Maharashtra

Satara

CC/12/121

ANKUSH BABAN DALAVI - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE - Opp.Party(s)

jagdale

16 Jan 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                           तक्रार क्र. 121/2012.

                                                                                                            तक्रार दाखल दि.14-08-2012.

                                                                                                            तक्रार निकाली दि.16-1-2015. 

श्री.अंकुश बबन दळवी,

रा.मु.पो.डिस्‍कळ, ता.खटाव,

जि.सातारा.                                 ....  तक्रारदार  

         विरुध्‍द

1. दि न्‍यू इंडिया एश्‍युरन्‍स कं.लि.तर्फे

  विभागीय प्रबंधक,    

  सातारा मंडल कार्यालय, जीवनतारा,

  513 एल.आय.सी.बिल्डिंग, कलेक्‍टर

  ऑफिससमोर, सदर बझार, सातारा.

2. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,

   सातारा आर.टी.ओ.‍ऑफीस,

   जिल्‍हा न्‍यायालयाचे मागे, सदर बझार, सातारा.

3. पंडित अँटोमोटिव्‍ह प्रा.लि. तर्फे- प्रबंधक,

   जे 3/1, अँडीशनल एम.आय.डी.सी.सातारा 4.

4.  टाटा मोटर्स फायनान्‍स लि.तर्फे प्रबंधक,

    ए बिल्डिंग, दुसरा मजला,

   लोढा आय थिंक टेक्‍नो कँम्‍पस,

   ऑफ पोखरण रोड-2, ठाणे पश्चिम-400 607.                                     ....  जाबदार

                तक्रारदारातर्फे अँड.व्‍ही.पी.जगदाळे.

                 जाबदारातर्फे- अँड.पी.सी.इनामदार.

                                                  

                        न्‍यायनिर्णय

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

         तक्रारदार हे डिस्‍कळ, ता.खटाव, जि.सातारा येथील रहिवासी आहेत.  त्‍यांनी दि.22-2-2011 चे सुमारास एम.एच-11-टी-9571 हे टाटा विंगर वाहन जाबदार क्र.3 कडून खरेदी घेतले.  प्रस्‍तुत खरेदीसाठी जाबदार क्र.4 कडून अर्थसहाय्य घेतले.  प्रस्‍तुत वाहन जाबदार क्र.2 कडे नोंदणी करणेसाठी व परवानाप्राप्‍तीसाठी पाठविले, तसेच प्रस्‍तुत वाहनाचा विमा जाबदार क्र.1 यांचेकडे उतरविला होता.  प्रस्‍तुत वाहनास दि.7-11-2011 रोजी ग्रामीण पोलिस स्‍टेशन खालापूर येथे अपधात झाला.  तक्रारदाराने प्रस्‍तुत अपघातात वाहनाचे झालेल्‍या नुकसानीबाबत जाबदार क्र.1 यांचेकडे विमाक्‍लेम दाखल केला होता, परंतु प्रस्‍तुत वाहनास जाबदार क्र.2 कडून परवाना प्राप्‍त नव्‍हता.  अशा सबबीखाली दि.31-5-2012 रोजी तक्रारदाराचे वाहनाचा विमा क्‍लेम जाबदार क्र.1 यांनी फेटाळला.  वाहनाच्‍या विमा व नोंदणी परवान्‍याची पूर्तता केवळ वाहनाचा परवाना मिळाला नाही म्‍हणून विमा क्‍लेम नाकारला गेला आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत जाबदार विमा कंपनीकडून तक्रारदाराचे वाहनाची विमा क्‍लेम रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे. 

2.    तक्रारदाराने सदर कामी जाबदार क्र.1 ते 4 यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे घोषित करुन मिळावे, जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्‍लेम आय.डी.व्‍ही.रु.5,93,750/- इतका जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराना सव्‍याज प्रदान करावा असा आदेश जाबदार क्र.1 याना दयावा, तसेच जाबदार क्र.2 यानी अनुज्ञप्‍तीची रक्‍कम स्विकारुनही वाहनास अनुज्ञप्‍ती दिली नसल्‍यामुळे झालेल्‍या मानसिक त्रासास जाबदार क्र.2 हे देखील जबाबदार असल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द रक्‍कम रु.50,000/- तक्रारदारास प्रदान करणेचे आदेश व्‍हावेत, तसेच जाबदार क्र.3 यांनी सदर कामी वेळच्‍यावेळी अनुज्ञप्‍ती मिळवणेसाठी कोणतेही सहाय्य केले नाही किंवा औपचारिक अनुज्ञप्‍ती नाही याची कल्‍पनाही तक्रारदारास दिलेली नाही, त्‍यामुळे त्‍यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने त्‍यांनी तक्रारदारास रक्‍कम रु.50,000/- देणेबाबत आदेश व्‍हावा, जाबदार क्र.4 यानी लवाद दावा त्‍वरीत मागे घेणेबाबत आदेश व्‍हावेत, तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- सर्व जाबदारानी अदा करावेत तसेच तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.25,000/- जाबदारानी तक्रारदाराना अदा करावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे. 

3.        तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 ते 4/14 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे वाहनाची विमा पॉलिसी, विमा कव्‍हरनोट, जाबदाराने विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, वाहनाचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, वाहनाची पावती, तक्रारदाराचे वाहनाचे परमीट, आर.सी.बुक, वाहनाच्‍या नुकसानी खर्चाचे कोटेशन, वाहनाची झेरॉक्‍स पावती, मोटार वाहन विभाग यांचे परमीटची पावती, टॅक्‍सची पावती, फिटनेस प्रमाणपत्र, अपघाताबाबत एफ.आय.आर.जाबदार क्र.4 यानी पाठवलेली नोटीस तसेच 2014 CPJ 89 (H.P) Oriental Insurance Co.Ltd. V/s. A Chandal. Appeal No.64 of 2014 decided on 2014  हा न्‍यायनिवाडा मे.मंचात दाखल केला आहे. 

4.     जाबदार क्र.1 यानी नि.19 कडे म्‍हणणे/कैफियत  दाखल केली आहे.  नि.20 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.21 कडे कागदयादीसोबत नि.21/1 ते 21/10 कडे अनुक्रमे विमापॉलिसी, पॅकेजपॉलिसी, कमर्शियल व्‍हेईकल, विमा क्‍लेम फॉर्म, वाहनाचे आर.सी.बुक, सर्व्‍हेअर यांचा सर्व्‍हे रिपोर्ट, परमीट मागणीसाठी जाबदाराने तक्रारदारास पाठवलेले पत्र, तक्रारदाराने जाबदारास पाठवलेले पत्र, वाहनाचे परमीट, तक्रारदारास जाबदाराने पाठवलेले पत्र, विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, नि.24 चे कागदयादीसोबत नि.25 कडे श्री.नितीन जोशी सर्व्‍हेअर यांचे प्रतिज्ञापत्र, नि.31 कडे लेखी म्‍हणणे व म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र हाच जाबदार 1 यांचा पुरावा समजणेत यावा अशी पुरसीस, नि.32 कडे लेखी युक्‍तीवाद, नि.29 कडे जाबदार क्र.3 चे म्‍हणणे, नि.28 कडे जाबदार क्र.3 चे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.29/अ चे कागदयादीसोबत तक्रारदारानी जाबदार 3 ला वाहनाचे परमीटबाबत लिहीलेले पत्र, नि.41 चे कागदयादीसह नि.41/1 ते 41/4 कडे अनुक्रमे जाबदार क्र.1ने दिलेले पत्र, इन्‍व्‍हेस्टिगेशन ऑफिसरचे पत्र, आर.टी.ओ.सातारा यांनी दिलेला दाखला, वाहनाची विमा पॉलिसी वगैरे कागदपत्रे जाबदाराने दाखल केलेली आहेत.   

       जाबदारानी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथन फेटाळले आहे, त्‍यांनी पुढीलप्रमाणे म्‍हणणे स्‍पष्‍ट केले आहे-

  1. तक्रारअर्जातील कथन अमान्‍य.
  2. तक्रारअर्ज करणेस कोणतेही कारण घडलेले नाही त्‍यामुळे तक्रार रद्द करणेत यावी.
  3. सेवा देण्‍यात जाबदारानी कोणतीही कमतरता केली  नाही.
  4. तक्रारदार हे वाहन व्‍यापारी हेतूसाठी व जादा नफा मिळवणेसाठी वापरतात त्‍यामुळे ते ग्राहक या संज्ञेत येत नाहीत, तसेच त्‍यानी सदर गाडीवर ड्रायव्‍हर नेमला आहे, त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारअर्ज चालणेस अपात्र आहे. 
  5. तक्रारदारास विमा घेताना विमा पॉलिसीतील सर्व अटी व शर्ती पूर्णपणे समजावून सांगितल्‍या होत्‍या व विमा पॉलिसीतील अटींचा भंग केलेस विमा क्‍लेम मिळणार नसल्‍याचे सांगितले होते.

   ऊ)   तक्रारदाराचे वाहनाचे अपघाताची माहिती मिळालेनंतर त्‍याचा फायनल सर्व्‍हे      करणेसाठी नितीन जोशी या सरकारमान्‍य सर्व्‍हेअरची नियुती केली व दि.30-11-2011 रोजी पहाणी केली.  त्‍यानंतर त्‍यांनी गाडी दुरुस्‍त करणारे लोकांबरोबर चर्चा करुन अंदाजे किती नुकसान झाले याची माहिती घेतली.  प्रस्‍तुत सर्व्‍हेअर यांनी सदर वाहनाची Total loss liability रक्‍कम रु.4,13,250/- अशी दाखवली आहे.  त्‍यावेळी कागदपत्रांची पहाणी करता प्रस्‍तुत वाहनाचे परमीट दि.4-1-2012 ते 3-1-2017 च्‍या कालावधीसाठी दि.4-1-2012 रोजी काढलेले लक्षात आले.  तसेच गाडीवर दि.7-1-2011 रोजी महेश वसंतराव शिंदे हे पगारी ड्रायव्‍हर नेमलेले होते.  त्‍यामुळे सदरचा विमा क्‍लेम जाबदाराने फेटाळला आहे.  तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदाराने म्‍हणणे दाखल केले आहे.

5.       वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.         मुद्दा                                             उत्‍तर

1.  तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय?    होय.

2. जाबदारानी तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे काय?                 होय.

3. तक्रारदार हे प्रस्‍तुत विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत काय?            होय.

4. अंतिम आदेश काय?                                शेवटी नमूद केलेप्रमाणे. 

विवेचन-

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने त्‍यांचे वाहन क्र.एम.एच-11-टी-9571 टाटा विंगरचा विमा जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे उतरवला होता.  त्‍याचा पॉलिसी क्र. 15170031100100017653 असा असून त्‍याचा विमा कालावधी दि.29-1-2011 ते दि.28-1-2012 अखेर होता.  प्रस्‍तुत वाहनाचा अपघात दि.7-11-2011 रोजी झाला आहे म्‍हणजे अपघात काळात प्रस्‍तुत वाहनाचा विमा चालू होता.  प्रस्‍तुत वाहनाचा विमा करार तक्रारदार व जाबदार क्र.1 यांचे दरम्‍यान झालेला होता ही बाब तक्रारदाराने नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 वरील विमा पॅकेज पॉलिसीवरुन सिध्‍द होते म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीचे ग्राहक असल्‍याचे निर्विवाद सिध्‍द होते.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

7.      वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण दि.7-1-2011 रोजी तक्रारदाराचे नमूद वाहनास अपघात झालेनंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांच्‍या पूर्ततेसह विमा क्‍लेम जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे सादर केला, परंतु जाबदार विमा कंपनीने प्रस्‍तुत वाहनास परवाना नाही हे कारण दाखवून क्‍लेम फेटाळला आहे.  वास्‍त‍विक प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज हा अपघातात वाहनाच्‍या झालेल्‍या नुकसानीबाबत भरपाई मिळणेसाठी तक्रारदारानी दाखल केला आहे आणि परवाना नसल्‍याचे कारण दाखवून पूर्णपणे विमाक्‍लेम फेटाळणे ही सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब प्रस्‍तुत मुद्दयाचे सविस्‍तर स्‍पष्‍टीकरण खाली नमूद विवेचनात देत आहोत. 

8.      वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांचा वाहनाच्‍या नुकसानभरपाईचा विमा क्‍लेम वाहनास परवाना नसल्‍याचे कारण दाखवून जाबदार क्र.1 विमा कंपनीने फेटाळला आहे.  वास्‍तविकतः प्रस्‍तुत परवाना असणे बंधनकारक असलेची बाब ही मोटार अँक्‍सीडेंट क्‍लेम्‍स ट्रॅब्‍यूनल यांचेसमोर अपघातातील जखमी व्‍यक्‍तीचे किंवा मयत व्‍यक्‍तीच्‍या विमा क्‍लेमच्‍या केसेसमध्‍ये काळजीपूर्वक पहाणे बंधनकारक आहे, परंतु मे.ग्राहक मंचासमोरील वाहनाच्‍या नुकसानभरपाई क्‍लेमबाबत किंवा विमा कंपनीकडे सादर केलेल्‍या वाहनाच्‍या नुकसानभरपाई क्‍लेममध्‍ये याचा विचार करणे गरजेचे नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  प्रस्‍तुत कामी आम्‍ही तक्रारदारांनी मे.मंचात दाखल केलेला खाली नमूद न्‍यायनिवाडा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे-

2014 CPJ 89 (H.P)

Himachal Pradesh State Consumer Disputes Redressal Commission Shimala-

Oriental Insurance Company Ltd. V/s. A Chandel.   Appeal No.64 of 2014 decided on 2014.

This plea of the appellant might have been relevant in case before the Motor Accident Claims Tribunal if there were claim petitions for injury or death of either of those two allegedly  unauthorized persons, but it is not relevant for setting the insured’s claim for damage to the insured vehicle.  The contract of insurance so for as it pertains to insured’s claim for own damage is governed by agreement between the parties and not by any statute.  It is only in case of third party claim under the relevant chapter of Motor Vehicle Accident; pertaining to statutory insurance covering the risk of third party that such a plea is relevant.   त्‍यामुळे तक्रारदार हे प्रस्‍तुत विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.  तक्रारदार हे सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे रक्‍कम रु.4,48,789/- (रु.चार लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्‍वद मात्र) मिळणेस पात्र आहेत. 

9.      वरील सर्व विवेचनाचा व मुद्दयांचा उहापोह करुन प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अं‍तिम आदेश पारित करीत आहोत-

 

 

                        आदेश

1.  तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. तक्रारदारांना जाबदार क्र.1 विमा कंपनीने वाहनाच्‍या विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.4,48,789/- (रु.चार लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणनव्‍वद मात्र) अदा करावेत.

3.  प्रस्‍तुत विमा रकमेवर जाबदारानी विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज अदा करावे.

4. तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- (रु.पंधरा हजार मात्र) जाबदार 1 यानी तक्रारदारास अदा करावी.

5.   तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) जाबदार क्र.1 यानी तक्रारदारास अदा करावेत.

6.    जाबदार क्र.2 ते 4 विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

7.    वर नमूद आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

8.    सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

9.    सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.16-1-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.