(मंचाचे निर्णयान्वये, अधि. कल्पना किशोर जांगडे (कुटे), सदस्या)
(पारीत दिनांक : 29 मार्च 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचा पती वासुदेव रामु किरंगे यांच्या मालकीचे मौजा मानापूर, ता.आरमोरी, जिल्हा – गडचिरोली येथे सर्व्हे क्र.79 ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीचा पती शेतीचा व्यवसाय करुन शेतातील उत्पन्नावर कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचा पती श्री वासुदेव रामु किरंगे हे शेतात जात असतांना लागूनच सरकारी नाला पाण्याने वाहत असून, अचानक पावसाचा लोंढा येताना नाल्यामध्ये बुडून दि.22.7.2012 रोजी मरण पावले. शासनातर्फे पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचा पती शेतकरी असल्याने व अपघात झाल्याने सदर तक्रारकर्ती विरुध्दपक्ष क्र.1 कडून रुपये 1,00,000/- चे विमा रकमेसाठी पाञ होती. तक्रारकर्तीने पतीचा अपघातात मृत्यु झाल्याने विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे विरुध्दपक्ष क्र.1 कडे सदर विमा योजने अंतर्गत दि.30.1.2013 ला रितसर अर्ज केला तसेच वेळोवेळी विरुध्द पक्षांनी जे दस्ताऐवज मागीतले त्याची पुर्तता केली. विरुध्दपक्ष क्र.1 ने दि.30.5.2013 चे पञ पाठवून दावा दाखल करण्यास उशिर झाल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा फेटाळत असल्याचे कळवील. वास्तविक, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना सर्व दस्ताऐवज वेळेत दिले, तसेच तक्रारकर्ती ही अशिक्षीत महिला आहे, तक्रारकर्तीचे काही दिवस शोकात असल्याने व सर्व कागदपञ जमा करण्यास वेळ गेल्याने तसेच, सदर विमा योजनेच्या अटी व शर्ती तक्रारकर्तीला माहिती नव्हते. तक्रारकर्तीला सदर दावा दि.14.11.2012 पर्यंत दाखल करावयाचा होता, परंतु ही अट तक्रारकर्तीला माहित नव्हती. गैरअर्जदार क्र.1 ने दस्ताऐवज मागणी केल्यानंतर त्याबाबतची विचारपूस गैरअर्जदार क्र.2 कडे करावयास पाहिजे होती तसेच तक्रारकर्तीला परत दस्तावेजाची मागणी करता आली असती, परंतु तसे काही न करता गैरअर्जदार क्र.1 ने दावा फेटाळून सेवेमध्ये ञुटी केली. यामुळे तक्रारकर्तीला अतिशय मानसिक ञास झाला. विमा पॉलिसी प्रमाणे तक्रारकर्ताला दाव्याची रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मंचाने नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- दि.30.1.2013 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह द्यावे, तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 20,000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदारांकडून मिळवून द्यावेत अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 10 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.16 नुसार लेखीउत्तर व नि.क्र.17 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.13 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.14 नुसार लेखीउत्तर दस्ताऐवजासह दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.16 वर सदर तक्रारीचे लेखीउत्तर दाखल केले आहे. सदर तक्रारीमध्ये तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 वर लावलेले आरोप गैरअर्जदार क्र.1 ने त्याचा लेखीउत्तरात नाकारले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने त्याच्या लेखीउत्तरात असा आक्षेप घेतला आहे की, तक्रारदाराने विमाक्लेम गैरअर्जदार क्र.3 कडे दि.30.1.2013 रोजी दाखल केलेला होता. तक्रादाराचा सदर विमाक्लेम मुदतीमध्ये नसल्यामुळे तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारण्यात आला.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे, त्याचेच ग्राहक होऊ शकतात. गैरअर्जदार क्र.2 केवळ मध्यस्थ सल्लागार आहे व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. गैरअर्जदार क्र. 2 ने पुढे नमूद केले की, सदर प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली मार्फत कबाल नागपूर कार्यालयास दि.14.3.2013 रोजी उशिरा प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव कबाल नागपूर मार्फत न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला पाठविला असता सदर दावा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीने सदरील दावा उशिरा प्राप्त झाल्या कारणाने दावा नामंजूर केला असून तसे दि.30.5.2013 च्या पञान्वये वारसदारास कळविण्यात आले. त्यामुळे, कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने अर्जाचा खर्च रुपये 5000/- अर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारीतून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली.
5. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमूद केले की, अर्जदाराचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी, आरमोरी कार्यालयाव्दारे सदर प्रस्ताव पञ क्र.309/20/13 दि.30.1.2013 अन्वये उपविभागीय कृषि अधिकारी, वडसा यांना सादर करण्यात आला. उपविभागीय कृषि अधिकारी अधिकारी वडसा यांचे पञ क्र. 204 / 13 दि.4.2.13 अन्वये प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांना सादर करण्यात आला. जिल्हा अधिाक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांचे पञ क्र.667/13 दि.27.2.13 अन्वये संदीप खैरनार, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्राईवेट लि. यांना आवश्यक सर्व दस्ताऐवजासह सादर करण्यात आला.
6. अर्जदाराने नि.क्र.20 नुसार शपथपञ व नि.क्र.21 नुसार लेखी युक्तीवाद, नि.क्र.24 नुसार 8 केस लॉ दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.22 नुसार 1 झेरॉक्स दस्ताऐवज, नि.क्र.23 नुसार शपथपञ, नि.क्र.26 नुसार 3 दस्ताऐवज, नि.क्र.27 नुसार 1 केस लॉ, नि.क्र.28 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले.
7. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा : अंतिम आदेशाप्रमाणे
लाभ मिळण्यास पाञ आहे काय ?
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
8. तक्रारकर्तीचा पती मय्यत वासुदेव रामु किरंगे याच्या मालकीचे मौजा मानापूर, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे सर्व्हे न.79 ही शेतीची जमीन आहे. तक्रारकर्तीचा पती शेतीचा व्यवसाय करीत होते व शेतीतील उत्पन्नावर तक्रारकर्तीचा पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पतीने महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.2 व 3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडून काढलेला होता. सदर विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- होती. तक्रारकर्तीचा पती मय्यत वासुदेव रामु किरंगे हे शेतामध्ये जात असतांना शेतीला लागूनच सरकारी नाला पाण्याने वाहत असून अचानक पावसाचा लोंढा येताना नाल्यामध्ये पडून दि.22.7.2012 रोजी मरण पावले. सदर बाब बाबत अर्जदार व गैरअर्जदारांचा कोणताही वाद नसल्यामुळे तक्रारकर्ती ही मय्यत श्री वासुदेव रामु किरंगे यांची पत्नी असून ती मय्यताची वारसदार आहे म्हणून तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
9. सदर प्रकरणात तक्रारकर्तीचा पती वासुदेव रामु किरंगे हे शेतीचा व्यवसाय करीत होते व त्याने महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- चा विमा गैरअर्जदार क्र.1 कडून काढलेला होता. तसेच तक्रारकर्तीचे पती श्री वासुदेव रामु किरंगे याचा मृत्यु दि.22.7.2012 रोजी शेतात जाताना नाल्यामध्ये पडून झाला, ही बाब तक्रारकर्ती व गैरअर्जदारांना मान्य आहे. तक्रारकर्तीने दि.30.1.2013 रोजी सदर विमा योजने अंतर्गत विमाक्लेम मिळण्याबाबत तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.3 कडे अर्ज केले होते, ही बाब सुध्दा तक्राकर्ती व गैरअर्जदारांना मान्य आहे.
शेतकरी जनता अपघात विमा योजना 2010-11 शासन निर्णय 10 ऑगष्ट 2010 प्रमाणे परिच्छेद क्र.8 मध्ये नमूद आहे ते खालील पमाणे.
‘‘8. विमा प्रस्ताव विहित कागदपञासह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच, योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत तालुका कृषि अधिका-याकडे प्राप्त झालले प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत या कारणास्तव विमा कंपन्याना प्रस्ताव नाकारता येणार नाहीत.’’
वरील शासनाचा निर्णयाचा आधार घेताना मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराचा विमादावा विषयीचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 नी बेकायदेशीर नामंजूर केलेला आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्ती प्रती न्युनतापूर्ण व्यवहार केलेला आहे.
10. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्ती प्रती न्युनतापूर्ण व्यवहार केला असल्यामुळे तक्रारकर्ती खालील आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
11. गै.अ.क्र.2 व 3 यांनी अर्जदाराला शासन निर्णयाप्रमाणे ‘शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत’ विमा रक्कम मिळण्यास विना मोबदला मदत केली. याकारणास्तव गै.अ.क्र.2 व 3 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदारबाईला विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावी, विमा रक्कम 30 दिवसाचे आत न दिल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अर्जदाराला द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-29/3/2014