1. अर्जदार ही नंदुरी तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून अर्जदाराचे पती श्री सुधाकर डोमाजी सराटे यांच्या मालकीची मौजा गोराळा, तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 44/1 ही शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 व दोन ही विमा कंपनी असून गैर अर्जदार क्रमांक 3 हे शासनाच्या वतीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्वीकारतात. अर्जदाराच्या पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रू.1 लाखाचा विमा उतरविला असून अर्जदार ही मयत श्री सुधाकर डोमाजी सराटे यांची पत्नी असल्याने विम्याची लाभधारक आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 25. 11. 2012 रोजी आपल्या शेतात असताना विषारी सापाने दंश केल्याने झाला. अर्जदाराच्या पतीने उपरोक्त विमा काढला असल्याने तिने आवश्यक दस्तऐवजांच्यासह गैरअर्जदार क्रमांक तीन कडे रिचार्ज दिनांक 25. 2 .2013 रोजी केला. रीतसर अर्ज केल्यानंतरही गैर अर्जदाराने अर्जदाराचा दावा मंजूर किंवा नामंजूर याबद्दल न कळविल्यामुळे दिनांक 6. 3 .2018 रोजी कायदेशीर नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ते तीन ला पाठविला. परंतु गैर अर्जदाराकडून काहीही उत्तर न मिळाल्याने अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदार विरुद्ध दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी उपस्थित होऊन लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी अर्जदाराचे कथन खोडून काढीत नमूद केले की अर्जदाराने सदर विमा दाव्यामध्ये कोणतीही आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अर्जदारांनी मयत हा शेतीचा मालक असल्याबाबतचा कोणताही दस्तावेज तक्रारीत दाखल केलेला नाही. सदर तक्रारीत अर्जदाराने चा खोटा 7/12 दाखल केलेला आहे, तसेच अर्जदाराचे पतीचा मृत्यू जनक 25 .11. 2012 रोजी सर्पदंशाने झालेला नाही. तसेच अर्जदाराने शेतकरी अपघात विमा बाबत कोणताही रीतसर अर्ज दाखल केला नाही त्यामुळे अर्जदाराला शेतकरी अपघात विमा ची योजना लागू पडू शकत नाही. तसेच दाव्यासाठी आवश्यक दस्तावेज अर्जदाराने दाखल केले नाही आणि जे दाखल केले ते खोटे व बनावटी आहेत. अर्जदाराच्या पतीने जहर घेतल्यामुळे किवां इतर कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा सबब सदर अर्ज नामंजूर करून खारीज करण्यात यावा तसेच अर्जदार ही मयताची पत्नी असल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. 3. गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल केले. त्यात त्यांनी नमूद केले की मयत श्री सुधाकर डोमा सराटे राहणार नंदुरी तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांचा प्रस्ताव या कार्यालयातून जावक क्रमांक 148 दिनांक 22.2.2013 रोजी मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला, परंतु जिल्हा कार्यालयाने मंजुरी रद्द झाल्याचे कंपनीचे रिजेक्ट पत्र सोबत पाठविले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी या उत्तरासह गैरअर्जदार यांनी दस्तावेज तक्रारी जोडलेले आहेत. 4. अर्जदारा ची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदारक्र. २ यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. २ यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष १. तक्रारकर्ती गैरअर्जदार क्रं. 1 यांची ग्राहक आहे काय ? होय. २. गैरअर्जदारक्र. 1 व 2 यांनी कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय ३.. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्रमांक 1 व २ बाबत ः- 5. अर्जदार हि गैरअर्जदाराची ग्राहक आहे ही बाब सिद्ध अर्जदाराने तक्रारीत निशाणी क्रमांक ४ वर दस्त क्रमांक अ 1ते अ 3 वर दस्तेअवज दाखल केलेले आहेत. त्यावरून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे स्पष्ट होते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत 6. महाराष्ट्र शासनाने कार्यान्वित केलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराचे पतीने विमा उतरविला होता यात वाद नाही. अर्जदाराचे पतीचे दिनांक 25 .11. 2012 रोजी शेतात काम करीत असताना विषारी सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला. अर्जदार बाईने सर्व दस्तऐवजांसह दावा मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे पाठविला. परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार बाईसा दावा मंजूर किंवा नामंजूर याबद्दल कोणताही प्रतिसाद दिला नाही. गैरहजर क्रमांक 1 व 2 ह्यांनी त्यांचे उत्तरात अर्जदाराने दाव्या संदर्भात कागदपत्रे कागदपत्रे न पाठविल्यामुळे तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू जहर पिल्याने झाला असावा असे नमूद केले. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दावा मंजुरीसाठी पाठविला असता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदर दावा नामंजूर केला याबद्दल चे पत्र त्याचे उत्तरात जोडले आहे. त्यात अर्जदाराचे विसरा रिपोर्ट न पाठविल्यामुळे अर्जदारांचा दावा फेटाळण्यात येत आहे असे दिसून येत आहे. परंतु अर्जदाराला गैर अर्जदार क्रमांक 1 व 2 व दोन यांनी दावा फेटाळण्यात आला असे कोणतेही पत्र पाठवले याबद्दलचा कोणताही पुरावा तक्रारी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2व दोन ह्यांनी दाखल केलेला नाही. तसेच अर्जदार यांनी तक्रारी सोबत दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता निशाणी क्रमांक 4 सह दस्त क्रमांक तीन वर सातबारा तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट घटनास्थळ पंचनामा मर्ग समरी वरून तसेच अर्जदार बाईने प्रतिज्ञालेखावर दाखल केलेल्या म्हणण्यावरून हे सिद्ध होते की अर्जदार बाई ही मयताची पत्नी आहे तसेच पोस्टमार्टम व इतर दस्ता-ऐवजांवरून असे सिद्ध होत आहे कि अर्जदाराचे पतीचा मृत्यू हा विषारी साप चावल्यामुळे झालेला आहे. सबब गैरअर्जदार क्रमांक 1 व 2चे विशेष कथनातील म्हणणे की अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा जहर खाल्ल्याने झाला असावा ह्या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. अर्जदार बाईचा विमा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला असून अर्जदार बाईस विम्याची रक्कम मिळणे पासून वंचित ठेवले आहे सबब गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ह्यांनी सेवेत त्रुटी पूर्ण व्यवहार केला व अर्जदारा प्रति अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
7. गैरअर्जदार क्रमांक 3 हे मध्यस्थ सल्लागार असून कागद पत्रांची देवाणघेवाण करतात. त्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक तीन विरुद्ध कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
आदेश (1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 66/2018 अंशतःमंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा सामुहीकरीत्या तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रू.1 लाख त्यावर आदेशाच्या दिनांकापासून रक्कम तक्रारकर्तीच्या हाती पडेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. (3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा सामुहीकरीत्या तक्रारकर्तीस मानसीक व शारिरीक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. (4) गैरअर्जदार क्र. ३ विरुद्ध कोणताही आदेश नाही. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . चंद्रपूर दिनांक – 22/01/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |