Maharashtra

Kolhapur

CC/10/610

Rama Tippa Pujari. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar.

27 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/610
1. Rama Tippa Pujari.Ambdulat.Tal- Shirol.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co Ltd.204 E,Kanchanganga Statio Road.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar., Advocate for Complainant
M.S.Kulkarni , Advocate for Opp.Party

Dated : 27 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.27/12/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्‍या)
 
(1)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे आपल्‍या म्‍हैशीचा विमा पंचायत समिती शिरोळ यांचेमार्फत केंद्र शासन पुरस्‍कृत पशुधन विमा योजना 2008 अंतर्गत उरतवला होता. सदर पॉलीसीचा क्र.KOPR/103130 असा होता. सदर तक्रारदार यांची म्‍हैस दि.07/02/2010 रोजी आकस्मिकरित्‍या आजारी पडून मयत झाली. तक्रारदाराने सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह सामनेवालांकडे क्‍लेम दाखल केला व विमा क्‍लेमचे रु.20,000/- रक्‍कम दयावी अशी विनंती केली. वेळोवेळी पाठपुरावा करुनही सामनेवालाने तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम मंजूर केला नाही. पशुधन विकास मंडळ, अकोला यांनीही सदर दावा निकाली काढण्‍याविषयी दि.17/10/2010 रोजी पत्र पाठवून कळवले. तरीही सामनेवालाने त्‍याची अजिबात दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन आपल्‍या पुढीलप्रमाणे मागण्‍या मान्‍य व्‍हाव्‍यात अशी विंनती मंचास केली आहे. विमा क्‍लेमची रक्‍कम रु.20,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(02)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत शासनातर्फे सामनेवाला यांना दावे लवकरात लवकर निकाली काढणेबाबत दिलेले पत्र, पॉलीसी, क्‍लेम फॉर्म, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, ट्रिटमेंट सर्टीफिकेट, पंचनामा व फोटो बील इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(03)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी महणणेत विमा पॉलीसी मान्‍य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराची मयत झालेली म्‍हेस व त्‍याने विमा उतरविलेली म्‍हैस ही एकच होती हे दाखवण्‍यासाठी कुठलाही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. त्‍यामुळे म्‍हैशीची ओळख पटवणे अवघड आहे. त्‍यामुळेच सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(04)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी कथनात तक्रारदाराची पॉलीसी मान्‍य केली असल्‍याने तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. विमाधारीत म्‍हैस व मयत म्‍हैस ही एकच असल्‍याबद्दल कुठलाच पुरावा दिला नसल्‍यामुळे आपण तक्रारदाराचा क्‍लेमबाबत निर्णय घेऊ शकत नाही असे सामनेवाला यांचे कथन आहे. तथापि, तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रात पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, उपचार प्रमाणपत्र, पंचनामा, बिल्‍ला डेअरीचे प्रमाणपत्र इत्‍यादी सर्व कागदपत्रे दाखल केलेली दिसून येत आहेत. जनावराला दिलेल्‍या टॅग नं., डॉक्‍टरांचे सर्टीफिकेट व पी.एम.रिपोर्ट इत्‍यादी सर्व कागदपत्रांवरुन मयत जनार व विमाधारीत जनावर हे एकच असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. तसेच महाराष्‍ट्र पशुधन विकास मंडळ यांचे क्‍लेमबाबत लवकर निर्णय घेण्‍याचे पत्रही सामनेवाला यांना मिळाले आहे. असे असताना सामनेवाला यांनी केवळ तांत्रिक कारण दाखवून तक्रारदाराच्‍या क्‍लेमबाबत निर्णय घेण्‍यास विलंब करणे ही सामनेवालाच्‍या सेवेतील निश्चित त्रुटी आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
                          
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्‍लेमची रक्‍कम रु.20,000/-(रु.वीस हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.17/03/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चा पोटी रु. 1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT