न्यायनिर्णय
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती वैद्य (गाडगीळ) मा. सदस्या
१.. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजा बोर्डा येथे राहत असून त्याने त्याचे घरगुती वापराकरता टवेरा गाडी क्रमांक एम एच ३४ ए एम ८८९९ विकत घेतली होती. गैरअर्जदार ही विमा कंपनी असून गाड्यांची विमा काढून सुरक्षा व नुकसानभरपाई देणारी संस्था आहे. अर्जदारांनी गैर अर्जदाराकडून त्याच्या गाडीचा विमा काढलेला आहे सदर गाडीचा विमा गैर अर्जदाराकडून दिनांक ०७.०२.२०१४ रोजी काढला होता सदर विमा पॉलिसी नुसार विम्याचा कालावधि दिनांक ०८.०२ २०१४ पासून ०७.०२.२०१५ पर्यंत होता. अर्जदाराला त्याच्या गाडीचा मेंटेनन्स करणे सांभाळ करणे कठीण होत असल्यामुळे सदर गाडी विक्री करायची त्याची इच्छा होती परंतु गाडी घेतेवेळी अर्जदाराने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे फायनान्स घेतले होते ते भरल्याशिवाय अर्जदाराला गाडी विक्री करणे शक्य होणार नव्हते त्याबद्दल अर्जदाराने धोटे यांना माहिती दिली असता गणेश धोटे हे सदर गाडी विकत घेण्याकरिता तयार झाले परंतु विकत घेण्या करता संपूर्ण रक्कम नसल्यामुळे दिनांक १०.०३.२०१४ रोजी अर्जदार व गणेश धोटे यांच्यात करार करण्यात आला या करारानुसार श्री गणेश धोटे यांच्यावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची फायनान्स रक्कम दरमहा २०,०४५/- भरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली व १,००,०००/- रक्कम म्हणून अर्जदाराला मिळाले. सर्व कारणांमुळे गाडीचे विक्रीपत्र होणे शक्य नव्हते तसेच मालकी हस्तांतरण करण्यासाठी फायनान्स कंपनीची एनओसी येणे गरजेचे होते. श्री गणेश धोटे यांच्याकडे गाडीचा ड्रायव्हर तसेच काळजी वाहक म्हणून अर्जदाराने दिली व गाडी चालु अवस्थेत ठेवून देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा गणेश धोटे यांच्याकडे अर्ज दराने दिली गणेश धोटे सदर गाडीचा वापर परिवाराच्या घरगुती कामाकरिता करायचे व अर्जदाराच्या परवानगीने सदर गाडीवर ड्रायव्हर व केअरटेकर म्हणून ते राहात होते दरम्यान श्री गणेश धोटे यांच्या घराजवळ राहणार्या त्यांच्या आत्या च्या परिवाराला उपचाराकरिता घेऊन जाण्याकरिता चंद्रपूर ते अकोला येथे दिनांक १५.०५. २०१४ रोजी सकाळी ६ वाजता ते निघाले गाडी येवतमाळ वरून नेर मार्गावर जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट गाडीसोबत अर्जदाराच्या गाडीचा अपघात झाला सदर गाडीला श्री गणेश धोटे चालवीत होते. यामध्ये अर्जदाराच्या गाडीला बरेचसे नुकसान झाले सदर दिनांक १५.०५.२०१४ च्या अपघातानंतर दिनांक १६.०५.२०१४ रोजी अर्जदाराने गैर अर्जदाराकडे विमा पॉलिसीचा नुकसान भरपाईचा क्लेम केला. सदर दावा पोलिस क्लेम क्र. १८२५००/३१/२०१५/००००४५ नुसार आहे. दिनांक १५.०५.२०१४ रोजी म्हणजे अपघाताचे दिवशी विमा पॉलिसी कालावधी अस्तिवात होती अर्जदाराने अपघातानंतर उपरोक्त गाडी दुरुस्त करण्याकरता गाडी कंपनीचे टायअप असलेले शोरूम मध्ये दुरुस्ती करण्यास गाडी टाकली .सदर गाडीला दुरुस्तीकरता शोरूम बिल 3,८०.७१६.३६/- लागले. याव्यतिरिक्त अंदाजे बाहेरील इतर खर्च रक्कम रुपये २०,०००/- चे जवळपास लागलेले आहे उपरोक्त नुकसानभरपाईचा दावा करण्यात आल्यानंतर अर्जदाराला वेळोवेळी मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 2,८५,०००/- नुकसानभरपाईचा दावा मंजूर करण्यात आल्याची माहिती अर्जदार चे कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी मध्ये गैरअर्जदाराकडून अर्जदारांना मिळाली .परंतु रक्कम मिळण्यास वेळ लागेल असे गैरअर्जदार यांनी सांगितले .अर्जदाराने श्री पाटील सर्वेयर राहणार नागपूर यांच्याकडून सुद्धा वेळोवेळी प्रकरणाची माहिती गेतली परंतु अचानक फरवरी २०१६ मध्ये अर्जदाराला त्याच्या गाडीच्या फायनान्स महिंद्रा कंपनी कडून माहिती मिळाली की अर्जदाराचा दावा गैरअर्जदार ने खारीज केला व तसे पत्र त्यांना आलेले आहे .अर्जदाराने महिंद्रा फायनान्स कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांना सदर पत्राची झेरॉक्सप्रत तेथे मिळाली. गैरअर्जदाराकडून कोणतेही पत्र अर्जदाराला आले नाही परंतु कथित २६.०५.२०१५ रोजी च्या पत्र नुसार खोट्या करण्याच्या आधारावरच आणि जाणीवपूर्वक अर्जदाराने अर्जदाराची विमा पॉलिसी नुसार नुकसान भरपाईचा दावा खारीज केला.सबब अर्जदाराने दिनांक 01.०३.२०१६ रोजी गैर अर्जदारांना नोंदनी कृत डाकेने पत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु अर्जदाराने त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही सबब विद्यमान मंचा समक्ष तक्रार दाखल करावी लागत आहे. दरम्यान श्री गणेश धोटे यांच्यासोबतचा व्यवहार रद्द होऊन उपरोक्त वाहन श्री नामदेव नारायण धोटे राहणार चंद्रपूर यांना विक्री केले व त्यानुसार त्यांचे नावांवर हस्तांतरित झाल्याचे आर सी बुक दिनांक 1 मार्च २०१६ रोजी श्री नामदेव नारायण धोटे यांना आरटीओ कार्यालय द्वारे पाठवण्यात आले. सबब गैरअर्जदार यांनी अर्जदाराची कायदेशीर मागणी पूर्ण न केल्यामुळे व कर्तव्यात कसूर केलेला असल्यामुळे सदर तक्रार दाखल केलेली आहे
अर्जदारांची मागणी अशी आहे की गैर अर्जदाराने अर्जदाराचे विमा पॉलिसी नुसार रक्कम रुपये व ४,००,०००/- दावा दाखल तारखे पासून रक्कम हाती मिळेपर्यंत १८ टक्के व्याजासह अर्जदारास द्यावी तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये ५०,०००/- नुकसान भरपाई अर्जदारांनी गैर अर्जदाराला द्यावी तसेच तक्रारींचा खर्च रुपये १५,०००/- गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावा.
२. अर्जदारची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले गैरअर्जदाराने त्याचे लेखी उत्तर दाखल केले. अर्जदाराची तक्रारीत नमूद केलेले कथन अमान्य करून पुढे कथन केले कि अर्जदाराने सदर गाडीसाठी विमा पॉलिसी ०८.०२ २०१४ पासून ०७.०२.२०१५ या कालावधीसाठी त्यतील संपूर्ण अटी व शर्ती सह घेतला होता . अटी व शर्ती प्रमाणे ड्रायव्हर जवळ वैध परवाना असणे अति आवश्यक असून प्रायव्हेट कार मोटोर वाहन हायर व रिवार्ड उपयोगासाठी निषिद्ध आहे .अर्जदाराने ड्रायव्हरचा मोटार वाहन परवाना दाखल केलेला आहे त्यातील नोंदणीची तारीख ०९.१२.२०१० lmv tansporT goods या वाहनासाठी असून त्याची वैधता मोटोर वाहन act १९८८ section 14 प्रमाणे 3 वर्ष आहे म्हणजेच स्पष्ट अर्थ असा होतो की ड्रायव्हर गणेश धोटे चा वाहन परवाना दिनांक ०८.१२.२०१३ पर्यंत वैध होता. त्यानंतर मोटर वाहनांच्या तरतुदीनुसार ३० दिवस (ग्रेस पिरेड) सुट mdl रीनिवालसाठी होता.तेव्हा श्री गणेश धोटे यांनी मोटर वाहन परवाना ला दिनांक २०.०५.२०१४ पासून रिनीवल केलेले आहे. म्हणजेच अपघाताच्या दिवशी दिनांक १५.०५.२०१४ रोजी त्यांच्याजवळ वैध मोटर वाहन परवाना नव्हता. तसेच गैर अर्जदार कंपनीने दिनांक २६.०५.२०१५ रोजी उचित पत्र कागदपत्रे पुराव्यासह त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. परंतु अर्जदाराने प्रतिसाद दिला नाही त्याअर्थी अर्जदार ला त्यावर त्यांच्या बचावात काही एक सांगावयाचे नाही असे ग्राह्य धरण्यात आले. ड्रायव्हर गणेश धोटे जवळ मोटार वाहनाचा वैध परवाना नव्हता व वाहन हायर व रिवार्ड साठी वापरले म्हणजेच पॉलिसी अटी व शर्तीचा भंग जाणुन बुजुन केलेला आहे. सबब अर्जदारांचा दावा न्यायाच्या कसोटीवर मान्य व ग्राह्य धरण्यास पात्र नाही म्हणून अर्ज खारीज होण्यास पात्र आहे.
३.. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे निष्कर्ष
(1.) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा
अवलंब केला आहे काय ? नाही
(3.) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? नाही
. कारणमीमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
४. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराने गैर अर्जदाराकडून सदर गाडीचा विमा काढलेला होता सदर विमा पॉलिसी नुसार विमा कालावधी ०८.०२.२०१४ पासून ०७.०२.२०१५ पर्यंत होता.अर्जदार ला सदर गाडीचा मेटेननन्स करणे शक्य नसल्यामुळे दिनांक १०.०३.२०१४ रोजी करारानुसार अर्जदार यांनी श्री गणेश धोटे सोबत सदर गाडीचा विक्रीचा करार केला परंतु सदर गाडीवर अर्जदाराचा फायनान्स असल्यामुळे गाडी श्री गणेश धोटे यांच्या नावाने हस्तांतरण करणे शक्य नव्हते. दिनांक १५.०५.२०१५ रोजी श्री गणेश धोटे हे त्याच्या आत्याच्या परिवाराला उपचारासाठी घेऊन यवतमाळवरुन नेर मार्गावर जात असताना गाडीला अपघात झाला व गाडीचे नुकसान झाले.दि. १६.०५.२०१५ रोजी नियमानुसार गैरअर्जदाराकडे विमा पॉलिसीच्या नुकसान भरपाई बद्दल मागणी केली तर अर्जदाराने अर्जदाराला विमा दावा विमा पॉलिसीच्या अटीवर व शर्ती प्रमाणे ड्रायव्हरजवळ अपघाताच्यावेळी वैध मोटार वाहन परवाना नव्हता होता या कारणावरून नाकारला अर्जदार यांनी तक्रारीत श्री गणेश धोटे यांचे ड्रायवींग लायसन दाखल केले त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येत आहे की त्यात नोंदणीची तारीख ९.१२.२०१० आहे मोटर वाहन १९८८ च्या कलम १४ प्रमाणे सदर लायसनची वैधता 3 वर्ष परंतु अर्जदार यांच्या ड्राईव्हर श्री गणेश धोटे यांनी दिनांक ०८.१२.२०१३ पर्यंत सदर लाईसन चे नुतनीकरण केले नव्हते. त्यानंतरही ही एक महिन्याच्या आत ग्रेस पिरियड मध्ये त्यांनी सदर लायसन नूतनीकरण केले नाही परंतु दि २०.०५.२०१४ रोजी नूतनीकरण केल्याची नोंद त्यात आहे. व त्यावर दिनांक १९.०५.२०१७ रोजी नियमानुसार पुढील नूतनीकरण करून घेण्याची तारीख नोंदवली आहे. अर्जदाराच्या गाडीचा दाखल दाखल दस्तावेजात प्रमाणे दिनांक १५.०५.२०११४ रोजी झाला श्री गणेश धोटे यांनी त्यांच्या परवाना दिनांक २०.०५.२०१४ रोजी नूतनीकरण करून घेतला यावरून ही बाब स्पष्ट होत आहे की अपघाताची तारीख दि. ०९.१२.२०१३ पासून दिनांक २०.०५.२०१४ पर्यंत अर्जदाराच्या ड्रायव्हरचा वैध परवाना नव्हता व त्याबद्दल खुलासा करण्याकरिता अर्जदाराने तक्रारीत कोणतेही दास्तएवज दाखल केले नाही. तरीसुद्धा गणेश धोटे यांनी त्यांच्या आत्याच्या परिवाराला घेऊन सदर गाडी चा उपयोग केला ही बाब गैरअर्जदार कंपनीच्या अटी व शर्ती चे उल्लंघन करणारी असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नाकारला तसेच तक्रारीत गैरअर्जदाराने तक्रारी दाखल केलेल्या सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या lll (2009) ACC 895 (sc ) New India insurance company Ltd vs Suresh Chandra Aggarwal. civil appal no 44 of 2003 या न्यायनिर्णयानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयानचे मत या तक्रारीतील तथ्याना लागू होत असल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारांचा दावा नाकारून सेवेतून त्रुटी दिलेली नाही ही बाब सिद्ध होत आहे सबब मुद्दा क्रमांक १ व २ उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
५. . मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार क्रं ५२/२०१६ अमान्य करण्यात येते.
(2) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे (कुटे) उमेश वि. जावळीकर किर्ती वैद्य(गाडगीळ)
सदस्या अध्यक्ष सदस्या