THE NEW INDIA INSURANCE CO.LTD.THROUGH DIVISIONAL MANAGER V/S SMT.TRIVENIBAI KACHRUJI WANKHEDE
SMT.TRIVENIBAI KACHRUJI WANKHEDE filed a consumer case on 30 Mar 2015 against THE NEW INDIA INSURANCE CO.LTD.THROUGH DIVISIONAL MANAGER in the Wardha Consumer Court. The case no is CC/76/2014 and the judgment uploaded on 07 Apr 2015.
Maharashtra
Wardha
CC/76/2014
SMT.TRIVENIBAI KACHRUJI WANKHEDE - Complainant(s)
Versus
THE NEW INDIA INSURANCE CO.LTD.THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)
ADV.KHSIRSAGAR
30 Mar 2015
ORDER
निकालपत्र
( पारित दिनांक :30/03/2015)
( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये)
तक्रारकर्तीनेग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रारविरुध्द पक्षा विरुध्द दाखल केलेली आहे.
तक्रारकर्तीच्यातक्रारीचा आशयथोडक्यात असाकी,त.क.चे पती मयत कचरुजी डोमाजी वानखेडे यांच्या मालकीची मौजा-खुर्सापार, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथे भूमापन क्रं. 81 ही शेत जमीन आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत वि.प. 1 व 2 कडे विमा उतरविला आहे. त.क.चे पती हे शेतकरी असल्यामुळे व विमा पॉलिसीच्या कालावधीमध्ये त्यांचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे व ते त.क.चे पती हे शेतकरी होते म्हणून तक्रारकर्ती ही सदर विम्याची लाभार्थी आहे.
त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, दि. 06.08.2012 रोजी तिचे पती कचरुजी डोमाजी वानखेडे हे रात्री आपल्या शेतात झोपले असतांना त्यांना विषारी सापाने दंश केल्यामुळे उपचारा दरम्यान दि.11.08.2012 रोजी त्यांचा सर्पदंशाने मृत्यु झाला. तिच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने दि. 03.12.2012 रोजी सर्व दस्ताऐवज सोबत रीतसर अर्ज केला. परंतु दि. 30.05.2013 रोजी वि.प. 1 ने पत्र पाठवून गाव नमुना 6 ड हा दिला नसल्याने व विसेरा रासायनिक विश्लेषन अहवाल दिलेला नसल्यामुळे त.क.चा दावा नामंजूर करण्यात आल्याचे कळविले. वास्तविकतः त.क.चे पती हे शेतकरी होते व त्यांचा अपघाती मृत्यु झाला व सर्व कागदपत्र देऊन सुध्दा वि.प. 1 ने त.क.चा विमा दावा नाकारुन त्याने सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केलेला आहे. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख) 18 टक्के व्याजासह, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 15,000/-रुपये मिळावा अशी मागणी केली आहे.
वि.प. 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्रं. 19 वर दाखल केलेला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. त्यांनी असे कथन केले की, मयत कचरुजी डोमाजी वानखेडे यांची शेती मौजा खुर्सापार, ता. समुद्रपूर,जि. वर्धा येथे होती व त्यांचा मृत्यु हा सेवाग्राम येथील दवाखान्यात झाला. त्यामुळे सदर कागदपत्राची पैरवी वि.प. 3 यांच्या कार्यशैलीत येत नसतांना त्यांनी सदरचे कागदपत्रे वि.प.1 ला वि.प.2 तर्फे दि.30.04.2013 ला प्राप्त झाले. त्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यामध्ये फॉर्म ड व विसेरा रिपोर्ट जोडलेला नव्हता. त्या कागदपत्रांची मागणी वि.प. 1 ने विमा पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच दि. 14.11.2012 च्या पूर्वी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले असता, कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे दि.30.05.2013 रोजी कृषी अधिकारी पुणे व वि.प. 2 यांना पत्र पाठवून त.क.चा क्लेम हा शासनाच्या करारातील शर्ती व अटीनुसार मुख्य दस्ताऐवज न दिल्यामुळे नामंजूर करण्यात आल्याचे कळविले. वि.प. 1 ने सर्व कागदपत्रांची योग्य त-हेने हाताळणी करुन विमा दावा नाकारलेला आहे. त्यामुळे त्यांनी त.क. यांना सेवा देण्यात कोणताही कसूर केलेला नाही. म्हणून त.क.ची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केलेली आहे.
विरुध्द पक्ष क्रमांक 3 ने त्याचा लेखी जबाब नि.क्रं. 7 वर दाखल केला असून तक्रारकर्ती ही त्याची ग्राहक होऊ शकत नाही असे नमूद केले आहे. त्यांनी शेतक-यांच्या वतीने विमा पॉलिसीचा प्रिमीयम भरुन काढलेल्या सदरील विमा पॉलिसीचे पॉलिसीधारक बेनिफिशरी आहेत असे कथन केलेले आहे. शेतकरी कचरु डोमाजी वानखेडे यांचा अपघात दिनांक 11.08.2012 रोजी झाला व तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज दिनांक 03.12.2012 रोजी त्याच्या कार्यालयास प्राप्त झाला. दाव्यातील दस्ताऐवज परिपूर्ण प्राप्त झाल्यानंतरच सदर प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नागपूर कार्यालयास दि.13.12.2012 रोजी अन्वये सादर केलेला आहे. त्यामुळे त्यांनी कोणतीही सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केलेला नाही. म्हणून त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती केलेली आहे.
त.क.ने तिच्या कथनाच्या पृष्ठयर्थ स्वतः चे शपथपत्र नि.क्रं. 20 वर दाखल केले असून, एकूण 13 कागदपत्र वर्णन यादी नि.क्रं. 3 प्रमाणे दाखल केली आहे. वि.प. 1 व 2 यांनी शपथपत्र दाखल केलेले नाही किंवा कोणताही पुरावा दिलेला नाही व तसा कोणताही पुरावा द्यावयाचा नाही, याकरिता नि.क्रं. 22 वर पुरसीस दाखल केली. त.क.ने तिचा लेखी युक्तिवाद नि.क्रं. 21 वर दाखल केला असून वि.प. 1 व 2 ने त्याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं. 27 वर दाखल केला आहे. त.क. व वि.प. 1 व 2 चे अधिवक्ता यांचा तोंडी युक्तिवाद ऐकूण घेण्यात आला.
वरीलप्रमाणे तक्रारकर्ती व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढील प्रमाणे आहे.
अ.क्रं.
मुद्दे
उत्तर
1
विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ?
होय
2
तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ?
अंशतः
3
अंतिम आदेश काय ?
तक्रार अंशतः मंजूर.
-: कारणमिमांसा :-
मुद्दा क्रं.1व 2 बाबत , ः-त.क. चे पती हे शेतकरी होते व त्यांचा मृत्यु दि.11.08.2012 रोजी झाला हे वादातीत नाही. तसेच त.क.ने पतीच्या मृत्युनंतर दि.03.12.2012 रोजी रीतसर अर्ज भरुन कागदपत्रासह वि.प. 3 मार्फत वि.प. 1 व 2 कडे विमा प्रस्ताव पाठविला. परंतु वि.प. 1 ने त.क.चा विमा दावा फॉर्म ड व विसेरा रिपोर्ट प्रस्तावा सोबत जोडलेला नाही, ती मागणी करुन ही पॉलिसीच्या विहित मुदतीत दाखल न केल्यामुळे त.क.चा विमा दावा नामंजूर केला. त.क.ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सुध्दा असे दिसून येते की, त.क.च्या पतीच्या नांवे मौजा-खुर्सापार, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथे भूमापन क्रं. 81, 1 हेक्टर 82 आर. ही शेत जमीन होती. त्याच्या मृत्युनंतर सदर शेतजमीन ही त्याची पत्नी, मुलगा व मुलगी यांच्या नांवाने करण्यात आली आहे. तसेच फेरफारची नक्कल नि.क्रं. 3(7) चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, कचरु डोमाजी वानखेडे यांचा मृत्यु दि. 11.08.2012 रोजी झाला व त्याप्रमाणे त्यांच्या वारसांच्या नांवाने त्याची शेतजमीन करण्यात आली. दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सुध्दा असे दिसून येते की, मृत्यु समयी कचरु डोमाजी वानखेडे हे शेतकरी होते.
कचरु डोमाजी वानखेडे यांच्या मृत्युच्या कारणासंबंधी विचार करावयाचा झाल्यास त.क.ने पोलिसांनी केलेल्या चौकशीचे कागदपत्राची झेरॉक्स प्रती दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, घटनेच्या दिवशी रात्री मयत कचरु डोमाजी वानखेडे हा शेतात झोपलेला असतांना त्याला सर्पदंश झाला व दवाखान्यात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. त.क. ने शवविच्छेदनाचा अहवाल नि.क्रं. 3(9) वर दाखल केला आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वैद्यकीय अधिका-याने त्याचे मत रासायनिक विश्लेशन रिपोर्टसाठी राखीव ठेवले व विसेरा, रक्त, त्वचा ही विश्लेषन अहवाल नि.क्रं. 3(10) सोबत दाखल केला. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विसेरा मध्ये कुठलेही केमिकल (रासायनिक) विष आढळून आले नाही. परंतु वैद्यकीय अधिका-याने जे शेवटचे मत दिले आहे, त्यात त्यांनी अॅनिमल बाईट (Animal Bite) मुळेच कचरु डोमाजी वानखेडे यांचा मृत्यु झाल्याचे नमूद केले आहे. ते मत त्यांनी कचरु वानखेडे यांच्या अंगावर असलेल्या जखमेवरुन नमूद केलेले आहे. जरी केमिकल रिपोर्ट व विसेरा मध्ये विष आढळून आले नाही तरी त्याचा मृत्यु हा विषारी सर्प दंशामुळे झाला हे वैद्यकीय अधिका-याच्या मता प्रमाणे व इतर कागदपत्रावरुन दिसून येते. अशा परिस्थितीत वि.प. 1 कंपनीने फक्त विश्लेषन अहवाल दाखल केलेला नसल्यामुळे जो त.क.चा विमा दावा नाकारलेला आहे तो असमर्थनीय आहे. कारण त्याच्याकडे कुठलीही चौकशी न करता, कचरु डोमाजी वानखेडे यांचा मृत्यु हा अपघाती नसल्यासंबंधीचा कुठलाही पुराव वि.प. 1 व 2 यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे मयत कचरु वानखेडे यांचा मृत्यु हा सर्प दंशामुळे झालेला आहे हे सिध्द होते व त्याचा मृत्यु हा अपघाती होता व शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अशा अपघातात शेतक-याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्ति ते विमा पॉलिसीच्या रक्कमेचे लाभधारक होतात.
वि.प. 1 कंपनीने 6 ड ची मागणी करुन ही त.क.ने मुदतीत दाखल केले नाही म्हणून सुध्दा विमा दावा नाकारल्याचे कथन केले आहे. परंतु कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. यांनी जो त.क.चे प्रकरण कागदपत्रासह वि.प. 1 कडे पाठविले त्या पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क.ने मुळ दावा अर्जा सोबत तलाठयाचे कचरु वानखेडे हे शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र , 7/12 फेरफार, 6-क चा उतारा तसेच तहसिलदार समुद्रपूर यांचे त.क.च्या मुलाल आलेले पत्र व अपघाता संबंधी आवश्यक कागदपत्र मुळ दाव्या सोबत वि.प. 1 कंपनीकडे पाठविले होते. फक्त 6-ड चा उतारा दाखल केला नाही म्हणून विमा दावा नाकारण्यात आला हे वि.प. 1 चे कृत्य सेवेतील त्रृटीपूर्ण व्यवहार या सदरात मोडते. तसेच 7/12 ची फेरफारची निक्कलवरुन मयत कचरु डोमाजी वानखेडे हे शेतकरी होते हे सिध्द होते आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त.क. हे शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्ती विम्याची रक्कम मिळण्यास विमा लाभधारक होते. म्हणून वि.प. 1 यांनी शुल्लक कारणावरुन त.क.चा विमा दावा नाकारणे ही निश्चितच सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार या संज्ञेत मोडते. म्हणून त.क. ही मयत कचरु वानखेडे यांची विधवा पत्नी या नात्याने विम्याची लाभधारक आहे व ती विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास पात्र आहे.
तसेच त.क.ने सर्व कागदपत्रासह विमा दावा वि.प. 1 व 2 कडे पाठवून सुध्दा त्यांनी ज्या शुल्लक कारणावरुन विमा दावा नाकारला, त्यामुळे त.क.ला मंचासमोर यावे लागले. म्हणून तिला निश्चितच मानसिक, शारीरिक त्रास झालेला आहे. त्याचे स्वरुप पाहता या सदराखाली तक्रारकर्तीला रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 3000/-रुपये मंजूर करणे मंचाला योग्य वाटते. तसेच तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून त.क.ला रुपये 1,00,000/- वर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह रक्कम मंजूर करणे संयुक्तिक वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1 तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2 विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 दी न्यू इंडिया इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड यांनी तक्रारकर्तीला तिचे पती मृतक कचरु डोमाजी वानखेडे यांच्या मृत्युबाबत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 30.05.2013 पासून तर प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी.
3 विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावेत.
4 विरुध्द पक्ष क्रं. 3 यांना या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने करावी.
5 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
6 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.