.161600/47/2008/2671 असा आहे. सदर पॉलीसीच्‍या कालावधीतच दि.28/05/2008 रोजी सायंकाळी तक्रारदाराचे पती बाबुराव दत्‍तात्रय शिंदे हे स्‍वत:चे राहते घरात जिन्‍यावरुन खाली पडलेने त्‍यांचे डोक्‍यास गंभीर मार लागला. त्‍यामुळे त्‍यांना सिटी हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे उपचार सुरु केले. परंतु औषधोपचारास त्‍यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसलेने त्‍यांना दि.10/06/2008 रोजी घरी आणले असता दि.11/06/2008 रोजी ते मयत झाले. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांसह तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 कडे क्‍लेम फॉर्म सादर केला. त्‍यांचेव्‍दारे सदरचा क्‍लेम सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठविणेचा होता. परंतु दि.11/08/2010 रोजी दावा कागदपत्रे मिळाली नसलेने दावा फाईल नो क्‍लेम म्‍हणून बंद करणेत आली असलेचे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने कळवलेले आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.
 
           वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो दि.11/08/2010 चे पत्राने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने मागणी केलेल्‍या कागदपत्रांची पूर्तता न केलेने क्‍लेम फाईल बंद केलेली आहे ती योग्‍य कारणास्‍तव केलेली आहे काय? याचा विचार करता प्रस्‍तुत नमुद विमाधारकाचा मृत्‍यू हा अपघाती असलेबाबत लागणारी कागदपत्रे वर्दी जबाब, पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, मृत्‍यूचे प्रमाणपत्र, शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादी कागदपत्रे क्‍लेम फॉर्मसोबत नसलेने क्‍लेम नाकारला आहे. याचा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार, राजारामपूरी पोलीस ठाणे यांचे दि.29/05/2008 रोजीची नोंदवहीप्रमाणे डॉ.पवार सिटी हॉस्पिटल, राजारामपूरी, कोल्‍हापूर यांनी नमुद बाबुराव शिंदे यांचा दि.28/05/2008 रोजी सायंकाळी 8.20 वाजता राहते घरी जिन्‍यावरुन खाली पडून औषधोपचारासाठी दाखल असलेबाबतची वर्दी दिलेने (2/1544) पोलीस हेड कॉन्‍स्टेबल मुजावर हे पेशंटचा जबाब घेणेस  रवाना झालेचे व पेशंटचा जबाब घेतलेचे नोंद आहे. प्रस्‍तुत जबाबानुसार जिन्‍यावरुन खाली पडून डोक्‍यास मार लागलेचे नमुद केलेले आहे. सिटी हॉस्पिटलची ट्रिटमेंट समरी दाखल आहे. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्‍य केंद्र चिखली ता.कागल यांनी मृत्‍यू प्रमाणपत्र दिलेले आहे. सदर प्रमाणपत्रानुसार नमुद शिंदे यांचा मृत्‍यू डोक्‍यास मार लागून अपघाती मृत्‍यू असलेचे नमुद केले आहे. वरील कागदपत्रावरुन नमुद विमाधारकाचा मृत्‍यू हा अपघाती असलेचे निर्विवाद आहे.
 
           तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीत व प्रस्‍तुत कागदपत्रे सामनेवाला क्र.2 कडे दिलेचे नमुद केले आहे. मात्र सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे फॉर्म देणेस गेले असता वर्दी जबाब, पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, मृत्‍यूचे प्रमाणपत्र, शवविच्‍छेदन अहवाल ही प्रस्‍तुत कागदपत्रे नसलेने सदर कारणास्‍तव फॉर्म स्विकारला नाही. त्‍यामुळे तक्रारदारास तशी कल्‍पना देऊन कागदपत्रे देणेबाबत सांगितले होते. दि.17/08/2010 चे तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांना दिलेल्‍या पत्रानुसार नमुद क्‍लेमबाबत खुलासा मागितलेला होता. त्‍यास सामनेवाला क्र.2 यांनी कोणतेही उत्‍तर दिलेचे दिसून येत नाही. प्रस्‍तुत प्रकरणी मात्र म्‍हणणेमध्‍ये त्‍याचा खुलासा केलेला आहे. प्रस्‍तुत तक्रार दाखल करणेपूर्वी त्‍यांनी लेखी खुलासा केलेचे आढळून आलेले नाही.
 
           तक्रारदाराने वर्दी नोंद स्‍टेटमेंट समरी, मृतयूचे प्रमाणपत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले आहे. घरात जिन्‍यावरुन पडून डोक्‍यास मार लागून मृत्‍यू झालेने मूळ कागदपत्रात स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे. मात्र मयताचे शवविच्‍छेदन केलेले नाही. त्‍यामुळे शवविच्‍छदन अहवाल व मरणोत्‍तर पंचनामा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. यासाठी तक्रारदाराचे वकीलांनी सदर मृत्‍यू हा अपघाती असलेचे प्रस्‍तुत कागदपत्रावरुन सिध्‍द होत असलेमुळे सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीस क्‍लीष्‍ट कायदेशीर प्रक्रियेचे ज्ञान असतेच असे नाही. प्रस्‍तुतचा मृत्‍यू अपघाती झालेमुळे व त्‍याबाबत कोणतीही संशयास्‍पद स्थिती नसलेने तसेच तक्रारदाराची पत्‍नी अडाणी व अशिक्षीत असलेने शवविच्‍छेदन केले गेले नाही. केवळ शवविच्‍छेदन अहवाल प्रस्‍तुतचा मृत्‍यू हा अपघाती आहे हा एकमेव पुरावा नसून इतर अनुषंगीक पुराव्‍यावरुन प्रस्‍तुतचा मृत्‍यू हा अपघाती असलेचे स्‍पष्‍ट होते यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे.
 
IV(2007)CPJ355(NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION NEW DELHI-Revision Petition No.973 of 2007 Decided on 24/10/2007 - Rita devi @ Rita Gupta Vs. National Insurance Co Ltd. And Ors. (i) Consumer Protection Act,1986 Section21(b)-Insurance-Janata Accidental Insurance Policy- Death caused by ‘ Cold wave’-Claim repudiated on ground that death not accidental-Complaint dismissed by Forum-Appeal against order dismissed-Hence revision-Death due to cold wave not natural-It is by natural external violent force- ‘Cold wave’ untoward event not expected or designed-An ordinary man could not expect occurrence-Cold wave was sudden-Number of persons including insured suffered massive heart attack as a result of which he died-Death accidental proved-Insurance Company liable under policy.
 
           तक्रारदाराचे वकीलांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस प्रस्‍तुत मंचासमोर ग्राहक तक्रार क्र.468/10 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीविरुध्‍द दाखल केलेली तक्रार मे. मंचाने निर्णित करुन तक्रारदाराचे बाजूने निकाल दिलेला आहे व त्‍याप्रमाणे नमुद कंपनीकडून विमा रक्‍कम अदा केली असलेचे प्रतिपादन केले आहे.
 
           वरील विस्‍तृत विवेचनाचा व दाखल कागदपत्रांचा विचार करता उपचार केलेल्‍या डॉक्‍टरांनी पेशंट unconscious locked jaw तसेच C.T. Scan चा उल्‍लेख आहे. विमाधारकाचा मृत्‍यू हा जरी राहत्‍या घरी झाला असला तरी तो अपघातीच आहे. प्रस्‍तुत विमाधारकाचा मृत्‍यू हा नैसर्गिक नसून तो अपघाती असलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराचे विमाधारक पती बाबुराव दत्‍तात्रय शिंदे यांचा मृत्‍यू अपघाती असलेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला विमा कंपनीने विमा पॉलीसीचा मूळ हेतू तसेच वस्‍तुस्थितीजन्‍य पुराव्‍याचा विचार करुन तसेच मा. राष्‍ट्रीय आयोग व सर्वोच्‍च न्‍यायालयाचा विविध पुर्वाधाराचां विचार करुन प्रस्‍तुतचा क्‍लेम मंजूर करावयास हवा होता. तसे न करता केवळ तांत्रिक कारणास्‍तव तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
 
मुद्दा क्र.2 :- तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा क्‍लेम रक्‍कम रु.1,00,000/- क्‍लेम नाकारले तारखेपासून व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. प्रस्‍तुत रक्‍कम देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 या विमा कंपनीची आहे. सदर रक्‍कमा देणेसाठी सामनेवाला क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्‍या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली क्‍लेम रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.05/04/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT