Maharashtra

Dhule

CC/13/18

Sakharbai Nimba Patil - Complainant(s)

Versus

The New India Insurance Co - Opp.Party(s)

Shri A.R.Salunke

09 Dec 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/13/18
 
1. Sakharbai Nimba Patil
R/o Naulane Tal Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Co
Hemkund chember,Nehru Palace New Delhi 110019
New Delhi
New Delhi
2. The New India Insurance Co
Yashovallbah Shopping complex near Muncipal Corporation Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S.S. Joshi PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. K.S. Jagpati MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –    १८/२०१३

                                  तक्रार दाखल दिनांक  – १८/०३/२०१३                             तक्रार निकाली दिनांक – ०९/१२/२०१४

साखरबाई निंबा पाटील (सुर्यवंशी)  

उ.व.४० वर्षे, धंदा–घरकाम,   

रा. नवलाणे, ता.जि.धुळे                              . तक्रारदार

 

        विरुध्‍द

१) द न्‍यु इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कं.

   हेमकुंड चेंबर, नेहरू पॅलेस,

   न्‍यु दिल्‍ली – ११००१९.

२) दि.न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कं.लि. शाखा धुळे.

   यशोवल्‍लभ शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स,

   नगरपालिकाजवळ धुळे

   ता.जि. धुळे

   (नं.१ ची नोटीस बजावणी नं.२ वर करण्‍यात यावी)    . सामनेवाला

  •  

 (मा.प्रभारी अध्‍यक्ष – श्री.एस.एस. जोशी)

(मा.सदस्‍या – सौ.के.एस. जगपती)

उपस्थिती

(तक्रारदारातर्फे – अॅड. श्री.डी.डी. शार्दुल)

(सामनेवाले क्र.१ व २ तर्फे – अॅड.सी.पी. कुलकर्णी)

 

निकालपत्र

 (द्वाराः मा.सदस्‍या – सौ.के.एस. जगपती)

 

१.   सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात त्रुटी केली, या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

२.   तक्रारदार यांनी तक्रारीत म्‍हटले आहे की, तक्रारदारांचे मयत पती श्री.निंबा पुंडलिक पाटील यांनी दि.२६/११/२०११ रोजी एस्‍कॉर्ट पॉवर ट्रॅक कंपनीचे अधिकृत विक्रेते साई ट्रॅक्‍टर्स यांच्‍याकडून मॉडेल एस्‍कॉर्ट पॉवर ट्रॅक ४४५ ओआयबी१एम, चेसिस नं.बी ३१६२१७५, इंजिन नं.इ-३१८०५९१ या वर्णनाचे ट्रॅक्‍टर विकत घेतलेले होते. ट्रॅक्‍टर विकत घेतेवेळी सामनेवाला कंपनीतर्फे ‘’हमरक्षक’’ नावाच्‍या विशेष विमा योजनेअंतर्गत ट्रॅक्‍टर विकत घेणा-यास विमा संरक्षण देण्‍यात आले होते. सदर मास्‍टर विमा पॉलिसीचा क्र.जीएपी /३११८००/ ४२/११/ ०१/००००००३३ असा असून त्‍यात रक्‍कम रूपये ७,००,०००/- विमा संरक्षण इनव्‍हॉईस तारखेपासून एक वर्ष कालावधिकरीता देण्‍यात आले होते.

 

     तक्रारदार यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदार यांचे पती दि.२९/०९/२०१२ रोजी लामकानी रोडवर मेहेरगाव ते कावठी गावाकडे जाणा-या चौफुलीवर झालेल्‍या रोड अपघातात दि.०१/१०/२०१२ रोजी मयत झालेले आहेत.   सदर अपघाताची तोंडी सुचना तक्रारदार यांच्‍या मुलाने सामनेवाला विमा कंपनीला दिली होती.  परंतु विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा सर्टिफिकेटवर वाहन खरेदीची मुळ तारीख दि.२६/११/२०११ अशी असतांना दि.१९/१०/२०११ अशी खोटी तारीख टाकुन सदर क्‍लेम नियमांत बसत नाही म्‍हणून नाकारला.     

 

     तक्रारदाराचे म्‍हणणे की, त्‍यांच्‍या पतीचा मृत्‍यु दि.०१/१०/२०१२ रोजी झालेला आहे. तक्रारदार यांच्‍या पतीने दि.२६/११/२०११ रोजी ट्रॅक्‍टर विकत घेतलेले होते. सामनेवाला यांच्‍या पॉलिसीच्‍या नियमानुसार ट्रॅक्‍टर खरेदी केल्‍याच्‍या एक वर्षाच्‍या आत विमा पॉलिसीचे फायदे मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे. सदरचा क्‍लेम नाकारून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली, म्‍हणून सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.  सबब तक्रारदार यांनी विमा पॉलिसीची रक्‍कम रूपये ७,००,०००/-, विमा पॉलिसीचे फायदे तसेच संपुर्ण रकमेवर द.सा.द.शे.१८% प्रमाणे व्‍याज सामनेवाला यांच्‍याकडून देण्‍याचे आदेश व्‍हावे म्‍हणुन विनंती केलेली आहे.         

३.   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ट्यर्थ नि.४ वर दस्‍तऐवज यादी दाखल केलेली आहे. त्‍यात इन्‍शुरन्‍स सर्टि‍फिकीट, विमा योजनेचे माहितीपत्र, पोस्‍टमार्टम रिपोर्ट, फिर्याद, इनव्‍हॉइस, नोटीस इत्‍यादी दस्‍तऐवज दाखल केलेले आहे. निशाणी १६ वर मूळ इनव्‍हॉईसची प्रत दाखल केली आहे.

४.   सामनेवाला क्र.१ व २ हे वकीलामार्फत मंचात हजर झाले. त्‍यांनी नि.१० वर आपला संयुक्‍त खुलासा दाखल केलेला आहे. त्‍यात त्‍यांनी तक्रारदाराचे संपुर्ण म्‍हणणे नाकबुल केलेले आहे. सामनेवाला कंपनीने कुठलीही सेवेत त्रुटी केलेली नाही.  सामनेवाला यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदाराने साई ट्रॅक्‍टर्स धुळे व एस्‍कॅर्टस कंपनी या दोघांना आवश्‍यक पार्टी म्‍हणुन सामील केलेले नाही. म्‍हणून नॉन जॉईंडर ऑफ पार्टीची बाधा येते.

 

     तसेच सामनेवाला यांचे पुढे म्‍हणणे की, ट्रॅक्‍टर खरेदीचा इनव्‍हॉईस दि.१२/०९/२०११ रोजीचा आहे. त्‍यामुळे विमा पॉलिसी दि.१२/०९/११ ते दि.११/०९/१२ या कालावधिसाठी ग्राह्य होती. त्‍यामुळे दि.११/०९/२०१२ रोजी सदर पॉलिसी संपुष्‍टात आलेली आहे. सदर तक्रारदाराचा क्‍लेम नाकारून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती सामनेवाले यांनी केलेली आहे.   

 

५.   तक्रारदार यांनी नि. २७ वर पुन्‍हा दस्‍तऐवज यादी दाखल केलेली आहे.  त्‍यात साई ट्रॅक्‍टरचे कोटेशन, साई ट्रॅक्‍टरचे इनव्‍हाईस, ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचे आर.सी. बुक, आय.सी.आय.सी.आय. बॅंकेचा खाते उतारा इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहे.   

 

६.   तक्रारदार यांची तक्रार, त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा, त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि उभयपक्षांच्‍या वकिलांनी केलेला युक्तिवाद याचा विचार करता आमच्‍यासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात.

 

              मुद्दे                                    निष्‍कर्ष

  1.  सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम

 नाकारून सेवेत त्रुटी केलेली आहे काय  ?               होय 

  ब.  आदेश काय ?                               अंतिम आदेशाप्रमाणे

  • वेचन

 

७.   मुद्दा -  तक्रारदारांचे मयत पती श्री.निंबा पुंडलिक पाटील यांनी एस्‍कॉर्ट पॉवर ट्रॅक कंपनीचे अधिकृत विक्रेते साई ट्रॅक्‍टर्स यांच्‍याकडून ट्रॅक्‍टर मॉडेल एस्‍कॉर्ट पॉवर ट्रॅक ४४५ ओआयबी१एम विकत घेतलेले होते. सदर ट्रॅक्‍टर घेतावेळी त्‍यांना विक्रेत्‍याकडून सामनेवाला यांची ‘’हमरक्षक’’ नावाची विमा पॉलिसी एक वर्षाच्‍या  कालावधिसाठी देण्‍यात आली होती. याबद्दल उभयपक्षात वाद नाही.  तसेच तक्रारदार यांचे पती श्री.निंबा पुंडलिक पाटील यांचा मृत्‍यु झालेला आहे ही बाब सामनेवाले यांना मान्‍य आहे.

 

 

     तक्रारदार यांचे मयत पती यांनी सामनेवाले इन्‍शुरन्‍स कंपनीकडून विमा काढलेला आहे व सदर कंपनीला सामनेवाला म्‍हणुन सामील केलेले आहे.  यात नॉन जॉईंडर ऑफ पार्टीची बाधा आलेली नाही, असे मंचाचे मत आहे.   

 

 

     तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या नि.९ वरील दस्‍तऐवज यादीतील पोस्‍टमार्टम रिपोर्ट, फिर्याद यावरून तक्रारदार यांच्‍या पतीचा मृत्‍यु अपघातामुळे दि.०१/१०/२०१२ रोजी झालेला दिसुन येतो. तक्रारदाराच्‍या मयत पतीने साई ट्रॅक्‍टर्स यांच्‍याकडून दि.२६/११/२०११ रोजी ट्रॅक्‍टर खरेदी केल्‍याचे ईनव्‍हॉईस दाखल केलेले दिसून येत आहे.

 

 

 

     सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या बचावाच्‍या पुष्‍ट्यर्थ इन्‍शुरन्‍स सर्टिफिकेटची छायांकीत प्रत दाखल केलेली आहेत. त्‍यात इनव्‍हॉईसची तारीख हाताने दि.१२/०९/२०११ लिहिलेली दिसते. तसेच या व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणताही पुरावा सामनेवाले यांनी मंचासमोर आणलेला नाही. म्‍हणून इन्‍शुरन्‍स सर्टिफिकेटच्‍या  छायांकीत प्रतीवर मंच विश्‍वास ठेवू शकत नाही.

 

 

     तक्रारदार यांनी नि.२७ वर साई ट्रॅक्‍टर्सचे टॅक्‍स ईनव्‍हॉईस आणि आय.सी.आय.सी.आय. बॅंकेच्‍या खाते उता-याची सत्‍यप्रत दाखल कलेली आहे. त्‍यावर इनव्‍हॉईस तारीख दि.२६/११/२०११ टाकलेली दिसत आहे. वरील दस्‍ताचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता इन्‍शुरन्‍स सर्टिफिकेटवर चुकीची तारीख नमूद असल्‍याचे दिसते. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराच्‍या पतीचा मृत्‍यु दि.०१/१०/२०१२ रोजी झालेला आहे व सामनेवाला यांच्‍याकडून मयत निंबा पाटील यांनी दि.२६/११/२०११ रोजी एस्‍कॉर्ट पॉवर ट्रॅक कंपनीचे ट्रॅक्‍टर विकत घेतलेले दिसत आहे. तक्रारदाराने नोटीस पाठवून सुध्‍दा सामनेवाले यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना मंचात तक्रार दाखल करावी लागली.  सदर तक्रारदाराचा विमा क्‍लेम मुदतीत असुन विमा क्‍लेमची रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत.  सदर विमा क्‍लेम नाकारून सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्‍यात त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून आम्‍ही   मुद्दा ‘अ’ चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

 

 

 

८. मुद्दा -  वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदार ह्या त्‍यांचे मयत पती श्री.निंबा पुंडलिक पाटील यांच्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे हे स्‍पष्‍ट होते. सामनेवाले यांनी सेवेत कसूर केल्‍यामुळे तक्रारदार यांना या मंचात दाद मागावी लागली. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्चही सहन करावा लागला. त्‍याबद्दलही त्‍यांना अनुक्रमे रूपये ५,०००/- व रूपये ३,०००/- भरपाई मिळायला हवी असे आमचे मत आहे. सामनेवाला क्र.१ हे वरिष्‍ठ कार्यालय आहे. सामनेवाला क्र.२ हे स्‍थानिक कार्यालय आहे. पॉलिसी प्रमाणपत्राचा विचार करता, त्‍यावर सामनेवाला क्र.१ चा पत्‍ता आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांना विम्‍याची रक्‍कम सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडून मिळणे अपेक्षीत आहे. त्‍यासाठी सामनेवाला क्र.२ यांनी पाठपुरावा करावा. सबब आम्‍ही सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याविरूध्‍द पुढीलप्रमाणे संयुक्‍त आदेश पारीत करीत आहोत.

 

  

आ दे श

 

  1. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

  1. सामनेवाला यांनी या निकालाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसांच्‍या आत तक्रारदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.

 

  1.   विमा रक्‍कम रूपये ७,००,०००/-(अक्षरी रूपये सात लाख मात्र)

  द्यावेत.

 

(ब)  तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार मात्र) द्यावेत. तसेच तक्रार खर्च     म्‍हणुन रक्‍कम रूपये ३,०००/- (अक्षरी रूपये तिन हजार मात्र)     द्यावेत.

 

 

३.   उपरोक्‍त आदेश क्र.२(अ) ची मुदतीत पुर्तता न केल्‍यास त्‍यावर मंचात    तक्रार दाखल तारखेपासुन संपुर्ण रक्‍कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे. ६%    प्रमाणे व्‍याज द्यावे.

 

 

 

  1.  

दिनांक ०९/१२/२०१४

 

                  (सौ.के.एस. जगपती)   (श्री.एस.एस. जोशी)

                        सदस्‍या           प्र.अध्‍यक्ष

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MRS. K.S. Jagpati]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.