Maharashtra

Dhule

CC/10/82

Moinuddin Jalauddin - Complainant(s)

Versus

The New India Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

B. P. Pawar

30 Oct 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/10/82
 
1. Moinuddin Jalauddin
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Co. Ltd.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                                 ग्राहक तक्रार क्रमांक –    ८२/२०१०


 

                                  तक्रार दाखल दिनांक – ०२/०३/२०१०


 

                                 तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१३


 

 


 

मोईनुद्दीन जलालुद्दीन


 

वय - ४५ वर्ष,


 

व्‍यवसाय – ट्रक खरेदी व विक्री,


 

राहणार – गुफा (कुबा) मस्जिद,


 

हजार खोली, धुळे, जिल्‍हा धुळे.


 

(महाराष्‍ट्र)                                       ------------- तक्रारदार              


 

 


 

        विरुध्‍द


 

१. दि. न्‍यु इंडिया अॅशुरन्‍स कंपनी लि.


 

 (नोटीसीची बजावणी यांच्‍यावर व्‍हावी)


 

 व्‍यवस्‍थापक


 

 दि. न्‍यु इंडिया अॅशुरन्‍स कंपनी लि.


 

 विभागीय कार्यालय, २-३३१३००,


 

 १९६ एस.एस. टॉवर, पहिला मजला,


 

 अखलिया सर्कल जवळ, चोपासनी रोड,


 

 जोधपुर (राजस्‍थान).


 

 


 

२. दि. न्‍यु इंडिया अॅशुरन्‍स कंपनी लि.


 

 (नोटीसीची बजावणी यांच्‍यावर व्‍हावी)


 

 विभागीय व्‍यवस्‍थापक


 

 दि. न्‍यु इंडिया अॅशुरन्‍स कंपनी लि.


 

 यशोवल्‍लभ शॅपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स,


 

 महानगरपालिके जवळ, धुळे, जिल्‍हा धुळे.           ------------ सामनेवाला


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

 


 

उपस्थिती


 

 (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.बी.पी.पवार)


 

 (सामनेवाला तर्फे – वकील श्री.सी.पी. कुलकर्णी)


 

 निकालपत्र


 


(दवाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

      सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा प्रलंबित ठेवल्‍याने तक्रारदारने सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हा मालट्रक खरेदी विक्रीचा तसेच ट्रान्‍सपोर्टचा व्‍यावसाय करतो. तक्रारदारने दि.०९/०९/०८ रोजी मालट्रक नं. आरजे-१९/२जी-१७६१ चा श्री.रमेश दधिच यांचेकडुन रू.८,११,०००/- ला खरेदी केला. सदर मालट्रक श्री.रमेश दधिच यांनी श्री.पुखराज बिश्‍नोई यांचेकडून त्‍याचदिवशी रू.८,०५,०००/- ला खरेदी केला होता. सदर दोन्‍ही व्‍यवहार नोटरीद्वारे रजिस्‍टर करण्‍यात आलेले होते. तक्रारदारने श्री.दधिच यांना मालट्रकची संपूर्ण रक्‍कम दिल्‍याने मालट्रक ट्रान्‍सफर चे सर्व पेपर दोघांनी तक्रारदारचे लाभा‍त, सहया करून दिलेले होते.


 

 


 

२.   तक्रारदाने दि.१६/०९/०८ रोजी सदर मालट्रक धुळे येथे आणला. दि.१७/०९/०८ रोजी सदर मालट्रक फतिमा मस्जिद  जवळ शेख वायरमनच्‍या घराशेजारी संध्‍याकाळी उभा केला असता दि.१७/०९/०८ ते दि.१८/०९/०८ चे दरम्‍यान रात्री सदर ट्रक चोरीला गेला. ट्रक चोरीला गेल्‍याचे सकाळी लक्षात येताच तक्रारदारने याबाबत आझादनगर पोलिस स्‍टेशनला चोरीची तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी दि.२३/०९/०८ रोजी गु.र.नं. १७८/०९ अन्‍वये गुन्‍हा दाखल केला. त्‍याबाबत दि.२४/०९/०८ रोजी पंचनामाही करण्‍यात आला. दि.२०/०५/०९ रोजी पोलिसांनी सी.आर.पी.सी. कलम १७३ नुसार मे. चिफ कोर्ट, धुळे येथे रिपोर्ट दाखल केला.  


 

 


 

३.   तक्रारदारचे पुढे असे म्‍हणणे आहे की, सदर मालट्रक चा विमा असल्‍याकारणाने व मालट्रक ट्रान्‍सफर होणे बाकी असल्‍याने तक्रारदारने मालट्रकचा मूळ मालक श्री.बिश्‍नोई यांना सामनेवाला विमा कंपनीकडे विमा दावा करावयास सांगितला. सामनेवाला यांनी मागितलेल्‍या कागदपत्रांची वेळोवेळी पुर्तता करूनही सामनेवाला यांनी सदर मालट्रक श्री.बिश्‍नोई यांचे ताब्‍यात नसून तक्रारदारचे ताब्‍यात असल्‍याचे कारण देवून विमा दावा देण्‍याचे नाकारला आहे.


 

 


 

     त्‍यामुळे मालट्रक चोरी गेल्‍याच्‍या तारखेला मालक असल्‍याने तक्रारदारने दि.०२/०१/२०१० रोजी सामनेवाला यांना रजिष्‍टर नोटीस पाठवून विमा पॉलिसीनुसार नुकसानभरपाई रक्‍कम रू.८,११,०००/- ची मागणी केली. परंतु सामनेवाला यांनी नोटीसचे उत्‍तरही दिले नाही अथवा नुकसान भरपाईही दिलेली नाही. अशाप्रकारे मालट्रकचे पूर्वीच्‍या मालकांना तक्रारदारास नुकसानभरपाई देण्‍यास काही एक हरकत नसतांना, सामनेवाला यांनी विमा दावा प्रलंबित ठेवून सेवेत कमतरता केली आहे. 


 

 


 

४. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रू.८,११,०००/-, त्‍यावर मालट्रक चोरी गेल्‍याच्‍या तारखेपासून १२% दराने व्‍याज, तसेच तक्रार अर्जाचा खर्च रू.१५,०००/- व मानसिक, शारिरिक त्रासाबद्दल रू.१०,०००/- मिळावे अशी विनंती केली आहे.


 

 


 

५.   तक्रारदारने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.५ सोबत नि.५/१ वर ए‍फ.आय.आर. ची प्रत, नि.५/२ वर फिर्याद, नि.५/३ वर घटनास्‍थळ पंचनामा, नि.५/४ वर अंतिम अहवाल, नि.५/५ वर पुखराज बिश्‍नोई यांचा विक्री करारनामा, नि.५/६ वर रमेश दधिच यांचा विक्री करारनामा, नि.५/७ वर विमा पॉलीसी प्रत, नि.५/८ वर विमा कंपनीकडे दाखल केलेली कागदपत्रे, नि.५/९ वर विमा दावा प्रत, नि.५/१० वर टॅक्‍स सर्टीफिकेट, नि.५/११ वर मालट्रक चे फिटनेस सर्टीफिकेट, नि.५/१२ वर मालट्रक परमिट प्रत, नि.५/१३ वर आर.सी. बुकची प्रत, नि.५/१४ वर विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, नि.५/१५ व नि.५/१६ वर विमा कंपनीचे पत्र, नि.५/१७ वर विमा कंपनीला पाठविलेली नोटीसची प्रत, नि.५/१८ व नि.५/१९ वर पोच पावती, नि.५/२० वर रेशन कार्डची झेरॉक्‍स प्रत, नि.५/२१ व निवडणूक ओळखपत्राची प्रत. तसेच नि.१७ सोबत नि.१७/१ वर पुखराज बिश्‍नोई यांचे प्रतिज्ञापत्र, नि.१७/२ वर रमेश दधिच यांचे प्रतिज्ञापत्र, नि.१८ सोबत वरीष्‍ठ कोर्टाचे न्‍यायनिवाडे, नि.३२ सोबत नि.३२/१ वर मो.व्‍हेईकल कायदा कलम ५० ची झेरॉक्‍स प्रत, नि.३२/२ ते नि.३२/६ वर वरिष्‍ठ कोर्टाचे न्‍यायनिवाडे, नि.३४ वर लेखी युक्‍तीवाद, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेले आहे.   


 

 


 

६.   सामनेवाला यांनी आपला लेखी खुलासा नि.२४ वर दाखल केलेला आहे. त्‍यात त्‍यांनी तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नसल्‍यामुळे त्‍याला या मे. मंचात तक्रार दाखल करण्‍याचा कुठलाही अधिकार नाही. सदरची तक्रार या मे. मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नसल्‍यामुळे ती रद्द होण्‍यास पात्र आहे. तक्रारीतील ट्रक हा जोधपूर येथील श्री.बिश्‍नोई यांचे मालकीचा असून ते नोंदणीकृत मालक आहेत. तसेच विमा पॉलीसीही त्‍यांचेच नावावर असल्‍याने श्री.बिश्‍नोई हेच सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. तसेच ट्रक चोरीला गेल्‍यानंतर त्‍याबाबत भरपाई मागण्‍याचा अर्ज त्‍यांनीच सामनेवाला यांचेकडे केला होता. सदर क्‍लेम नाकारल्‍याने त्‍यांनी जोधपूर मंचात तक्रार अर्ज क्र.१११/१० दाखल केला. त्‍या अर्जाचे कामकाज अदयापही सुरू आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार सामनेवाला यांचे विरूध्‍द तक्रार दाखल करू शकत नाही.


 

 


 

     तक्रारीतील ट्रकचे मूळ मालक श्री.बिश्‍नोई यांचेशी तक्रारदारचा कुठलाही संबंध नाही. श्री.बिश्‍नोई यांनी श्री.दधिच यांचेशी ट्रक विकण्‍याचा सौदा केला होता सदरची ट्रक ही जरी दि.०९/०९/०८ पासून श्री. दधिच यांचे कब्‍जे उपभोगात असली तरी ते त्‍या ट्रकचे अधिकृत व कायदेशीर मालक नव्‍हते, त्‍यामुळे त्‍यांना ट्रकची विक्री करण्‍याचा अधिकार नव्‍हता. अशा परिस्थितीत त्‍यांनी तक्रारदारशी केलेला व्‍यवहार संपूर्ण बेकायदेशीर असून या व्‍यवहारानुसार कुठलाही मालकी हक्‍क तक्रारदारास प्राप्‍त झालेला नाही. सामनेवाला यांचा संबंध फक्‍त वाहनाचा नोंदणीकृत, अधिकृत मालक, विमाधारक, असेल तरच त्‍यांचेशी येतो व तोच सामनेवाला यांचा ग्राहक आहे.


 

 


 

७.   सामनेवाला यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, सदर ट्रक चोरीची घटना दि.१७/०९/०८ रोजी घडली मात्र दि.२३/०९/०८ रोजी पोलीस स्‍टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. वाहन चोरी झाल्‍यानंतर लगेच पोलीसांकडे फिर्याद देणे आवश्‍यक होते. सदर तक्रारीत श्री. बिश्‍नोई यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्‍यात आलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्रात जोधपूर येथील तक्रार काढून घेण्‍याबाबतचे त्‍यांचे कथन खोटे व लबाडीचे आहे. जोपर्यंत वाहनाचा अधिकृत मालक म्‍हणून  ज्‍या व्‍यक्‍तींची नोंद वाहतूक विभागाकडे होत नाही तोपर्यंत कायदेशीररित्‍या त्‍या व्‍यक्‍तीला वाहन मालक म्‍हणून मान्‍यता मिळत नाही. वाहन चोरी होईपर्यंत वाहतूक विभागातील नोंदीनुसार श्री.बिश्‍नोई हेच त्‍या वाहनाचे कायदेशीर व अधिकृत मालक होते, अन्‍य कोणीही व्‍यक्‍ती नोंदीणीकृत मालक नसल्‍याने त्‍या वाहनाचा कायदेशीर मालक म्‍हणून अधिकार सांगू शकत नाही. त्‍यामुळे सेवेत कमतरता नाही. शेवटी तक्रारदारची तक्रार खर्चासह रद्द करावी असे नमुद केले आहे.


 

 


 

८.   सामनेवाला यांनी आपले म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयार्थ नि.१९ सोबत वरीष्‍ठ कोर्टाचा न्‍यायनिवाडा, नि.२६ वर प्रतिज्ञापत्र, नि.२८ वर जोधूपर मंचातील तक्रारीचा रोजनामा प्रत, नि.३१ वर जोधपूर मंचातील तक्रारीची प्रत, नि.३३ वर लेखी युक्‍तीवाद, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे.


 

 


 

     तक्रारदारची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, दोन्‍ही वकीलांचा युक्‍तीवाद ऐकता, तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍यासमोर निष्‍कर्षाकरिता खालील मुद्दे उपस्थित होतात. त्‍यांची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत. 


 

            मुद्दे                                   निष्‍कर्ष


 

१.    तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे का ?                होय


 

२.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या


 

सेवेत त्रुटी केली आहे काय ?                        होय


 

३.     तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे ?   अंतिम आदेशाप्रमाणे


 

४.     आदेश काय  ?                                 खालीलप्रमाणे                               


 

 


 

 


 

विवेचन



 

९.   मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद ट्रक श्री. रमेश दधिच यांचेकडून दि.०९/०९/०८ रोजी विकत घेतला होता. श्री. दधिच यांनी तो श्री.पुखराज बिश्‍नोई यांचेकडून त्‍याचदिवशी विकत घेतला होता. त्‍याबाबतचा करारनामाही तक्रारदारने तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी पूर्वी उपस्थित केलेल्‍या प्राथमिक मुद्दांच्‍या निकालात मे. मंचाने तक्रारदार हा इंडिया मोटर टेरिफच्‍या जी.आर.१७ प्रमाणे आपोआप (Deemed owner) विमाधारक होतो व त्‍यास नुकसानीबाबत तक्रार दाखल करण्‍याचा कायदेशीर अधिकार आहे असे ठरविले असल्‍याने, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.     


 

 


 

१०. मुद्दा क्र.२-  तक्रारदार यांची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍यांनी ट्रक क्रं. आरजे-१९/२जी-१७६१ हा श्री. दधिच यांचेकडून दि.०९/०९/०८ रोजी विकत घेतला. त्‍यानंतर व्‍यवहाराची पुर्तता करून सदर ट्रक दि.१६/०९/०८ रोजी जोधपूर येथून धुळे येथे आणला. दि.१७/०९/०८ रोजी संध्‍याकाळी तक्रारदारने सदर ट्रक फातिमा मस्जिद जवळ, शेख वायरमनच्‍या घराशेजारी लावला असता, दि.१७/०९/०८ ते दि.१८/०९/०८ चे रात्रीचे दरम्‍यान चोरीस गेला. त्‍याबाबत त्‍याने दि.२३/०९/०८ रोजी ट्रक चोरीबाबत तपासाअंती आझादनगर पोलीस स्‍टेशनला गु.र.नं. १७८/२००८ अन्‍वये भा.द.वि. कलम ३७९ नुसार फिर्याद दाखल केली.


 

 


 

११. तक्रारदारने सदर ट्रकचा विमा सामनेवाला विमा कंपनीने विमा काढलेला असल्‍याने ट्रक खरेदी केल्‍यानंतर लगेचच ८ ते ९ दिवसात व आर.टी.ओ. कडे नोंद होण्‍याअगोदर चोरी गेल्‍याने ट्रकचे मूळ मालक श्री. पुखराज बिश्‍नोई यांना विमा दावा करावयास सांगितला. परंतु सामनेवाला विमा कंपनीने सदर ट्रक श्री.बिश्नोई यांनी विकल्‍याने व चोरीच्‍या दिवशी तक्रारदारचे ताब्‍यात असल्‍याने श्री.बिश्‍नोई हे मालक नाही असे कारण देवून विमा दावा नाकारला. त्‍यामुळे तक्रारदारने सामनेवाला विमा कंपनीला दि.०२/०१/१० रोजी नोटीस पाठवून नुकसानभरपाईची मागणी केली असूनही सामनेवाला यांनी आजपावेतो तक्रारदारचा विमा दावा प्रलंबित ठेवलेला आहे.


 

१२. विमा कंपनीने आपल्‍या खुलाश्‍यात, सदर ट्रक श्री. बिश्‍नोई यांचे मालकीचा असून, ते सदर ट्रकचे नोंदणीकृत मालक आहेत. त्‍यांनी विमा उतरविला असल्‍याने विमापॉलीसी त्‍यांच्‍या नावे देण्‍यात आलेली आहे. तसेच श्री.बिश्‍नोई यांनी जोधपूर मंचात नुकसानभरपाई बाबत तक्रार दाखल केलेली असतांना तक्रारदारास नुकसानभरपाई मागण्‍याचा अधिकार नाही. जोपर्यंत वाहनाचा अधिकृत मालक म्‍हणून त्‍या व्‍यक्‍तीची नोंद वाहतूक विभागाकडे होत नाही तो पर्यंत कायदेशीररित्‍या त्‍या व्‍यक्‍तीला वाहन मालक म्‍हणून मान्‍यता मिळत नाही. वाहन चोरीला जाईर्यंत श्री.बिश्‍नोई हेच त्‍या वाहनाचे कायदेशीर व अधिकृत मालक होते. त्‍यामुळे तक्रारदार त्‍या वाहनाचा कायदेशीर मालक म्‍हणून  अधिकार सांगू शकत नाही असे म्‍हटले आहे.   


 

 


 

१३. वरील परस्‍पर विरोधी म्‍हणणे पाहता, सदर वाहन चोरीस गेले त्‍यावेळी वाहनाचा अधिकृत मालक कोण होता हे पाहणे आवश्‍यक आहे. याबाबत तक्रारदारने नि.५/६ विक्री करारनामा, तसेच नि.१७/१ वर श्री.बिश्‍नोई यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. त्‍यात त्‍यांनी जोधपूर येथील तक्रार काढून घेतल्‍याचेही नमूद केलेले आहे. त्‍यावरून सदर ट्रकचा तक्रारदार अधिकृत मालक आहे हे स्‍पष्‍ट होत आहे. तसेच नि.५/१४ वर सामनेवाला विमा कंपनीने श्री.बिश्‍नोई यांचा विमा दावा नाकारल्‍याचे पत्र दाखल आहे. त्‍यात पुढीलप्रमाणे मजकूर नमुद आहे.


 

 


 

    ‘आपने बिमीत वाहन आरजे-१९/२जी-१७६१ को श्री. रमेश दधिच को रू.८,०५,०००/- मे बेच कर वाहन का कब्‍जा रमेश दधिच को सुपुर्द कर दिया एवं रमेश दधिच द्वारा उक्‍त वाहन को रू.८,११,०००/- मे श्री. मोईनुद्दीन को बेचा जाकर उक्‍त वाहन का वास्‍तविक एवं भैतिक रूप से कब्‍जा नही रहा | आपद्वारा कम्‍पनी मे प्रस्‍तुत इकरारनाम के आधार व उसमे दर्शाये गये तथ्‍थो के आधार आप अब उक्‍त वाहन के स्‍वामी नही रहे, क्‍योंकी उसपर आपका कब्‍जा, नियंत्रण, संचालन नही रहा है |


 

      यावरून सामनेवाला विमा कंपनीनेच सदर ट्रक विकला गेल्‍याने तक्रारदार (मोईनोद्दीन) हाच ट्रकचा मालक असल्‍याचे मान्‍य केल्‍याचे दिसून येत आहे.


 

१४. सामनेवाला यांचे म्‍हणणे की तक्रारदार हा चोरी झालेल्‍या दिवशी वाहनाचा नोंदीणीकृत मालक नसल्‍याने त्‍याला नुकसान भरपाई मागण्‍याचा अधिकार नाही. याबाबत आम्‍ही तक्रारदारने दाखल केलेल्‍या नि.३२/१ वर मोटर वाहन कायदा, १९८८ चे कलम ५० चे बारकाईने अवलोकन केले आहे. त्‍यामध्‍ये पुढीलप्रमाणे नमुद आहे.


 

  


 

Sec.50 – Transfer of Ownership


 

 


 

(a)             the transferor shall ----


 

 


 

          (ii) in the case of vehicle registered outside the State, within  forty-five day of the transfer, forward to the registering       authority referred to in sub clause (i)


 

 


 

     तसेच तक्रारदारने सदर ट्रक दि.०९/०९/०८ रोजी विकत घेतलेला असून तो दि.१७/०९/०८ ते दि.१८/०९/०८ चे दरम्‍यान रात्री चोरीस गेलेला आहे. म्‍हणजे ट्रक खरेदी केल्‍यानंतर लगेच ८-९ दिवसात चोरीची घटना घडलेली असल्‍याने तक्रारदारास वाहन नोंदणी करण्‍यास पुरेसा अवधीच न मिळाल्‍याने व मोटार वाहन कायदा १९८८ च्‍या कलम ५० नुसार त्‍याला ४५ दिवसांत आर.टी.ओ. कडे नोंदणी करावयाचा अवधी असल्‍याने त्‍या दरम्‍यानचे काळात तो आपोआपच  त्‍या वाहनाचा मालक (Deemed owner) आहे हे स्‍पष्‍ट होत आहे. यावरून सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारची नुकसानभरपाईची मागणी तांत्रीक कारणामुळे प्रलंबित ठेवून तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. या मतास आम्‍ही आलो अहोत, म्‍हणून मुद्दा क्रं.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१५. सामनेवाला विमा कंपनी यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.१९ सोबत वरिष्‍ठ कोर्टाचा न्‍यायनिवाडा दाखल केलेला आहे. सदर न्‍यायनिवाडयाचे अवलोकन केले असता त्‍यातील तत्‍व व तक्रारीतील कथन यात तफावत असल्‍याने ते या कामी लागू होत नाही असे आम्‍हांस वाटते. 


 

 


 

 


 

१६. तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.१८ सोबत खालीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत.


 

 


 

 


 

(1)  IV (2004) CPJ 17 Oriental Insurance Co.Ltd. V/s.


 

       Vijaykumar Agarwal


 

(2) (2002) CCJ 1036 Rajkumar V/s. United India Insurance Co. Ltd.


 

       त्‍यात पुढीलप्रमाणे तत्‍व विषद आहे.


 

 


 

   Motor insurance- Repudiation of claim-Theft of car-Insurance Company contended that Complainant had no insurable interest in the vehicle as the same was sold by the insured – Policy was taken in the name of registered owner of the vehicle the complainant who purchased the vehicle had paid the premium amount – Whether the insurance Company was deficient in its service in repudiating the claim – Held- Yes- insurance company directed to pay compensation with 12 percent interest  


 

 


 

          वरिल वरीष्‍ठ कोर्टाच्‍या न्‍यायनिवाडयाचे तत्‍व या तक्रारीस लागु होतात असे आम्‍हांस वाटते.


 

 


 

१७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी नुकसान भरपाईची रक्‍कम रू.८,११,०००/- व त्‍यावर वाहन चोरीस गेलेल्‍या तारखेपासून १२% दराने व्‍याज मिळावे. तक्रारी अर्जाचा खर्च रू.१५,०००/- तसेच मानसिक, शारिरिक त्रासाबाबत रू.१०,०००/- मिळावे अशी मागणी केलेली आहे. वरील विवेचनावरून तक्रारदार हे नुकसानभरपाई रक्‍कमेपोटी विमा संरक्षित रक्‍कम रू.६,९०,०००/-. तसेच सदर रकमेवर नोटीस पाठविल्‍याचा दि.०२/०१/२०१० पासून ६%  दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. सामनेवाला यांनी नुकसानभरपाईचीमागणी प्रलंबित ठेवल्‍याने तक्रारदार यांना साहजिकच मानसिक त्रास झालेला आहे व तक्रारही दाखल करावी लागली आहे.  म्‍हणून तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.५०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.२०००/- मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.


 

 


 

 


 

१८. मुद्दा क्र.४- वरील विवेचनावरून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.  


 

 


 

 


 

 


 

 


 

आ दे श


 

 


 

१.         तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे. 


 

 


 

२.         सामनेवाला दि. न्‍यु इंडिया अॅशुरन्‍स कंपनी लि. यांनी तक्रारदार यांना विमा संरक्षित रक्‍कम रू.६,९०,०००/- व त्‍यावर दि.०२/०१/१० पासून ६% दराने व्‍याज या आदेशाच्‍या दिनांकापासून ३० दिवसाच्‍या आत दयावे.


 

 


 

३.         सामनेवाला दि. न्‍यु इंडिया अॅशुरन्‍स कंपनी लि. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रू.५,०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रू.२०००/- या आदेशाच्‍या दिनांकापासून ३० दिवसाच्‍या आत दयावे.


 

 


 

धुळे.


 

दि.३०/१०/२०१३.


 

 


 

 


 

         (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

               सदस्‍य           सदस्‍या            अध्‍यक्षा


 

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.