Maharashtra

Bhandara

CC/16/62

Mr. Umedhkumar S/o Nandlal Sharma - Complainant(s)

Versus

The New India Insurance company - Opp.Party(s)

adv. Deepak p. Rawlani

21 Jun 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/62
( Date of Filing : 03 Jun 2016 )
 
1. Mr. Umedhkumar S/o Nandlal Sharma
R/0 Bajaj Nagar, Tumsar tah. Tumsar, Dist Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance company
1215, 12 th Floor Naurang House, 21 Kasturba Gandhi Marg New Delhi 110 001 Tah & Distt. New delhi
New delhi
2. The Maruti Insurance Broking Private Limited
Through Its Manager, Office at 1 Nelson Mandela Road Vasant Kunj, New Delhi- 110070
New Delhi
3. The Automotive Manufacturers Pvt. Ltd
Office at Plot No. 575, Kamtee Road Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:adv. Deepak p. Rawlani, Advocate
For the Opp. Party: Adv. Nashine, Advocate
 Adv. D.A. Nakhate , Advocate
Dated : 21 Jun 2019
Final Order / Judgement

                                                                   (पारीत व्‍दारा श्री. भास्‍कर बी. योगी, मा. अध्‍यक्ष)

                                                                             (पारीत दिनांक– 21 जून, 2019)   

01. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विरुध्‍द  अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवा दिल्‍या संबधात ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

तक्रारकर्त्‍याचे मालकीचे मारुती ओमनी हे वाहन असून त्‍याचा नोंदणी क्रं-MH-36-H-2596 असा असून ENGINE CHASIS NO.-4495037-1369104 असा आहे. तक्रारकर्ता सदर वाहनाचा‍ विमा  विरुध्‍दपक्ष क्रं 1) विमा कंपनीकडे, विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कडून नियमित काढत असतो. तक्रारकर्त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी ही दिनांक-06 मार्च, 2016 पर्यंत वैध होती, त्‍यामुळे पॉलिसी लॅप्‍स होऊ नये म्‍हणून त्‍याने पूर्वीच म्‍हणजे दिनांक-26.02.2016 रोजीच त्‍याचे खाते असलेल्‍या भंउारा अर्बन को-ऑप बँक मर्यादित, तुमसर शाखेचा धनादेश विमा पॉलिसीचे नुतनीकरणासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे नावे जारी केला होता. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे नुतनीकरणासाठी धनादेश दिल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष यांनी त्‍याचे नावे सर्टीफीकेट कम पॉलिसी शेडयुल दिनांक-29.02.2016 रोजी दिले होते. परंतु त्‍यानंतर दिनांक-09 मार्च, 2016 रोजी तक्रारकर्त्‍याचे वाहनास अपघात झाला आणि त्‍यामध्‍ये वाहनाची संपूर्ण बॉडी क्षतीग्रस्‍त झाली त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने क्षतीग्रस्‍त वाहन विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचेकडे दुरुस्‍ती करीता आणले व त्‍यावेळी त्‍याने वि.प.क्रं 3 ला वाहनाची कडे दुरुस्‍तीसाठी आणले व त्‍यावेळी विमा पॉलिसी सुध्‍दा दाखविली. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे एक कर्मचारी फहीम हैदर याने दिनांक-10.03.2016 रोजी जॉब कॉर्ड बनविले आणि नमुद केले की, एकूण दुरुस्‍तीचे खर्चापैकी 50% खर्चाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला सहन करावयाची आहे व त्‍यास तक्रारकर्त्‍याने मान्‍यता दिली. दिनांक-17.03.2016 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे कर्मचारी फहीम हैदर याने तक्रारकर्त्‍याला ई मेल पाठवून त्‍याव्‍दारे रुपये-15,259/- एवढी रक्‍कम दुरुसतीपोटी  भरण्‍यास सुचित केले. परंतु त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे अन्‍य कर्मचारी छत्रपाल याने दिनांक-29.03.2016 रोजी आणखी एक ईमेल तक्रारकर्त्‍याला पाठविला, सदर ईमेल मध्‍ये तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला जो धनादेश जारी केला होता तो वटविल्‍या गेला नाही व त्‍याचे कारण “Not arranged for” असे नमुद केले, तो ईमेल वाचून त्‍याला धक्‍का बसला. सदर चेक बाऊन्‍स मेमो वरुन स्‍पष्‍टपणे असे दिसून येत होते की, विरुध्‍दपक्षाचे बँकेनी तक्रारकर्त्‍याने जारी केलेला धनादेश वटण्‍यासाठी त्‍याचे खाते असलेल्‍या बँकेत प्रत्‍यक्षात पाठविलाच नाही. त्‍याचे बँक खाते हे भंडारा अर्बन को-ऑप बँक मर्यादित तुमसर असताना त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी जारी केलेला धनादेश हा वटविण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष यांनी  भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मर्यादित भंडारा शाखा तुमसर या बँकेकडे चुकीने पाठविला आणि चुकीच्‍या बँकेत धनादेश वटविण्‍यासाठी पाठविल्‍याने त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी विरुध्‍दपक्ष क्रं 2 चे मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे नावे जारी केलेला धनादेश वटविल्‍या गेला नाही.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षांचेच चुकीमुळे वाहनाचे विम्‍याचे नुतनीकरणासाठी जारी केलेला धनादेश चुकीचे बँकेत वटविण्‍यासाठी पाठविला गेला यामध्‍ये त्‍याची काहीही चुक नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला तक्रारकर्त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी रद्द करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 3 ला सुध्‍दा वाहनाचे दुरुस्‍ती खर्चाची पूर्ण रक्‍कम तक्रारकर्त्‍याला मागण्‍याचा अधिकार नाही. विरुध्‍दपक्षांचेच चुकीमुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन आज पर्यंत दुरुस्‍त झालेले नाही. तक्रारकर्त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी रद्द झाल्‍या बाबत केलेल्‍या सततच्‍या ईमेल संदेशामुळे त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि त्‍यासाठी विरुध्‍दपक्ष हेच जबाबदार आहेत, त्‍यामुळे त्‍याने विरुध्‍दपक्षांना दिनांक-16.04.2016 रोजी कायदेशीर नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविली परंतु विरुध्‍दपक्षांनी नोटीसचे उत्‍तर दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नसल्‍याने त्‍याने शेवटी ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

(01)   विरुध्‍दपक्षांनी त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषीत करण्‍यात यावे.

(02)   तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- एवढी रक्‍कम व्‍याजासह विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)  वाहनाचे दुरुस्‍तीपोटी आलेला खर्च रुपये-35,303/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(04)  विरुध्‍दपक्षांचे झालेल्‍या चुकीमुळे तक्रारकर्त्‍याला प्रतीदिवस रुपये-2000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(05)   विरुध्‍दपक्षांना नोटीस खर्चा पोटी रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- अशा रकमा तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.(06)   या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर मंचा समक्ष पान क्रं 34 ते 38 वर दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील वर्णनातीत वाहनाची मालकी असल्‍याची बाब मान्‍य केली परंतु तो विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा नियमित ग्राहक असल्‍याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे प्रिमियमची रक्‍कम न भरल्‍याने त्‍याची विमा पॉलिसी रद्द करण्‍यात आल्‍याने तो विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा ग्राहक होत नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मालकीच्‍या वाहनाचे विमा पॉलिसीचे नुतनीकरण विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे मार्फतीने करण्‍यासाठी धनादेश क्रं 015920 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्‍ह बँक तुमसरचा जारी केला होता आणि त्‍या अनुषंगाने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वाहनाचे विम्‍यापोटी कव्‍हरनोट  धनादेश वटण्‍याचे आधीन राहून जारी केली केली होती. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी जारी केलेला धनादेश त्‍यांचे हॉंगकॉंग अॅन्‍ड शांघाई बँकेत वटण्‍यासाठी जमा केला परंतु सदर धनादेश बँकेनी प्रिमियमची रक्‍कम मिळाली नसल्‍याचे कारणावरुन परत केला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी ही आपोआप रद्द झाली. तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विम्‍याचे नुतनीकरणासाठी धनादेश जारी केल्‍याची बाब मान्‍य केली परंतु दिनांक-09.03.2016 रोजी त्‍याचे वाहनाचा अपघात झाल्‍याची बाब माहिती अभावी नाकबुल केली व असे नमुद केले की त्‍याने अपघाता संबधी पोलीस दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत तसेच वाहनाची बॉडी क्षतीग्रस्‍त झाल्‍याची बाब सुध्‍दा नाकबुल केली. विरुध्‍दपक्ष क्रं 3 संबधात केलेली विधाने माहिती अभावाने नाकबुल केलीत. तक्रारकतर्याने जारी केलेला धनादेश हा “Not arranged” या कारणामुळे वटविल्‍या गेला नाही ही बाब मान्‍य केली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी जारी केलेला धनादेश त्‍यांचे बँकेत जमा केला परंतु बँकेने सदर धनादेश कोणत्‍या बँकेत वटविण्‍यासाठी पाठविला हे पाहण्‍याची त्‍यांची जबाबदारी येत नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ची बँक असलेल्‍या हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित या बँकेने केलेल्‍या चुकी बाबत सदर बँकेला नोटीस पाठविला नाही. धनादेश बँकेत जमा केल्‍या नंतर तो वटविल्‍या गेला नसल्‍याने विमा पॉलिसी ही आपोआप रद्द झाली. तक्रारकर्त्‍याची पाहण्‍याची जबाबदारी होती की, त्‍याने वाहनाचे विम्‍याचे नुतनीकरणापोटी दिलेला धनादेश वटविल्‍या गेला किंवा कसे. तक्रारकर्त्‍याने दिनांक-29.02.2016 ते दिनांक-29.03.2016 पर्यंत पॉलिसीचे पेमेंट झाल्‍या बाबत कोणताही दस्‍तऐवज दाखल केला नाही वा सदर कालावधीचा त्‍याचे बँक खात्‍याचा उतारा दाखल केलेला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची यामध्‍ये कोणतीही चुक नाही व त्‍यासाठी त्‍यांची कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी त्‍यांचे बँकेत तक्रारकर्त्‍याने पॉलिसीचे नुतनीकरणासाठी दिलेला धनादेश जमा केला होता व बँकेच्‍या चुकीमुळे तो धनादेश वटल्‍या गेला नाही परंतु तक्रारकर्त्‍याने सदर बँकेला या तक्रारीत प्रतिपक्ष केलेले नाही, त्‍यामुळे योग्‍य प्रतिपक्षाचे अभावी सदर तक्रार ही बेकायदेशीर ठरते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विरुध्‍द केलेली अन्‍य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत तसेच त्‍याने केलेल्‍या मागण्‍या नाकबुल केल्‍यात. आपल्‍या विशेष कथनात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकतर्याने पॉलिसीचे नुतनीकरणासाठी जारी केलेला धनादेश क्रं 015920 त्‍यांचे हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित दिल्‍ली येथे वटविण्‍यासाठी जमा केला परंतु धनादेशाची रककम त्‍यांना मिळाली नाही. सदर विमा पॉलिसी ही त्‍यांनी धनादेश वटण्‍याचे आधिन राहून जारी केली होती. हॉंगकॉंग बँकेनी सदर धनादेश वटण्‍यासाठी चुकीच्‍या बँकेत पाठविला यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कोणतीही जबाबदारी येत नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने तक्रार ही हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित यांचे विरुध्‍द टाकावयास हवी होती, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विरुध्‍द तक्रार करण्‍याचे कोणतेही प्रयोजन नाही. यामध्‍ये जो काही निषकाळजीपणा झालेला आहे तो हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँकेच्‍या चुकीमुळे झालेला आहे, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच तक्रारीत नमुद केलेले आहे की, त्‍याने जारी केलेला धनादेश हा चुकीच्‍या बँकेत वटविण्‍यासाठी पाठविल्‍या  गेला त्‍यामुळे यामध्‍ये जी काही जबाबदारी येते ती हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँकेची येते. सबब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विरुध्‍द केलेली तक्रार खारीज करण्‍याची विनंती करण्‍यात आली.

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 दि मरुती इन्‍शुरन्‍स ब्रोकींग प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे नाव आणि दिल्‍ली पत्‍त्‍यावर मंचाचे मार्फतीने रजि. पोस्‍टाने पाठविलेली नोटीस त्‍यांना 20 ऑगस्‍ट 2018 रोजी मिळाल्‍या बाबत रजि.पोस्‍टाची पोच पान क्रं 48 वर अभिलेखावर दाखल आहे, परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित न झाल्‍याने त्‍याचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने प्रकरणात पारीत केला.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तर्फे वकील श्री डी.ए.नखाते यांनी प्रकरणात दिनांक-02/01/2017 रोजी मेमो ऑफ एपीयरन्‍स दाखल केला तसेच त्‍याच दिवशी उत्‍तर दाखल करण्‍यासाठी मुदतीचा अर्ज दाखल केला परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांना योग्‍य ती संधी देऊनही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार बिनालेखी जबाबा शिवाय चालविण्‍याचा आदेश मंचाने दिनांक-26.06.2018 रोजी पारीत केला.

       त्‍यानंतर  तक्रार अंतिम आदेशासाठी नेमलेली असताना विरुध्‍दपक्ष क्रं 3 तर्फे लेखी युक्‍तीवाद दिनांक-03.05.2019 रोजी दाखल करण्‍यात आला.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे लेखी युक्‍तीवादा प्रमाणे त्‍याचा वाहनाचे विमा पॉलिसीशी कोणताही संबध नाही, वाहनाची विमा पॉलिसी ही विरुध्‍दपक्ष क्रं 2 चे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून काढण्‍यात आली होती.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 ने वाहन दुरुस्‍ती संदर्भात जॉब कॉर्ड बनविले होते व त्‍यातील 50 टक्‍के रक्‍कम भरण्‍याची तक्रारकर्त्‍याने तयारी दर्शविली होती. विरुध्‍दपक्ष क्रं 3 ने तक्रारकर्त्‍याला पत्र पाठवून त्‍याव्‍दारे वाहनाचा ताबा घेण्‍यास सुचित केले होते व न घेत्‍ल्‍यास  प्रतीदिवस रुपये-200/- शुल्‍क भरावे लागतील असे सुध्‍दा सुचित केले होते. तक्रारकर्त्‍याने वाहन दुरुस्‍तीसाठी त्‍यांचेकडे आणले होते व त्‍यावेळी वाहनाचे विम्‍याचे प्रमाणपत्र सुध्‍दा दाखविले होते. वाहनाचे विमा पॉलिसी संबधात विरुध्‍दपक्ष क्रं 3 चा कोणताही संबध येत नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 3 ने तक्रारकर्त्‍याचे वाहनाची दुरुस्‍ती केली व सदर वाहन दुरुस्‍त करुन दिनांक-20/04/2016 रोजी ताबा देण्‍यास तयार ठेवले आणि त्‍याचा संपूर्ण खर्च देण्‍याची जबाबदारी ही तक्रारकर्त्‍याची आहे परंतु तक्रारकर्त्‍याला वारंवार सुचित करुनही त्‍याने वाहन आपले ताब्‍यात घेतले नव्‍हते त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला दिनांक-27.04.2016 रोजी पत्र सुध्‍दा पाठविले व ताबा घेण्‍यास सुचित केले होते आणि सरतेशेवटी तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन दिनांक-05/05/2016 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे सर्व्‍हीस स्‍टेशन मधून नेले त्‍या बाबत तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्रं 13 दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःहून दिनांक-05/05/2016 पर्यंत वाहनाचा ताबा घेतला नाही, जेंव्‍हा की वाहन हे दिनांक-20.04.2016 रोजी दुरुसत होऊन तयार होते. विरुध्‍दपक्ष क्रं 3 ने तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही वा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 3 ने लेखी युक्‍तीवादा मध्‍ये केली.

06.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 12 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 13 प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने सर्टीफीकेट कम पॉलिसी शेडयुल, विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे कर्मचा-यां तर्फे पाठविण्‍यात आलेले ई मेल, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पाठविलेले पत्र, विरुध्‍दपक्ष क्रं 3 कडून प्राप्‍त चेक व  रिर्टन मेमो, तक्रारकतर्याने विरुध्‍दपक्षांना पाठविलेली नोटीस, पोस्‍टाच्‍या पावत्‍या, पोच, विरुध्‍दपक्ष क्रं 3 ने पाठविलेले पत्र, जॉब कॉर्ड कॅश मेमो अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 49 ते 51 वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले.

07.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तर व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे श्री गजानन शंकरराव कुंभरे विभागीय प्रबंधक यांनी शपथपत्र पान क्रं 52 ते 53 वर दाखल केले,  अन्‍य दस्‍तऐवज दाखल केले नाहीत. विरुध्‍दपक्ष क्रं 3 तर्फे लेखी युक्‍तीवाद दाखल करण्‍यात आला तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल करण्‍यात आलेत.

08.    तक्रार मौखीक युक्‍तीवादासाठी नेमलेली असताना तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वकील गैरहजर होते. विरुध्‍दपक्ष क्रं 3 तर्फे वकील श्रीमती भुरे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

09.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र, विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तर व शपथपत्र तसेच  तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-  

                                              :: निष्‍कर्ष ::

10.   तक्रारकर्त्‍याचे मालकीचे मारुती ओमनी हे वाहन असून त्‍याचा नोंदणी क्रं-MH-36-H-2596 असा असून ENGINE CHASIS NO.-4495037-1369104 असा आहे या बद्दल उभय पक्षांमध्‍ये कोणताही विवाद नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे जारी सर्टीफीकेट कम पॉलिसी शेडयुल प्रमाणे वाहनाचा विमा हा दिनांक-07 मार्च, 2016 ते दिनांक-06 मार्च, 2017 पर्यंतचे मध्‍यरात्री पर्यंत काढलेला होता. सदर विमा पॉलिसी ही Issue of Policy is subject to the realization of cheque चे आधीन राहून जारी करण्‍यात आली होती.  तक्रारकर्त्‍याने  विमा पॉलिसीचे प्रिमीयम पोटी त्‍याचे खाते असलेल्‍या भंडारा अर्बन को ऑपरेटीव्‍ह बॅक, शाखा तुमसरचा धनादेश  क्रं 889, विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीचे नावे दिनांक-26.02.2016 रोजी रुपये-3817/- चा जारी केला होता व विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदरचा धनादेश त्‍यांचे खाते असलेल्‍या दि हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक लिमिटेड यांचे खात्‍यात वटविण्‍यासाठी जमा केला होता परंतु पुढे विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे मार्फतीने सदर धनादेश न वटविल्‍या गेल्‍याने तो तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यात आला व त्‍यामध्‍ये धनादेश न वटण्‍याचे कारण हे “Not arrange for”  असे नमुद करण्‍यात आल्‍याचे  चेक रिर्टन मेमो वरुन दिसून येते.

11.   या संदर्भात तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे खाते असलेल्‍या हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित या बँकेने  तक्रारकर्त्‍याने जारी केलेला धनादेश वटण्‍यासाठी त्‍याचे खाते असलेल्‍या बँकेत प्रत्‍यक्षात पाठविलाच नाही. त्‍याचे बँक खाते हे भंडारा अर्बन को-ऑप बँक मर्यादित तुमसर येथे असताना त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी जारी केलेला धनादेश हा वटविण्‍यासाठी भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मर्यादित भंडारा- शाखा -तुमसर या बँकेकडे चुकीने पाठविला आणि चुकीच्‍या बँकेत धनादेश वटविण्‍यासाठी पाठविल्‍याने त्‍याने वाहनाचे विम्‍यापोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे नावे जारी केलेला धनादेश वटविल्‍या गेला नाही, यामध्‍ये त्‍याची कोणतीही चुक नाही.

12.   या उलट, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मालकीच्‍या वाहनाचे विमा पॉलिसीचे नुतनीकरण करण्‍यासाठी धनादेश क्रं 015920 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्‍ह बँक तुमसरचा जारी केला होता आणि त्‍या अनुषंगाने वाहनाचे विम्‍यापोटी कव्‍हरनोट  धनादेश वटण्‍याचे आधीन राहून जारी केली होती. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदरचा धनादेश त्‍यांचे हॉंगकॉंग अॅन्‍ड शांघाई बँकेत वटण्‍यासाठी जमा केला परंतु सदरचा धनादेश बँकेनी प्रिमियमची रक्‍कम मिळाली नसल्‍याचे कारणावरुन परत केला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी ही आपोआप रद्द झाली. तक्रारकर्त्‍याने जारी केलेला धनादेश हा “Not arranged” या कारणामुळे वटविल्‍या गेला नाही ही बाब मान्‍य केली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वाहनाचे विम्‍यापोटी जारी केलेला धनादेश त्‍यांचे बँकेत जमा केला परंतु बँकेने सदर धनादेश कोणत्‍या बँकेत वटविण्‍यासाठी पाठविला हे पाहण्‍याची त्‍यांची जबाबदारी येत नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ची बँक असलेल्‍या हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित या बँकेने केलेल्‍या चुकी बाबत नोटीस पाठविला नाही. तक्रारकर्त्‍याची पाहण्‍याची जबाबदारी होती की, त्‍याने वाहनाचे विम्‍याचे नुतनीकरणापोटी दिलेला धनादेश वटविल्‍या गेला किंवा कसे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची यामध्‍ये कोणतीही चुक नाही व त्‍यासाठी त्‍यांची कोणतीही जबाबदारी येत नाही व बँकेच्‍या चुकीमुळे तो धनादेश वटल्‍या गेला नाही परंतु तक्रारकर्त्‍याने सदर बँकेला या तक्रारीत प्रतिपक्ष केलेले नाही, त्‍यामुळे योग्‍य प्रतिपक्षाचे अभावी सदर तक्रार ही बेकायदेशीर ठरत असल्‍याने खारीज करण्‍याची विनंती केली.

13.    यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे मुख्‍यत्‍वे असा बचाव आहे की, त्‍यांनी वाहनाचे विम्‍याचा धनादेश त्‍यांचे खाते असलेल्‍या हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित येथे वटविण्‍यासाठी जमा केला होता परंतु बँकेने तो धनादेश वटविण्‍यासाठी चुकीच्‍या बँकेत पाठविला व त्‍यामुळे जी काही जबाबदारी येते ती बँकेची येते व धनादेश वटला गेला किंवा कसे हे पाहण्‍याची जबाबदारी देखील तक्रारकर्त्‍याची येते. परंतु तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विम्‍याचे नुतनीकरणापोटी धनादेश विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे जमा केला होता व त्‍याचे खात्‍यात अपर्याप्‍त निधी नसल्‍याचे कारणावरुन तो धनादेश वटविल्‍या गेला नाही असे कारण या प्रकरणात घडलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असलेल्‍या बँकेनी धनादेश वटविण्‍यासाठी चुक केली त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचा कोणताही संबध येत नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिलेला धनादेश वटविल्‍या गेला किंवा कसे हे पाहण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची आहे.  त्‍यामुळे या सर्व व्‍यवहारात जी काही जबाबदारी येते ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचीच येते. तक्रारकर्त्‍याचा धनादेश वटविल्‍या गेला नाही यासाठी जे काही कारण घडले त्‍यासाठी त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी रद्द करण्‍याचा कोणताही अधिकार विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला पोहचत नाही कारण या सर्व प्रकारात तक्रारकर्त्‍याची काहीही चुक दिसून येत नाही. या सर्व प्रकरणाचे अवलोकन केले असता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहनाचे विमा पॉलिसीचे नुतनीकरणापोटी दिलेला धनादेश विरुध्‍दपक्ष क्रं 1 बँकेच्‍या  खात्‍यात जमा केल्‍या नंतर सदर बँकेने तो धनादेश चुकीच्‍या बँकेत वटविण्‍यासाठी पाठविल्‍याने चुक घडलेली आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची विमा पॉलिसी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने रद्द केलेली आहे, यावरुन जी काही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍याला मिळालेली आहे ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळाल्‍याची बाब सिध्‍द होते. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने तक्रारकर्त्‍यास कोणत्‍या प्रकारे दोषपूर्ण सेवा दिली याचा तक्रारीत उल्‍लेख नाही तसेच घडलेली वस्‍तुस्थिती तपासली असता विरुध्‍दपक्ष क्रं 2 चा या व्‍यवहारात कोणताही दोष असल्‍याचे दिसून येत नसल्‍याने तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 2 विरुध्‍द खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

14.  तक्रारकर्त्‍याचे वाहनास विमा पॉलिसीचे वैध कालावधीत दिनांक-09 मार्च, 2016 रोजी अपघात झाला त्‍याने सदर वाहन विरुध्‍दपक्ष क्रं 3 ऑटोमोटीव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरस यांचे कडून दुरुस्‍त करुन घेतले व त्‍यापोटी रुपये-35,503/- अदा केल्‍याची बाब विरुध्‍दपक्ष क्रं 3 तर्फे जारी केलेल्‍या देयका वरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याचे वाहनाचे विमा पॉलिसीचे नुतनीकरणासाठी दिलेला धनादेश वटला किंवा कसे या व्‍यवहारा बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 3 ची कोणतीही जबाबदारी येत नाही, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे सांगण्‍या नुसार वाहन दुरुस्‍त करुन तयार ठेवून त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 ची या प्रकरणात कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 15.   तक्रारकर्त्‍याची कोणतीही चुक नसताना व त्‍याचे खात्‍यात पर्याप्‍त निधी असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे खाते असलेल्‍या बँके तर्फे जर धनादेश वटल्‍या गेला नाही व त्‍यामुळे जर तक्रारकर्त्‍याची विमा पॉलिसी रद्द होत असेल तर यामध्‍ये जी काही जबाबदारी येते ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचीच येते आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आपली जबाबदारी तक्रारकर्त्‍याची पॉलिसी रद्द करुन टाळू शकत नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला जर असे वाटत असेल की त्‍यांचे खाते असलेल्‍या हॉंगकॉंग अॅन्‍ड शंघाई बँक मर्यादित बँकेच्‍या चुकीमुळे तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे नुतनीकरणापोटी जारी केलेला धनादेश वटल्‍या गेला नाही तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी सदर बँके विरुध्‍द योग्‍य ती कायदेशीर कार्यवाही (Legal Action) करु शकते परंतु त्‍या संबधात तक्रारकर्त्‍याला जबाबदार धरु शकत नाही.

16.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याने त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच रजि. नोटीस द्दावी लागली आणि शेवटी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करावी लागली. उपरोक्‍त नमुद सर्व विवेचना वरुन तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहनाचे विमा पॉलिसीचे नुतनीकरणापोटी जारी केलेला धनादेश हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे बँक खाते असलेल्‍या बँकेच्‍या चुकीमुळे वटविल्‍या गेला नसल्‍याने तक्रारकर्त्‍याची विमा पॉलिसी अपघाताचे वेळी अस्तित्‍वात होती असे विचारात घेऊन तक्रारकर्त्‍यास वाहनाचे दुरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाची रक्‍कम  रुपये-35,503/- आणि सदर रकमेवर दुरुस्‍तीची रक्‍कम अदा केल्‍याचा दिनांक-05.05.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6%  दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे.तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विमा पॉलिसीपोटी जारी केलेला धनादेशाची रक्‍कम  रुपये-3817/- अद्दापही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला मिळालेली नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर विमा प्रिमियमची रक्‍कम रुपये-3817/- (अक्षरी रुपये तीन हजार आठशे सतरा फक्‍त) तक्रारकर्त्‍याला नुकसान भरपाईची रक्‍कम देताना त्‍यामधून समायोजित करुन उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी असे आदेशित करणे योग्‍य व वाजवी राहिल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रार व नोटीस खर्च म्‍हणून रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

17.  उपरोक्‍त सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                 :: आदेश ::

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी मर्यादत न्‍यु दिल्‍ली यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  1. विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी अपघाताचे दिवशी तक्रारकर्त्‍याचे वाहनाची विमा पॉलिसी अस्तित्‍वात असल्‍याचे विचारात घेऊन त्‍याचे विमाकृत वाहनाचे दुरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाची रक्‍कम रुपये-35,503/- (अक्षरी रुपये पस्‍तीस हजार पाचशे तीन फक्‍त) आणि सदर रकमेवर  दिनांक-05.05.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.- 6% दराने व्‍याज सदर आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसाच्‍या आत तक्रारकर्त्‍याला अदा करावे.
  1. तक्रारकर्त्‍याने वाहनाचे विमा पॉलिसीपोटी जारी केलेला धनादेशाची रक्‍कम  रुपये-3817/- अद्दापही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला मिळालेली नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर विमा प्रिमियमची रक्‍कम रुपये-3817/- (अक्षरी रुपये तीन हजार आठशे सतरा फक्‍त) तक्रारकर्त्‍याला नुकसान भरपाईची रक्‍कम देताना त्‍यामधून समायोजित करुन उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.  
  1. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच  हजार फक्‍त) द्यावेत.
  1. विरुध्‍दपक्ष क्रं 2 दि मरुती इन्‍शुरन्‍स ब्रोकींग प्रायव्‍हेट लिमिटेड न्‍यु दिल्‍ली यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  1. विरुध्‍दपक्ष क्रं 3 दि ऑटोमोटीव्‍ह मॅन्‍युफॅक्‍चरर्स प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  क्रं-(1) विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावी.
  1. निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.
  1. तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.