Maharashtra

Wardha

CC/40/2013

SMT.SHARDA PURUSHOTTAM DHAGE +1 - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE CO.LTD.THROUGH DIVISIONAL MANAGER MOHAN LIMAYE +2 - Opp.Party(s)

KSHIRSAGAR

23 Jul 2014

ORDER

DIST. CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHWANT COLLEGE
WARDHA-442001
MAHARASHTRA (PH.NO.07152-243550 )
 
Complaint Case No. CC/40/2013
 
1. SMT.SHARDA PURUSHOTTAM DHAGE +1
ALIPUR,HINGANGHAT
WARDHA
MAHARASHTRA
2. SANTOSH PURUSHOTTAM DHAGE
ALIPUR,HINGANGHAT
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA INSURANCE CO.LTD.THROUGH DIVISIONAL MANAGER MOHAN LIMAYE +2
MUMBAI
MUMBAI
MAHARASHTRA
2. KABAL INSURANCE BROKING SERVICES LTD. THROUGH SANDEEP V. KHAIRNAR
NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI
HINGANGHAT
WARDHA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Milind B.Pawar PRESIDENT
 HON'BLE MR. Milind R. Kedar MEMBER
 HON'BLE MS. Smita N. Chandekar MEMBER
 
For the Complainant:KSHIRSAGAR, Advocate
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र

( पारीत दिनांक : 23/07/2014 )

( द्वारा प्रभारी अध्‍यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे) )

01.       अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.

1.   गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी ‘शेतकरी व्‍यक्तिगत अपघात    विमा’ योजने अंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही

   18 टक्‍के व्‍याजदराने द्यावी.

2.  मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.20,000/-

3.  तक्रारीचा खर्च रु.10000/-

 

अर्जदाराच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे आहे.

 

अर्जदारांनी सदर तक्रार अर्जामध्‍ये नमुद केले आहे की, अर्जदार, मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांची अर्जदार क्र.1 ही पत्‍नी असून अर्जदार क्र.2 हा मुलगा आहे. मयत मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचे नावे मौजा अलीपुर, ता.हिंगणघाट, जि.वर्धा येथे भुमापन क्र.466 अंतर्गत  शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्‍त शेतक-यांस व त्‍याच्‍या कुटुंबियास लाभ देण्‍याकरीता 15 ऑगस्‍ट 2011 ते 14 ऑगस्‍ट 2012 या कालावधीकरिता ‘शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना’ काढली.

1.   अर्जदार यांनी नमुद केले आहे की, मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचा दिनांक 19/07/2012 रोजी शेतात काम करीत असतांना सर्पदंशाने मृत्‍यु झाला. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यानी ‘शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना’ अंतर्गत राशी मिळण्‍याकरीता गैरअर्जदार क्र.2 यांचे मार्फत दिनांक 12/09/2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला विमा दाव्‍यासोबत सर्व कागतपत्रे सादर केले. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांचा विमा दावा दि.27/05/2013 रोजी पत्र पाठवुन कागदपत्रे मुदतीत दाखल केले नाही म्‍हणुन खारीज केला. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रृटी असुन त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचामध्‍ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.

02.    गैरअर्जदार क्र. 1/विमा कंपनी यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. मात्र सदर लेखी जवाब गैरअर्जदार क्र.1 यांनी प्रतिज्ञालेखावर दाखल केला नाही त्‍यामुळे तो पुरावेत वाचता येवु शकत नाही.

03.   गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांनी त्‍याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने/आरोप अमान्‍य करुन पुढे नमुद केले आहे की, अर्जदार हिने त्‍यांच्‍या कडे दिनांक 12/9/2012 रोजी विमा दावा दाखल केला होता. सदर अर्ज पुढील कार्यवाहीस्‍तव उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा यांच्‍या कडे दिनांक 20/9/2012 रोजी पाठविण्‍यात आली. त्‍यानंतर दिनांक 27/9/2012 रोजी जिल्‍हा कृषी अधिकारी यांचे मार्फत कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी यांना सादर करण्‍यात आला, परंतु त्‍यांनी काही कागदपत्रांची मागणी केली, त्‍यानंतर दिनांक 4/12/2012 ला गैरअर्जदार क्र.3 यांना जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना त्रुटीची पुर्तता करुन कागदपत्रे पाठविले. यात गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍यांच्‍या सेवेत कुठल्‍याही प्रकारची त्रुटी दिली नसल्‍यामुळे अर्जदाराची त्‍यांच्‍या विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.

04.   गैरअर्जदार क्र. 2 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग कंपनी यांनी त्‍याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक आणी विकास प्राइज़ भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्‍त विमा सल्‍लागार कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ते महाराष्‍ट्र राज्‍य शासनाला सदरील विमा योजना राबवण्‍यासाठी विना मोबदला सहाय्य करतात. यामध्‍ये मुख्‍यत्‍वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार याच्‍यामार्फत आल्‍यानंतर त्‍याची सहानिशा व तपासणी केल्‍यानंतर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडुन दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे ऐवढेच काम गैरअर्जदार क्र.2 यांचे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, वरील सर्व कामांकरीता ते राज्‍य शासन किंवा शेतकरी यांच्‍याकडुन कोणताही मोबदला घेत नाही तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमीअम घेतलेला नाही. सदर बाब ही मा.राज्‍य ग्राहक आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांनी आमचे म्‍हणणे ग्राहय धरले असुन तसा आदेशही पारीत केलेला असल्‍याचे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्‍हणणे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचा दिनांक 19/07/2012 रोजी शेतात काम करतांना सर्पदंशामुळे मृत्‍यु झाला व सदरील  प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्‍या मार्फत त्‍यांच्‍याकडे दिनांक 8/11/2012 रोजी प्राप्‍त झाला. त्‍यानंतर सदर प्रस्‍ताव हा पुढील कार्यवाहीकरीता गैरअर्जदार क्र.1/विमा कंपनीकडे दिनांक 4/12/2012 रोजी पाठविण्‍यात आला. गैरअर्जदार क्र.1/विमा कंपनीने सदरील प्रस्‍ताव हा प्रस्‍तावामध्‍ये आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता झाली नाही म्‍हणुन नामंजुर केला असुन त्‍याबाबत अर्जदार यांना दिनांक 27/5/2013 रोजीच्‍या पत्रान्‍वये कळविण्‍यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी नमुद केले आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या सेवेत कुठलीही चुक केलेली नसल्‍यामुळे सदरची अर्जदाराची त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.

03.       अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत विमा प्रपत्र, घटनास्‍थळ पंचनामा, एफ.आय.आर. पी.एम.रिपोर्ट, गाव नमुना 7/12, शेतकरी अपघात विमा योजना परीपत्रक, गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा दावा फेटाळण्‍याचे पत्र, इत्‍यादी एकुण 13 दस्‍तावेंजांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहे.

गैरअर्जदार 2 व 3 यांनी त्‍यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला आहे.

-: कारणे व निष्‍कर्ष :-

            प्रस्‍तुत प्रकरणात दोन्‍ही पक्षांतर्फे दाखल करण्‍यात आलेले सर्व दस्‍तावेज व प्रतिज्ञालेख बारकाईने पाहण्‍यात आले.

4.   सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्‍यू किंवा अपंगत्‍व आल्‍यास शेतकरी व त्‍यांच्‍या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्‍त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.

 

5.   अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्‍तावेजांवरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचे वारसदार या नात्‍याने, विमाधारक मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचा दिनांक 19/07/2012 रोजी शेतात काम करीत असतांना सर्पदंशाने मृत्‍यु झाला व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे दाखल नि.क्र.2 वरील पी.एम.रीपोर्ट, अकस्‍मात खबरी बुक, घटनास्‍थळ पंचनामा ईत्‍यादी दस्‍तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचा दिनांक 19/07/2012 रोजी शेतात काम करीत असतांना सर्पदंशाने मृत्‍यु झाला हे सिध्‍द होते.   

06.  मयत मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे हे शेतकरी होते या   पुष्‍ठर्थ भुमापन क्र.466 मध्‍ये ता.हिंगणघाट येथील 7/12 उतारा     निशानी क्र.2/5 कडे दाखल करण्‍यात आला आहे. यावरुन मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे हे शेतकरी होते व त्‍यांचा, शासन  निर्णया नुसार दिनांक 15 ऑगस्‍ट 2011 ते 14 ऑगस्‍ट 2012 या  कालावधी करीता शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा काढण्‍यात आला होता ही बाब स्‍पष्‍ट दिसुन येते.

07.  गैरअर्जदार क्र.2 कबाल इंश्‍युरन्‍स यांचे लेखी उत्‍तरावरुन मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचा दिनांक 19/07/2012 रोजी शेतात काम करीत असतांना सर्पदंशाने मृत्‍यु झाला व   त्‍यांच्‍या वारसांना  कृषि विमा अपघात योजने अंतर्गत विमा अर्ज दिनांक 8/11/2012 रोजी प्राप्‍त झाला व सदर प्रस्‍ताव त्‍यांचे गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालयास सादर केला. परंतु सदर प्रस्‍तावामध्‍ये आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. म्‍हणुन सदर बाब नि.क्र.2/2 वरील गैरअर्जदार क्र.1 यांचे पत्रावरुन सुध्‍दा दिसुन येते. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी आपला लेखी जवाब शपथ पत्रावर दाखल केला नाही, त्‍यामुळे तो पुरावेव्‍या कामी वाचता येवु शकला नाही. परंतु त्‍यानंतर सुध्‍दा गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी आपले बचावात्‍मक पुष्‍ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही.

        अर्जदार यांनी नि.क्र.2/2 कडे गैरअर्जदार क्र.1 यांचे दिनांक 27/5/2013 चे पत्र दाखल केले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा प्रस्‍तावासाठी आवश्‍यक कागदपत्रे वेळेत दाखल केली नाही म्‍हणुन विमा प्रस्‍ताव फेटाळला आहे. मात्र नि.क्र.7 सोबतचे गैरअर्जदार क्र.3 यांचे कागदपत्रांचे अवलोकन करता गैरअर्जदार क्र.3 यांनी आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असल्‍याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांना कोणती कागदपत्रे आवश्‍यक होती व त्‍यासाठी अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेशी काय पत्रव्‍यवहार केला यासबंधी कोणताही कागदोपत्री पुरावा या कामी दाखल केलेला नाही. तरीही गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी वेळेत कागदपत्रे मिळाली नाही म्‍हणुन विमा दावा फेटाळला आहे ही त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी ठरते.

10.    प्रस्‍तुत प्रकरणातील हकीकत व परिस्थितीवरुन असे दिसुन येते की, मयत श्री पुरुषोत्‍तम नारायण ढगे यांचा अपघाती मृत्‍यु   झालेला आहे. या शिवाय गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव योग्‍य मार्गाने गैरअर्जदार क्र. 2 व 3 मार्फत पोहचविण्‍यात आला. सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्‍यात आली. तरीही गैरअर्जदार क्र.1 यांनी तो असमर्थनिय कारणास्‍तव नामंजुर केला व त्‍यामुळे अर्जदार यांना विमा लाभ मिळाला नाही. म्‍हणुन अश्‍या परिस्थितीत, अर्जदारास विमा योजनेतील लाभापासुन वंचित ठेवणे हे न्‍यायोचित होणार नाही.

 

11.   उपरोक्‍त सर्व दस्‍ताऐवज, पुरावे व प्रतिज्ञालेखावरील पुरावे ग्राहय धरुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार महाराष्‍ट्र शासनामार्फत राबविण्‍यात येणा-या वैयक्तिक शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ रु.1,00,000/-      (रुपये एक लाख)  मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचास वाटते.

12.  गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्‍ताव वेळेत गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला व आपले कर्तव्‍य पार पाडले आहे, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना प्रस्‍तुत प्रकरणातुन मुक्‍त करणे न्‍यायोचित ठरेल.

13.  गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्‍या कर्तव्‍यात निष्‍काळजीपणा व हलगर्जीपणा केला, म्‍हणुन अर्जदारास विमा योजनेतील लाभांपासुन वंचित राहावे लागले, तसेच सदर प्रकरण दाखल करावे लागले ही बाब ग्राहय धरुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार, गैरअर्जदार क्र.1 कडुन मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 1500/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्‍यास पात्र आहे.

     उपरोक्‍त सर्व विवेचनांवरुन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.

// आदेश //

  1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुरकरण्‍यात येते.

  2. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी विमा रक्‍कम रुपये

         1,00,000/- ( रुपये एक लाख फक्‍त )अर्जदार क्र.1 व 2

         यांना समान हिस्‍स्‍याने सदर निकालाची प्रत प्राप्‍त

         झाल्‍यापासुन 30 दिवसांच्‍या आंत द्यावे,  तसेच  या

         रक्‍कमेवर दिनांक 20/06/2013 (तक्रार दाखल दिनांक)

         पासून ते पुर्ण रक्‍कम अदा करे पर्यंत

         दरसाल दरशेकडा 12 टक्‍के दराने होणा-या व्‍याजाची रक्‍कम

         अर्जदार यांना देण्‍यात यावी.

  3. वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झालेल्‍या

         दिनांकापासुन 30 दिवसांच्‍या आंत करावे. मुदतीत आदेशाचे

         पालन न केल्‍यास, मुदतीनंतर उपरोक्‍त रुपये 1,00,000/-

         व या रक्‍कमेवर दिनांक 20/06/2013 (तक्रार दाखल

         दिनांक)  पासून ते पुर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत दरसाल

         दरशेकडा 18 टक्‍के दराने दंडणीय व्‍याजासह रक्‍कम देण्‍यास

         गैरअर्जदार  क्र.1 जवाबदार राहतील.                                

  4. अर्जदार यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल

         गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रुपये 1500/- ( रुपये

         एक हजार पाचशे फक्‍त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 1000/-

         ( एक हजार फक्‍त)  सदर निकाल प्राप्‍ती पासून तीस

         दिवसांचे आंत द्यावे.

    5)   मा.सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधीतांनी परत

         घेवुन जाव्‍यात.

  5. निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्‍तव व

         उचित कार्यवाहीकरीता पाठविण्‍यात याव्‍यात. 

  6. गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्‍द आदेश नाही.

           

 
 
[HON'ABLE MR. Milind B.Pawar]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Milind R. Kedar]
MEMBER
 
[HON'BLE MS. Smita N. Chandekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.