Maharashtra

Satara

CC/14/61

UVARAJ KRISHNA NIKAM - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE - Opp.Party(s)

SABALE

18 Mar 2016

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                                    मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                   तक्रार क्र. 61/2014.

                                                                                                                    तक्रार दाखल दि. 29-04-2014.

                                                                                                                   तक्रार निकाली दि. 18-3-2016. 

 

श्री.युवराज कृष्‍णा निकम,

रा.अपशिंगे, (मिलिट्री)

ता.जि.सातारा.                                 ....  तक्रारदार

         विरुध्‍द

व्‍यवस्‍थापक,

दि न्‍यू इंडिया एश्‍योरन्‍स कं.लि.

जीवनतारा, एल.आय.सी.बिल्‍डींग,

पोवई नाका, सातारा.                        ....  जाबदार

 

                     तक्रारदारातर्फे अँड.वाय.के.साबळे.   

                     जाबदारातर्फे अँड.आर.एन.कुलकर्णी.                                                 

                              न्‍यायनिर्णय

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा यानी पारित केला

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे तो खालीलप्रमाणे-

      तक्रारदार हे अपशिंगे (मिलिट्री)ता.जि.सातारा येथे कायमस्‍वरुपी रहाणेस असून स्‍वतःचे चरितार्थासाठी तक्रारदाराने मालवहातुकीसाठी टाटा कंपनीचा ट्रक क्र.MH-11-AL-2521 हा खरेदी केला आहे.  प्रस्‍तुत ट्रकचा विमा तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे उतरविला असून त्‍याचा पॉलिसी क्र.15170031110100008869 असा असून त्‍याचा कालावधी दि.1-9-2011 ते 31-8-2012 असा आहे.  जाबदारानी तक्रारदाराकडून सदर ट्रकचा विमा हप्‍ता म्‍हणून रक्‍कम रु.29,616/- प्रिमियम म्‍हणून भरुन घेऊन तक्रारदाराला विमा पॉलिसी अदा कली होती.  प्रस्‍तुत तक्रारदाराचा सदरचा ट्रक दि.31-8-2012 रोजी मुंबईहून बेंगलोर येथे माल भरणेसाठी जात असताना सदर ट्रकचा अपघात झाला व सदर अपघातात वादातीत ट्रकचे रक्‍कम रु.6,97,103/-(रु.सहा लाख सत्‍त्‍याण्‍णव हजार एकशे तीन मात्र) चे नुकसान झाले असून ट्रक ड्रायव्‍हर हा अपघातात मयत झाला आहे.  मयत ड्रायव्‍हरकडे अपघातग्रस्‍त वाहन चालवणेचे वैध लायसेन्‍स होते.  प्रस्‍तुत अपघातामुळे तक्रारदारास प्रचंड मानसिक, शारिरीक धक्‍का बसला आहे.  तक्रारदाराने जाबदाराकडे अपघाताची सूचना दिलेली आहे.  तक्रारदाराने जाबदाराचे सदर वाहनाचा विमा क्‍लेम नं.151700/31/12/01/90000370, दि.20-12-2012 रोजी कोणतेही कारण नसताना नाकारला व त्‍याबाबतचे पत्र तक्रारदाराना पाठविले आहे, त्‍यामुळे त्‍यांचा ट्रक क्र. MH-11-AL-2521 चा ओन डॅमेज क्‍लेम मिळणेसाठी तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे. 

 

2.     तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून ट्रक क्र. MH-11-AL-2521 चा रक्‍कम रु.6,97,103/- ओन डॅमेज क्‍लेम जाबदाराकडून वसूल होऊन मिळावा, जाबदाराने दि.20-12-2012 रोजी तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारलेमुळे द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत देणेचा आदेश व्‍हावा, तक्रारदाराना जाबदाराकडून रक्‍कम रु.50,000/- मानसिक त्रास व नुकसानभरपाईपोटी वसूल होऊन मिळावेत, तक्रारअर्जाचे खर्चापोटी जाबदाराकडून रु.5,000/- वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे. 

3.     तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/7 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे वाहनाचे अपघाताबाबत एफ.आय.आर, पंचनामा, विमा पॉलिसी, आर.सी.सी.बुक, क्‍लेम नाकारलेचे पत्र, वाहन दुरुस्‍तीचे कोटेशन, अपघातानंतर वाहन ओढून नेणेसाठी आलेल्‍या खर्चाची पावती, नि.13 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 चे कागदयादीसोबत नि.15/1 ते 15/10 कडे अनुक्रमे अपघाताचा चार्जशीट फॉर्म, मयताचा पंचनामा, यमकनमर्डी पोलिस स्‍टेशनचा रिपोर्ट, अपघाताचा एफ.आय.आर, घटनास्‍थळ पंचनामा, मयताचा पोस्‍टमार्टेम रिपोर्ट, मयताचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, एम.ए.सी.पी.507/2012 मधील अँवॉर्डची प्रत, एम.एस.सी.पी.507/2012 मधील इंटरनेटवरील जजमेंटची प्रत, तक्रारदाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र, नि.15/38 कडे तक्रारदाराचा पुरावा संपलेची पुरसीस, नि.17 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.18 कडे युक्‍तीवाद परि.क्र.6-अ व 6-क मध्‍ये वाहनचालकाचे नाव सुनिल वसंत माधव असे नमूद आहे त्‍याऐवजी रविंद्र विजयराव जाधव असे वाचणेत यावे म्‍हणून पुरसीस, नि.19 चे कागदयादीसोबत वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे, नि.20 कडे जाबदारानी दाखल केलेला सर्व्‍हेअरचा रिपोर्ट पुरावा म्‍हणून वाचणेस हरकत नाही, सर्व्‍हेअर यांचे वेगळया प्रतिज्ञापत्राची आवश्‍यकता नाही अशी पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत. 

4.      सदर कामी जाबदारांनी नि.10 कडे म्‍हणणे, नि.11 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिाापत्र, नि.12 चे कागदयादीसोबत नि.12/1 ते 12/5 कडे अनुक्रमे मोटार इन्‍शुरन्‍स क्‍लेम फॉर्म, आर.टी.ओ.वाहन नोंदणी रजिस्‍टरचा सहीशिक्‍याचा उतारा, ड्रायव्‍हर रविंद्र जाधवचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍सचा आर.टी.ओ.चा उतारा, सर्व्‍हेअरचा फायनल सर्व्‍हे रिपोर्ट, वाहनाच्‍या पॉलिसीची सहीशिक्‍क्‍याची नक्‍कल, नि.16 कडे जाबदाराना जादा पुरावा देणेचा नाही अशी पुरसीस, वगैरे कागदपत्रे जाबदारानी दाखल केली आहेत.  जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये  तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी तक्रारअर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत-

1)  तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.  तक्रारदारांचे माल वहातुकीचा ट्रक क्र. MH-11-AL-2521 चा विमा जाबदार कंपनीकडे पॉलिसी क्र. 15170031110100008869 ने दि.1-9-2011 ते 31-8-2012 या कालावधीसाठी त्‍या पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार उतरविलेला होता.  सदर वाहन चालवणा-या व्‍यक्‍त्‍ीस वाहन चालवणेचा योग्‍य व चालू परवाना असणे आवश्‍यक होते व या महत्‍वाच्‍या मूलभूत अटीवर सदर विमा उतरविलेला होता.  सदर अपघातातील वाहनाचे मालासहित वजन 12990 किलोपर्यंत होईल या पध्‍दतीने माल भरुन (ग्रॉस/लेडन व्‍हेईकल वेट) सदरचे वाहन वापरणेचे होते. 

2)    प्रस्‍तुत वाहनाची मालासह वजन मर्यादा 12990 किलो एवढी असल्‍याने सदरचे वाहन हेवी गुडस् व्‍हेईकल या प्रकारचे होते.  तसेच प्रस्‍तुत वाहनाचा विमासुध्‍दा हेवी गुडस् व्‍हेईकल म्‍हणूनच उतरविला होता.  तथापि मोटर व्‍हेईकल अँक्‍टचे तरतुदीनुसार सदरचे वाहन हे हेवी गुडस् व्‍हेईकल (एच.जी.व्‍ही) या प्रकारचे असतानाही चुकीने सदर वाहनाचा प्रकार (व्‍हेईकल क्‍लास)मिडीयम गुडस् व्‍हेईकल असा आर.टी.ओ.रेकॉर्ड सदरी लिहीला गेला आहे.  तसेच आर.टी.ओ.रेकॉर्ड सदरी सदर वाहनाचे मालाशिवाय वजन (अनलेडन वेट) व मालासह वजन (लेडनवेट) याच्‍या मर्यादा स्‍पष्‍टपणे नमूद केल्‍या आहेत.  सदर वाहनाची मालासह वजन मर्यादा विचारात घेता सदर वाहन मोटर व्‍हेईकल अँक्‍टमधील तरतुदीनुसार हेवी गुडस् व्‍हेईकल (एच.जी.व्‍ही)प्रकाराने होते व आहे हे स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे प्रस्‍तुत वाहन चालवणारे चालकास एच.जी.व्‍ही.चालवणेचा वैध परवाना असणे आवश्‍यक होते तथापि अपघातावेळी सदर वाहनाचा वाहन चालक रविंद्र विजयराव जाधव यास केवळ लाईट मोटार व्‍हेईकल ट्रान्‍स्‍पोर्ट म्‍हणजे हलके व्‍यापारी वाहन चालवणेचा परवाना होता व त्‍यास अपघातग्रस्‍त हेवी गुडस् व्‍हेईकल वाहन चालवणेचा परवाना नव्‍हता.  असे असतानाही तक्रारदाराने चालक रविंद्र जाधव यास सदर वाहन चालवणेसाठी दिले होते, त्‍यामुळे अपघातावेळी सदर वाहन चालकास सदर वाहन चालवणेचा आवश्‍यक तो वैध परवाना नसल्‍याने तक्रारदाराने सदर वाहनाच्‍या विमा पॉलिसीतील मूलभूत अटी व शर्तींचा भंग केला आहे त्‍यामुळे तक्रारदाराचे अपघातग्रस्‍त वाहनाची झालेली नुकसानभरपाई देणेची कोणतीही व कसलीही जबाबदारी जाबदार विमा कंपनीवर येत नाही, त्‍यामुळेच जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराने सादर केलेला विमा क्‍लेम देय नसल्‍याचे तक्रारदारास दि.20-12-2012 चे पत्राने कारणे देऊन कळविले होते.  सबब जाबदारांनी योग्‍य कारणासाठीच तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारला आहे त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराना द्यावयाच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारअर्ज खर्चासह रद्द होणेस पात्र आहे. 

3)    तक्रारदाराने जाबदाराकडे दाखल केलेला विमा क्‍लेम जाबदाराने दि.20-12-2012 रोजी नाकारलेनंतर त्‍याविरुध्‍द एक वर्षाचे आत तक्रारदाराने योग्‍य त्‍या कोर्टात दाद मागणे आवश्‍यक होते.  क्‍लेम नाकारलेपासून एक वर्षाचे आत तक्रारदाराने योग्‍य त्‍या कोर्टात दाद मागणे आवश्‍यक होते.  क्‍लेम नाकारलेपासून एक वर्षाचे आत याविरुध्‍द दाद न मागितलेस तक्रारदारास अशी कोणतीही दाद मागणेचा हक्‍क त्‍याने सोडून दिला असून तो नष्‍ट झाला आहे असे समजणेत येईल अशी स्‍पष्‍ट तरतूद सदर विमा पॉलिसीमध्‍ये होती व आहे.  यासाठी तक्रारदाराने विमा क्‍लेम जाबदाराने नाकारले तारखेपासून एक वर्षाचे आत तक्रार दाखल केलली नाही सबब तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. 

4)   जाबदाराने तक्रारदाराचे वाहनाच्‍या अपघातानंतर सर्व्‍हेअर्स युनायटेड सर्व्‍हेअरर्स यांचेकडून सदर वाहनाचे अपघातामुळे झालेल्‍या नुकसानीची पहाणी व तपासणी करुन दि.24-9-2012 चा सविस्‍तर अहवाल जाबदार कंपनीस दिला आहे.  त्‍या अहवालानुसार तक्रारदाराचे अपघातग्रस्‍त वाहनाचे रक्‍कम रु.3,61,150.50 एवढेच नुकसान झालेले होते व आहे हे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रादाराने तक्रारअर्जात केलेली अवाजवी मागणी ही नाकारणेत यावी.  जाबदार कपनीकडून तक्रारदारास कोणतीही रक्‍कम देय होत नसल्‍याने तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशा स्‍वरुपाचे म्‍हणणे जाबदाराने दाखल केले आहे.  जाबदाराने मे.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे पुढील न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत-

  1.  (2012) 4 CPR (N.C) Page 595- विजेंदरकुमार विरुध्‍द न्‍यू इंडिया अँश्‍युरन्‍स कं.

  2.  (2014) 1 CPR (N.C) Page  क्र.735- रामप्रसाद विरुध्‍द बजाज अलियांज.

  3.  (1997) 4 Sec. 366/(1997)2 CPJ (S.C.)1 नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि. विरुध्‍द सुजीर गणेश नायक.

  4.  (2000)1 CPJ (N.C)55/(2000)2 CPR.(N.C.)1 (2000)1 C.P.C.(N.C)583/(2000)2 C.L.T. (N.C.)178 नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि.विरुध्‍द मारथी क्रीस्‍टल सॉल्‍ट कं.लि.  

 

5.     वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुराव्‍याची प्रतिज्ञापत्रे, लेखी व तोंडी युक्‍तीवाद वगैरे सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्यांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                             उत्‍तर

1.  तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार

   आहेत काय?                                                  होय.

2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा क्‍लेम नाकारुन

   तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे काय?                          होय.

3. तक्रारदार अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत काय?   होय.

4. अंतिम आदेश काय?                                शेवटी नमूद आदेशाप्रमाणे.

 

विवेचन- 

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो कारण तक्रारदाराचे वादातीत मालट्रक क्र. MH-11-AL-2521 चा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता.   सदर विमा पॉलिसीचा क्रमांक 15170031110100008869  असा असून त्‍याचा कालावधी दि.1-9-2011 ते 31-8-2011 असा होता.  ही बाब दाखल पॉलिसीवरुन सिध्‍द होते तसेच जाबदार विमा कंपनीने प्रस्‍तुत बाब मान्‍य व कबूल केली आहे.  सबब तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असल्‍याचे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. 

 

7.      वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे वादातीत वाहनाचा अपघात दि.31-8-2012 रोजी मुंबईहून बेंगलोर येथे माल भरणेसाठी जात असताना झाला.  त्‍यावेळी विमा पॉलिसीतील नमूद कालावधीप्रमाणे विमा चालू होता.  याबाबत जाबदाराचा कोणताही आक्षेप नाही.  प्रस्‍तुत वादातीत वाहन ट्रकचे सदर अपघातात तक्रारदाराचे मतानुसार रक्‍कम रु.6,97,103/-चे नुकसान झाले.  प्रस्‍तुत अपघातात वाहन चालवणारा ड्रायव्‍हर मयत झाला आहे परंतु सदर ड्रायव्‍हरकडे L.M.V. (Transport) असे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स होते तसेच प्रस्‍तुत वादातीत वाहनाचे नि.5/4  वरील आर.सी.सी.बुकवर Class of Vehicle म्‍हणून L.C.V.अशी नोंद आहे.  म्‍हणजेच Light Commercial Vehicle असे नमूद आहे.  परंतु आर.टी.ओ उतारा नि.12/2 वर व्‍हेईकल क्‍लासचे समोर MGV  म्‍हणजेच   Medium Goods Vehicle असे नमूद केले आहे.  वास्‍तविक प्रस्‍तुत तक्रारदाराचे वाहनाचा चालक रविंद्र विजयराव जाधव याचेकडे LMV  TR. असे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स होते तसेच प्रस्‍तुत वाहनाचे आर.सी.बुकवरील नोंदीनुसार रिकाम्‍या वाहनाचे वजन 4975 कि.ग्रॅ.असलेचे दिसून येते.  सदरील बाबीचा विचार करता मोटर वाहन वापरातील तरतुदीनुसार सदरील रिकाम्‍या वाहनाचे वजन (Unladden weight)हे 7500 कि.ग्रॅ.पेक्षा कमी असलेचे स्‍पष्‍ट दिसून येते.  तसेच LMV (Tr) लायसन असल्‍याने व्‍यक्‍तीना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार लाईट गुडस् व्‍हेईकल चालवणेस परवानगी असलेचे स्‍पष्‍ट दिसून येते.  त्‍यामुळे तक्रारदाराचे ड्रायव्‍हरकडे वैध ड्रायव्‍हींग लायसेन्‍स होते व असे असतानाही जाबदाराने तक्रारदाराचा वाहनाचा अपघातातील नुकसनीचा विमाक्‍लेम वैध ड्रायव्‍हींग लायसेन्‍स नसल्‍याच्‍या कारणावरुन फेटाळला आहे व तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे हे स्‍पष्‍ट होते.  सदर बाबतीत आम्‍ही तक्रारदाराने दाखल केलेल्‍या वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या खालील नमूद न्‍यायनिवाडयांचा विचार केला-

1. ATR 2008 Supreme Court 1418

   National Insurance Co. Ltd V/s. Annappa Irappa Neshria & Ors.

   Motor Vehicle Act (59 of 1988) Sec.2(21)149- Central Motor Vehicle Rules (1989)Form 4 (Before its amendment in 2001) light motor vehicle- covers light passenger carriage vehicle & light goods carriage vehicle- Driver possessing LMV licence- cannot be said to not possess effective licence to drive Matador van having goods carriage permit- Insurance company cannot shirk its liability to pay compensation.

 

2.   Supreme Court of India

     Civil appeal no.9929-30 of 2014.   Kulwant Singh & Ors. V/s. Oriental Insurance Co.Ltd.

    In the instant case, admittedly the driver was holding a valid driving licence to drive light motor vehicle.  There is not dispute that the motor vehicle in question, by which accident took place, was Mahindra Maxi Cab.  Merely because the driver did not get any endorsement in the driving licence to drive Mahindra Maxi Cab, which is a light motor vehicle, the Hight Court has committed grave error of law in holding that the insurer is not liable to pay compensation because the driver was not holding the licence to drive the commercial vehicle.  The impugned judgment (Civil Mis.Appeal No.1016 of 2002, order dated 31-10-2008  (Mad)is therefore, liable to be set aside.  No contrary view has been brought to our notice. 

 

3.   Supreme Court of India-

     National Insurance Co.Ltd. V/s. Swaran Singh & Ors.

     Special leave petition  (Civil)9027 of 2003-

     The breach of policy condition e.g.- disqualification of dricer or invalid driving licence of the driver, as contained in sub-section (2)(a)(ii) of section 149, have to be proved to have been committed by the insured for avoiding liability by the insurer.  Mere absence, fake or invalid driving licence or disqualification of the driver for driving at the relevant time, are not in themselves defences available to the insurer against  either the insured or the third parties.  To avoid its liability towards insured, the insurer has to prove that the insured was guilty of negligence and failed to exercise reasonable care in the matter of fulfilling the condition of the policy regarding use of vehicles by duly licenced driver or one who was not disqualified to drive at the relevant time.  

    Even where the insurer is able to prove breach on the part of the insured concerning the policy condition regarding holding of a valid licence by the driver or his qualification to drive during the relevant period, the insurer would not be allowed to avoid its liability towards insured unless the said breach or breaches on the condition of driving licence is/are so fundamental as are found to have contributed to the cause of the accident. 

 

4.  AIR 1999 Supreme  Court 3181-  Ashok Gandadhar Maratha V/s. Oriental Insurance Co.:Ltd. 

    Motor Vehicle Act (59 of 1988), Sec.147,2(21), 2(14) – Liability of insurer- Light Motor Vehicle- Cannot always mean a light goods carriage- It can be a non transport vehicle as well- Vehicle in question weighing 5920 kilos- Permit to ply vehicle in question as transport vehicle neither pleaded nor produced- Vehicle even though designed as goods carrier cannot in view of S.66 be held to be transport vehicle- Person driving it at time of accident authorized to drive only L.M.V. and not transport vehicle- Cannot be said to be having no effective valid licence- Insurer cannot escape liability on ground of breach of policy by insured.

 

       वरील सर्व न्‍यायनिवाडयांचा व त्‍यातील दंडकांचा विचार करता जाबदार विमा कंपनीस तक्रारदाराचे ड्रायव्‍हरकडे LMV (TR) हे ड्रायव्‍हींग लायसन्‍स होते परंतु तक्रारदाराचे वाहनाचे ड्रायव्‍हरकडे Heavy goods vehicle चालवणेचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स नव्‍हते त्‍यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग झाला असल्‍याचे म्‍हणून जाबदार विमा कपनीस तक्रारदाराचे वाहनाचे अपघातात झालेल्‍या नुकसानीचा विमा क्‍लेम नाकारुन विमा क्‍लेम देणेची जबाबदारी वगळता येणार नाही असे स्‍पष्‍ट होते.  परंतु सदर कामी जाबदार विमा कंपनीने नमूद कारणावरुनच तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारला आहे हे न्‍यायोचित नाही तर ही सेवेतील त्रुटी आहे.  तसेच तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज मे.मंचात जाबदार विमा कंपनीने विमा क्‍लेम फेटाळले तारखेपासून 2 वर्षाचे आत दाखल केला आहे म्‍हणजेच सदरचा तक्रारअर्ज मुदतीत दाखल केलेला आहे असे या मे.मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब नैसर्गिक न्‍यायतत्‍वाचा विचार करता तक्रारदार हे प्रस्‍तुत वादातील वाहनाचा अपघातामधील नुकसानभरपाईचा विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

       प्रस्‍तुत कामी जाबदाराने युनायटेड सर्व्‍हेअर यांचेमार्फत वादातीत वाहनाचा सर्व्‍हे करुन अपघातग्रस्‍त वाहनाचे झाले नुकसानीबाबत सर्व्‍हेअरचा रिपोर्ट नि.12/4 कडे मे.मंचात दाखल केला आहे, त्‍यामध्‍ये प्रस्‍तुत सर्व्‍हेअर यानी जाबदारांची जबाबदारी रक्‍कम रु.3,61,150/-(रु.तीन लाख एकसष्‍ट हजार एकशे पन्‍नास मात्र) इतकीच राहील असे म्‍हटले आहे.  तसेच तक्रारदाराने प्रस्‍तुत सर्व्‍हे रिपोर्ट पुराव्‍यात वाचणेस हरकत नाही व सर्व्‍हेअर यांच्‍या वेगळया प्रतिज्ञापत्राची गरज नाही असे नि.20 कडील पुरसीसमध्‍ये म्‍हटले आहे.  सबब प्रस्‍तुत सर्व्‍हेअर यांनी दिले वादातीत वाहनाच्‍या दुरुस्‍तीसाठी सदर सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये नमूद केलेप्रमाणे जाबदार विमा कंपनीची रक्‍कम रु.3,61,150/- (रु.तीन लाख एकसष्‍ट हजार एकशे पन्‍नास मात्र) एवढी जबाबदारी येते असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब सदर कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                            आदेश

1.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो. 

 

2.  जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांचे वादातीत वाहनाच्‍या विमा क्‍लेमपोटी तक्रारदारांना रक्‍कम रु.3,61,150/- (रु.तीन लाख एकसष्‍ट हजार एकशे पन्‍नास मात्र) अदा करावी.  प्रस्‍तुत रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज जाबदाराने तक्रारदारास अदा करावे. 

 

3.   जाबदाराने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत. 

 

4.    वर नमूद आदेशंची पूर्तता जाबदाराने आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावी.

 

5.  विहीत मुदतीत जाबदाराने मंचाचे आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारांना जाबदाराविरुध्‍द कलम 25 व 27 अन्‍वये कारवाई करणेची मुभा राहील. 

 

6.    सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

7.    सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 18-3-2016.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)  (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.