जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –181/2010 तक्रार दाखल तारीख –23/12/2010
कुरेशी मझार सरदार कुरेशी
वय 40 वर्षे,धंदा व्यापार ..तक्रारदार रा.भुई गल्ली,पेठ बीड, जि.बीड
विरुध्द
1. दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
कार्यालय जालना रोड, बीड
2. दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
जालना रोड,औरंगाबाद ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.पी.लघाने
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- अँड बी.बी.नामलगांवकर
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी व्यापारासाठी ट्रक घेण्याचे ठरविले. अंबाजोगाईतील व्यापा-याकडून दि.15.4.2010 रोजी ट्रक खरेदी केला.
तक्रारदारांनी पूर्वीपासून रसूलभाई या चालकाला गाडी चालविण्यासाठी ठेवले होते. तो मालेपिर बीड येथे राहत होता. ट्रकचा नंबर एम.एच.-44-6453 असून व्यापारासाठी ट्रकचा वापर करीत असे,उशिर झाला किंवा पाऊस पडला असेल तर चिखलापासून चालक ट्रक नगर रोड बीड येथे त्यांचे राहते घरासमोर लावत असे आणि पून्हा दूसरे दिवशी कामावर घेऊन जात होता. ट्रकचा पूर्ण विमा गैरअर्जदार क्र.1कडून घेतलेला आहे. त्यांचा विमा पॉलिसी नंगबर160402310090/00200902 आहे. त्यांचा कालावधी दि.12.11.2009 ते 11.11.2010असा होता.
तक्रारदारांनी ट्रक खरेदी केल्यावर नियमाप्रमाणे पूवीच्या मालकाचे नांवावरील विमा पण आवश्यक फि भरुन स्वतःचे नांवावर वर्ग करुन घेतला आहे.सदरचे विमा पत्र दि.3.5.2010 रोजी वर्ग झाला आहे. वरील ट्रक दि.2.5.2010 रोजी 11वाजेचे सुमारास कोणत्या तरी अज्ञात इसमाने चोरुन नेला आहे त्याबददलची फिर्याद पोलिस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला.शोध घेतल्यावर त्यांचा पत्ता लागला नाही.
सामनेवालाकडे दावा अर्ज भरुन दिला. दिड महिन्याचा कालावधी गेला परंतु सामनेवाला यांचे सर्व सर्व्हेअर श्री.जवळेकर यांनी तिन नोटीसा दिल्या परंतु स्वतःसर्व्हेअर सर्व्हे करण्यासाठी आलेले नाहीत. दि.27.9.2010 रोजी तक्रारदारांनी दावा मंजूरी बाबत विनंती केली. परंतु सामनेवाला यांनी उडवाउडविची उत्तरे दिली व तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला. विनंती की, रु.3,50,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्या बाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- देणे बाबत आदेश व्हावा.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.10.2.2011 रोजी नि.7 दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारीतील सर्व आरोप नाकारलेले आहेत. त्यांस बांधा न येता सामनेवाला यांचे म्हणणे की, आक्षेपित चोरी बाबत तक्रारदारांनी पोलिस स्टेशनला तक्रार केली. त्यांनी दावा फाईल्ड केलेला आहे. सामनेवाला यांनी सदरची तक्रार चौकशी अधिकारी श्री.जवळेकर यांचेकडे वर्ग केली त्यांनी त्यांचा अहवाल दाखल केलेला आहे. दावा दाखल करतेवेळी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पुस्तक, वाहनाची चावी, रिपोर्ट न्यायालयाचा अंतिम आदेश,ही कागदपत्र दाखल करण्यास सांगितली होती. सदरचा अर्ज तक्रारदाराने दाखल केला.त्यानंतर कागदपत्राची पूर्तता केलेली नाही. तक्रारदार कार्यालयात आला नाही आणि त्यांनी अद्यापपर्यत कागदपत्र दिलेले नाहीत.दरम्यानच्या काळात चौकशी अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. तक्रारदाराकडून कागदपत्र न आल्याने सामनेवाला यांनी सदर दाव्यावर अंतिम निर्णय घेता आलेला नाही व या दरम्यानच तक्रारदारांनी न्यायमंचात तक्रार दाखल केली. या सर्व पार्श्वभूमीवर तक्रार अपरिपक्त आहे ती प्राथमिक पातळीवरच रदद करण्यात येईल. सदरचा दावा हा निर्णयासाठी प्रलंबित आहे तो नाकारलेला नाही किंवा मंजूरही करण्यात आलेला नाही.यात तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. विनंती की,तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्ववान वकील श्री.एस.पी.लघाने व सामनेवाला यांचे विद्ववान वकील श्री.बी.बी.नामलगांवकर यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्र पाहता ट्रक क्र. एम.एच.-44-6453 तक्रारदारांनी खरेदी केलेला आहे. त्या बाबतची नोंदणी झाल्याचे नोंदणी पूस्तकातील नोंदीवरुन दिसते. तसेच तक्रारदारांनी सामनेवाला यांचे संदर्भातील विमा पत्र त्यांचे नांवावर वर्ग करुन घेतल्याचे कागदपत्रावरुन दिसते.
या संदर्भात विमा पत्र नसल्याचे सामनेवाला यांचे म्हणणे नाही. विमा पत्राचे संदर्भात सामनेवाला यांचा कोणताही आक्षेप नाही. विमा कालावधीतच ट्रक चोरीला गेलेला आहे व या संदर्भात तक्रारदारांनी पोलिस स्टेशन, तसेच विमा कंपनी यांना कळवलेले आहे. पोलिस स्टेशनने त्या बाबत योग्य ती कारवाई करुन न्यायालयात त्यांचा अहवाल दिलेला आहे व न्यायालयाने सदर अहवालानुसार केस समरी दि.22.12.2010 रोजी केल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसते.
तक्रारदाराचा दावा सामनेवाला यांचेकडे प्रलंबित आहे व त्यांनी तो नाकारलेला नाही किंवा मंजूरही केलेला नाही अशा परिस्थितीत तक्रारदारांनी दाव्याच्या कागदपत्राची पूर्तता न केल्याने निर्णयासाठी प्रलंबित आहे.
तक्रारदाराकडे मागणी केलेली कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली नाहीत अशी हरकत सामनेवाला यांची आहे परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रे पाहता खुलाशात नमूद केलेले कागदपत्रे सदर कागदपत्रामध्ये दिसतात. त्यामुळे तक्रारदारांनी कागदपत्राची पूर्तता केली नाही हे सामनेवाला यांची विधाने याठिकाणी गृहीत धरणे उचित होणार नाही. तथापि,तक्रारदारांनीतक्रार दि.3.1.2011 रोजीजिल्हा मंचात दाखल केली आहे. त्यापूर्वीचदि.22.12.2010 रोजी न्यायालयाने पोलिसांचा अंतिम रिपोर्ट मंजूर केलेला आहे.त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा मंजूर करणे उचित होईलअसे न्यायमंचाचे मत आहे,परंतु वरील सर्व कालावधीत लक्षात घेता बराच कालावधी होऊन गेल्यानंतर सामनेवाला यांनी सदर दाव्यावर निर्णय घेतला नाही अशी परिस्थिती नाही. त्यामुळे या संदर्भात सामनेवाला यांचे सेवेत कसूरीची बाब स्पष्ट होत नाही. दाखल कागदपत्रावरुन तक्रारदाराचा ट्रक चोरीला गेलेला असल्याने ट्रकची रक्कम रु.3,50,000/- चा असल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. सेवेतकसूरीची बाब वरील विवेचनावरुन स्पष्ट होत नसल्याने मानसिक त्रासाची रक्कम देणे उचित होणार नाही.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना ट्रकच्या विम्याची
रक्कम रु.3,50,000/- आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आंत अदा
करावी.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम वरील मूदतीत
अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने दि.1.1.2011
पासून व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. खर्चाबददल आदेश नाही.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड