Maharashtra

Wardha

CC/85/2013

SMT.SUSHILA GOVINDRAO DOMKAVALE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE CO.LTD.THROUGH DIVISIONAL MANAGER MOHAN LIMAYE + 2 - Opp.Party(s)

ADV.KSHIRSAGAR

13 Mar 2015

ORDER

निकालपत्र

( पारित दिनांक :26/02/2015)

(  मा. अध्‍यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्‍या आदेशान्‍वये)

 

1.                      तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍द पक्षाच्‍या  विरुध्‍द दाखल केलेली आहे.

2.                      तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा की, तिचे मृतक पती गोविंद निलकंठराव डोमकावळे यांच्‍या मालकीचे मौजा कांढळी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथे सर्व्‍हे नं. 29/1 ही शेतजमीन आहे. त.क. चे पती गोविंद निलकंठराव डोमकावळे यांचा दि. 20.07.2012 रोजी घरातील कुलरचा इलेक्‍ट्रीक शॉक लागून त्‍यांचा त्‍वरित मृत्‍यु झाला.

3.                      महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांसाठी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना सुरु केली असून त्‍याकरिता वि.प. 1 कडे विमा उतरविला आहे. सदर अपघात विम्‍याचा लाभ मिळण्‍यासाठी मृतकाची पत्‍नी या नात्‍याने त.क. पात्र आहे. त.क. चे पती शेतकरी असल्‍याने व अपघातात मृत्‍यु झाल्‍याने वि.प. 2 मार्फत वि.प. 1 कडे सदर विमा योजना अंतर्गत दि.04.03.2013 रोजी रीतसर अर्ज केला व वेळोवेळी वि.प.च्‍या मागणीप्रमाणे दस्‍ताऐवजाची पूर्तता केली. परंतु वि.प. 1 ने दि. 28.06.2013 रोजी त.क.स पत्र पाठवून 6-ड दस्‍ताऐवज व 7/12 उतारा न दिल्‍याने तिचा अर्ज फेटाळण्‍यात आल्‍याचे कळविले.

4.                           त.क. ने पुढे असे कथन केले आहे की, त.क.चे सासरे शेतकरी होते व त्‍यांच्‍या मृत्‍युनंतर तिचे पती हे आपोआप शेतकरी होते. परंतु सास-याच्‍या मृत्‍युनंतर त.क.च्‍या पतीचे 7/12 उता-यावर नांव चढविण्‍यात आले नसल्‍याने त्‍याचा नावाचा 7/12 व 6-ड उपलब्‍ध नाही.  परंतु जे दस्‍ताऐवज वि.प. 1 ला दिलेले आहे, त्‍यावरुन त.क.चे पती शेतकरी होते हे सिध्‍द होते. परंतु वि.प. 1 ने विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. त.क.चा विमा दावा फेटाळल्‍याने त.क.ला अतिशय मानसिक त्रास झाला असून वि.प.ने  विमा पॉलिसीप्रमाणे सदर विमा दाव्‍याची रक्‍कम देणे क्रमप्राप्‍त असल्‍याने त.क.ला आवश्‍यक ती सेवा प्रदान करण्‍यात कसूर केल्‍याने त.क.ने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल केली असून त्‍यात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1 लाख, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल व आर्थिक नुकसान भरपाई म्‍हणून 20,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्‍हणून 10,000/-रुपयाची मागणी केलेली आहे.

5.                      वि.प. 1 कंपनीने आपला लेखी जबाब नि.क्रं. 23 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्‍त विरोध केला आहे. त्‍याचे म्‍हणणे असे की, शासनाने शेतक-यांसाठी शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजना लागू केली व त्‍या अंतर्गत व पॉलिसीच्‍या अधिन व अटीनुसार ज्‍या लोकांचा मृत्‍यु किंवा अपंगत्‍व आले असेल त्‍यांना सदर योजनेचा लाभ देण्‍यात येतो हे मान्‍य केलेले असून इतर सर्व आक्षेप अमान्‍य केलेले आहे.

6.                      वि.प. 1 चे पुढे असे म्‍हणणे की, त.क.च्‍या पतीचा दि.20.07.2012 रोजी मृत्‍यु झाला त्‍या दिवशी त्‍याच्‍या नांवाने कोणतीही शेती नव्‍हती व सदरची घटना पॉलिसी अंतर्गत येत नाही. कारण शासनाने जी योजना राबविली आहे ती फक्‍त शेतक-यांकरिताच अपघात विमा योजना अंतर्गत केली आहे, इतरांकरिता नाही. विम्‍याच्‍या अटी व शर्तीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्‍याची जबाबदारी वि.प. 2 व 3 ची होती व ते सदर पॉलिसीच्‍या अधीन राहून दिलेल्‍या मुदतीच्‍या आत तसेच कट ऑफ डेटच्‍या आधी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्‍याची जबाबदारी आहे. परंतु वि.प. 2 व 3 यांनी विहित मुदतीत वि.प. 1 कडे कागदपत्रांची पूर्तता केली नाही. मयत गोविंद निलकंठ डोमकावळे यांच्‍या महसूल रेकॉर्डमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची नोंद नाही.  वि.प. यांनी सर्व कागदपत्राची तपासणी व पडताळणी करुन पॉलिसीच्‍या अधीन राहून त.क.चा क्‍लेम नामंजूर केला. त्‍यांनी सेवा देण्‍यामध्‍ये कोणताही कसूर केलेला नाही.

7.                      वि.प. 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं.10 वर दाखल केला असून  त्‍यात सदर कंपनी ही राज्‍य शासनाकडून कोणताही विमा प्रिमियम स्विकारत नाही आणि ती शासनाला विनामूल्‍य मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून सेवा देत असल्‍यामुळे त.क.चा विमा दावा देण्‍याची जबाबदारी वि.प. 2 ची नाही असे कथन केले आहे. केवळ कागदपत्रांची छाननी करुन विमा दावा वि.प. क्रं.1 कडे पाठविणे ही त्‍यांची जबाबदारी आहे. या शिवाय राज्‍य ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठाने अपील क्रं.1114/2008 मधील दि.16.03.2009 रोजी पारित केलेल्‍या आदेशाची प्रत आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ दाखल केली  आहे. त्‍याप्रमाणे विना मोबदला मध्‍यस्‍थ सेवा देणारी कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.कंपनी विमा ग्राहकाला विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नसल्‍याचा निर्णय दिला आहे.

8.                      तसेच वि.प. 2 ने असे कथन केले आहे की, गोविंदराव डोमकावळे मु.पो. कांढळी, ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांचा अपघात हा दि. 20.07.2012 रोजी झाला, यासंबंधीचा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी वर्धा मार्फत कबाल नागपूर कार्यालयास दि.12.03.2013 रोजी उशिरा व अपूर्ण प्राप्‍त झाला. त्‍यानंतर वि.प. 2 ने दि.15.03.2013 रोजी प्रस्‍ताव वि.प. 1 कडे पाठविला. त्‍यानंतर वि.प. 1 ने दि.28.06.2013 रोजीच्‍या पत्राद्वारे 6-ड व 7/12 ची पूर्तता न केल्‍याने विमा दावा नामंजूर केला असे कळविले. वि.प. 2 ला कारण नसतांना पक्षकार केलेले आहे. म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

9.                      वि.प. 3 यांनी लेखी उत्‍तर नि.क्रं. 12 वर दाखल केला असून  असून त्‍यांनी त.क.चा क्‍लेम मान्‍य केलेला आहे. वि.प. 3 ने असे कथन केले की, शेतकरी गोंविदनिलकंठ डोमकावळे याचा मृत्‍यु वारसदाराकडून प्रस्‍तावात नमूद केल्‍याप्रमाणे दि.20.07.2012 रोजी झाला. वि.प. 2 च्‍या कार्यालयास दि. 01.03.2012 रोजी सदरील विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाला. त्‍यांनी ते पुढील कार्यवाहीसाठी दि. 04.03.2013 रोजीच्‍या पत्रान्‍वये जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांच्‍याकडे पुढील कार्यवाहीकरिता सादर केला. वि.प. 3 ने त्‍याचे कर्तव्‍य पार पाडलेले असल्‍यामुळे ते तक्रारकर्तीस नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही. म्‍हणून वि.प. 3 यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी  अशी विनंती केलेली आहे.

10.                 त.क.ने तिच्‍या कथनाच्‍या पृष्‍ठयर्थ स्‍वतःचे शपथपत्र नि.क्रं. 24 वर दाखल केले असून एकूण 11 कागदपत्रे वर्णन यादी 2 प्रमाणे  दाखल केलेली आहे. वि.प. 1 ने त्‍यानी दाखल केलेले लेखी जबाब  हेच शपथपत्र ग्राहय धरण्‍यात यावे अशी पुरसीस नि.क्रं. 26 वर दाखल केलेली आहे. त.क.ने तिचा लेखी युक्तिवाद नि.क्रं. 25 वर दाखल केला असून वि.प.1 ने आपला लेखी युक्तिवाद नि.क्रं. 28 वर दाखल  केलेला आहे. त.क. व वि.प. 1 चे वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्‍यात आला.

11.                 वरील प्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्‍पर विरोधी विधानावरुन     खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्‍यावरील कारणमिमांसा    खालीलप्रमाणे आहे. 

अ.क्रं.

            मुद्दे

उत्‍तर

1

विरुध्‍द पक्ष क्रं 1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्‍यवहार व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे  काय ?

होय

2

तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास पात्र आहे काय ?

अंशतः

3

अंतिम आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर.

-: कारणमिमांसा :-

12.            मुद्दा क्रं.1 , 2  व 3  ः- तक्रारकर्तीच्‍या पतीचा दि. 20.07.2012 रोजी कुलरचा इलेक्‍ट्रीक शॉक लागून मृत्‍यु झाला हे वादातीत नाही.   त.क. ने दाखल केलेल्‍या     कागदपत्रावरुन सुध्‍दा असे दिसून येते की, त.क.चे पती हे इलेक्‍ट्रीक शॉक लागून मयत झाले आहे. यासंबंधी पोलिस स्‍टेशन सिंदी (रेल्‍वे) येथे मर्ग   क्रं.10/2012प्रमाणे नोंदविण्‍यात आले असून घटना स्‍थळ पंचनामा सुध्‍दा करण्‍यात आला आहे.शवविच्‍छेदन अहवाल वर्णन यादी नि.क्रं. 2(8) सोबत दाखल    केलेला     आहे. त्‍याचे अवलोकन केले असता वैद्यकीय अधिकारी, जनरल हॉस्‍पीटल वर्धा यांनी त.क.चे पतीचे मृत्‍युचे कारण हे इलेक्‍ट्रीक शॉक लागून झाल्‍याचे नमूद   केले आहे. यावरुन हे सिध्‍द होते की,त.क.चे पती घरातील कुलरचा इलेक्‍ट्रीक शॉक लागल्‍याने मयत झाले आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-यांकरिता शेतकरी      व्‍यक्तिगत अपघात विमा      योजने अंतर्गत वि.प. 1 कडे विमा पॉलिसी काढलेली असून सदर शेतक-यांचा मृत्‍यु झाल्‍यास   त्‍याच्‍या    लाभधारकास रु.1 लाख देण्‍याची तरतूद करण्‍यात आलेली आहे हे     सुध्‍दा वादातीत नाही.

13.                      त.क.ची तक्रार अशी आहे की, तिचे पती हे शेतकरी होते व त्‍यांच्‍या नांवावर मु.पो.कांढळी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथे सर्व्‍हे नं. 229/1 ही शेतजमीन होती. मृत्‍युनंतर तिने सर्व कागदपत्रासह विमा दावा वि.प. 2 व 3 मार्फत वि.प. 1 कडे पाठविला. परंतु वि.प. 1 ने अपघाताच्‍या वेळेस त.क.च्‍या पतीच्‍या नांवे शेती नव्‍हती व मुदतीत विमा दावा दाखल केलेला नाही या कारणावरुन दावा नामंजूर केला तो योग्‍य नाही. तसेच तिने असे कथन केले आहे की, तिच्‍या सास-याच्‍या नांवे शेतजमीन होती व सास-याच्‍या मृत्‍युनंतर त.क.चे पती आपोआप शेतकरी झाले होते. 7/12 वर नांव नोंदविलेले नाही. परंतु ती शेत जमीन मयत गोविंद निलकंठ डोमकावळे यांच्‍याकडे आल्‍याने तो शेतकरी झाला  होता. म्‍हणून विमा दाव्‍याची रक्‍कम त.क. लाभधारक

     म्‍हणून मिळण्‍यास पात्र आहे.

14.                      या उलट वि.प.1 ने असे कथन केले आहे की, मृत्‍यु समयी अपघाताच्‍या वेळेस गोंविद डोमकावळे यांच्‍या नांवावर शेती नव्‍हती, त्‍यामुळे तो शेतकरी होत नाही व त्‍यामुळे त्‍यांचा विमा काढण्‍यात आलेला नव्‍हता. म्‍हणून त.क. ही विमा लाभधारक होऊ शकत नाही व तिला विमा दाव्‍याची रक्‍कम मिळू शकत नाही. म्‍हणून वि.प. 1 ने जो विमा दावा नाकारला तो योग्‍य व कायदेशीर असून त्‍यांनी कोणतीही सेवेत त्रृटीपूर्ण व्‍यवहार केलेला नाही. त्‍यामुळे अपघाताच्‍या वेळेस त.क.चे पती हे शेतकरी होते व तो शेतकरी या संज्ञे खाली मोडते काय हे पाहणे जरुरीचे आहे. त.क.ने तिचे शपथपत्रा व्‍यतिरिक्‍त गाव नमुना सहा क चा उतारा वर्णन यादी नि.क्रं. 2 (4) प्रमाणे दाखल केली. तसेच 7/12 चा उतारा वर्णन यादी 2(5) प्रमाणे दाखल केली आहे. गाव नमुना 6 क च्‍या उता-याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, काढंळी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथे सर्व्‍हे नं.229/1 हे गोविंद निलकंठ डोमकावळे यांचे वडील डोमकावळे निलकंठ गंगाराम यांच्‍या नांवे होती व निलकंठ गंगाराम डोमकावळे  यांचा मृत्‍यु दि.14.04.2010 रोजी झाला. त्‍यानंतर गोविंद निलकंठ यांचा मृत्‍यु दि.20.07.2012 रोजी झाला व त्‍यानंतर सदरील जमीन त.क. व त्‍यांचे मुलाच्‍या नावांने नोंदविण्‍यात आली. सदरील फेरफार हा दि.17.09.2012 रोजी करण्‍यात आला. गोविंद निलकंठ डोमकावळे यांचा मृत्‍यु दि.20.07.2012 रोजी झाला. यावरुन निश्चितच असे दिसून येते की, मृत्‍यु समयी गोविंद डोमकावळे यांच्‍या नांवे जमीन नव्‍हती. परंतु त्‍यांच्‍या वडिलांच्‍या नांवे जमीन होती व त्‍यांच्‍या दि.14.04.2010 रोजी मृत्‍युनंतर गोविंद निलकंठ डोमकावळे हे निलकंठ गंगाराम डोमकावळे यांचा मुलगा वारस या नात्‍याने त्‍या जमिनीचा मालक झाला. फक्‍त त्‍याचे नांवाने फेरफार करण्‍यात आले नव्‍हते. परंतु मयत गोंविद डोमकावळे यांच्‍याकडे शेती होती व तो शेतकरी होता.

15.                     त.क.चे अधिवक्‍ता यांनी Reliance General Insurance Co. Ltd. Vs. Sakorba Hetubha Jadeja IV (2012) CPJ 51 (NC) या न्‍याय निवाडयाचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की, निलकंठ डोमकावळे यांच्‍या मृत्‍युनंतर जरी त्‍यांची शेती मयत गोविंद निलकंठ डोमकावळे यांच्‍या नांवे करण्‍यात आली नव्‍हती तरी पण तो त्‍या जमीनीचा मालक झाला होता. म्‍हणून तो शेतकरी होता. वि.प. 1 ने जो विमा दावा नाकारला आहे तो बेकायदेशीर आहे. वरील न्‍याय निवाडयामध्‍ये मा. राष्‍ट्रीय आयोगाने असे नमूद केले आहे की, Death of BJ was nearly five months before the date of entry, i.e. 12.04.2002- All his legal heirs became registered farmers immediately after death of their father – It was the only statutory process of registration of legal heirs in village record- HJ  became registered farmer in December, 2001, well before 26.01.2002, the date of inception of insurance policy- Complainants entitled to receive the sum insured- Repudiation not justified.

          हातातील प्रकरणात सुध्‍दा जरी गोविंद निलकंठ डोमकावळे यांचे नांवे त्‍यांच्‍या  वडिलांच्‍या मृत्‍युनंतर जमीन नोंदविण्‍यात आले नसली  तरी तो वारस या नात्‍याने त्‍याच्‍या वडिलांच्‍या नांवावर असलेल्‍या शेतीचा व्‍यवसाय करीत होता व तो मालक होतो व ती शेती तो वहिती करीत होता म्‍हणून तो शेतकरी होतो. तसेच त.क.ने वि.प. 1 कडे क्‍लेम फॉर्म सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रात तलाठयाचे गोविंद निलकंठ डोमकावळे हा शेतकरी होता असे प्रमाणपत्र दिले आहे व तसेच इतर कागदपत्र सोबत जोडलेले आहे. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत हा शेतकरी होता किंवा नाही आणि तो विमा कालावधीत मयत झाला काय हे पाहणे जरुरीचे आहे. त.क.ने दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन सुध्‍दा मयत हा शेतकरी होता हे सिध्‍द होते. त्‍यामुळे त्‍या कारणावरुन वि.प. 1 ने जो त.क.चा विमा दावा नाकारला तो असमर्थनीय आहे. त्‍यामुळे त.क. ही विमा दाव्‍याची रक्‍कम मयत पतीची लाभार्थी म्‍हणून रु. एक लाख मिळण्‍यास पात्र आहे.

16.                 तसेच वि.प. 1 ने त.क.चा विमा क्‍लेम कट ऑफ डेथ तारखेनंतर दाखल केला असल्‍यामुळे तो मंजूर करता येत नाही असे कथन केले आहे . हे सत्‍य आहे की, त.क. च्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु दि. 20.07.2012 रोजी झाला आणि त.क.ने प्रकरण दि. 04.03.2013 रोजी वि.प. 3 कडे सादर केला. शासनाच्‍या परिपत्रकात तालुका कृषी अधिकारी कडे प्रकरण सादर केल्‍याची तारीख हिच वि.प. 1 कडे विमा दावा दाखल केल्‍याची तारीख समजण्‍यात यावी असे नमूद केलेले आहे. जरी 90 दिवसाच्‍या आत प्रस्‍ताव दाखल करावा असे शासनाच्‍या परिपत्रकात नमूद केले असले तरी मुदतीच्‍या कारणावरुन विमा दावा वि.प. 1 ला नाकारता येणार नाही असे सुध्‍दा सदरील परिपत्रकात नमूद करण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे त्‍या कारणावरुन त.क.चा विमा दावा नाकारण्‍यात आला होता ते संयुक्तिक वाटत नाही. म्‍हणून वि.प. 1 ने त.क.चा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्‍यवहार व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे या निष्‍कर्षा प्रत मंच येते. त्‍यामुळे त.क. ही विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1 लाख मिळण्‍यास हक्‍कदार आहे या निष्‍कर्षा प्रत मंच येते.           

17.                 त.क.ने विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी वि.प. 1 कडे वि.प. 2 व 3 मार्फत दावा क्‍लेम पाठवून सुध्‍दा वि.प. 1 ने विमा दावा नामंजूर केला. त्‍याकरिता त.क.ला दाद मागण्‍याकरिता मंचासमोर यावे लागले. त्‍यामुळे निश्चितच त.क.ला शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्‍याचे स्‍वरुप पाहता तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून 2000/- रुपये मंजूर करणे मंचाला योग्‍य वाटते. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 व 2  वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

     वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

आदेश

1      तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2    विरुध्‍द पक्ष क्रं. 1 दी न्‍यू इंडिया एन्‍श्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड यांनी तक्रारकर्तीस मृतक पती गोविंदराव निलकंठ डोमकावळे यांच्‍या मृत्‍युबाबत शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम तक्रारकर्तीच्‍या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह द्यावी.

3    विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.2,000/- द्यावेत.

4    विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांना रक्‍कम देण्‍याच्‍या दायित्‍वातून मुक्‍त करण्‍यात येते.

                   वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत वि.प.क्रं. 1 ने करावी.

5       मा.सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधितांनी परत घेवून   जाव्‍यात.

6   निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव व उचित 

     कार्यवाही करिता पाठविण्‍यात याव्‍यात.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.