जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/19 प्रकरण दाखल तारीख - 18/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य संदीपसिंघ पि.शंकरसिंघ गाडीवाले, वय वर्षे 28, धंदा गुत्तेदारी, अर्जदार. रा.गाडीवाले कॉम्प्लेक्स,बडपुरा,भगतसिंघ रोड, नांदेड. विरुध्द. 1. दि.न्यु.इंडिया एश्योरन्स कं.लि., गैरअर्जदार. मार्फत व्यवस्थापक, न्यु.इंडिया एश्योरन्स बिल्डींग, 87 महात्मा गांधी मार्ग फोर्ट,मुंबई – 400 001. 2. दि.न्यु.इंडिया एश्योरन्स कं.लि., मार्फत व्यवस्थापक, स्थानिक शाखा- लाहोटी कॉम्प्लेक्स, प्रभात टॉकीज जवळ,नांदेड. 3. टाटा मोटार्स फायनान्स लि, मार्फत व्यवस्थाक, दुसरा माळा, आय.सी.33, राम कृष्णा मेटल वर्क्स – 1, फर्स्ट रोड नं.20, मोराती सर्व्हीस सेंटरच्या विरुध्द , इंडस्ट्रीयल इस्टेट ठाणे – 400 604. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एस.अर्धापुरे. गैरअर्जदारां तर्फे वकील. - अड.एस.व्ही.राहेरकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्य) अर्जदारांने आपली तक्रार ग्राहक मंचा समोर मांडली आहे. थोडक्यात तक्रार अशी की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराचे खोदकाम यंत्राबद्यल उतरविलेली विमा पॉलिसी न देणे ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे अर्जदार सदरील अर्ज ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा नांदेड येथील रहिवाशी असुन गुत्तेदारीचा व्यवसाय करीत आहे. यावरच त्यांची उपजिवीका चालत आहे. सदरील यंत्र पडुन नुकसान झाले त्यामुळे कुठलेही काम करण्यासाठी अर्जदारांना खोदकाम यंत्र किरायाने घेत असतात. सदरील यंत्राची अर्जदारास नेहमी गरज पडत होते. या यंत्राचे काम असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडुन फायनान्सवर रक्कम कर्जाऊ रक्कम घेऊन टाटा कंपनीने Ex 70 Excavator खोदकाम यंत्र घेतले ज्याचा इंजिन क्र.7032651 असुन चेसीज क्र. 7032651 आहे. ज्यावेळेस कर्ज घेतले त्या वेळेस गैरअर्जदार क्र. 3 म्हणजेच टाटा फायनान्स व अर्जदार यांच्यात असे ठरले होते की, गैरअर्जदार क्र. 3 हे विमा काढतील ती रक्कम अर्जदाराच्या कर्ज खात्यावर टाकतील व त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 3 यांनी खोदकाम यंत्राचा विमा गैरअर्जदार क्र. 1 न्यु.इंडिया एशुरन्स कंपनी मुंबई यांच्याकडुन काढला व पॉलिसीचा क्र.121000/31/07/01/00009551 असा असुन अर्जदार यांच्या नांवाने त्यांचे कर्ज खात्यावर टाकले. गैरअर्जदार क्र. 1 स्थानिक शाखा गैरअर्जदार न्यु.इंडिया एशोरन्स कंपनी नांदेड हे असुन सदरील पॉलिसीचा विमा हप्ता रु.18,628/- असे ठरले होते. नांदेड येथील गुरुद्वारा यांत्री निवास पोलिस चौकी जवळ खोदकाम करीत असतांना त्या ठिकाणची जमीन भुसभुसीत असल्यामुळे अर्जदाराची खोदकाम यंत्र दि.20/08/2008 रोजी उलटुन पडले व त्यामध्ये स्विंग मोटर, ट्रॅक मोटर व इत्यादीचे नुकसान झाले. अर्जदाराने सदरील घटनेचा वृतांत पोलिस स्टेशन वजीराबाद यांना 30/2008 या क्रमांकावर नांदेड केली. पोलिस स्टेशन वजीराबाद यांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे विमा काढला, विमा कालावधी दि.09/11/2007 ते दि.08/11/2008 च्या मध्य रात्रीपर्यंत होता. म्हणजेच घटना ही दि.20/08/2008 रोजी घडली असल्यामुळे अर्जदाराची तक्रार ही विमा काढलेल्या मुदतीत आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्या ऑफिसकडे वेळोवेळी खोदकाम यंत्राचे झालेल्या नुकसानीबद्यल विमा मागीतले. गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदरील कागदपत्र प्रक्रियेसाठी व मंजुरीसाठी मुख्य शाखेला म्हणजेच गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविले व त्यामधील नुकसानीची पाहणी करुन व्हॅल्युअर श्री.तोतला यांची नेमणुक गैरअर्जदार क्र. 1 यांनी केली. श्री.तोतला यांनी खोदकाम यंत्राचे नुकसान रु.1,63,759/- एवढया किंमतीचे झालेले आहे असा रिपोर्ट दिला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार खोदकाम यंत्राचे सर्व भाग महाग असल्यामुळे नुकसान रु.2,58,502/- इतकी झालेली आहे. त्याबद्यलची सर्व बिले अर्जदाराने मंचा समोर दाखल केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना विमा रक्कम मिळणे बाबत चौकशी केली असता, गैरअर्जदारांनी त्यांना कुठलीही माहीती दिलेली नाही. म्हणुन दि.07/08/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराला माहीती दिली व त्यांनी सदरचा क्लेम नामंजुर झाला, विमा रक्कम मिळणार नाही असे सांगितले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी असे सांगीतले की, सदरील खोदकाम यंत्राची अपघातात नुकसान झालेले नसुन खोदकाम करीत असतांना खडडयात पडुन नुकसान झालेले आहे व खोदकाम यंत्राची त्या गोष्टीसाठी इंशुअर्ड केलेले नाही. म्हणुन अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला, या घटनेमुळे अर्जदारास ग्राहक मंचाकडे धाव घ्यावी लागली. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे Overturning मध्ये यंत्राचे नुकसान झाले तर भरपाई करुन देण्यासाठी पॉलिसी घेत असतांना विमा यंत्राच्या किंमतीच्या 1 टक्का जास्तीचे प्रिमीअम पॉलिसी घेत असतांना दिलेले नाही. त्यामुळे विमा कंपनी या नुकसानीस जबाबदार नाही व अर्जदाराचे म्हणणे कि, त्यांचे रु.2,58,502/- नुकसान झाले, ते सर्वथा चुक आहे. गैरअर्जदाराने नेमलेले सर्व्हेअर श्री.तोतला यांनी दाखल केलेला अंतीम अहवालात अर्जदाराचे एकुण रु.1,63,759/- नुकसान झाल्याचे कथन केलेले आहे. म्हणुन अर्जदाराची मागणी फेटाळून लावून गैरअर्जदार यांना खर्च द्यावे अशी मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यानी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांना दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे गैरअर्जदार क्र 1 व 2 नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय? नियमाप्रमाणे. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – वास्तविक पहाता अर्जदाराने जेंव्हा सदरील खोदकाम यंत्र गैरअर्जदार क्र. 3 फायनान्स कंपनी यांच्या साहयाने त्यांच्याकडुन कर्ज घेऊन विकत घेतले आहे व ही पॉलिसी देखील गैरअर्जदार क्र.3 यांनी काढलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वर दाखल केलेले नियम जे की, पॉलिसी घेतांना विमा यंत्राच्या किंमतीच्या 1 टक्का जास्तीचे प्रिमीअम अर्जदाराने दिले नाही, हे अर्जदारास माहीत नाही. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्याकडुन नुकसान भरपाई मागीतलेली आहे. सदरील अपघाताची तारीख पाहीली असता, आजपर्यंत अर्जदाराचे यंत्र बंद आहे, त्या गोष्टीला जवळपास पाउणे दोन वर्ष होत आलेले आहेत. त्यामुळे अर्जदार यांचे काम बंद होते त्यामुळे त्यांचे आर्थीक नुकसान फारच झालेले आहे, ही गोष्ट स्पष्ट होत आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे अर्जदाराने रु.18,628/- मोठी किंमतीचा हप्ता भरलेला आहे व अपघात हा पॉलिसीच्या मुदती घडलेला आहे. त्यामुळे अर्जदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. अर्जदारानेसदरील तक्रारअर्जामध्ये गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्याकडुन नुकसान भरपाई,दावा खर्च म्हणुन रु.1,00,000/- मागीतलेले आहे पण त्याबद्यल कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही किंवा त्यांचेकडे असलेले कामाचे ऑर्डर्स दाखल केलेले नाही. म्हणुन त्यांचे रु.1,00,000/- नुकसान झालेले आहे असे मंचास गृहीत धरता येणार नाही. एक बाब निश्चित होते की, खोदकाम करीत असतांना अर्जदाराचे खोदकाम यंत्र उलटुन पडल्यामुळे त्यांचे नुकसान झालेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदारांनी दाखल केलेले नियम की, खोदकाम करतांना हे वाहन चालु असतांना अपघात झालेले नाही. त्यामुळे त्याची नुकसान भरपाई देण्यास ते जबाबदार नाही हे म्हणणे चुकीचे आहे. कारण खोदकाम यंत्र हे अशी मशीन आहे की, जे एक जागेहून दुस-या जागेत नेण्यासाठी दुस-या वाहनाचा वापर करावा लागतो व त्यामध्ये खोदकाम यंत्र ठेवून ज्या जागेत काम करावयाचे आहे त्या जागी घेऊन जावे लागते प्रत्यक्ष खोदकाम यंत्र रस्त्यावर चालवण्याचे वाहन नाही. त्यामुळे त्याचे अपघात, वाहन चालु असतांन होणे शक्य नाही, ही गोष्ट गैरअर्जदारांना माहीती आहे व ती माहीती असुन सुध्दा रु.18,628/- विमा हप्ता घेऊन सदरील खोदकाम यंत्राचे विमा उतरवलेले आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 सदरची विमा रक्कम देण्याची जबाबदारी टाळू शकत नाही. गैरअर्जदार क्र. 3 हे फायनान्स कंपनी आहे, त्यांचा विमा देण्याशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे विमा रक्कम व उर्वरित खर्च हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी भरपाई करावी असे मत मंचाचे आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरीत्या अर्जदारास विमा रक्कम रु.1,63,759/- हे दि.20/11/2008 पासुन एक महिन्यात 9 टक्के व्याज दाराने द्यावे. सदरील रक्कम एक महिन्यात न दिल्यास सदर रक्कम फिटेपर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास 12 टक्के व्याजाने रक्कम द्यावी. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल व दावा खर्चाबद्यल रु.25,000/- एक महिन्यात द्यावे, व गैरअर्जदार क्र. 3 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही, या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरीत्या अर्जदारास विमा रक्कम रु.1,63,759/- हे दि.20/11/2008 पासुन एक महिन्यात 9 टक्के व्याज दाराने द्यावे. सदरील रक्कम एक महिन्यात न दिल्यास सदर रक्कम फिटेपर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास 12 टक्के व्याजाने रक्कम द्यावी. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी फिर्यादीस मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- तीस दिवसांचे आंत द्यावे. 4. गैरअर्जदार क्र. 3 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही 5. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती पाठविण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |