(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवालाकडून रक्कम रु.17,298/- मिळावेत, या रकमेवर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याज मिळावे, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांनी पान क्र.37 लगत लेखी म्हणणे व पान क्र.42 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडिक्लेम विमापॉलिसीपोटी रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार व त्यांचे वकिल हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. सामनेवाला यांनी पान क्र.44 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमापॉलिसी घेतलेली आहे, ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 2 मध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत मेडीक्लेम विमापॉलिसीची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.6 लगतची विमापॉलिसी यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “पॉलिसी कालावधी अंतर्गत अर्जदार आजारी पडले. त्यावेळी त्यांनी सिध्दीविनायक हॉस्पीटल, नाशिक व जसलोक हॉस्पीटल, मुंबई येथे उपचार घेतले. त्याबाबत सामनेवाला यांनी अर्जदार यांना रक्कम रु.20,047/- इतकी रक्कम अदा केलेली आहे. सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. अर्जदार यांना एम.डी.इंडिया हेल्थ केअर सर्व्हीस यांचेकडून नुकतीच योग्य ती रक्कम मिळालेली आहे. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
वास्तविक पान क्र.6 चे पॉलिसीप्रमाणे सामनेवाला यांनी अर्जदार यांचेबाबतीत कॅशलेस मेडीक्लेम विमापॉलिसी दिलेली आहे. असे असूनही सामनेवाला यांनी अर्जदार यांचा संपुर्ण विमाक्लेम का मंजूर केलेला नाही? याबाबत सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. मेडीक्लेम विमापॉलिसीपोटी जी रक्कम सामनेवाला यांचेकडून मिळालेली आहे, त्याचा उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये केलेला आहे. जी रक्कम सामनेवाला यांचेकडून मिळालेली नाही तीच रक्कम अर्जदार हे सामनेवालाकडून मागत आहेत. पान क्र.7 चे बिलानुसार अर्जदार यांना वैद्यकिय उपचाराकरीता रु.1,32,146/-इतका खर्च आलेला आहे असे दिसून येत आहे. एम.डी.इडिया हेल्थ केअर सर्व्हीसेस यांचेकडून अर्जदार यांना किती रक्कम मिळालेली आहे याबाबतचा कोणताही पुरावा व कागदपत्रे सामनेवाला यांनी या कामी दाखल केलेली नाहीत. कॅशलेस विमापॉलिसी असूनही सामनेवाला यांनी अर्जदार यांना संपुर्ण रक्कम अदा केलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमापॉलिसीपोटी रक्कम रु.17,298/- इतकी रक्कम वसूल होवून मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रार अर्जामधील संपुर्ण कथन व पान क्र.7 चे बिल तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व त्यामधील कथन याचा विचार होता, अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमापॉलिसीपोटी रक्कम रु.17,298/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला विरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागलेली आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2500/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्वकागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत
आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे
रकमा द्याव्यात.
2अ) मेडीक्लेम विमा पॉलिसीपोटी रक्कम रु.17,298/- द्यावते
2ब) मानसिक त्रासापोटी रु.2500/- द्यावेत.
2क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.