Maharashtra

Chandrapur

CC/19/71

Shrimati Bajabai Wadagu Jevurkar - Complainant(s)

Versus

The New India Insurance Company Ltd. Through Divisional Manager Divisional Office no.130800 - Opp.Party(s)

Devendra Hatkar

11 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/71
( Date of Filing : 04 Jun 2019 )
 
1. Shrimati Bajabai Wadagu Jevurkar
R/o Talegaon Tah.Warora Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Company Ltd. Through Divisional Manager Divisional Office no.130800
17-A, Seventh Floor, Kuprej Road, New India Center Mumbai 400001
Mumbai
MAHARASHTRA
2. The New India Insurance Company Ltd. Through Shetriy Manager
M.E.C.L. Complex, Seminary Hills, Nagpur 440018
Nagpur
MAHARASHTRA
3. Taluka Krushi Adhikari
Warora Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 Apr 2023
Final Order / Judgement

:::नि का ल  प ञ   :::

         (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)

                  (पारित दिनांक ११/०४/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारककर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,१९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ती ही वरील नमूद पत्‍त्‍यावर राहत असून तिचा पती श्री वडगु यादव जेवुरकर हे दिनांक २९/१२/२०१२ रोजी अपघातात मरण पावले. तक्रारकर्तीचा पती हा शेतीचा व्‍यवसाय करीत असून त्‍याच्‍या नावाने भुमापन क्रमांक ४१ मौजा तळेगांव, तहसील वरोरा येथे शेती आहे व शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर ते कुटुंब चालवित होते. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना सदर पॉलिसीच्‍या नियमानुसार दावे स्‍वीकारतात व पुढे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे पाठवितात. तक्रारकर्तीच्‍या पतीचा शासनाच्‍या योजनेप्रमाणे रुपये १,००,०००/- चा विमा महाराष्‍ट्र सरकारतर्फे काढला होता. तक्रारकर्ती ही लाभार्थी असल्‍यामुळे तिचा पतीचा मृत्‍यु झाल्‍यावर तिने दिनांक २५/२/२०१३ रोजी रितसर अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे सर्व कागदपञासह विमा दावा सादर केला परंतु आजपर्यंत सदर दाव्‍याबद्दल काहीही विरुध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्तीला कळविले नाही. तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु तो बाजारात पायी जातांना बस स्‍टॅन्‍ड जवळ एका गाडीने धडक दिल्‍याने झाला. तक्रारकर्ती ही अशिक्षीत असल्‍यामुळे तिचा या योजनेबद्दल काहीही माहिती नव्‍हती. तिने जमेल तसे कागदपञांची जुळवाजुळव करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे प्रस्‍ताव दाखल केला होता. सदर योजनेचा उद्देश आहे की शेतक-याचा वारसांना आधार देण्‍याकरिता सदर योजना कार्यान्‍वीत आहे परंतु सदर उद्देशालाच विरुध्‍द पक्ष तडा देत आहे. वारंवार विचारणा करुनही विरुध्‍द पक्ष यांना दावा प्रस्‍तावाबद्दल उत्‍तर तक्रारकर्तीला दिले नाही. त्‍यामुळे दिनांक ६/५/२०१९ रोजी तकक्रारकर्तीने तिच्‍या वकीलामार्फत विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविला परंतु विरुध्‍द पक्ष यांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही. तक्रारकर्तीला सदर विम्‍याची रक्‍कम न मिळाल्‍यामुळे सदर तक्रार आयोगामसमोर दाखल केलेली आहे.
  3. तक्रारकर्तीची तक्रार स्‍वीकृत करुन आयोगातर्फे विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढण्‍यात आली.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तकारीत हजर होऊन तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढीत विशेष कथनात नमूद केले की, तक्रारीतील घटनेचे कारण दिनांक २९/११/२०१२ रोजी जेव्‍हा तक्रारकर्तीचा पती दिनांक २९/११/२०१२ रोजी रस्‍ता अपघातात मरण पावला व तक्रारकर्ती हिने सदर तक्रार जुन २०१९ मध्‍ये दाखल केली. तसेच तक्रारकर्ती हिने काणताही दावा अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ कडे दाख्‍ला केलेला नाही. त्‍यामुळे सदर तक्रार ही मुदतबाह्रय आहे. तसेच तक्रार दाखल करायला आलेला उशीर तक्रारकर्ती हिने योग्‍यरित्‍या कारण दिलेले नाही तसेच तक्रारीसोबत विलंब माफिचा अर्ज जोडलेला नसून कोणत्‍याही कोर्टाला, ट्रीबुनल किंवा आयोगाला योजनेच्‍या अटी व शर्ती बदलविण्‍याचा किंवा दुरुस्‍त  करण्‍याचे अधिकार नाही. तक्रारकर्ती हिने सदर क्‍लेम अर्ज ९० दिवसाच्‍या नंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे दाखल केला असून तक्रारीत असे कोणतेही दस्‍त  दाखल नाही की यावरुन दिसून येत आहे की, तक्रारकर्ती हिने दावा अर्ज मुदतीत दाखल केलेला आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे शासनाने राबविलेल्‍या योजनेची अमंलबजावणी  अटी व शर्ती नुसार करतात व त्‍याचे प्रत्‍येक कृती ही पारदर्शक असे काम करतात. विरुध्‍द पक्ष ही धर्मादाय संस्‍था  नसून त्‍याच्‍याकडे आलेली रक्‍कम ही ठोस पुरावा व कागदपञे असल्‍याशिवाय देऊ शकत नाही. तक्रारकर्ती ही सदर तक्रार घटनेला कारण घडल्‍यावर सात वर्षानंतर दाखल केली असल्‍यामुळे मुदतबाह्रय आहे तसेच तक्रारीतील दाखल दस्‍तावेज क्रमांक ३५ व २५ नोटीस यावर अधिवक्‍ता श्री हटकर यांनी स्‍वाक्षरी नसलेला नोटीस सदर तक्रार मुदतीत आहे असे दाखविणारा आहे. परंतु सदर नोटीस पाठवून सदर तक्रार मुदतीत आहे असे म्‍हणता येणार नाही. तक्रारकर्ती हिने सदर तक्रार सबळ पुरावा शिवाय दाखल केलेली असून विरुध्‍द पक्ष यांना ञास देण्‍याच्‍या उद्देशाने दाखल केल्‍यामुळे सदर तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना आयोगामार्फत नोटीस प्राप्‍त होऊनही आयोगासमोर हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ विरुध्‍द दिनांक २१/८/२०१९ रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आले.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार शपथपञ तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ चे उत्‍तर तसेच शपथपञ व दोन्‍ही पक्षाचे लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवादवरुन तक्रारीच्‍या निकालीकामी  निष्‍कर्षे  व त्‍यावरील कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे.

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्तीचा पती शेतकरी असून त्‍याची शेती मौजा तळेगांव, तहसील वरोरा येथे असून भुमापन क्रमांक ४१ हा आहे, ही बाब तक्रारीत दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत आहे. तसेच तक्रारर्तीच्‍या पतीचा दिनांक २९/११/२०१२ रोजी बाजारात पायी जात असतांना बस स्‍टॅन्‍ड जवळ एका गाडीने धडक दिल्‍याने जखमी होऊन मृत्‍यु झाला ही बाब तक्रारीत दाखल पोलीस दस्‍त अभिलेखावरुन सिध्‍द होत आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाल्‍यावर तिने आवश्‍यक दस्‍तएवजासह विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे अर्ज केल्‍याची बाब तक्रारीत नमूद केलेली आहे. आयोगाने तक्रारीतील दोन्‍ही पक्षाचे तोंडी युक्तिवाद व दाखल दस्‍तएवजाचे निरीक्षण केले असता तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक २९/११/२०१२ रोजी झाला त्‍यानंतर तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांच्‍याकडे प्रत्‍यक्ष दावा प्रपञ याबद्दल तारीख दर्शविणारा कोणताही दस्‍तएवज प्रकरणात दाखल केला नाही तसेच प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ सुध्‍दा हजर न झाल्‍यामुळे त्‍याचेकडे तक्रारकर्तीने दावाप्रपञ केव्‍हा दाखल केले या बद्दल काहीही खुलासा नाही. तक्रारीत दाखल दस्‍तऐवजाप्रमाणे या शेतकरी विमा योजनेचा कालावधी २०१२-२०१३ या वर्षासाठी लागू होता. योजनेच्‍या तरतुदीनुसार कालावधी दरम्‍यान तसेच कालावधी संपल्‍यानंतर ९० दिवसापर्यंत दावाप्रपञ दाखल होणे आवश्‍यक होते परंतु प्रस्‍तुत प्रकरणात विमा दावा दाखल केल्‍यासंबंधीचा कुठलाही दस्‍तऐवज अभिलेखावर नाही. तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु दिनांक २९/११/२०१२ रोजी झाल्‍यापासून दिनांक ६/५/२०१९ रोजी तक्रारकर्तीच्‍या वकीलाची कायदेशीर नोटीस विरुध्‍द पक्ष यांना पाठविली परंतु या मधल्‍या काळात कुठलाही पञव्‍यवहार केल्‍याचे दिसून येत नाही तसेच तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु दिनांक २९/११/२०१२ रोजी झाल्‍यानंतर दिनांक ४/६/२०१९ रोजी आयोगासमक्ष तक्रार दाखल केलेली तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यान्‍वये मुदतबाह्रय असल्‍याचे स्‍पष्‍ट  होते तसेच विलंबाबाबत मान्‍य करण्‍यायोग्‍य कुठलेही निवेदन अथवा पुरावा आयोगासमोर तक्रारकर्तीने सादर केलेला नाही. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक सी.सी. ७१/२०१९ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.