निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 14/09/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 22/09/2010 तक्रार निकाल दिनांकः- 22/02/2011 कालावधी 05 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. राधेशाम पिता बन्सीलाल पोरवाल. अर्जदार वय 55 वर्षे.धंदा.व्यवसाय. अड.एस.ए.बागल. रा.हॉटेल दिलशा,पाथरी ता.पाथरी.जि.परभणी. विरुध्द दि ओरियंटल इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार. व्दारा- शाखा व्यवस्थापक. अड.जी.व्हि.नरवाडे. दौलत बिल्डींग.शिवाजी चौक, परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती.अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे पाथरी येथे दिलशा नावाचे हॉटेल आहे.त्याच्याकडे मद्य विक्री करण्याचा परवाना असल्यामुळे तो त्याच्या हॉटेलमधून मद्य विक्री देखील करतो त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडून हॉटेल मधील सामानाचा व मद्य विक्री मालाचा विमा (पॉलीसी क्रमांक 182003/48/09/540) घेतला होता. दिनांक 13/08/2009 रोजी अर्जदाराच्या दुकानामध्ये जवळपास रु.1,00,000/- किमतीच्या मद्याच्या बाटल्या होत्या त्या रोजी अर्जदारा नेहमी प्रमाणे त्याचे हॉटेल बंद करुन घरी गेला व दिनांक 14/08/2009 रोजी सकाळी हॉटेल उघडले असता हॉटेल मध्ये चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले.अंदाजित रक्कम रु.56,870/- किमतीच्या मद्य मालाची चोरी झालेली आहे त्याचा तपशिल खालील प्रमाणे. --------------------------------------------------------------------------------------- 1) बॅग पाईपर 180 एमएल च्या 130 बॉटल किंमत रु.11,400/- 2) मॅकडॉल 180 एमएल च्या 20 बॉटल किंमत रु.2,200/- 3) इंम्पोरील ब्लु 18 एमएल च्या 108 बॉटल किंमत रु.9,720/- 4) रॉयल स्टॉग 18 एमएल च्या 97 बॉटल किंमत रु.11,640/- 5) डि.एस.पी. 180 एमएल च्या 30 बॉटल किंमत रु.2,250/- 6) बॅग पाईपर 90 एमएल च्या 15 बॉटल किंमत रु.3,600/- 7) रोमन ओळका 180 एमएल च्या 29 बॉटल किंमत रु.2,610/- 8) डि.एस.पी. 180 एमएल च्या 14 बॉटल किंमत रु.1,350/- 9) बॅग पाईपर(टेटा)180 एमएल च्या 10 बॉटल किंमत रु. 750/- 10) खजुरा बिअर 150 एमएल च्या 140 बॉटल किंमत रु.11,200/- 11) एक बेडशीट लाल रंगाचे किंमत रु. 150/- --------------------------------------------------------------------------------------- एकुण रुपये 56,870/- --------------------------------------------------------------------------------------- अर्जदाराने त्याच दिवशी पोलिस स्टेशन पाथरी येथे फिर्याद दिली,व पोलिसांनी गुन्हा कमांक 22/09 नोंदविला सदर गुन्हयाचा तपास केला असता आरोपी सापडले नाही म्हणून दिनांक 24/11/2009 रोजी पोलिसांनी सदर प्रकरण “ अ ” वर्ग मध्ये कायम तपासावर येऊन न्यायालयात रिपोर्ट दाखल करण्याची नोटीस तक्रारदाराला दिली.पुढे अर्जदाराने सदर घटनेची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीस कळविली व विमा हमी पोटी चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन गैरअर्जदाराकडे क्लेम दाखल केला. परंतु गैरअर्जदाराने दावा निकाली काढताना सद्विवेक बुध्दीचा वापर न करता कागदपत्राची योग्य ती दखल न घेता अर्जदारास फक्त रक्कम रु. 16,100/- मंजूर केले.अर्जदारास गरज असल्यामुळे त्यांनी उपरोक्त रक्कम निषेध नोंदवुन स्वीकारली म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने विमा रक्कम रु.40,770/- दिनांक 14/08/2009 पासून पूर्ण रक्कम देय होई पर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजदराने द्यावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व दाव्याचा रक्कम रु.3,000/- द्यावे अशी मागणी अर्जदाराने मंचासमोर केली आहे.अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/4 व नि.17/1 ते 17/3 वर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.12 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने सदर घटनेची माहिती कळविल्यानंतर गैरअर्जदाराने सर्व्हेअर व लॉस असेसर श्री.ए.डी.अग्नीहोत्री यांची नियुक्ती केली. त्याने सर्व्हे करुन दिनांक 25/01/2010 रोजी सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदाराकडे दाखल केला.सर्व्हेअरने पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार Less Standard margin 10 % रु.5,672/- ही रक्कम नुकसानीच्या केलेल्या मुल्यांकन रक्कम रु. 56720/- मधून वजा केली,पुढे अर्जदाराने दाखल केलेल्या रिपोर्ट नुसार दिनांक 13/08/2009 रोजी हॉटेल मध्ये असलेल्या संपूर्ण मालाची किंमत रक्कम रु.19,02,620=/- एवढी होती त्यापैकी अर्जदाराने फक्त 6,00,000/- किमतीच्या मालाचा विमा घेतला होता म्हणून पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार 68.46 % होणारी रक्कम रु.34948=00 वजा जाता अर्जदारास देय होणारी रक्कम रु. 16,100/- एवढी होते. पॉलिसीच्या अटी व शर्तीचे पालन करुन गैरअर्जदाराने उपरोक्त रक्कम अर्जदारास दिली यात गैरअर्जदार विमा कंपनीने कसलीही त्रुटीची सेवा अर्जदारास दिलेली नसल्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.13 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.15/1 ते नि.15/3 वर मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराचे पाथरी येथे दिलशा नावाचे हॉटेल आहे अर्जदाराकडे मद्य विक्री करण्याचा परवाना असल्यामुळे तो हॉटेल मधुन मद्य विक्री करतो अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडून मद्य विक्री मालाचा विमा ( पॉलिसी क्रमांक 182003/48/09/540) घेतला होता. दिनांक 13/08/2009 ते दिनाक 14/08/2009 च्या दरम्यान अर्जदाराच्या हॉटेल मधुन अंदाजे रक्कम रु.56,870/- किमतीच्या मद्यमालाची चोरी झाली अर्जदाराने सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास दिली व विमा हमी पोटी चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन गैरअर्जदाराकडे क्लेम दाखल केला असता फक्त रक्कम रु. 16,100/- अर्जदारास देण्यात आले अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने सर्व्हेअर व लॉस असेसर श्री.ए.डी.अग्नीहोत्री यांची नियुक्ती केली होती त्याने सर्व्हे करुन दिनांक 25/01/2010 रोजी सर्व्हे रिपोर्ट दाखल केला त्यानुसार चोरी झालेल्या तारखेस रक्कम रु. 19.02.620/- एवढया किमतीचा मद्य विक्री साठीचा माल हॉटेल मध्ये उपलब्ध होता त्यापैकी अर्जदाराने फक्त रक्कम रु.600,000/- किमतीच्या मद्य विक्री मालाचाच विमा घेतलेला असल्यामुळे त्या नुसारच अर्जदारास रक्कम रु.16,100/- देण्यात आलेली आहे.मंचासमोर निर्णयासाठी एकमेव मुद्दा असा उपस्थित होतो की,गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली उपरोक्त रक्कम योग्य आहे काय ? यासाठी नि.15/1 वर गैरअर्जदाराने दाखल केलेल्या सर्व्हेअर व लॉस असेसर श्री.ए.डी.अग्नीहोत्रीच्या सर्व्हे रिपोर्टची झेरॉक्स प्रतीची पडताळणी केली असता असे लक्षात येते की, दिनांक 13/08/2009 ते दिनांक 14/08/2009 रोजीच्या दरम्यान अर्जदाराच्या हॉटेल मधून मद्य विक्रीचा माल चोरीला गेला त्यावेळेस रक्कम रु.19,02,620/-किमतीचा मद्य माल विक्रीसाठी हॉटेल मध्ये उपलब्ध होता परंतु त्यापैकी फक्त रक्कम रु. 6,00,000/- किमतीचा मद्य विक्रीचा मलाचा विमा काढण्यात आला होता.म्हणजे एकुण माल पैकी साधारणपणे 1/3 मद्य विक्री मालाचा विमा अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतला होता सर्व्हे रिपोर्ट मधील Observations / finding या कॉलम खाली दिलेल्या 6.11 नुसार 68.46 % प्रमाणे होणारी रक्कम रु. 34,948/- कपात करुन अर्जदारास रक्कम रु. 16,100/- दिलेली आहे. व अर्जदाराने ती रक्कम Under protest उचललेली आहे.या विषयांचा ठोस पुरावा मंचासमोर अर्जदाराने दाखल केलेला नाही.तसेच सर्व्हेचा रिपोर्ट हा तज्ञाचा रिपोर्ट असल्यामुळे त्याला अन्य ठोस कारणा शिवाय नामंजूर करणे संयुक्तिक होणार नसल्याने मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रति मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |