(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगिळ (वैदय)मा.सदस्या.)
(पारीत दिनांक :- ३१/०८/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार ही पोष्ट उदासा तह. उमरेड जिल्हा नागपूर येथिल रहीवासी असून तिचे पती श्री. दामु गजानन गहुकर यांचे मालकीचे मौजा सातारा (रि) ता. चिमुर जि. चंद्रपूर येथे भुमापन क्रं. १६०/०२ ही शेतजमीन आहे व तो शेतीचा व्यवसाय करतो. गैरअर्जदार क्रं. १ व २ ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्रं. ३ हे अपघात विमा दावे स्विकारतात. अर्जदाराच्या पतीने १ लाखचा विमा शासनाच्या वतीने गैरअर्जदाराकडुन उतरविला होता. परंतु दि. १८.०६.२०१३ रोजी घरी इलेक्ट्रीक शेवई मशीन दुरुस्त करत असतांना विजेचा धक्का लागल्याने अर्जदाराचे पती जागेवरच मरण पावले. तक्रारकर्तीच्या पतीचे शेतकरी व्यक्तिगत विमा असल्याने तिने गैरअर्जदार क्रं. ३ यांचेकडे दि. २०.०९.२०१३ रोजी रितसर अर्ज केला होता. व त्याने मागितलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. त्यानंतर १ वर्षे उलट़न गेल्यावरही गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी दावा मंजूर किंवा नामंजुर याबद्दल न कळविल्याने दि. १६.०८.२०१४ ला वकीलामार्फत नोटीस पाठविला.
२. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा अंतर्गत काही न कळविल्याने तिला मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला असल्यामुळे तिने सदर मंचात गैरअर्जदार क्रं. १ ते ३विरुध्द तक्रारदाखल केली आहे.
३. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने गैरअर्जदार क्रं. १ ते ३ यांनी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रु. १,००,०००/- तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदारांकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
४ अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. १ व २ हजर होवून नि. क्रं. १० वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं १ व २ ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या सर्व बाबी खोटया आहेत असे सांगून प्राथमिक आक्षेप घेतला आहे की, अर्जदार ही नागपूर जिल्हयातील रहिवासी असून गैरअर्जदार क्रं. १ व २ हे सुध्दा चंद्रपूर येथिल रहिवासी नाहीत. व सदर घटना अर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे नागपूर येथे घडली आहे. त्यामुळे सदर वाद चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यु शेवई मशीन दुरुस्ती करतांना विजेचा शॉक लागून झाला असे अर्जदाराच्या दस्ताऐवजावरुन आढळून आले. परंतु तिच्या पतीला मशीन दुरुस्त करण्याचे कोणतेही ज्ञान नव्हते व किंवा प्रशिक्षण ही नव्हते. त्याबद्रदल गैरअर्जदाराने दि. २५.०२.२०१४ रोजी अर्जदाराला पञ पाठवून मयत वायरमन होता का व असल्यास त्याच्या प्रमाणपञाची मागणी केली नाही. परंतु ते पञ प्राप्त होवून अर्जदाराने ते दाखल केले नाही. म्हणून वाट पाहून दि. ३०.०३.२०१४ ला अर्जदाराचा विमा दावा बंद केला. व त्याबद्दल दि. ३०.०३.२०१४ च्या पञात अर्जदाराला कळविले. अशा परिस्थितीत अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
५. गैरअर्जदार क्रं. ३ ने नि. क्रं. ०९ वर त्यांचे उत्तर दाखल केले व त्यात त्यांनी असे कथन केले कि, त्यांच्या कार्यालयाला दि.२०.०९.२०१३ रोजी अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाला त्यात त्यांनी ञुटीची पुर्तता करुन दि. २३.१०.२०१३ ला जि.अ.कृ.अ.चंद्रपूर यांच्याकडे सादर केला. दि. १४.१.२०१३ ला पुन्हा ञुटीची पुर्तता करण्याबाबत ता.कृ.अ. कार्यालयात पञ प्राप्त झाले. त्यामुळे अर्जदाराला दि.१३.०१.२०१४ ला शेतकरी अपघात विमा योजना शिबीरात उपस्थित राहायला सांगितले त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाशी व विमा कंपनीशी आमचा कोणताही पञ व्यवहार नाही.
६. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(१) अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. ०१ व ०२ चा
ग्राहक आहे काय ? होय.
(२) सदर तक्रार चालविण्याचा अधिकार क्षेञ या मंचाला आहे का ? होय.
(३) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(४) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(५) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
७. अर्जदार ही पोष्ट उदासा तह. उमरेड जिल्हा नागपूर येथिल रहीवासी असून तिचे पती श्री. दामु गजानन गहुकर यांचे मालकीचे मौजा सातारा (रि) ता. चिमुर जि. चंद्रपूर येथे भुमापन क्रं. १६०/०२ ही शेतजमीन आहे व तो शेतीचा व्यवसाय करतो. गैरअर्जदार क्रं. १ व २ ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्रं. ३ हे अपघात विमा दावे स्विकारतात. अर्जदाराच्या पतीने १ लाखाचा विमा शासनाच्या वतीने गैरअर्जदाराकडुन उतरविला होता. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे सबब अर्जदार ही गैरअर्जदारांची ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
८. अर्जदार हिच्या पतीच्या नावाने उपरोक्त तक्रारीत नोंदविलेली शेती आाहे व ती चंद्रपूर जिल्हयात आहे याबद्दल अर्जदाराने तक्रारीत नि. क्रं.०४ दस्त क्रं. ३ ते ६ वर दस्ताऐवज दाखल केलेले आहे. अर्जदाराचा पती जरी नागपूर जिल्हयाचा रहिवासी असला तरी सदर शेत जमीन त्याच्या मालकीची असून ती शेत जमीन मंचाच्या अधिकार क्षेञात येत असल्यामुळे प्रस्तु तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचाला आहे सबब मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ व ४ बाबत ः-
९. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या नि. क्रं. १६ वरील दस्त क्रं. ब – १ पञान्वये अर्जदाराला पञ पाठवून तिच्या पतीजवळ इलेक्ट्रीक मशीन दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण किंवा ज्ञाना बद्दल प्रमाणपञ आहे का त्याबद्दल विचारले परंतु अर्जदाराचे त्याबद्दल उत्तर न आल्याने त्यांनी अर्जदाराचा दावा खारीज करण्यात आला असे तक्रारीत दाखल केलेल्या नि. क्रं. १६ वरील दस्त क्रं. ब – २ वर पञ दाखल केलेले आहे. परंतु तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व अर्जदार यांनी नि. क्रं. १३ वरील दाखल केलेल्या महाराष्ट्र शासन निर्णय शेतकरी जनता अपघात विमा योजनेतील पृष्ठ क्रं. ०८ वरील मुद्दा क्रं. ०६ नूसार अपघाती मृत्यु सदंर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणावरुन एकही प्रकरण नाकारता येणार नाही. असे स्पष्ट नमुद केलेले आहे. सदर प्रकरणातील तक्रारकर्तीच्या पतीचा विजेचा शॉक लागून अपघाती मृत्यु झाल्याचे तक्रारकर्तीने दाखल नि. क्रं. ०४ वरील दस्त क्रं. ८ व ९ वरुन सिध्द होत आहे. म्हणून गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी अर्जदाराचा विमा दावा न देवून सेवेत ञुटी केलेली आहे. तसेच अर्जदाराप्रति गैरअर्जदाराने अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केला असल्याने मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
१०. मुद्दा क्रं. १ ते ४ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(२) गैरअर्जदार क्रं. १ व २ यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या
अर्जदाराला रु. १,००,०००/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे
आत दयावे.
(३) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदार
क्रं. १ व २ यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या
रु. ५,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ३,०००/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत करुन दयावे.
(४) गैरअर्जदार क्रं. ३ विरुध्द कोणताही आादेश नाही.
(५) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ३१/०८/२०१५