Maharashtra

Kolhapur

CC/10/440

Chandgad Taluka Prathmic Sikashak Sah Pat Sanstha and others. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance co ltd. - Opp.Party(s)

Kasim Mulla

11 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/440
1. Chandgad Taluka Prathmic Sikashak Sah Pat Sanstha and others.A/p Chandgad Tal-Chandgad.KolhapurMaharashtra2. Smt. Shobha Anant Patil A/p kha. Kolindre Tal. Chandgad Dist. Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance co ltd.204 E Station Road.KolhapurKolhapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Kasim Mulla , Advocate for Complainant K.Y.Mulla, Advocate for Complainant
A.D. Chougule, Advocate for Opp.Party

Dated : 11 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.11/11/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           तक्रारदाराचा जनता वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार क्र.1 संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी कायदयाखाली नोंद झालेली प्राथमिक शिक्षकांची पत संस्था आहे.तक्रारदार संस्‍थेच्‍या सभासदांना त्‍यांचे पगाराचे तारणावर दिलेल्‍या कर्जाच्‍या बोजाची त्‍यांचे आकस्मिक मृत्‍यू प्रकारे त्‍यांचे कुटूंबियांवर फार मोठा आघात होऊन संपूर्ण कुटूंबियांची वाताहत होऊनये म्‍हणून तक्रारदार संस्‍थेच्‍या सर्व सभासदांचा कर्जाच्‍या फेडी संदर्भात व कुटूंबियांचा भावी आधाराचा उद्देश ठेवून तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला विमा कंपनीकडे प्रत्‍येक सभासदांचे रक्‍कम रु.3,00,000/- चा 5 वर्षे मुदतीचा जनता वैयक्तिक अपघात ग्रुप विमा उतरविला आहे. सदर ग्रुप विम्‍याच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम रु.3,53,520/- कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सह.बॅंक लि. या बँकेचा चेक क्र.146956 ने सामनेवाला यांनी स्विकारुन तक्रारदार संस्‍थेस विमा पॉलीसीही दिलेली आहे.
 
           ब) तक्रारदार संस्‍था ही सर्व सभासदांचेवतीने विमा धारक म्‍हणून जबाबदार असली तरी मूळ लाभधारक(Benificiary)  म्‍हणून सभासदांचे वारस येत असलेने प्रस्‍तुत प्रकरणी मूळ लाभधाकर म्‍हणून मयताचे वारस श्रीमती शोभा आनंद पाटील रा.चंदगड असलेने त्‍यांना आवश्‍यक पक्षकार क्र.2 केले आहे. त्‍यांचेवतीने तक्रार चालविणेचे सर्व अधिकार तक्रारदार क्र.1 यांना दिलेले आहेत. सामनेवाला विमा कंपनीने अपघात प्रसंगी तातडीने विना विलंब विम्‍याची संपूर्ण रक्‍कम अदा करणेची खात्री व हमी दिलेनंतर तक्रारदार यांनी सामनेवालांकडे विमा उतरविलेला आहे.
 
           क) तक्रारदार संस्‍थेचे सभासद व तक्रारदार क्र.2 चे पती आनंदा अर्जून पाटील यांचे दि.30/03/2009 रोजी मोटरसायकल व ट्रक अपघातामध्‍ये मृत्‍यू झालेला आहे.त्‍याबाबतची योग्‍य ती कागदपत्रे दाखल करुन विमा रक्‍कमेची मागणी केली असता सामनेवालांचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर श्री जाधव यांनी विमा मंजूर होणेस अडचण असलेचे सांगून लवकरच चलन पाठवून देत असलेचे सांगितले. मात्र विमा रक्‍कम रु.3,00,000/- चे चलन न पाठवता रक्‍कम रु.1,80,000/- इतक्‍या अंशत: रक्‍कमेचे चलन दि.06/03/2010 रोजी पाठवून दिले. सदरची रक्‍कम पार्ट पेमेंट म्‍हणून स्विकारत असून उर्वरित रक्‍कम अदा करणेबाबत चलनावर नमुद करुन त्‍याप्रमाणे स्‍वतंत्र पत्रानेही सामनेवाला यांना कळवलेले आहे. उर्वरित रक्‍कमेची वारंवार मागणी केली असता दि.28/04/2010 रोजी सामनेवालांनी पत्र पाठवून संपूर्ण रक्‍कम देणेस नकार दिला. तदनंतर दि.29/04/2010 रोजी तक्रारदाराने नोटीस वजा पत्र पाठवून विमा रक्‍कमेच्‍या वसुलीसाठी दावा दाखल करुन दाद मागावी लागेल याची कल्‍पना दिली. याची दखल न घेतलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणेत आलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा रक्‍कम रु.3,00,000/- दि.15/07/2009 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासहीत वसुल होऊन मिळावेत तसेच शारिरीक, मानसिक व आर्थिक खर्चापोटी रक्‍कम रु्15,000/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)            तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रार दाखल करणेबाबत व चालविणेबाबत केलेल्‍या ठरावाची प्रत, तक्रारदार यांनी विम्‍या विषयी दिलेल्‍या माहितीचे पत्रक, सामनेवाला यांची पॉलीसी रक्‍कमेची पोहोच पावती, विमा पॉलीसी, दावा रक्‍कम न मिळालेने तक्रारदाराने पाठविलेले पत्र, मयत विमेदार व्‍यक्‍तीचा पोलीस पंचनाम्‍याची नक्‍कल, पोलीसांनी साक्षिदारांचे नोंदवलेल्‍या जबाबाची नक्‍कल, कन्‍व्‍केट्स पंचनामा, मयताचा पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, फिर्यादी तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार यांचा जबाब, संपूर्ण क्‍लेम रक्‍कमेची मागणी केलेले तक्रारदाराचे पत्र, सामनेवाला कंपनीने विमा क्‍लेम मंजूर केलेचे व कमी रक्‍कमेचे पाठविलेले पावती व मान्‍यतापत्र, सामनेवाला यांनी संपूर्ण रक्‍कम देणेस नकार दिलेचे पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना संपूर्ण रक्‍कम मागणी केलेचे नोटीसपत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.   
 
(04)       सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा, खोडसाळ, आपमतलबी, बिनबुडाचा, बनावट, काल्‍पनिक व बेकायदेशीर असलेने सामनेवालांना तो मान्‍य व कबूल नाही. त्‍याचा सामनेवाला स्‍पष्‍ट व विशिष्‍टपणे इन्‍कार करतात. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की,मयत अनंत अर्जून पाटील यांनी सामनेवाला कंपनीचे कोल्‍हापूर यांचेकडे श्री फणेश्‍वर विकास सेवा सोसायटी मर्या.खा.कोळिद्रे, ता.चंदगड जि.कोल्‍हापूर यांचेतर्फे, प्राथमिक शिक्षक सह.बँक‍ लि. 1031, क/2, ई वॉर्ड गवत मंडई, कोल्‍हापूर, चंदगड तालूका प्राथ.शिक्षक सह.पत संस्‍था मर्या. चंदगड जि.कोल्‍हापूर यांचेतर्फे अनुक्रमे जनता व्‍यक्तिगत दुर्घटना पॉलीसी नं.47/08/3527, पॉलीसी नं.161600/47/09/602 प्रत्‍येकी रक्‍कम रु.1,00,000/- तर पॉलीसी क्र.47/06/20189 रु.3,00,000/- ची विमा पॉलीसी उतरविलेली होती.
 
           नमुद पॉलीसीच्‍या उपबंध व शर्तीनुसार शर्त क्र.6 ला अनुसरुन सदर जनता व्‍यक्तिगत विमा दुर्घटना पॉलीसी अंतर्गत एक किंवा एकापेक्षा जास्‍त पॉलीसी उतरविल्‍या तरीही अशा पॉलीसीसाठी जास्‍तीतजास्‍त दायित्‍वाची रक्‍कम रु.3,00,000/- देणेस सामनेवाला विमा कंपनी बांधील आहे. सदर अटीस अनुसरुन फणेश्‍वर विकास सेवा सोसायटी व प्राथमिक शिक्षक सह.बँक कोल्‍हापूर यांचेकडील असणा-या पॉलीसीअंतर्गत प्रत्‍येकी रक्‍कम रु.60,000/- मान्‍य व कबूल करुन स्विकारलेले आहेत. त्‍यामुळे एकूण दायित्‍व रक्‍कम रु.3,00,000/- पैकी रक्‍कम रु.1,20,000/- अदा केली असलेने उर्वरित रक्‍कम रु.1,80,000/- चा चेक पत्रासोबत पाठवला होता. मात्र पावती व मान्‍यता पत्रावर सदरची रक्‍कम पहिला हप्‍ता म्‍हणून स्विकारत असून उर्वरित रक्‍कम रु.1,20,000/- मिळावे असे खोडसाळपणे लिहून चेक स्विकारुन व्‍हौचर कंपनीस परत दिले आहे. जरी मयत अनंत अर्जून पाटील यांच्‍या वेगवेगळया तीन पॉलीसी असल्‍यातरी रक्‍कम रु.3,00,000/- पेक्षा जादा रक्‍कम देता येणार नाही व विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे रक्‍कम रु.3,00,000/- विमाधारकाचे मयत वारस शोभा अनंत पाटील यांना मिळालेले आहेत. सबब सामनेवाला कंपनी काहीही देणे लागत नाही. याबाबत तक्रारदारास दि.03/03/2010 रोजीचे पत्राने कळवलेले आहे व ते योग्‍य, बरोबर व कायदेशीर आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा व चुकीचा सादर केलेने सामनेवालांना विनाकारण त्रास सहन करावा लागला म्‍हणून कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट रक्‍कम रु.10,000/- सामनेवालांना तक्रारदाराकडून देणेत यावेत अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ जनता व्‍यक्तिगत विमा दुर्घटना पॉलीसीचे उपबंध व शर्ती, सर्क्‍यूलर,, सामनेवाला कंपनीचे पत्र, पावती व मान्‍यता पत्र, क्‍लेम पेमेंट व्‍हौचर, तक्रारदार क्र.1 यांना सामनेवाला यांनी पाठविलेले पत्र, क्‍लेम पेमेंट व्‍हौचर इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे‍ निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय    --- होय.
2. काय आदेश ?                                               --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदार क्र.1 संस्‍थेमार्फत तक्रारदार क्र्.2 चे पती अनंत अर्जून पाटील यांचा जनता व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता याबाबत वाद नाही.सदर संस्‍थेने आपल्‍या कर्जदार सभासदांच्‍या कर्जाची सुरक्षीतता व कुटूंबायाच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून प्रत्‍येक सभासदाचा 5 वर्षे मुदतीचा रक्‍कम रु.3,00,000/- चा ग्रुप विमा उतरविलेबाबत व त्‍यापोटी रक्‍कम रु.3,53,520/- कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सह.बँकचा चेक क्र.146956 व्‍दारे अदा केलेली होती व ती सामनेवाला कंपनीने स्विकारलेली आहे. सदर दाखल विमा पॉलीसीच्‍या सत्‍यप्रतीचे अवलोकन केले असता पॉलीसीचे वर्ष 2006 व पॉलीसी क्र.189‍ दिसून येतो. पॉलीसीचा कालावधी हा 19/08/2005 ते 18/08/2010 असा आहे. 491 सभासदांचा ग्रुप विमा उतरविलेला आहे व विमा रक्‍कम रु.3,00,000/- प्रत्‍येक सभासदामागे दिसून येते.  विमाधारक अनंत अर्जून पाटील यांचा मृत्‍यू दि.30/03/2009 रोजी अपघातामध्‍ये झालेला आहे. त्‍यासंबंधीची कागदपत्रे दाखल आहेत. सदर सभासदाचा मृत्‍यू हा अपघाती आहे याबाबत वाद नाही.
 
           वर तक्रारदार संस्‍थेबरोबरच श्री फणेश्‍वर विकास सेवा सोसायटी मर्या.खा.कोळिद्रे, ता.चंदगड जि.कोल्‍हापूर यांचेतर्फे, प्राथमिक शिक्षक सह.बँक‍ लि. 1031, क/2, ई वॉर्ड गवत मंडई, कोल्‍हापूर तर्फे अनुक्रमे जनता व्‍यक्तिगत दुर्घटना पॉलीसी नं.47/08/3527, पॉलीसी नं.161600/47/09/602 प्रत्‍येकी रक्‍कम रु.1,00,000/- विमा उतरविलेला होता. व सदर अनंत पाटील यांचा अपघाती मृत्‍यू झालेमुळे सदर पॉलीसी अंतर्गत रक्‍कम रु.60,000/- प्रत्‍येकी प्रमाणे नमुद संस्‍थां व तक्रारदार क्र.2 मयत विमा धारकाची पत्‍नी यांनी मान्‍य व कबूल करुन स्विकारलेले आहेत ही वस्‍तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे.
 
           वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो नमुद पॉलीसीच्‍या अट क्र.6 नुसार सदर पॉलीसी अंतर्गत एकपेक्षा जास्‍त पॉलीसीज उतरविल्‍या असल्‍यातरी एकूण विमा दायित्‍वाची रक्‍कम रु.3,00,000/-पेक्षा जास्‍त असणार नाही.त्‍यास अनुसरुन तक्रारदारांना रक्‍कम रु.1,20,000/- मिळालेले आहेत. जरी विमा पॉलीसी रु.3,00,000/- असली तरी उर्वरित रक्‍कम रु.1,80,000/- सामनेवाला कंपनी देय असलेने त्‍याप्रमाणे सामनेवाला कंपनीने दि.03/03/2010 रोजी  रक्‍कम रू.1,80,000/- चा चेक पावती व मान्‍यता पत्रासोबत पाठवला होता. मात्र सदरचा चेक स्विकारताना सामनेवाला संस्‍थेने सदरची रक्‍कम पहिला हप्‍ता म्‍हणून स्विकारत आहोत व उर्वरित रक्‍कम रु.1,20,000/- त्‍वरीत मिळावी असे नमुद करुन प्रस्‍तुतचा चेक दि.10/03/2010 रोजी स्विकारलेला आहे व त्‍याबाबत दि.28/04/2010 रोजी सामनेवालांनी तक्रारदार संस्‍थेस पत्र पाठवून तक्रारदाराचे हे कृत्‍य नियमबाहय व बेकायदेशीर असलेने दावा रक्‍कमेचा चेक देणे शक्‍य नाही तसेच दावा रक्‍कम रु.1,80,000/-मान्‍य असलेस या कार्यालयात सहीचा अधिकार असलेल्‍या व्‍यक्‍ती व साक्षीदार यांनी प्रत्‍यक्ष येऊन नवीन दावा व्‍हौचरवर सही शिक्‍का करावा व सदरचे काम सदर पत्र मिळालेपासून 7 दिवसात न केलेस नमुद दावा रक्‍कम घेणेस आपण उत्‍सुक नाही असे समजून फाईल बंद केली आहे असे नमुद केलेले आहे.त्‍यास दि.29/04/2010 रोजीच्‍या पत्राने तक्रारदार संस्‍थेने सामनेवालांना प्रस्‍तुतची रक्‍कम रु.1,80,000/- मान्‍य नसलेबाबत व संपूर्ण रक्‍कम देणेस कंपनी टाळाटाळ करीत असलेमुळे विम्‍याची संपूर्ण रक्‍कम व्‍याजासहीत 7 दिवसांचे आत न मिळालेस जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,कोल्‍हापूर येथे दावा करीत असलेबाबत कळवलेचे दिसून येते.
 
           वरील वस्‍तुस्थितीचा विचार करता वर नमुद तीन संस्‍थामार्फत अनंत पाटीली यांचे नांवे विमा उतरविलेला होता. दोन संस्‍थांनी प्रत्‍येकी रक्‍कम रु.60,000/- मान्‍य करुन स्विकारलेली आहे व तिस-या तक्रारदार संस्‍थेने पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीने पाठविलेली रक्‍कम रु.1,80,000/- चेकची रक्‍कम नाकारलेली आहे. सदर संस्‍थांनी विमा उतरवितेवेळी अन्‍य कोणत्‍या संस्‍थांनी विमा उतरविलेला आहे याची माहिती त्‍यांना असणेचे कारण नाही. त्‍यामुळे प्रत्‍येक संस्‍थेने स्‍वतंत्रपणे विमा हप्‍ता भरुन विमा उतरविलेला आहे. याची माहिती मात्र सामनेवाला विमा कंपनीला पूर्वीपासून होती. कारण प्रस्‍तुतचे सर्व विमे सामनेवाला विमा कंपनीचे कोल्‍हापूर येथील शाखा कार्यालयाकडून उतरविणेत आलेले आहेत.नमुद विमा योजनेच्‍या अट क्र.6 चे अवलोकन केले असता सदर पॉलीसी अंतर्गत एकापेक्षा जास्‍त जरी पॉलीसी उतरविल्‍या तरी एकूण दायित्‍व हे रक्‍कम रु.3,00,000/- इतके राहिल ही वस्‍तुस्थिती असली तरीही सदर अटी व शर्ती सामनेवाला संस्‍था अथवा तक्रारदारांना अथवा त्‍या विमा धारकाला माहित होत्‍या हे कुठेही निदर्शनास आलेले नाही. त्‍यामुळे वरील तीनही संस्‍थांना एकमेकांची माहिती असेलच असे नाही. मात्र या तीनही संस्‍थाच्‍या विमा व्‍यवहाराची माहिती सामनेवाला विमा कंपनीच्‍या कोल्‍हापूर येथील शाखा कार्यालयास होती. त्‍यामुळे प्रस्‍तुतची माहिती वर नमुद विमा उतरविलेल्‍या संस्‍था अगर विमा धारकांनी जाणीवपूर्वक दडवली असे म्‍हणता येणार नाही. कारण सदरचे विमे हे तक्रारदारांनी न उतरविता संस्‍थांनी उतरविलेले आहेत. व सामनेवाला यांनी प्रत्‍येक संस्‍थेकडून स्‍वतंत्ररित्‍याविमा हप्‍ता घेतलेला आहे.
 
           प्रस्‍तुत पॉलीसीचे अट क्र.6 ची माहिती ही सामनेवाला कंपनीने संबंधीत विमा उतरविलेल्‍या संस्‍थांना जेव्‍हा विमा दाव्‍याची मागणी केली त्‍यावेळेला दिलेली दिसून येते. त्‍यापूर्वी सदर अटी व शर्तीची माहिती तक्रारदार संस्‍था व अन्‍य विमा उतरविलेल्‍या संस्‍थांना दिली होंती अगर कसे याबाबत सामनेवाला कंपनीने आपल्‍या लेखी म्‍हणणेत नमुद केलेले नाही.सामनेवाला कंपनीने स्‍वतंत्ररित्‍या तिन्‍ही संस्‍थाशी संव्‍तंत्रपणे व्‍यवहार करुन विमा हप्‍ता रक्‍कम स्विकारुन करार केलेला आहे.सबब सदर तीन्‍हीं संस्‍था अंतर्गत दिलेल्‍या विमा पॉलीसीच्‍या रक्‍कमा देणेबाबत त्‍यांचे दायित्‍व येते. नमुद दोन संस्‍थांनी प्रत्‍येकी रक्‍क्‍म रु.60,000/- प्रमाणे कोणतीही तक्रार न करता रक्‍कमा स्विकारल्‍या त्‍याबाबत वाद नाही. मात्र तक्रारदार संस्‍थेने अट क्र.6 ला अनुसरुन अदा केलेली रक्‍कम रु.1,80,000/- नाकारलेली आहे. जरी सामनेवाला कंपनीने रक्‍कम रु.1,80,000/- चेक दिला असला तरी दि.28/04/2010 रोजी पत्र पाठवून तक्रारदार संस्‍थेने सदर मान्‍यता पत्रावर हरकत नोंदविल्‍यामुळे नवीन व्‍हौचरवर सही शिक्‍क्‍यानिशी 7 दिवसांत सदर काम न केलेस दावा फाईल बंद करणेत येईल असे कळवलेले आहे. यास अनुसरुन तक्रारदार संस्‍थेने नवीन व्‍हौचर सही करुन दिलेचे दिसून आलेले नाही. तसेच तक्रारीत त्‍यांनी सदर रक्कम रु.1,80,000/- हरकत घेऊन स्विकारलेचे कळवलेमुळे सदर रक्‍कम सामनेवाला कंपनीने अदा केलेली नाही. सबब सदर पॉलीसी अंतर्गत तक्रारदारास विमा रक्‍कम अदा केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सदर पॉलीसी अंतर्गत देय असणारी विमा रक्‍कम रु.3,00,000/- तक्रारदारास अदा न करुन सामनेवाला कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पुर्वाधार पुढीलप्रमाणे –
 
2007(1)CPR 203, UTTARANCHAL STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, DEHRADUN –United India Insurance Co. Ltd.& Ors. Vs.  Neeraj  Sharda & Ors. First Appeal Nos.25, 26 & 61 of 2005 Decided on 08/09/2006 –
 
( I ) Consumer Protection Act, 1986-Section 12 and 17- Janata Personal Accident Insurance Policy Claim-Insured deceased had taken two policies, one of Rs.5 Lacs on 5-8-1996 and 2ndfor Rs.10 lakhs on 23-11-1998-Insured died in car accident on 25-3-2000-Claim filed by assignees was resisted on ground that under the scheme of policy, maximum limit of single or more than one policy was Rs.10 lacs only and insurer was liable to pay Rs. 5 lakhs under each policy as per condition No.6 in policy –District Forum allowed complaint directing appellant to pay policy amount under both policies-Appeal-In condition No.6 was mentioned in both policies in question-When two interpretations were possible one beneficial to insured should be accepted-Policy condition could not be construed to restrict the claim amount-Both Policies had been issued by some office and it was not a case of any fraudulent concealment or suppression of fact-Order passed by District Forum allowing claim under policies called for no interference.
 
IMPORTANT POINT-When two interpretation of a clause in insurance policy are possible one beneficial to insured should be accepted.
 
2009(2) CPR 231(NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION NEW DELHI – New India Assurance Company Ltd. Vs. Khem singh and Others Revision Petition No342 of 2006 Decided on 28-04-2009
 
Consumer Protection Act,1986-Sections 12 and 17-Claim under Janata Personal Insurance Scheme-Deceased insured covered under policy died in road accident on 22.6.1998-Intimation regarding death of insured was sent to Insurance Company on 15.5.2001-Claim was repudiated on ground opf delay in lodging claim as it was to be lodged within one week of death of insured or within one month on showing reasonable cause-Employer of deceased insured would be an agent of Insurance Company and the principal i.e. Insurance Company would be liable for acts of its agent-for the default committed by agent-for the default committed by agent, legal heirs of deceased could not be made to suffer-Order allowing claim under policy and further compensation called for no interference
 
IMPORTANT POINT-In a Janata Personal Insurance Scheme where premium was to be deducted by employer from salary of employee, the employer would be agent of Insurance Company and Insurance Company would be liable for the acts and commissions of agent.   
 
मुद्दा क्र.2:- मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांचे सेवा त्रुटीमुळे क्‍लेमपासून तक्रारदारास वंचित राहवे लागल्‍याने त्‍यास विनाकारण मानसिक त्रास भोगावा लागला आहे. त्‍यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना दिलेला रक्‍कम रु.1,80,000/- चा चेक तक्रारदाराने वटवून घेतला आहे किंवा नाही याबाबतची वस्‍तुस्थिती नि‍दर्शनास आलेली नाही. सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेत पॉलीसीचे अट क्र.6 नुसार संपूर्ण रक्‍कम अदा केलेचे नमुद केले आहे. काही येणे-देणे नसलेचेही नमुद केले आहे. मात्र दि.28/04/2010 चे सामनेवालांचे तक्रारदार संस्‍थेस दिलेले पत्र व दि.29/04/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेल्‍या पत्राचा विचार करता रक्‍कम रु.1,80,000/- तक्रारदारांना मिळाले अथवा नाही याबाबत सत्‍यवस्‍तुस्थिती निदर्शनास आलेली नाही. याचा विचार करता सदर रक्‍कम तक्रारदारांना मिळाली असल्‍यास तक्रारदार रक्‍कम रु.3,00,000/- मिळणेस पात्र असलेने सदर रक्‍कमेतून नमुद रक्‍कम वजावट करुन घेणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षीत ठेवणेत येतो या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
(01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
(02) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्‍कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.28/04/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
                    
(03) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 
(04) सामनेवाला कंपनीने तक्रारदारास चेकची रक्‍कम रु.1,80,000/- अदा केली असल्‍यास सदर रक्‍कम वजावट करुन घेणेचा त्‍यांचा अधिकार सुरक्षीत ठेवणेत येतो.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER