Maharashtra

Chandrapur

CC/20/13

Shrimati Sunita Shriram Kashiwar - Complainant(s)

Versus

The Orienral Insurance Company Ltd.Through Divisional Manager - Opp.Party(s)

P.S.Deotale

06 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/13
( Date of Filing : 05 Feb 2020 )
 
1. Shrimati Sunita Shriram Kashiwar
At.Jankapur Post Kalasgaon (khurd)Tah.Nagbhid,Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. The Orienral Insurance Company Ltd.Through Divisional Manager
Divisional Office,Pagalkhana Chowk,Chhindwada road,Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
2. M/s Jaika Insurance Brokerage Pvt Ltd. Through Manager
Second Floor,Jayaka Building,commercial road,civil line,nagpur
Nagpur
MAHARASHTRA
3. Taluka Krushi Adhikari, Nagbhid
Nagbhid, Tah.Nagbhid, Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Feb 2023
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                  (पारीत दिनांक ०६/०२/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे  कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ती ही जनकापूर, तहसील पळसगांव (खुर्द) तालुका नागभीड, जिल्‍हा  चंद्रपूर येथे राहत असून तिच्‍या पतीच्‍या मालकीची मौजा अड्याळमेंढा, तालुका नागभीड, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक १६८ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचा पती सदर शेतजमीनीवर शेती करुन कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विमा कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ही विमा सल्‍लागार कंपनी आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत दावे स्‍वीकारतात. तक्रारकर्तीने तिच्‍या पतीचा रुपये २,००,०००/- चा विमा शासनाच्‍या वतीने उतरविला होता. तिच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक ३/१२/२०१७ रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने झाला असल्‍याने तिने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे दिनांक २१/०२/२०१८ रोजी अपघात विमा नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता दावा केला. तक्रारकर्ती ही श्री श्रीराम जयराम काशीवार यांची पत्‍नी असल्‍यामुळे सदर विम्‍याची एकमेव लाभधारक आहे. त्‍यामुळे तिने रीतसर अर्ज करुन दस्‍तऐवजासह दावा दाखल करुन मागविलेले दस्‍तऐवजाची पुर्तता केली परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विमा दाव्‍याबाबत काहीही न कळविल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या वकीलांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे माहितीच्‍या कायद्याखाली माहिती मागविली असता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी निधी उपलब्‍ध झाल्‍यावरच पैसे देऊ असे सांगितले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दावा मंजूर अथवा नामंजूर नकळविल्‍याने तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांची दावा रक्‍कम देण्‍याची इच्‍छा नसल्‍याने निधी उपलब्‍ध नसल्‍याचे कारण त्‍यांनी दिले. त्‍यामुळे तक्रारकर्तीला रकमेस व त्‍यावरील व्‍याजास मुकावे लागत आहे. ज्‍या उद्देशाने शासनाने सदर योजना चालूकेली त्‍या उद्देशालाच तडा विरुध्‍द पक्ष हे देत आहे. तसेच विरुध्‍द पक्ष ह्यांची ही कृती तक्रारकर्तीप्रती सेवेत न्‍युनता असल्‍यामुळे सदर तक्रार विरुध्‍दपक्षा विरुध्‍द दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रार अर्ज मंजूर करुन विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- प्रस्‍ताव दिल्‍यापासून दिनांक २१/०२/२०१८ पासून द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याजासह विरुध्‍द पक्ष यांनी द्यावे तसेच तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक वशारीरिक ञासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- विरुध्‍द पक्ष यांनी द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारीत हजर राहून त्‍याचे उत्‍तर दाखल करीत नमूद केले की. शासनाने शेतकरी व त्‍यांच्‍या कुटुंबियाकरिता शेतकरी जनता अपघात विमा योजना काढली. या योजनेअंतर्गत अर्जदाराला त्‍याचे दावे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांच्‍याकडे सादर करावे लागतात असे दावे सादर झाले की, दस्‍तऐवजाची मागणी करुन त्‍याची पुर्तता झाल्‍यावर ते दावे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे कृषी अधिकारीकडे पाठवितात व नंतर कृषी अधिकारी विमा सल्‍लागार म्‍हणजे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडे पाठवितात व त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे दावे मंजूरीकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे पाठवितात. प्रत्‍येक दावा मंजूर वा नामंजूर करणे हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या अखत्‍यारीत असते. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे फक्‍त एक मध्‍यस्‍थी म्‍हणून काम करतात. तक्रारकर्तीच्‍या पतीचे दिनांक ३/१२/२०१७ रोजी अपघाती निधन झाले.विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांची नियुक्‍ती दिनांक १/१२/२०१६ ते ३०/११/२०१७ या कालावधीकरिता झाली होती तसेच विमा कंपनी पॉलिसीचा कालावधी दिनांक १/१२/२०१६ ते ३०/११/२०१७ होता. तक्रारकर्तीने सादर केलेल्‍या कागदपञावरुन हे स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे की, सदर दावा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या झालेल्‍या नियुक्‍तीच्‍या कालावधीत तसेच विमा पॉलिसीच्‍या कालावधीत मोडत नाही. सबब तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्षक्रमांक २ विरुध्‍द सदरची तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण नाही. सबब सदरची तक्रारविरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सदर तक्रारीत उपस्थित राहून तक्रारकर्तीचे कथन खोडून काढीत पुढे नमूद केले की, तक्रारकर्ती हिने सदर दावा दाखल करायच्‍या आधी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेशी कोणताही संवाद साधला नाही किंवा दावा प्रपञासह  कोणतेही दस्‍तऐवज विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दाखल केलेले नाही. सदर तक्रारीला कारण दिनांक ३/१२/२०१७ रोजी घडले जेव्‍हा तक्रारकर्तीचा पतीचे निधन झाले तसेच एफ.आय.आर. हा दिनांक १७/१२/२०१७ रोजी पोलीस स्‍टेशन बाळापूर तळोधी येथे झाला. परंतु तक्रार ही आयोगात दिनांक ०३/०२/२०२०रोजी दाखल करण्‍यात आली. त्‍यामुळे सदर तक्रार मुदतबाह्य असून खारीज होण्‍यास पाञ आहे. शेतकरी अपघात योजनेनुसार तक्रारकर्तीने दावा हा ९० दिवसाच्‍या आत कृषी अधिकारी यांचेकडे दाखल करायला हवा परंतु तक्रारकर्तीने असे कोणतेही दस्‍त तक्रारीत दाखल केले नाही जे दर्शवित आहे की तक्रारकर्तीने तिचा दावायोग्‍य दस्‍तऐवजासह ९० दिवसांचे आत दाखल केला आहे. तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीने अपघाताच्‍या वेळी कलम १२९ एम.व्‍ही. कायद्यानुसार हेल्‍मेट घातले नव्‍हते जेव्‍हा की, शवविच्‍छेदन रिपोर्टनुसार तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युचे कारण Bodily Injury हे आहे. म्‍हणजेच तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केलेले असल्‍यामुळे झाला हे सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्तीचा दावा खारीज होण्‍यास पाञ आहे. तसेच तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करीत असतांना मय्यताचे वारसदार यांना पक्ष केले नाही किंवा त्‍याचे ना हरकत पञ तक्रारीत दाखल नाही. तक्रारकर्तीच्‍या पतीचे निधन दिनांक ३/१२/२०१७ रोजी झाले परंतु विमा कंपनी यांची विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक १/१२/२०१६ ते दिनांक ३०/११/२०१७ होता. तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु हा विमा पॉलिसीच्‍या कालावधीत मोडत नसल्‍याकारणानेही सदर तक्रार विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्तीने खोटी व बनावटी स्‍वाक्षरी करुन सदर तक्रार दाखल केल्‍यामुळे सदर तक्रार दंडासह खारीज होण्‍यास पाञ आहे.
  6. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्‍याचे लेखी उत्‍तर दाखल करीत नमूद केले की, तक्रारकर्तीने दिनांक २१/०२/२०१८ रोजी सादर केलेल्‍या  प्रस्‍तावाची तपासणी करुन सविस्‍तर प्रस्‍ताव मा. जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचे कार्यालयास सादर करण्‍यात आला. सदर प्रस्‍ताव त्‍याचे पञ दिनांक  २५/०५/२०१९ प्रमाणे मुख्‍य सांख्‍यीकी आयुक्‍त, पुणे यांचे कार्यालयात सादर केल्‍याचे पञ आहे. सदर प्रस्‍ताव खंडित कालावधीत असल्‍याने कुठल्‍याही विमा कंपनीने विम्‍याचे दायित्‍व घेतले नसल्‍याने सदर प्रस्‍ताव शासन स्‍तरावर प्रलंबित आहे. शासन निर्णय क्रमांक शेअवि२०१८/प्र.क्र.१८६/११-अे दि. २८ फेब्रुवारी २०२० नुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सन २०१७-२०१८ या वर्षातील दिनांक ९/१२/२०१७ ते ७/१२/२०१७ खंडित कालावधीतील प्राप्‍त झालेले दावे निकाली काढण्‍याकरिता विशेष बाब म्‍हणून शासन स्‍तरावरुन मंजूरी देण्‍याकरिताच शासन निर्णय झाला आहे.

कारणमीमांसा

  1. सदर प्रकरणातील तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु दिनांक ३/१२/२०१७ रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने झाला. तक्रारकर्तीचा पती यांचा अपघात विमा काढलेला असल्‍यामुळे तक्रारकर्तीने दिनांक २१/०२/२०१८ रोजी अपघात विमा दावा मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे दावा अर्ज दस्‍तऐवजासह दाखल केला परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला दावा मंजूर अथवा नामंजूर न कळविल्‍याने तक्रारकर्तीने सदर तक्रार आयोगासमोर दाखल केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी त्‍याच्‍या उत्‍तरात कथन केले की, तक्रारकर्तीचा पती दिनांक ३/१२/२०१७ रोजी मरण पावला परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कंपनीची पॉलिसी ही दिनांक १/१२/२०१६ ते ३०/११/२०१७ तसेच दुसरी पॉलिसी दिनांक ८/१२/२०१७ ते ७/१२/२०१८ पर्यंतच होती व त्‍याबद्दलचे पॉलिसी तक्रारीत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी दाखल केलेल्‍या आहेत तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी नमूद केले की, दिनांक ३०/११/२०१७ ते ८/१२/२०१७ या कालावधीची कोणतीही पॉलिसी नव्‍हती. त्‍यामुळे तक्रारकर्तीचा पतीचा अपघात विमा दावा देण्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे जबाबदार नसून तक्रारकर्तीचा पती हा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चा ग्राहक नाही. आयोगाने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे प्रकरणातील उत्‍तराचे अवलोकन केले असता त्‍यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरात असे कथन केले की, तक्रारकर्तीचा सदर प्रस्‍ताव खंडित कालावधीचा असल्‍यामुळे कुठल्‍याही विमा कंपनीने विम्‍याचे दायीत्‍व घेतले नसल्‍याने सदर प्रस्‍ताव शासन स्‍तरावर प्रलंबित आहे. पुढे त्‍यांनी नमूद केले की, शासन निर्णय क्रमांक शेअवि-२०१८/प्र.क्र.२०१८/प्र.क्र.१८६/११अे, दिनांक २८/०२/२०२० नुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सन २३०१७-२०१८ या वर्षातील दिनांक १/१२/२०१७ ते ७/१२/२०१७ खंडित कालावधीतील प्राप्‍त झालेले दावे निकाली काढण्‍यासाठी शासन स्‍तरावर मंजूरी देण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी उपरोक्‍त शासन निर्णय तक्रारीत दाखल केलेला नसून त्‍या शासन निर्णयाचे निरीक्षण केल्‍यास सदर विमा दावे मंजूर करण्‍यासाठी आयुक्‍त कृषी यांना प्राधिकृत करण्‍यात आलेले आहे असे नमूद  असून या कालावधीतील दावे तपासून त्‍यांच्‍या पाञ अपाञतेबाबत सखोल व काळजीपूर्वक छाननी शासन नियुक्‍त विमा सल्‍लागार कंपन्‍यांना करावयाचे आहे असे स्‍पष्‍ट नमूद असल्‍यामुळे तक्रारकर्तीला या शासन निर्णयाप्रमाणे तिचा विमा दावा प्रस्‍ताव पुन्‍हा कृषी अधिकारी, नागभीड यांचेकडे नियमाप्रमाणे दाखल करावा असे आयोगाचे मत आहे.  सदर तक्रारी संदर्भातील विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍याकडे उपरोक्‍त तक्रारकर्तीच्‍या मयत पतीच्‍या निधनाच्‍या कालावधीची इंन्‍शुरन्‍स पॉलिसीची शासन मंजूरी देण्‍यात आलेली नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीप्रती कोणतीही सेवेत न्‍युनता दिली ही बाब सिध्‍द होत नसल्‍यामुळे आयोग खालील आदेश पारित करीत आहे.
  2. वरील विवेंचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक सी.सी. १३/२०२० खारीज करण्‍यात येते.
  2. तक्रारकर्तीला तिच्‍या पतीचा अपघात विमा दावा प्रकरणी अर्ज तालुका कृषी अधिकारी, नागभीड यांचेकडे पुन्‍हा सादर करण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे.  
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.