Maharashtra

Sangli

CC/11/54

SMT SHEWANTA SHAMRAO SHID - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INS.CO.LTD,NAGPUR - Opp.Party(s)

AD SHETE

08 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/54
 
1. SMT SHEWANTA SHAMRAO SHID
A/P CHIKURDE,TAL WALWA
SANGLI
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INS.CO.LTD,NAGPUR
HINDUSTAN COLONY,WARDHA RD,NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:AD SHETE, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                               नि.क्र. 28   
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र.54/2011
---------------------------------------------
तक्रार नोंद तारीख   : 25/02/2011
तक्रार दाखल तारीख  :  03/03/2011
निकाल तारीख         :   08/06/2012
----------------------------------------------
 
1. श्रीमती शेवंता शामराव शिद
    वय वर्षे 50, व्‍यवसाय शेती व घरकाम
    रा.चिकुर्डे, ता.वाळवा, जि. सांगली.                  ...... तक्रारदार
विरुध्‍द
 
1. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., चे
    विभागीय व्‍यवस्‍थापक श्री अरुणाभ बर्धन,
    वय वर्षे सज्ञान, धंदा – नोकरी
    डिव्‍हीजन ऑफिस नं.2, 8, हिंदुस्‍थान कॉलनी,
    अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर 440 015
 
2. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि. चे व्‍यवस्‍थापक
    श्रीमती सुचेता प्रधान,
    वय वर्षे सज्ञान, धंदा – नोकरी
    101, शिवाजी नगर, 3३ रा मजला,
    मंगला टॉकीज जवळ, पुणे 411005
 
3. महाराष्‍ट्र शासन तर्फे मा.जिल्‍हाधिकारी
    श्री शाम वर्धने
    वय वर्षे सज्ञान, धंदा – नोकरी
    जिल्‍हाधिकारी कार्यालय, सांगली                    ..... जाबदार
 
                                    तक्रारदार तर्फे : अॅड एम.एन. शेटे
                              जाबदारक्र.1 तर्फे :  श्री एस.पी.कुलकर्णी
                 जाबदारक्र. 2 : एकतर्फा
                 जाबदारक्र. 3 : स्‍वत:
 
 
 
- नि का ल प त्र -
 
द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. अनिल य.गोडसे 
 
1.    तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे. 
 
2.  सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने राज्‍यातील शेतक-यांच्‍या अपघातासंदर्भात शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी जाबदार क्र.1 विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्‍यात आला आहे. तक्रारदार यांचे पती कै.शामराव दादू शिद हे शेतकरी होते व त्‍यांचा दि.17/12/2008 रोजी पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला. तक्रारदार या त्‍यांच्‍या पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्‍कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी, चिकुर्डे यांचेकडे जानेवारी 2009 मध्‍ये प्रस्‍ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्‍ताव तहसिलदार वाळवा यांचेकडे पाठविला. तहसिलदार वाळवा यांनी सदरचा प्रस्‍ताव जाबदार क्र.3 मार्फत योग्‍य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविला. सर्व पूर्तता करुनही जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा दि.27/09/2010 रोजीच्‍या पत्राने नाकारला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी विम्‍याची रक्‍कम व्‍याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.3 च्‍या यादीने 8 कागद दाखल केले आहेत.
 
3.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. 2 यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होवून देखील ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्‍यात आला. 
 
4.    जाबदार क्र.1 यांनी याकामी नि.24 वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांच्‍या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये महाराष्‍ट्र शासनाबरोबर शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देणेबाबत करार झाला आहे ही बाब मान्‍य केली आहे. तक्रारदार यांचे पती हे शेतकरी होते ही बाब जाबदार यांनी अमान्‍य केली आहे. तक्रारदार यांचे पती हे दि.11/8/2008 पासून बेपत्‍ता होते व ते वेडसरपणामुळे पाण्‍यात पडून मयत झाले आहेत त्‍यामुळे तक्रारदार यांचा विमादावा पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार देय नाही. जाबदार यांनी  तक्रारदार यांचा विमादावा योग्‍य त्‍या कारणास्‍तव नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत. सबब प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यात नमूद केले आहे. जाबदार क्र.1 यांनी नि.25 ला शपथपत्र दाखल केले आहे.
 
5.    जाबदार नं.3 यांनी नि.12 वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. सदर म्‍हणण्‍यामध्‍ये जाबदार यांनी तक्रारदार यांचे विम्‍याबाबतचा परिपूर्ण प्रस्‍ताव दि.18/2/2009 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडे पाठविला आहे. तक्रारदारांच्‍या विमादाव्‍याबाबतचा मजकूर जाबदार यांनी मान्‍य केला आहे. 
 
6.    तक्रारदार यांनी नि.२३ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे तसेच नि.22 च्‍या यादीने व नि.27 च्‍या यादीने कागद दाखल केले आहेत. तसेच तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस नि.26 ला दाखल केली आहे.
 
7.    तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे यांचे  अवलोकन केले. जाबदार यांचे विधिज्ञ यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला नाही तसेच जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठीही उपस्थित राहिले नाहीत. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील तक्रारअर्ज व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्‍या वतीने महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.1 यांचेबरोबर विमा करार केला आहे त्‍यामुळे अपघातग्रस्‍त शेतकरी व त्‍यांचे वारस हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्‍दा ग्राहक या सदरात येतो त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.1 यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.
 
8.    तक्रारदार यांनी त्‍यांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्‍कम रु.1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.  तक्रारदार यांनी नि.27/4 वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये विम्‍याचा कालावधी दि.15/8/2007 ते 14/8/2009 असा असल्‍याचे नमूद केले आहे.   तक्रारदार यांचे पती यांचा मृत्‍यू दि.17/12/2008 रोजी म्‍हणजे विमा मुदतीत झाला आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. जाबदार यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणण्‍यानुसार महाराष्‍ट्र शासनाचे वतीने जाबदार क्र.1 यांच्‍या बरोबर राज्‍यातील शेतक-यांसाठी विमा योजना राबविण्‍यात आली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या नि.27/4 वरील पॉलिसीनुसार अपघातग्रस्‍त व्‍यक्‍ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय 10 ते 75 वयोगटातील असणे आवश्‍यक आहे. पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्टचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे वय 65 असे नमूद आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पतीच्‍या वयाबाबत कोणताही वाद उपस्थित केला नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचे पतीचे वय निश्चितच 10 ते 75 या दरम्‍यानचे आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. अपघातग्रस्‍त व्‍यक्‍ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी सात-बारा उतारा व खाते उतारा याकामी दाखल केला आहे.    सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचे पती हे शेतकरी आहेत ही बाब समोर येते. 
 
9.    तक्रारदार यांनी याकामी नि.3/8 ला जाबदार यांचे पत्र दाखल केले आहे. जाबदार यांनी सदर पत्रानुसार तक्रारदार यांचा विमादावा तक्रारदार यांचे पती यांचा मृत्‍यू वेडसरपणामुळे पाण्‍यात पडून झाला आहे या कारणास्‍तव फेटाळला आहे. तक्रारदार यांचे पती हे वेडसरपणामुळे पाण्‍यात पडले व त्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला हे दर्शविण्‍यासाठी जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये नि.3/4 वरील वर्दी जबाबाचा उल्‍लेख केला आहे. सदर वर्दी जबाब हा मयताचा भाऊ भिरु बापू शिद यांनी दिला आहे. सदर भिरु बापू शिद याने माझे चुलत भाऊ शामराव शिद हे थोडे वेडसरपणात कोठेतरी निघून गेले होते असे नमूद केले आहे. सदर वर्दी जबाब हा ग्राहय धरण्‍यासारखा पुरावा नाही असे तक्रारदार यांचे विधिज्ञांनी आपले युक्तिवादामध्‍ये नमूद केले. तसेच त्‍याचे पुष्‍ठयर्थ सन्‍मा. राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र यांचा 2006 (3) CPR 320   Shri Narendra Vs. The Divisional Manager, National Insurance Co. हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयाचे कामी सन्‍मा राज्‍य आयोग यांनी
Consumer Forum cannot rely on statement recorded under Section 161 of Cr.P.C. to arrive a finding on question of breach of condition of insurance policy.  
सदर निवाडयातील निष्‍कर्ष पाहता सदरचा वर्दी जबाब हा तक्रारदार यांचे पतीचा मृत्‍यू वेडसरपणामुळे पाण्‍यात पडून झाला ही बाब शाबीत करण्‍यासाठी पुरेसा नाही. तक्रारदार यांच्‍या मृत्‍यूबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांनी Cr.P.C. 174  प्रमाणे चौकशी केली असून त्‍याचा चौकशी अहवाल तक्रारदार यांनी नि.22 चे यादीने दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे पतीचा मृत्‍यू हा पाण्‍यात पडून मयत असे नमूद केले आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचे पती यांचा मृत्‍यू हा वेडसरपणामुळे झाला ही बाब शाबीत होत नाही व त्‍याबाबत जाबदार यांनी कोणताही इतर अन्‍य पुरावा दाखल केलेला नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारला आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्‍याने तक्रारदार हे रक्‍कम रु.1,00,000/- व सदर रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.27/09/2010 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज देण्‍याबाबत आदेश करणे न्‍याय्य होईल असे मंचाचे मत झाले आहे. 
 
10.   तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारल्‍याने तक्रारदार यांना या न्‍याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्‍य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
 
11.   यातील जाबदार क्र.3 हे महाराष्‍ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.2 यांची सल्‍लागार म्‍हणून नेमणूक केली आहे. विम्‍याचे संरक्षण देण्‍याची जबाबदारी व करार जाबदार क्र.1 यांचेबरोबर झालेला आहे त्‍यामूळे सदरचा आदेश जाबदार क्र.1 यांचेविरुध्‍द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
 
2. तक्रारदार यांना जाबदार नं.1 यांनी विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रुपये 1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख माञ) दि.27/9/2010 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह अदा करावेत.
 
3. तक्रारदार यांना जाबदार क्र.1 यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
 
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी दिनांक 23/7/2012 पर्यंत करणेची आहे.
 
5. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली
दि. 8/06/2012                        
 
                  (गीता सु.घाटगे)                    (अनिल य.गोडसे)
                       सदस्‍या                                       अध्‍यक्ष           
                              जिल्‍हा मंच, सांगली.                    जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
 
 
[HON'ABLE MR. A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.