Maharashtra

Nanded

CC/08/314

Santosh Gunaji Mule - Complainant(s)

Versus

The Orient Insurance Co.Lit - Opp.Party(s)

ADV.S.V.Ardhapurkar

06 Jan 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/314
1. Santosh Gunaji Mule R/o.Taroda Naka,NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. The Orient Insurance Co.Lit G.G.Road.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 06 Jan 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  314/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 25/09/2008
                           प्रकरण निकाल तारीख   - 06/01/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते,                 - सदस्‍य
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर          -  सदस्‍या
             
संतोष गुणाजी मुळे
वय, 27 वर्षे, धंदा, ट्रान्‍सपोर्ट
रा. तरोडा नाका, कल्‍याण नगर, नांदेड.                       अर्जदार
 
      विरुध्‍द.
 
1.   दि. ओरिएंन्‍टल इश्‍योरंन्‍स कंपनी लि.
    मार्फत, विभागीय मॅनेजर,
    572, सदाशिव पेठ, चेंबर, लक्ष्‍मी रोड,
    पूणे- 411 030.                                  गैरअर्जदार
 
2.   दि. ओरीएंन्‍टल इश्‍योरंन्‍स कंपनी लि.
    मार्फत, ब्रॅच मॅनेजर, तारासींह मार्केट,
    नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील            - अड.वाय.एस.अर्धापूरकर
गैरअर्जदार   तर्फे वकील          - अड.पी.एस. भक्‍कड.
 
                            निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार ओरिएंन्‍टल इन्‍शूरन्‍स कंपनी  यांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदाराने खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदार यांच्‍या मालकीच्‍या ट्रक नंबर एम.एच.-26-बी-4458 या वाहनाच्‍या सूरक्षेसाठी गैरअर्जदार कंपनीकडे दि.11.06.2006 ते 10.07.2007 या कालावधीसाठी विमा घेतला होता. सदरील वाहन चालविण्‍यासाठी अधिकृत वाहन चालविण्‍याचा परवाना असलेले दिलीप गवळी यांना ट्रक ड्रायव्‍हर म्‍हणून नेमले होते. दि.04.06.2007 रोजी अर्जदाराची गाडीचा वडवणी-बीड-परळी रोडवर अपघात झाला. यात गाडी पलटी झाल्‍यामूळे गाडीचे पूर्ण बाडीचे व इंजीनचे नूकसान झाले. यानंतर गैरअर्जदारास अपघातासंबंधी माहीती दिली व त्‍यांनी पाठविलेल्‍या अधिका-यांनी नूकसानी बददलचे असेंसमेंट केले. अर्जदार यांनी दूरुस्‍तीसाठी रु.40,165/- व रु.29,000/- खर्च आला. तसेच बॉडी बिल्‍डींगचे कामात रु.79,500/- खर्च आला. गैरअर्जदारांनी वाहनाच्‍या नूकसानीची भरपाई देण्‍याऐवजी दि.21.07.2008 रोजी  अपघातग्रस्‍त ट्रकमध्‍ये 11 प्रवासी प्रवास करीत होते म्‍हणून पॉलिसीच्‍या अटीचे व शर्तीचे उल्‍लंघन केले आहे असे कारण देऊन क्‍लेम देण्‍याचे नाकारले. अर्जदारास वाहनाच्‍या दूरुस्‍तीसाठी रु.1,53,665/- एवढा खर्च आलेला आहे. गैरअर्जदाराने बेकायदेशीररित्‍या क्‍लेम नाकारल्‍यामूळे त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व खर्च गैरअर्जदाराकडून मिळावा अशी मागणी केली आहे.
 
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांनी सेवेत कोणतीही कमतरता केली नाही. वाहनाची मालकी, विमा व अपघात हे गैरअर्जदारास मान्‍य आहे. दि.05.07.2006 रोजी गैरअर्जदार यांना सूचना प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी दोन सर्व्‍हेअर मार्फत घटनास्‍थळाचा पंचनामा केला व श्री. बस्‍वराज जी बरबडे सर्व्‍हेअर यांचा फायनल सर्व्‍हे रिपोर्ट दि.17.08.2007 रोजी गैरअर्जदारांना प्राप्‍त झाला. बिल चेक रिपोर्ट प्रमाणे वाहनाचे अपघातात रु.66,670/- चे नूकसान झालेले आहे. अर्जदाराने मागितलेले रु.1,53,665/- चा खर्च गैरअर्जदार यांना अमान्‍य आहे. अर्जदाराचे वाहन ट्रक एम.एच.-26-बी-4458 यांची आसन क्षमता वाहनाप्रमाणे 2   1 अशी आहे. म्‍हणजे ट्रक ड्रायव्‍हर व क्‍लीनर यांचा विमा, यांचे व्‍यतिरिक्‍त वाहनामध्‍ये 11 प्रवासी प्रवास करीत होते. एवढे प्रवासी बसवून अर्जदाराने विमा पॉलिसीचे उल्‍लंघन केलेले आहे. त्‍यामूळे दि.21.07.2008 रोजी अर्जदाराचा क्‍लेम अमान्‍य केला आहे. असे कळवून गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. सबब अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
 
 
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द करतात
     काय ?                                             होय.
2.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                             कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांनी पॉलिसी कव्‍हर नोट नंबर ऐ 1239674  तसेच वाहनाचे आर.सी. बूक, अपघाता संबंधीचे एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी, ड्रायव्‍हींग लायसन्‍स व वाहनाला झालेला अपघात हे गैरअर्जदारांना मान्‍य आहे. वाद फक्‍त वाहनाची दूरुस्‍ती बदललचा आहे. अर्जदाराचा ट्रक नंबर एम.एच.-26-बी-4458 या वाहनाचे दूरुस्‍तीसाठी रु.1,53,665/- एवढी रक्‍कम मागितली आहे व गैरअर्जदार यांचे सर्व्‍हेअरनी सर्व्‍हे करुन वाहनाचे झालेले नूकसान बिल चेक रिपोर्ट नंतर रु.66,670/- असे ठरवलेले आहे परंतु ती रक्‍कम देण्‍याचे नाकारलेले आहे व त्‍यांचे कारण त्‍यांनी ट्रकमध्‍ये 11 प्रवासी प्रवास करीत होते असे दिलेले आहे. यामूळे विमा पॉलिसीतील अटीचे व शर्तीचे उल्‍लंघन झालेले आहे असे त्‍यांनी म्‍हटले आहे व यांच कारणासाठी त्‍यांनी गैरअर्जदारांना पञ पाठवून या कारणाचा उल्‍लेख करुन क्‍लेम नामंजूर केलेला आहे. ते पञ या प्रकरणात दाखल केलेले आहे. पॉलिसीतील शर्तीप्रमाणे यात 11 प्रवासी जरी प्रवास करीत असले तरी अपघाताचे कारण ओव्‍हर लोड किंवा प्रवासी बसल्‍यामूळे झाला काय हे बघणे आवश्‍यक आहे. एफ.आय.आर., पोलिस पंचनामा पाहताना असे दिसून येते की, ट्रक वेगात जात असताना ट्रक रोडच्‍या बाजूस पलटी खाल्‍ला त्‍यामूळे वाहनाच्‍या बॉडीचे व इंजीनचे नूकसान झाले व त्‍यात प्रवासी जखमी पण झाले. अपघाताचे कारण हे प्रवासी नसून रोडच्‍या कडेला असलेल्‍या खडडयात जाऊन ट्रक पलटी खाल्‍ला म्‍हणून अपघात झालेला आहे म्‍हणून गैरअर्जदार यांनी पॉलिसीच्‍या नियमाचा आधार घेऊन आपल्‍या जबाबदारीतून मूक्‍त होता येणार नाही. 
 
              III 1996 CPJ   178  मा. राज्‍य आयोग, हिमाचल प्रदेश  यात सूरजिंतसिंग   विरुध्‍द न्‍यू इंडिया अश्‍योरंन्‍स कंपनी लि.   या सायटेशनचा आधार घेता येईल. यात ट्रक मधून अनाधिकृत प्रवासी प्रवास करीत होते त्‍या ट्रकचा अपघात झाला परंतु ट्रकमध्‍ये असलेल्‍या प्रवाशामूळे हा अपघात झाला नव्‍हता त्‍यामूळे गैरअर्जदार यांना जबाबदारी टाळता येत नाही.
 
              या प्रकरणात सर्व्‍हेअर श्री. बी.जी.बरबडे  यांचा सर्व्‍हे रिपोर्ट दाखल आहे. अपघात झाला त्‍यावेळेस सर्व प्रथम जाऊन वाहनाचे काय नूकसान झाले हे पाहणारा अधिकारी आहे. अर्जदार यांनी जरी रु.1,53,665/- मागितले असले तरी वाहनाचे वय लक्षात घेऊन त्‍याचेवर 50 टक्‍के डिप्रिसियेशन सर्व्‍हेअरने गृहीत धरले आहे. त्‍यातून पॉलिसी एक्‍सेस व सालव्‍हेज वजा जाता रु.66,670/- एवढे नूकसान झाल्‍याचे प्रमाणीत केले आहे. सर्व्‍हेअरनी ठरवलेली रक्‍कम अर्जदार यांना मिळणे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने योग्‍य आहे. म्‍हणून अर्जदार यांनी जरी दूरुस्‍तीची बिले दाखल केलेली असली तर 50 टक्‍के डिप्रिसियेशन गृहीत धरल्‍यास सर्व्‍हेअरनी ठरवलेले असेंसमेंट हे योग्‍य आहे. ही रक्‍कम गैरअर्जदाराने अर्जदारांना न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2.                                         गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.66,670/- व त्‍यावर दि.21.07.2008 पासून 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम पदरीपडेपर्यत व्‍याजासह दयावेत.
 
3.                                         मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे                                       श्रीमती सुजाता पाटणकर                               सतीश सामते    
   अध्‍यक्ष                                                            सदस्‍या                                                  सदस्‍य.                
 
 
 
जे.यु.पारवेकर
लघूलेखक.