Maharashtra

Kolhapur

CC/10/628

Nigappa Dhondiba Kumbhar. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar.

19 Jan 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/628
1. Nigappa Dhondiba Kumbhar.Chandgad.Tal - Chandgad.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co ltd.204,E,Kanchanganga.Station Road.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar., Advocate for Complainant
M.S.Kulkarni., Advocate for Opp.Party

Dated : 19 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.19/01/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांनी त्‍यांचे गायीचा सामनेवालांकडे विमा उतरविला होता. त्‍याचा विमा पॉलीसी नं.181100/48/2008/2238 असा होता. तर गायीच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचा क्र.OIC/KOP/103201 असा होता.
 
(03)       तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सदर विमाधारक गाय दि.14/06/2008 रोजी मयत झाली. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदाराने सामनेवालांकडे विमा रक्‍कम रु.16,000/- ची मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.28/03/2009 रोजी ‘’ जनावराच्‍या कानातील बिल्‍ला कानाचे तुकडयासोबत नाही.’’ असे चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा क्‍लेम नाकारला आहे. वास्‍तविक तक्रारदाराने सामनेवालांकडे क्‍लेम फॉर्मसोबत सर्व आवश्‍यक कागदपत्रे जोडलेली आहेत. तरी देखील सामनेवालांनी चुकीचे कारणावरुन सदरचा न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरी तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन तक्रारदाराचे गायीच्‍या विम्‍याची रक्‍कम रु.16,000/-दि.14/09/2009 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- सामनेवालां कडून मिळणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे.
 
(04)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत क्‍लेम नाकारलेचे पत्र, पशु विमा क्‍लेम फॉर्म, कॅटल डेथ सर्टीफिकेट, कॅटल पोस्‍ट मार्टेम, पंचनामा, रवळनाथ दूध संस्‍था दाखला, कॅटल इन्‍शुरन्‍स पॉलीसी इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(05)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्ज व त्‍यातील कथने वस्‍तुस्थितीस सोडून आहेत तसेच तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथनांचा विचार करता मे; कोर्टात चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. तक्रार अर्ज कलम 1 मधील सामनेवाला कंपनीबाबतचा मजकूर वगळता अन्‍य मजकूर अमान्‍य आहे. तक्रार अर्ज कलम 2 मधील मजकूर मान्‍य नाही. तक्रारदाराचे गायीचा मृत्‍यूची तारीख दिली आहे. मात्र क्‍लेम सर्व कागदपत्रांसह किती दिवसात दाखल केला याचा उल्‍लेख मात्र कुठेच केलेला नाही. तक्रारदाराचा क्‍लेम मुदतीत नाही. तसेच दि.28/03/2009 रोजी क्‍लेम नाकारलेला आहे इ. म्‍हणणे चुकीचे व वस्‍तुस्थितीस सोडून आहे. सबब सामनेवाला यांना मान्‍य नाही.
 
           ब) वास्‍तविक ज्‍या जनावराचा विमा उतरविलेला असतो त्‍याचे बरोबर आयडेंटीफिकेशनसाठी त्‍या जनावराचे कानात बिल्‍ला(टॅग) लावलेला असतो. जेव्‍हा तक्रारदार क्‍लेम करतात त्‍यावेळी मयत जनावराच्‍या कानातला बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासह विमा कंपनीला क्‍लेम फॉर्म व इतर महत्‍वाच्‍या कागदपत्रांसह जमा करणेचा असतो; ज्‍यावरुन विमा उतरविलेले जनावर व मयत जनावर ह एकच आहेत हे सदर टॅगवरुन ओळखले जाते. तक्रारदाराने क्‍लेम फॉर्म जमा करताना टॅग दिला मात्र तो जनावराच्‍या कानाच्‍या तुकडयासह नसलेने सामनेवालांनी योग्‍य कारणानेच तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेला आहे. मात्र मयत गायीचा बिल्‍ला कानाच्‍या पाळीच्‍या तुकडयासह नसलेमुळे पॉलीसीतील तरतुदीचा तक्रारदाराने भंग केला आहे. सबब सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम योग्‍य व कायदेशीर कारणामुळे नाकारलेला आहे. तसेच तक्रारदाराचा तक्रार अर्ज, त्‍यातील कथने,तक्रारदाराची मागणी इत्‍यादी मान्‍य व कबूल न करता तक्रारदाराने आपला क्‍लेम शाबीत केलेस व सामनेवाला कंपनीची कोणती व कसलीही कायदेशीर जबाबदारी येते आहे असे मानले तर सामनेवाला कंपनीची जबाबदारी ही कायदयास व पॉलीसीतील अटीस बांधील राहूनच आहे. सामनेवालांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(06)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(07)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?          --- होय.
2) तक्रारदार हा विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?              --- होय.
3) तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय? --- होय.
4) काय आदेश ?                                                                   --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :-सामनेवाला विमा कंपनीने दि.28/03/2009 रोजीच्‍या पत्रानुसार तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे यावरुन नमुद गायीचा विमा उतरविलेला होता ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदार व सामनेवाला विमा कंपनीने दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन नमुद पॉलीसी क्र. 181100/48/2008/2238 असा होता व गायीच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचा क्र.OIC/KOP/103201 असा होता. सदर गायीचे वर्णन व पॉलीसीवरील विमा उतरविलेली रक्‍कम रु.16,000/-याबाबत वाद नाही. नमुद विमा कालावधीत दि.14/06/2008 रोजी सदर गाय मयत झाली. त्‍याबाबत डॉ.बी.पी.गोडसे यांनी दिलेला मयत गायीचा मयताचा दाखला, जनावराचा पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट दाखल आहे. तसेच पंचनामा दाखल आहे. मयत जनावराचे पोस्‍ट मार्टेम करुन विव्‍हेवाट लावलेचा ग्राम पंचायत चंदगड यांचा दाखला दाखल आहे. तक्रारदाराने विमा क्‍लेमची मागणी केली असता कानाच्‍या तुकडयासहीत बिल्‍ला नाही या कारणाखाली क्‍लेम नाकारलेला आहे. मात्र तक्रारदाराने क्‍लेमसोबत बिल्‍ला पाठवून दिलेला आहे. बिल्‍ला नाही असे सामनेवाला यांचे म्‍हणणे नाही फक्‍त तो कानाच्‍या तुकडयासहीत दिलेला नाही असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. याचा विचार करता काया मानवी असो वा जनावराची असो त्‍याचे मृत शरीर नाशवंत आहेत. सडण्‍याची/कुजण्‍याची प्रक्रिया लगेच सुरु होते. जनावर मृत झाले तर त्‍याचा पंचनामा त्‍वरीत करुन सदर मृत शरीराची पुरुन ताबडतोब विल्‍हेवाट लावली जाते. अशा परिस्थितीत जनावराचे कानासहीत बिल्‍ला नसल्‍याने विमा दावा रक्‍कम नाकारणे हे आजच्‍या आधुनिक युगात जिथे आरोग्‍याच्‍या बाबतीत विविध रोग स्‍वाईन फल्‍यू, चिकन गुनीया, डेंग्‍यू व मलेरिया व इतर संसर्गजन्‍य रोगाचा प्रसार रोखणेसाठी शासन विविध स्‍तरावर प्रयत्‍न करीत असताना विमा कंपनी मात्र जनावराच्‍या कानासहीत बिल्‍ला पाठवणेचे अटीबाबत आग्रही राहून विमा दावा नाकारत आहे. सदरची अट ही अयोग्‍य, आरोग्‍यास घातक आहे. तसेच सदरची अट ही निर्णायक नसून मार्गदर्शक स्‍वरुपाची आहे.
 
           अशा प्रकारच्‍या कॅटल क्‍लेमबाबत इतर विमा कंपन्‍याना सदर कानासहीत बिल्‍ला पाठवला असता सदरचा कान कुजून त्‍यात आळया पडत असलेचे निदर्शनास आलेमुळे मयत जनावराचे कानात बिल्‍ला असलेचा फोटो व बिल्‍ला जरी पाठवला तरी ते ग्राहय धरले जाते. अशा परिस्थितीत सामनेवाला यांनी कानाच्‍या तुकडयासहीत बिल्‍ला पाठवला नसल्‍यामुळे क्‍लेम नाकारलेला आहे हे सामनेवाला यांनी केलेली सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र. 1 मधील विस्‍तृत विवेचनानुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराने योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांसहीत विमा क्‍लेम दाखल केला असताही सामनेवाला यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारला आहे. सबब तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.16,000/- व्‍याजासहीत मिळणेस पात्र आहेत.
 
मुद्दा क्र.3 :- सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्‍याय व योग्‍य क्‍लेम चुकीच्‍या कारणास्‍तव नाकारलेमुळे तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्‍कम रु.16,000/-(रु.सोळा हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.28/03/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT