Maharashtra

Gadchiroli

CC/14/1

Smt. Varsha Anandrao Vadhai At. Bramhani Th.Dist. Gadchiroli - Complainant(s)

Versus

The New India Issurance Co. Ltd Through Divisional Manager Mumbai & 2 Others - Opp.Party(s)

Uday Shirsagar Nagpur

24 Sep 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli, M.I.D.C. Road, Tea Point, Navegaon, Tah. Dist. Gadchiroli, Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/14/1
 
1. Smt. Varsha Anandrao Vadhai At. Bramhani Th.Dist. Gadchiroli
At. Bramahi Tah. Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Issurance Co. Ltd Through Divisional Manager Mumbai & 2 Others
Divisional Office No. 130800 New India Center 7th Floor, 17/A Kuprej Road Mumbai-400039
Mumbai
Maharashtra
2. The New India Insurance Co. Ltd. Through Regional Manager Shri. Gurunath Reddy Patil
Regional office, Dr. Ambedkar Bhawan, M.E.C.L. Building 4th Floor , Seminary Hills Nagpur-18
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari Gadchiroli
Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

आ दे श  -

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 24 सप्‍टेंबर 2014)

                                      

                  तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           तक्रारकर्ती हिचा पती आनंदराव लहुजी वाढई यांच्‍या मालकीचे मौजा ब्राम्‍हणी, ता. जिल्‍हा - गडचिरोली येथे सर्व्‍हे क्र.350/1 ही शेत जमीन होती व ते शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर कुंटूंबाचे पालनपोषण करीत होते.  तक्रारकर्तीचा पती हे दि.22.10.2012 रोजी शेतात काम करीत असतांना विषारी साप चावल्‍याने त्‍याच दिवशी विषबाधा होवून मरण पावले.  शासनातर्फे तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्तीचा पती शेतकरी असल्‍याने व अपघात झाल्‍याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- चा विमा रकमेसाठी पाञ होती.  तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.3 मार्फत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 कडे विमा योजने अंतर्गत  दि.1.3.2013 ला रितसर अर्ज केला, तसेच विरुध्‍द पक्षाचे मागणी प्रमाणे दस्‍ताऐवजाची पुर्तता केली. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.3 कडे रितसर अर्ज केला असतांना विरुध्‍दपक्षांनी सदर दाव्‍याबाबत अद्याप पर्यंत मंजुर अथवा नामंजूर काहीच कळविलेले नाही. वास्‍तविक, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना सर्व दस्‍ताऐवज वेळेत दिलेले आहेत, तसेच तक्रारकर्ती अशिक्षीत महिला व विमा योजनेच्‍या अटी व शर्ती तक्रारकर्तीला माहिती नव्‍हते. त्‍यामुळे तक्रारकर्तीला दावा दाखल करण्‍यास थोडा उशिर झाला.  गैरअर्जदार क्र.1 ने सदर दावा दाखल केल्‍यापासून तीन महिन्‍याचे आत मंजूर करायला पाहिजे होता, परंतु तसे काही न करता गैरअर्जदारांनी दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्‍ये ञुटी केली आहे. गैरअर्जदाराने दावा प्रलंबित ठेवल्‍याने तक्रारकर्तीला भरपूर मानसिक, शारिरीक व वारंवार मुंबई व नागपूरला येण्‍याचे आर्थिक नुकसानही झाले. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा दावा प्रलंबित ठेवल्‍याने सेवेमध्‍ये ञुटी केली आहे. त्‍यामुळे, गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि. 1.3.2013 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 कडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली. 

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 13 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्‍तर व नि.क्र.13 नुसार 3 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.18 नुसार गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले लेखीउत्‍तर हे गैरअर्जदार क्र.2 चे समजण्‍यात यावे अशी पुरसीस दाखल केली.  गैरअर्जदार क्र.3 ला नि.क्र.7 नुसार नोटीस मिळून सुध्‍दा हजर झाले नाही व लेखी उत्‍तर दाखल केले नाही, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दि.26.3.2014 ला पारीत करण्‍यात आला.

 

3.          गैरअर्जदार क्र.1 नी त्‍याचे लेखी उत्‍तरात नि.क्र.11 वर असे कथन केले आहे की,  गैरअर्जदार क्र.1 चे कंपनीला महाराष्‍ट्र शासन यांनी शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा काढण्‍यासाठी नेमलेले होते. त्‍याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 कंपनीकडून शेतक-यांचा विमा काढण्‍यात आले.  अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदार क्र.1 ला नाकबूल आहे. अर्जदाराने मय्यतची मृत्‍यु विषयी त्‍याच्‍या रक्‍ताचा अहवाल अथवा रासायनीक अहवाल किंवा कोणताही प्रमाणपञ हे दर्शविण्‍यासाठी की, मयतचा मृत्‍यु साप चावल्‍यामुळे झाले आहे हे तक्रारीत दाखल केले नाही, म्‍हणून सदर तक्रार खर्चासह रद्द करावी अशी विनंती करण्‍यात आली.  

 

4.          अर्जदाराने नि.क्र.19 नुसार शपथपञ व नि.क्र.21 सोबत 1 दस्‍ताऐवज, नि.क्र.20 नुसार लेखी युक्‍तीवाद, व नि.क्र.22 नुसार केस लॉ दाखल केले.  गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.23 सोबत 4 दस्‍ताऐवज, नि.क्र.24 नुसार शपथपञ व नि.क्र.25 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द नि.क्र.1 वर दि.26.3.2014 ला एकतर्फा आदेश पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                   :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?           :  होय

2)    गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण       :  होय

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अंतीम आदेश काय ?                              : अंतिम आदेशाप्रमाणे

                                                      

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-  

 

5.          तक्रारकर्ती हिचा पती आनंदराव लहुजी वाढई यांच्‍या मालकीचे मौजा ब्राम्‍हणी, ता. जिल्‍हा - गडचिरोली येथे सर्व्‍हे क्र.350/1 ही शेत जमीन होती व ते शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर कुंटूंबाचे पालनपोषण करीत होते.  शासनातर्फे तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला होता.  तक्रारकर्तीचा पती हे दि.22.10.2012 रोजी शेतात काम करीत असतांना विषारी साप चावल्‍याने त्‍याच दिवशी विषबाधा होवून मरण पावले.  शासनातर्फे तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्तीचा पती शेतकरी असल्‍याने व अपघात झाल्‍याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- चा विमा रकमेसाठी पाञ असल्‍यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 ची ग्राहक आहे असे सिध्‍द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 बाबत :-  

 

6.          तक्रारदाराचा पती श्री आनंदराव लहूजी वाढई हे दि.22.10.2012 रोजी शेतात काम करीत असतांना विषारी साप चावल्‍याने त्‍याच दिवशी विषबाधा होवून मरण पावले.  तक्रारदाराचे पती शेतकरी असल्‍याने व अपघात मृत्‍यु झाल्‍याने गैरअर्जदार क्र.3 तर्फे गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे सदर विमा योजना अंतर्गत दि.1.3.2013 ला रितसर अर्ज केला.  ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्र.2 वर दस्‍त क्र.4, 5, 7, 8, 9, 10 व 13 वर सिध्‍द होते.  अर्जदाराने दाखल 2  दस्‍त क्र.1 वर महाराष्‍ट्र शासनाचे लिहलेले निर्णय क्र.शेअवि.-2011/प्र.क्र.94/11-अे, दि.8 ऑगस्‍ट 2011 मध्‍ये परिच्‍छेद क्र.8 वर असे नमूद केले आहे की,  ‘‘ विमा प्रस्‍ताव विहित कागदपञांसह योजनेच्‍या कालावधीत कधही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्‍यानंतर 90 दिवसांपर्यंत तालुका कृषि अधिका-यांकडे प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसांनंतर प्राप्‍त होणारे विमा प्रस्‍ताव विमा कंपनीने स्विकारावेत.  प्रस्‍ताव विहित मुदतीत सादर केले नाही या कारणास्‍तव विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत.’’  अर्जदाराने नि.क्र.2 वर दस्‍त क्र.9 “Memorandum of a post-mortem examination of  dead body of Anandrao Lahuji Wadaee”  ची पडताळणी करतांना असे नमूद दिसले की, “Opinion as to the cause probable cause of death.- Probable Cause of Death is due to Snake bite poisoning.” व त्‍या दस्‍ताऐवजावर वैद्यकीय अधिकारी जिल्‍हा हॉस्‍पीटल गडचिरोली यांची सही होती.  महाराष्‍ट्र शासनाचा निर्णय 8.8.2011 चे पडताळणी करतांना असे दिसले की, ‘शेती व्‍यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वीज, शॉक बसणे इ. नैसर्गीक आपत्‍तीमुळे होणारे अपघात, रस्‍त्‍यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्‍य कोणतेही कारणामुळे होणारे अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्‍यु ओढावतो किंवा काहींना अपगंत्‍व येते’ यामुळे महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना असे चालु करण्‍याचा निर्णय घेतला.  म्‍हणून तक्रारादाराचे विमा क्‍लेम अर्जावर गैरअर्जदाराने कोणतेही निर्णय न घेवून अर्जदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविली आहे असे सिध्‍द होत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

                       

 

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-  

 

7.          मुद्दा क्र.1 ते 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.       

                 

अंतिम आदेश  -

 

(1)   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.  

 

(2)   गैरअर्जदार क्र.1 नी तक्रारदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावी, विमा रक्‍कम 30 दिवसाचे आत न दिल्‍यास द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह अर्जदाराला द्यावे.

 

(3)   गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2000/- आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे.    

 

(4)   उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी. 

 

     

गडचिरोली.

दिनांक :- 24.9.2014 

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.