(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांनी शासनाच्या, राजीव गांधी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणा-या विमा रकमेची मागणी गैरअर्जदार यांच्याकडे केली. गैरअर्जदार यांनी रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.415/10 अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा दिपक देवरे हा गैरअर्जदार क्र.2 यांच्या शाळेत शिक्षण घेत होता. विहीरीत पडल्यामुळे त्याचे निधन झाले. त्याचा पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम करण्यात आले. अर्जदाराने शासनातर्फ काढण्यात आलेल्या राजीव गांधी सुरक्षा योजनेअंतर्गत विमा रकमेची मागणी गैरअर्जदार यांच्याकडे केली. पण गैरअर्जदार यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, गैरअर्जदार यांनी व्याजासह रक्कम देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीत ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला प्रतिवादी केले होते. पण ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या जवाबानुसार शासनाची ही पॉलीसी त्यांच्याकडे काढण्यात आलेली नाही. त्यानंतर अर्जदाराने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे ही विमा योजना असल्याचे सांगून त्यांना प्रतिवादी करण्याची विनंती मंचास केली, व मंचाने त्यास मान्यता दिली. व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला प्रतिवादी क्र.1 करण्यात आले, व ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला वगळण्यात आले. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी प्रतिवादी क्र.1 तर्फे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार अर्जदाराने मुलाच्या अपघाती निधनानंतर त्यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल केला नसल्याचे व अर्जदाराची तक्रार प्री मॅच्युअर असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाची ही विमा योजना दि.27.10.2007 ते 26.08.2008 या कालावधीसाठी होती, पण अर्जदाराच्या मुलाचे दि.30.03.2009 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे या पॉलीसीच्या मुदतीनंतर आहे. त्यामुळे सदरील तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार दिपक देवरे हा विद्यार्थी 2008 ते 2009 या शैक्षणिक वर्षात त्यांच्या शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत होता. दि.29.03.2009 रोजी विहिरीत पडल्यामुळे त्याचे अपघाती निधन झाले. या घटनेनंतर शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा अंतर्गत विमा संरक्षण या योजनेअंतर्गत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला व त्याप्रमाणे पोलीस पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टम अहवाल, इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली, पण गैरअर्जदार विमा कंपनीतर्फे त्याची दखल घेण्यात आली नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार असे आढळून येते की, मयत दिपक यादवराव देवरे हा गैरअर्जदार क्र.2 या शाळेचा (3) त.क्र.415/10 विद्यार्थी होता. दि.29.03.2009 रोजी त्याचे विहीरीत पडून अपघाती निधन झाले. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली असून, त्याचा पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टम अहवाल इत्यादी कागदपत्रे अर्जदाराने मंचात दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार सदरील विमा योजनेची मुदत दि.27.10.2007 ते 26.08.2008 अशी होती व अर्जदाराच्या मुलाचे दि.29.03.2009 रोजी अपघाती निधन झालेले असल्यामुळे अर्जदारास विमा रक्कम देता येत नाही. महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी काढण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजना 2007-2008 चे निरीक्षण केल्यावर या विमा योजनेचा कालावधी दि.27.10.2007 ते 26.08.2008 असा नमूद केलेला दिसून येतो. नंतर महाराष्ट्र शासनातर्फे गैरअर्जदार क्र.1 यांच्याबरोबर झालेल्या कराराप्रमाणे या योजनेचा कालावधी दि.27.08.2008 ते 26.08.2009 पर्यंत वाढविण्यात आला. मुदतवाढ झाल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 हे अर्जदाराचा क्लेम फॉर्म स्विकारुन त्यांना नियमाप्रमाणे विमा रक्कम देण्यास बांधिल आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी तारीख नसलेले पत्र गैरअर्जदार क्र.2 यांच्या नावे पाठविले असून, त्यात दिपक देवरे यांच्या अपघाती मृत्यूचा पोलीस पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र व पोस्टमार्टम अहवाल पाठविण्याबददल कळविले असल्याचे दिसून येते. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराचा क्लेम फॉर्म मिळाला नसल्याचे व ही योजना मुदतबाहय असल्याचे गैरअर्जदार क्र.1 यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही. अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत असून, ते विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास 30,000/- रुपये क्लेम फॉर्म मिळाल्याच्या तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत 9% व्याजदराने 30 दिवसाच्या आत द्यावे. 2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबददल रु.2500/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |