Maharashtra

Beed

CC/12/53

Shaikh Mujib Shaikh Yusuf - Complainant(s)

Versus

The new India Insurance company ltd. Latur - Opp.Party(s)

Kale A.D.

21 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/12/53
 
1. Shaikh Mujib Shaikh Yusuf
Kagdi Darwaja Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The new India Insurance company ltd. Latur
Sathe Chowk, Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 21.01.2014
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष)
तक्रारदार शेख मुजीब शेख युसुफ यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला क्र.1 इन्‍शुरन्‍स कंपनीने नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, सामनेवाला क्र.2 हे ट्रक क्र.एम.एच.44-5079चे मालक होते. दि.21.12.2005 रोजी तक्रारदार यांनी सदरील ट्रक रक्‍कम रु.1,10,000/- मध्‍ये खरेदी केले. सदरील ट्रकवर आय.सी.आय.सी.आय. बँकेचे कर्ज सामनेवाला क्र.2 यांनी घेतले होते, या कर्जाचे एकूण 38 मासिक हप्‍ते होते. तक्रारदार यांनी सदरील कर्ज फेडण्‍याची हमी घेतली. सर्व कर्जाची फेड झाल्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी सदरील ट्रक तक्रारदार यांचे नावे नोंद करुन घेण्‍याचे ठरले होते, तसा करार सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना लिहून दिलेले आहे. अशा प्रकारे तक्रारदार हे सदरील ट्रकचे खरेदीदार झालेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे सदरील ट्रकचा विमा उतरविलेला आहे. तक्रारदार हे सदरील ट्रक स्‍वतःच्‍या उपजिवीकेसाठी वापरत आहे व कर्जाचे हप्‍ते भरत आहे.
तक्रारदार यांचे कथन की, दि.23.09.2006 रोजी सदरील ट्रक औरंगाबाद येथून माल घेऊन जालना येथे जात होता. नागेवाडी येथे सदरील ट्रकचे ब्रेक फेल झाल्‍यामुळे ड्रायव्‍हरला गाडी सावरता आली नाही. सदरील ट्रक समोरील ट्रकवर जाऊन आदळला. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या ट्रकची समोरील बाजू पूर्ण चेपली गेली व नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील अपघाताबाबत दि.04.09.2006 रोजी जालना शहर पोलीस स्‍टेशनमध्‍ये खबर दिली. पोलीसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. तक्रारदार यांनी अपघाताची माहिती सामनेवाला क्र.2 यांना दिली, सामनेवाला क्र.2 यांच्‍या नावे विमा उतरविला असल्‍यामुळे व विमा कालावधीत अपघात झाल्‍यामुळे सदरील बाब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना कळविले. सामनेवाला क्र.1 यांच्‍या सर्वेअरने अपघातग्रस्‍त वाहनाची पाहणी केली व क्‍लेम फॉर्म भरुन घेतला. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली. सामनेवाला क्र.1 यांनी नुकसान भरपाई देण्‍याची टाळाटाळ केली. सामनेवाला क्र.1 यांनी, सामनेवाला क्र.2 यांना एक पत्र पाठवून नुकसान भरपाई लवकरच मिळेल ट्रक दुरुस्‍त करुन घ्‍या, व दुरुस्‍तीचे बिले दाखल करा असे कळविले. सदरील गाडी दुरुस्‍तीसाठी रक्‍कम रु.4,00,000/- खर्च अपेक्षित होता. तक्रारदार यांनी नातेवाईकांकडून उधारीने पैसे घेऊन सदरील ट्रकची दुरुस्‍ती केली, ट्रक दुरुस्‍ती खर्च एकूण रु.3,07,776/- इतका झाला. दुरुस्‍ती खर्चाच्‍या पावत्‍या तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 मार्फत विमा कंपनीकडे जमा केल्‍या. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचे मार्फत विम्‍याची रक्‍कम मिळावी म्‍हणून वेळोवेळी पाठपुरावा केला. सामनेवाला क्र.1 यांनी दि.25.03.2010 रोजी कागदपत्राची पुर्तता न केल्‍यामुळे क्‍लेम बंद करण्‍यात आला आहे असे कळविले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत सर्व कागदपत्राची पुर्तता केली होती. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु.3,07,776/-, तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी निशाणी 7 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांनी अपघातातील पोलीस तपासातील कागदपत्र, वाहन अपघात मागणी पत्र, वाहन दुरुस्‍तीची बिले, याबाबत वेळोवेळी मागणी करुनही तक्रारदार यांनी पुर्तता केली नाही.त्‍यामुळे सामनेवाला क्र.1 यांना सदरील प्रकरण बंद करावे लागले.तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाई मागण्‍याचा कायदेशिर अधिकार नाही. तक्रारदार व सामनेवाला यांच्‍यामध्‍ये कोणताही करार झालेला नाही. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक नाही. तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांना वेळोवेळी लेखी कळवून सुध्‍दा त्‍यांनी आवश्‍यकत त्‍या कागदपत्राची पुर्तता केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचा क्‍लेम बंद करावा लागला. सबब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली.
सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी निशाणी 9 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, सामनेवाला क्र.2 यांनी सदरील ट्रक हा तक्रारदार यांना विकला आहे व त्‍याबाबत करार झाला आहे ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सदरील ट्रकचा विमा सामनेवाला क्र.1 कडे उतरविला आहे. तसेच सदरील ट्रक‍ला दि.23.09.2006 रोजी अपघात झाला व अपघातात ट्रकचे रु.3,07,776/- चे नुकसान झाले ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी स्‍वतः सदरील क्‍लेम फॉर्म भरुन सर्व कागदपत्राची पुर्तता सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे केलेली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी वाहन दुरुस्‍तीचा खर्च देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, त्‍यांनी सदरील ट्रक तक्रारदार यांना विकला असल्‍यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना मागणी करुनही कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह मंजूर करण्‍यात यावी असे सामनेवाला क्र.2 यांनी कथन केले आहे.
तक्रारदार यांनी निशाणी 4 सोबत तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांच्‍यात झालेला करारनामा, सामनेवाला क्र.1 यांनी पाठविलेले पत्र, घटनास्‍थळ पंचनामा, तपासणी अहवाल, ड्रायव्हिंग लायसन्‍स, ट्रकचे परमीट व ट्रक दुरुस्‍ती कामी करावा लागलेल्‍या खर्चाच्‍या पावत्‍या हजर केल्‍या आहेत.
तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र निशाणी 12 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी वरीष्‍ठ मंडल प्रबंधक यांचे शपथपत्र निशाणी 8 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी शपथपत्र निशाणी 10 अन्‍वये दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.काळे यांचा युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 यांचे वकील श्री.महाजन यांचा युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्‍ताचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्‍तर 1) सामनेवाला क्र.1 इन्‍शुरन्‍स कंपनी यांनी तक्रारदार
यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही
बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास
पात्र आहे काय? होय. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.

कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.काळे यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून तक्रारीत नमुद केलेला ट्रक खरेदी केला आहे व त्‍या संबंधी करारपत्र केलेले आहे. सदरील ट्रकचा विमा सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे उतरविलेला आहे. सदरील ट्रकचा अपघात झाला, अपघातामध्‍ये ट्रकचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, सदरील बाब सामनेवाला क्र.1 यांचे निदर्शनास आणून दिली त्‍या कामी सामनेवाला यांच्‍या अधिका-यांनी सर्वेअर नेमून नुकसानीची पाहणी केली. तक्रारदाराने सदरील वाहन दुरुस्‍त करुन घेतले व त्‍या कागदपत्राच्‍या पावत्‍या व क्‍लेम सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे दाखल केल्‍या. सामनेवाला क्र.1 यांनी कोणत्‍याही संयुक्तिक कारणाशिवाय तक्रारदाराचा क्‍लेम बंद केला. तसेच तक्रारदार यांच्‍या वकीलांनी सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेले शपथपत्र व लेखी निवेदन यावर या मंचाचे लक्ष वेधले व युक्‍तीवाद केला की, विमा पॉलीसी जरी सामनेवाला क्र.2 यांच्‍या नावे असली तरी तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्रआहे. कारण तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे केलेली आहे. तक्रारदार हे ग्राहक आहे. तक्रारदार यांचे वकीलांनी त्‍यांचे युक्‍तीवादाचे समर्थनार्थ खालील न्‍यायनिर्णय दाखल केला.
1) 1(2013) CPJ 610 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW
DELHI.
ANDAGRO UNITED SERVICES LTD. V/s. UNITED INDIA INSURANCE
CO.LTD & ANR.

(i) Consumer Protection Act, 1986 – Sections 2(1) (d), 21(a)(i) – Consumer – Contract of Insurance – Privity of contract – OP2 obtained insurance services from OP1 for the benefit of complainant and other parties, whose goods were being kept there – Premium was paid by complainant in advance to OP2 – Privity of contract established between complainant and OP1 due to agreement entered between OP1 and OP2 – Complainant is a consumer.

सामनेवाला क्र.1 यांचे वकील श्री.महाजन यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक नाही. तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांनी वेळोवेळी मागणी करुनही कागदपत्राची पुर्तता केली नाही. सबब तक्रारदाराचा क्‍लेम बंद करण्‍यात आला. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
वर नमुद केलेला युक्‍तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्‍त याचे अवलोकन केले. अपघातग्रस्‍त ट्रक हा सामनेवाला क्र.2 यांच्‍या नावे आर.टी.ओ.कडे नोंदलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे सदरील ट्रकचा विमा उतरविलेला आहे. सदरील ट्रकवर आय.सी.आय.सी.आय. बँकेचे कर्ज काढलेले आहे. सदरील कर्जाची फेड करण्‍याची हमी तक्रारदार यांनी घेतलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचे लाभात करारनामा करुन दिलेला आहे. सदरील करारनाम्‍यात नमुद केलेल्‍या बाबीचा विचार करता तक्रारदार हे सदरील ट्रकचे कायद्याने (Defacto owner) मालक आहेत व सामनेवाला क्र.2 हे Dejure मालक आहे. सदरील ट्रकचा वापर तक्रारदार हे करत होते व त्‍यांनी नेमलेला ड्रायव्‍हर अपघाताच्‍यावेळेस गाडी चालवित होता. सदरील ट्रक जरी सामनेवाला क्र.2 यांचे नावावर असला तरी, तक्रारदार व सामनेवाला क्र.2 यांच्‍यामध्‍ये झालेला करार लक्षात घेतला असता तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 चे ग्राहक आहेत ही बाब सिध्‍द होते. सदरील वाहनाचा विमा हा व्‍यक्‍ती सोबत नव्‍हे तर वाहना सोबत जात असतो. सदरील वाहन तक्रारदार वापरत असल्‍यामुळे व सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचे लाभात अधिकारपत्र दिल्‍यामळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम कागदपत्राची अपुर्तता आहे या कारणास्‍तव नाकारलेला आहे.सदरील क्‍लेम हा तक्रारदार सामनेवाला क्र.1 चा ग्राहक नाही, या कारणास्‍तव नाकारलेला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचे सर्व कथन मान्‍य केलेले आहे व नुकसान भरपाई देण्‍यास सामनेवाला क्र.1 यांना निर्देश देण्‍यात यावे असे कथन केले आहे. सबब या मंचाचे मते सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम बंद करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सदरील ट्रक दुरुस्‍त कामी रक्‍कम रु.3,07,776/- एवढी मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी सदर दुरुस्‍तीबाबत बिले या मंचासमोर हजर केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सर्वेअर नियुक्‍त केले होते त्‍याबाबत सामनेवाला क्र.1 यांनी कोणताही दस्‍तऐवज या मंचासमोर हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी सादर केलेले खर्चाच्‍या पावत्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सदरील ट्रक दुरुस्‍तीचा खर्च रु.2,57,546/- केल्‍याचे निदर्शनास येते. सदरील पावत्‍याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये काही खर्चाच्‍या बाबी असे नमुद केले आहे की, त्‍या दुरुस्‍तीच्‍या अपघाताशी संबंधित नाही. वरील रकमेच्‍या दहा टक्‍के खर्च वगळता तक्रारदार हे रक्‍कम रु.2,31,812/- खर्चापोटी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारदार हे शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास वाहन दुरुस्‍ती खर्च म्‍हणून
रक्‍कम रु.2,31,812/-, (अक्षरी रु.दोन लाख, एकतीस हजार, आठशे
बारा फक्‍त) निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर
रक्‍कम विहीत मुदतीत न दिल्‍यास संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल
तारखेपासून वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज
द्यावे.
3) सामनेवाला क्र.1 यांनी, तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.

 

श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्‍य अध्‍यक्ष

 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.