Maharashtra

Kolhapur

CC/10/403

Smti.Chingubi Dyandev Misal - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance co ltd. - Opp.Party(s)

A.K.Dhisal

22 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/403
1. Smti.Chingubi Dyandev MisalYevluj.Tal-Panhala.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance co ltd.204 E,Kanchanganga .Station Road.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :A.K.Dhisal, Advocate for Complainant
A.D. Chougule, Advocate for Opp.Party

Dated : 22 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.21/02/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती कै.ज्ञानदेव तुका मिसाळ यांचे नांवे जनता पर्सनल अॅक्सिडेंट विमा सामनेवालांकडे सन-2008 मध्‍ये उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसी क्र.161600/47/08/3510 असून विमा रक्‍कम रु.1,00,000/- तर कालावधी हा 5 वर्षाकरिता होता. तक्रारदाराचे पतीस दि.15/02/2009 रोजी गावातील कुत्रे चावलेने त्‍यावर डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे उपचार घेतले. उपचारादरम्‍यान दि.14/07/2009 रोजी रेबीजमुळे मृत्‍यू झाला. तक्रारदाराने सामनेवालांकडे विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.05/04/2010 रोजीचे पत्राने कुत्रे चावल्‍याची घटना 4 ते 5 वर्षापूर्वीची असलेने क्‍लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ मृत्‍यूचा दाखला, क्‍लेम फॉर्म, सरपंचाचा दाखला, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच प्रतिउत्‍तराचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
 
(04)       सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार अ) तक्रारदाराचा तक्रारअर्ज खोटा, खोडसाळ, आपमतलबी, बिनबुडाचा, काल्‍पनीक व बेकायदेशीर असलेने सामनेवालांना तो मान्‍य व कबूल नाही. सामनेवाला त्‍याचा स्‍पष्‍टपणे इन्‍कार करतात. तक्रार अर्ज कलम 1 मधील विमा उतरविलेचा मजकूर बरोबर आहे. तक्रारीतील अन्‍य मजकूर परिच्‍छेदनिहाय नाकारला आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने क्‍लेम फॉर्ममध्‍ये खोटी माहिती दिलेली आहे. तसेच सरपंच व गाव कामगार पोलीस पाटील यांनीही दिलेल्‍या त्‍यांचे पत्रामध्‍ये 5-6 महिन्‍यापूर्वी पाळीव कुत्रे चावलेचे खोटे नमुद केले आहे. सामनेवाला यांनी नमुद क्‍लेमबाबत हेरॉल्‍ड या इन्‍व्‍हेस्‍टीगेटरची नेमणूक केली. त्‍यांनी नमुद इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी दिलेल्‍या चौकशी अहवालामध्‍ये तक्रारदाराचे पती दि.12/06/2009 रोजी त्रास होऊ लागलेने डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले त्‍यांचेवर डॉ.यश हे उपचार करीत होते. दि.14/06/2009 चे प्रोग्रेस रेकॉर्डप्रमाणे तक्रारदाराचे पतीस मृत्‍यूपूर्वी 5 आधी कुत्रे चावले होते असे उपचार करणा-या डॉक्‍टरांनी नमुद केले आहे. तसेच दि.13/07/2009 रोजी सकाळी 10.45 वाजता 4 वर्षापूर्वी कुत्रा चावलेचे नमुद केले आहे. तक्रारदाराचे पतीची विमा पॉलीसी दि.24/03/2008 पासून चालू होत आहे व त्‍यापूर्वी तक्रारदाराचे पतीस कुत्रे चावलेले होते. सदरची घटना ही 4 ते 5 वर्षापूर्वीची असलेने विमा पॉलीसी कव्‍हर होत नाही. सबब दि;05/04/2010 चे पत्राने सामनेवालांने क्‍लेम नाकारलेचे कळवलेले आहे हे योग्‍य बरोबर व कायदेशीर आहे. सबब  सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवालांना विनाकारण खर्चात पाडलेने रक्‍कम रु.10,000/- तक्रारदाराकडून सामनेवालांना देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.         
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ क्‍लेम नाकारलेचे पत्र, पेमेंट रिसीट, दुर्घटना क्‍लेम सिक्‍युरिटी फॉर्म, हेरॉल्‍ड इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचा रिपोर्ट व खर्चाचे बील, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे रोगलक्षणे व प्रगती रिपोर्ट, रुग्‍ण पत्रिका, प्रोग्रेस रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, पॅथॉलॉजी रिपोर्ट, डॉक्‍टर्स ऑर्डर, मेडिकल सर्टीफिकेट, डेथ सर्टीफिकेट, पॅथॉलॉजी रिक्‍वीजीट फॉर्म, मेडिकल बीले, ग्रामपंचायत यवलूज यांचा दाखला, श्री पांडूरंग ज्ञानू पाटील, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, क्‍लेम फॉर्म इत्‍यादी कागदपत्र दाखल केलेली आहेत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?   -- होय.
2) काय आदेश?                                                            -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पती ज्ञानदेव तुका मिसाळ यांचा जनता व्‍यक्‍तीगत अपघात योजनेअतंर्गत सामनेवालांकडे विमा उतरविलेला होता. त्‍याचा पॉलीसी क्र.161600/47/08/3510 असून विमा रक्‍कम रु.1,00,000/- तर कालावधी हा 5 वर्षाकरिता होता. तक्रारदाराचे पतीस दि.15/02/2009 रोजी गावातील कुत्रे चावलेने त्‍यावर डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे उपचार घेतले. उपचारादरम्‍यान दि.14/07/2009 रोजी रेबीजमुळे मृत्‍यू झाला. तक्रारदाराने सामनेवालांकडे विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.05/04/2010 रोजीचे पत्राने कुत्रे चावल्‍याची घटना 4 ते 5 वर्षापूर्वीची असलेने सदर घटना पॉलीसीमध्‍ये कव्‍हर होत नसलेने क्‍लेम नाकारलेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.
 
           वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो तक्रारदाराचे पतीस पॉलीसी उतरविणेपूर्वी 4-5 वर्षापूर्वी कुत्रा चावलेने प्रस्‍तुतची बाब तक्रारदाराने विमा उतरवितेवेळी दडवून ठेवलेली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा विमा क्‍लेम नाकारला आहे. याचा विचार करता तक्रारदाराचे विमाधारक पतीचा मृत्‍यू हा रेबीजने झालेला आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रामध्‍ये दि.14/07/2009 नमुद तक्रारदाराचे पतीवर उपचार करणेबाबत व धोक्‍याची कल्‍पना डॉक्‍टरांनी दिलेबाबतचे संमत्‍ती पत्रातील मागील बाजूस नोंद असणा-या मजकूराचा सामनेवाला यांनी आधार घेतलेला आहे. सदर मजकूरामध्‍ये नमुद तक्रारदाराचे पतीस 5 वर्षापूर्वी कुत्रा चावलेची नोंद केलेली आहे. मात्र नमुद मजकूराखाली सदरचा मजकूर कोणी लिहीला त्‍याची सही शिक्‍क्‍यानिशी नोंद नाही. सबब सदर मजकूराचा पुराव्‍याचे दृष्‍टीने विचार करता येणार नाही. सामनेवाला यांनी दि.13/07/2009 रोजी 10.45 वर 4 वर्षापूर्वी कुत्रा चावलेचे नमुद केलेचे प्रतिपादन केले आहे. मात्र तशी नोंद नमुद केसपेपरवर दिसून येत नाही. याउलट तक्रारदाराचे वकीलांनी तक्रारदाराने दाखल केलेला मृत्‍यूच्‍या दाखल्‍यामध्‍ये नमुद ज्ञानदेव मिसाळ हे दि.14/07/2009 रोजी रॅबीजने मृत्‍यू पावल्‍याचे डॉ.यश यांनी दिलेचे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच विमा क्‍लेम फॉर्मवर P.M.cannot be done as history 6 months back in rabies  असे डॉ. यश यांनी त्‍यांचे सहीशिक्‍क्‍यानिशी नमुद केले आहे. तसेच प्रपत्राच्‍या हॉस्पिटल ऑथोरीटी/डॉक्‍टराने भरावयाची माहिती क्‍लॉज 1 ते 5 मध्‍ये 5 महिन्‍यापूर्वी कुत्रा चावलेचे हिस्‍ट्री असलेचे सहीशिक्‍क्‍यानिशी नमुद केलेले आहे. तसेच दि.30/07/2009 रोजीचा सरपंच ग्राम पंचायत यवलूज यांचा नमुद तक्रारदाराचे पतीस 5-6 महिन्‍यापूर्वी कुत्रे चावलेबाबतचा दाखला दिलेला आहे.
 
           वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी संमत्‍ती पत्राच्‍या विनासहीशिक्‍क्‍यानिशी असलेल्‍या नोंदीचा आधार घेऊन पाच वर्षापूर्वी कुत्रा चावल्‍याच्‍या हिस्‍ट्रीच्‍या आधारावर क्‍लेम नाकारलेला आहे. तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा दि.14/07/2009 रोजी रॅबीजने झालेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्‍तुतची पॉलीसी ही दि.24/3/2008 ते 23/03/2013 अशा पाच वर्षाचे कालावधीकरिता उतरविलेली होती. सदर पॉलीसी उतरविणेपूर्वी तक्रारदाराचे पतीस कुत्रा चावलेची बाब तक्रारदाराने दडवून ठेवलेचे प्रतिपादन सामनेवालांचे वकीलांनी केलेले आहे. वस्‍तुत: तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा रॅबीजने वर नमुद तारखेस झालेला आहे. पॉलीसी उतरवितेवळी तक्रारदाराचे पतीस रॅबीज होता व सदरची बाब तक्रारदाराचे पतीने दडवून ठेवली असे कुठेही निदर्शनास आलेले नाही. वादाकरिता तक्रारदारास पाच वर्षापूर्वी कुत्रा चावला असेल व 5 वर्षानंतर त्‍यास रेबीज होऊन तो मृत्‍यू पावला असे क्षणभर गृहीत धरले तरी त्‍यावेळी नमुद विमाधारकास पाच वर्षानंतर आपण रेबीजने मृत्‍यू पावू व पॉलीसीचा लाभ घेऊ याचे ज्ञान व माहिती होती व ती त्‍याने जाणीवपूर्वक दडवली असे म्‍हणणे चुकीचे होईल.
 
           सबब सामनेवाला कंपनीकडे तज्ञ डॉक्‍टरांचे पॅनेल असते. सामनेवालांनी प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराचे पतीचे कुत्रा चावलेचे उपचाराबाबतचे कागदपत्रांची वैद्यकीय समीक्षण व परिक्षणाच्‍या दृष्‍टीने छाननी व अवलोकन करुन कुत्रा चावलेपासून किती कालावधीमध्‍ये रॅबीज हा रोग विकसीत होऊ शकतो हे तज्ञांचे अहवालाव्‍दारे व शपथपत्राव्‍दारे दाखवून दयावयास हवे होते. जेणेकरुन त्‍यांचे मताप्रमाणे 5 वर्षापूर्वी कुत्रा चावलेनंतर हा रॅबीज झालेला आहे हे सिध्‍द करणेची जबाबदारी सामनेवालांची होती व ती त्‍यांनी पार पाडलेली नाही. याचा विचार करता केवळ विनासही शिक्‍क्‍याच्‍या नोंदीच्‍या आधारे प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा क्‍लेम रक्‍कम रु.1,00,000/- क्‍लेम नाकारले तारखेपासून व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्‍या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली क्‍लेम रक्‍कम रु.1,00,000/-रु.एक लाख फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.05/04/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT