Maharashtra

Sangli

CC/10/551

Sau.Surekha Suresh Gaikwad - Complainant(s)

Versus

The New India Insurance Company Ltd.,etc.2 - Opp.Party(s)

13 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/551
 
1. Sau.Surekha Suresh Gaikwad
941, Highschool Road, Wanleswadi, Sangli, Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Company Ltd.,etc.2
Siddhivinayak Complex, Nr.Tata Petrol Pump, Sangli Miraj Road, Sangli, Tal.Miraj, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

 
                                                            नि. २५
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या श्रीमती सुरेखा बिचकर
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ५५१/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    ३०/१०/२०१०
तक्रार दाखल तारीख   ०२/११/२०१०
निकाल तारीख         १३/०३/२०१२
----------------------------------------------------------------
 
 
सौ सुरेखा सुरेश गायकवाड
वय ३४ वर्षे, धंदा टॅंकर मालक व वाहतूक,
रा.९४१, हायस्‍कूल रोड, वानलेसवाडी,
सांगली ता.मिरज जि.सांगली                                                     ..... तक्रारदारú
          
 विरुध्‍दù
 
१. दी न्‍यू इंडिया श्‍युरन्‍स कं.लि.
    श्री सिध्‍दी विनायक कॉम्‍प्‍लेक्‍स, टाटा पेट्रोल पंपाजवळ,
    सांगली-मिरज रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली
    पिन ४१६ ४१६
 
२. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.
    बल्‍क पेट्रोलियम डेपो, सांगली-मिरज रोड,
    चंदनवाडी, मिरज ता.मिरज जि. सांगली
    पिन ४१६ ४१६                                 .....जाबदारúö
 
                               
                                          तक्रारदारतर्फेò     : +ìb÷.श्री.एन.एन.वाळवेकर
   जाबदार क्र.१ तर्फे  : +ìb÷. श्री एस.एस.पाटील
      जाबदार क्र.२ तर्फे  : +ìb÷. श्री एम.बी.कुलकर्णी
 
 
 
नि का ल प त्र
 
द्वारा- अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
.     तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्‍या वाहनाच्‍या अपघात विमा दाव्‍याबाबत दाखल केला आहे.
 
२.     सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
 
तक्रारदार यांच्‍या टॅंकर क्र.एमएच १०/झेड ४४४९ या वाहनाचा जाबदार यांचेकडे टॅंकरमधील मालासह विमा उतरविला होता. सदर वाहनाचा विम्‍याचा कालावधी हा दि.७/६/०९ ते ६/६/१० असा होता. सदरचा टॅंकर हा जाबदार क्र.२ यांचेकडे पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी तीन वर्षाच्‍या कॉन्‍ट्रॅक्‍ट पध्‍दतीने लावला होता. दि.१२/०१/२०१० रोजी तक्रारदार यांनी सदर टॅंकरमध्‍ये जाबदार क्र.२ यांचेकडील रक्‍कम रु.३,५४,९९०/- किंमतीचे १२००० लिटर इतके डिझेल चंदनवाडी, मिरज येथे भरुन वेंगुर्ला मच्छिमार सोसायटीस पोहोच करण्‍यासाठी भरुन घेतले. दि.१३/१/२०१० रोजी तक्रारदार यांचे ड्रायव्‍हर सदरचा टॅंकर घेवून कोल्‍हापूर गगनबावडा मार्गे वेंगुर्लाकडे जात असताना दु.१.०० च्‍या दरम्‍यान वैभववाडी येडगाव येथील उताराच्‍या वळणावर सदरचा टॅंकर आला असता सदर टॅंकरचा ब्रेक फेल होवून टॅंकर पलटी झाला व सदर अपघातामध्‍ये टॅंकरचे बरेच नुकसान झाले. टॅंकरमध्‍ये असणारे १२००० लिटर इतके डिझेल टॅंकरच्‍या चारही झाकणामधून वाहून गेले. सदर अपघाताबाबत वैभववाडी पोलीस स्‍टेशन येथे गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. सदर अपघातातील टॅंकरचा पंचनामा वैभववाडी पोलीसांनी केलेला आहे. तक्रारदार यांचे टॅंकरमध्‍ये असणा-या १२००० लिटर डिझेलची किंमत ही रु.३,९८,९९०/- इतकी होती. सदरची रक्‍कम वेंगुर्ला मच्छिमार सोसायटीने जाबदार क्र.२ यांना अडव्‍हान्‍समध्‍ये अदा केली होती. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांचेकडे रक्‍कम रु.३,५४,९९०/- ची वेळोवेळी मागणी केली व शेवटी पाच दिवसांच्‍या आत रक्‍कम भरणा केली नाही तर सेक्‍युरिटी डिपॉझिटमधून सदर रक्‍कम वळती करुन घेवू व टॅंकर डिझेल वाहतुकीस बंद करु अशी धमकीवजा समज दिली. तक्रारदार यांना सदरचा टॅंकर पुन्‍हा इंधन वाहतुकीसाठी लावणेचा असलेने तक्रारदारांनी नाईलाजास्‍तव जाबदार क्र.२ यांना दि.२७/१/२०१२ रोजीचा रु. रु.३,५४,९९०/- चा फेडरल बॅंक मिरज शाखेचा चेक दिला व त्‍या चेकप्रमाणे जाबदार यांना सदरची रक्‍कम मिळाली आहे. वस्‍तुत सदरची रक्‍कम जाबदार क्र.१ यांनी विमा पॉलिसीनुसार देणे बंधनकारक होते. तक्रारदार यांनी दि.२७/१/२०१० रोजी जाबदार क्र.१ यांच्‍याकडून १२००० लिटर डिझेलची किंमत रु.३,५४,९९०/- इतकी नुकसान भरपाई मिळणेची विनंती केली असता दि.४/२/२०१० रोजीच्‍या पत्राने सदरची बाब कायदेशीर कारवाईशी निगडीत असलेने आम्‍ही नुकसान भरपाई देवू शकत नाही असे चुकीचे व बेकायदेशीर उत्‍तर दिले. जाबदार क्र.१ यांची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी असताना जाबदार यांनी तक्रारदारांचा क्‍लेम चुकीच्‍या पध्‍दतीने नाकारला आहे. तक्रारदार यांना जाबदार क्र.२ यांची रक्‍कम देणेसाठी मित्रांच्‍याकडून व्‍याजाने रक्‍कम घ्‍यावी लागली. तसेच प्रस्‍तुत अपघातामध्‍ये टॅंकरचे बरेचसे नुकसान झालेने सदरचा टॅंकर आजअखेर बंद अवस्‍थेत आहे. सदर टॅंकरच्‍या दुरुस्‍तीसाठीही रु.३ ते ४ लाखची आवश्‍यकता आहे. जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांना विमा रक्‍कम अदा केली असती तर तक्रारदार यांना टॅंकरचे दुरुस्‍तीसाठी कोणतीही अडचण आली नसती. जाबदार यांनी दिलेल्‍या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज डिझेलची रक्‍कम रु.३,५४,९९०/- व्‍याजासह मिळावी या प्रमुख मागणीसाठी तसेच इतर तदानु‍षंगिक मागण्‍यांसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ८ कागद दाखल केले आहेत. 
 
३.     जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.११ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे.  जाबदार यांनी विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये टॅंकरमध्‍ये १२००० लिटर डिझेल भरले होते व सदर टॅंकरचा अपघात झाला व सदर अपघातामध्‍ये संपूर्ण डिझेल वाहून गेले ही बाब अमान्‍य केली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारअर्जामध्‍ये तक्रारीमध्‍ये डिझेलच्‍या किंमतीमध्‍ये तफावत असल्‍याचे दिसून येते. तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांना डिझेलची किंमत रु.३,५४,९९०/- दिली ही बाबही जाबदार यांनी अमान्‍य केली आहे. पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार विमा कंपनीच्‍या पूर्वपरवानगीशिवाय तक्रारदार यांना झालेल्‍या मालाच्‍या नुकसानीबाबत रक्‍कम अदा करण्‍याचा कोणताही अधिकार नव्‍हता व नाही. पॉलिसीतील अटीमध्‍ये ओ.डी.क्‍लेम सेटल झाल्‍याशिवाय वाहनातील नुकसानीबाबत विमादाव्‍याबाबत निर्णय घेता येणार नाही. विमा करारानुसार या मंचास प्रस्‍तुत तक्रारअर्ज चालविण्‍यास अधिकारक्षेत्र नाही. तक्रारदार यांचा विमादावा नाकारल्‍याची बाब जाबदार यांनी अमान्‍य केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ नि.१२ ला प्रतिज्ञापत्र व नि.१३ च्‍या यादीने पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.
 
४.     जाबदार क्र.२ यांनी नि.१४ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांचा टॅंकर जाबदार यांचेकडील पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी कराराने लावणेत आला होता ही बाब जाबदार यांनी मान्‍य केली आहे. सदर वाहनास दि.१३/१/२०१० रोजी दु.१.३० चे दरम्‍यान अपघात झाला आहे व त्‍यामध्‍ये डिझेलचे पूर्ण नुकसान झाले आहे. जाबदार व तक्रारदार यांचेतील करारानुसार सदर झालेली डिझेलची नुकसान भरपाई देण्‍यास तक्रारदार हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्‍कम रु.३,५४,९९०/- अदा केली आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ नि.१५ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
 
५.     तक्रारदार यांनी नि.१९ च्‍या यादीने कागदपत्रे दाखल केली आहेत तसेच नि.२० ला सरतपासाचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.२२ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार व तक्रारदारतर्फे काही निवाडे दाखल करण्‍यात आले आहेत. तक्रारदार व जाबदार क्र.१ यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
 
६.     तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे व दोन्‍ही बाजूंचा युक्तिवाद यावरुन तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? हे ठरविणे आवश्‍यक आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे त्‍यांचा टॅंकर डिझेल वाहतुकीसाठी भाडयाने लावला होता त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.२ यांचे निश्चितच ग्राहक होत नाहीत. तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांच्‍याकडून त्‍यांच्‍या टॅंकरसाठी विमा पॉलिसी घेतली आहे म्‍हणजेच तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांच्‍याकडून विमा सेवा घेतली आहे. सदरची विमासेवा ही व्‍यापारी कारणासाठी घेतली आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. कोणतीही विमा सेवा घेताना वाहनाचे नुकसान झाल्‍यास त्‍याची नुकसान भरपाई मिळावी व विमा सुरक्षा मिळावी हा एकमेव हेतू विमा पॉलिसी घेण्‍याच्‍या मागे प्रत्‍येक विमाधारकाचा असतो त्‍यामुळे सदरची सेवा ही जरी एखाद्या व्‍यावसायिक वाहनासाठी अथवा कारणासाठी घेतली असेल तरी विमासेवा ही व्‍यापारी कारणासाठी घेतलेचे म्‍हणता येणार नाही. सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी Harsolia Motors Vs. National Insurance Co.Ltd. या निवाडयाचे कामी Hiring of services of the insurance company by taking insurance policy by complainant who are carrying on commercial activities, cannot be held to be a commercial purpose. The policy is taken for reimbursement or for indemnify for the loss which may be suffered due to various perils. There is no question of trading of carrying on commerce in insurance policies by the insured. May be that insurance coverage is taken for commercial activity carried out by the insured. असा निष्‍कर्ष काढला आहे. सदर निष्‍कर्ष विचारात घेता तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे ग्राहक होतात असे या मंचाचे मत आहे.
 
७.     तक्रारदार यांनी त्‍यांचे टॅंकरला दि.१३/१/२०१० रोजी अपघात झाला व सदर अपघातामध्‍ये टॅंकरमधील १२००० लिटर डिझेल वाहून गेले, त्‍याची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारअर्ज दाखल केला आहे व तक्रारअर्जामध्‍ये टॅंकर ८ महिने बंद असल्‍याने दरमहा रु.५०,०००/- चे नुकसान झालेने रु.४,००,०००/- मिळावेत व इतर अन्‍य मागण्‍या केल्‍या आहेत. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्‍ये टॅंकर अद्याप बंद अवस्‍थेत आहे व त्‍याचे दुरुस्‍तीसाठी ३ ते ४ लाख रुपये इतका खर्च येणार आहे असे नमूद करुनही सदर दुरुस्‍तीसाठी खर्चाची मागणी तक्रारअर्जामध्‍ये केली नाही अथवा दुरुस्‍तीसाठी किती खर्च येईल ? याबाबत पुरावा दाखल केला नाही. यावरुन टॅंकर अद्याप नादुरुस्‍त आहे अथवा दुरुस्‍त झाला आहे व त्‍याबाबत विमा दावा सेटल झाला आहे अथवा नाही हा प्रश्‍न अनुत्‍तरीत राहतो. तक्रारदार यांचे प्रमुख मागणी आहे ती टॅंकरमध्‍ये १२००० लिटर डिझेल होते. अपघातामध्‍ये सर्व डिझेल वाहून गेले व सदर डिझेल जाबदार क्र.२ यांचे मालकीचे असलेने जाबदार नं.२ यांनी तक्रारदार यांचेकडे सदर डिझेलच्‍या रकमेची मागणी केली व तक्रारदार यांनी सदर रक्‍कम जाबदार नं.२ यांना अदा केली. सदरची रक्‍कम आपणास मिळावी अशी तक्रारदार यांची प्रमुख मागणी आहे. जाबदार यांनी सदर मागणीबाबत आक्षेप घेताना तक्रारदार यांनी पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार जाबदार यांना अपघाताबाबत तात्‍काळ कळविणे गरजेचे होते व प्रस्‍तुतचा वाद केवळ दिवाणी न्‍यायालयाच्‍या अधिकारक्षेत्रातील आहे असा युक्तिवाद केला. तक्रारदार यांचे टॅंकरला अपघात हा दि.१३/१/२०१० रोजी झाला आहे व त्‍याबाबत तक्रारदार यांनी प्रथमत: जाबदार यांना लेखी दि.२७/१/२०१० रोजी कळविले आहे व जाबदार क्र.२ यांनी मालाचे नुकसानीचा चेकही त्‍याचदिवशी म्‍हणजे दि.२७/१/२०१० रोजीच दिला असलेचे दिसून येते. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना नि.५/३ वरील पत्राने रकमेची मागणी केली आहे. सदर पत्रामध्‍ये Therefore, you are requested to kindly give an amount of Rs.3,54,990/- excluding sales Tax of Rs.81,648/- immediately असे नमूद असताना तक्रारदार यांनी रक्‍कम रु.३,५४,९९०/- चा चेक कसा दिला हाही प्रश्‍न अनुत्‍तरीत राहतो. तक्रारदार यांनी त्‍यांचे टॅंकरमधील रु.१२,०००/- लिटर डिझेल वाहून गेले व त्‍याची किंमत मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेल्‍या पत्रामध्‍ये किती लिटर डिझेल वाहून गेले याबाबत कोणताही उल्‍लेख केला नाही. तक्रारदार यांचे ड्रायव्‍हर यांनी अपघातानंतर लगेचच दि.१३/१/२०१० रोजी वैभववाडी पोलीस स्‍टेशनला फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीमध्‍ये अपघातामध्‍ये टॅंकर डावे अंगावर पलटी झाला व अपघात झाला आणि अपघातात माझे डोके तसेच क्लिनर सागर बोटे यांचे डावे पायाचे घोटयाजवळ किरकोळ मार लागला असून आम्‍ही खाजगी डॉक्‍टरकडून पूर्ण चेकअप करुन घेतले आहे असे नमूद केले आहे. सदर फिर्यादीमध्‍ये डिझेल वाहून गेल्‍याचा उल्‍लेख नाही. तक्रारदार यांनी याकामी नि.५/२ वर पंचनाम्‍याची प्रत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये टॅंकरमधील डिझेल गटारातून वाहत चालले आहे असे नमूद आहे. या फिर्यादीवरुन व पंचनाम्‍यावरुन टॅंकरमधील संपूर्ण डिझेल वाहून गेले हा निष्‍कर्ष काढणे योग्‍य ठरणार नाही व टॅंकर केवळ डाव्‍या बाजूवर पलटी झाला असताना त्‍यामधील संपूर्ण डिझेल वाहून जाईल का ? ही बाबही लक्षात घेणे गरजेचे आहे. या सर्व परिस्थितीवरुन टॅंकरमधील संपूर्ण डिझेलचे नुकसान झाले हे सिध्‍द करण्‍यासाठी अधिक साक्षीपुराव्‍याची व सखोल चौकशीची गरज आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी याबाबत दिवाणी न्‍यायालयात दाद मागणे योग्‍य ठरेल असे या मंचाचे मत आहे. वरील सर्व कारणांवरुन व विवेचनावरुन तक्रारअर्ज काढून टाकणेत येवून निकाली करणे संयुक्तिक ठरेल या निर्णयाप्रत सदरचा मंच आला आहे.
 
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                        आदेश
 
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहेत.
 
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
 
 
सांगली                                             
दिनांकò: १३/०३/२०१२                          
 
          (सुरेखा बिचकर)                              (अनिल य.गोडसे÷)
               सदस्‍या                             अध्‍यक्ष           
       जिल्‍हा मंच, सांगली.                        जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.