Maharashtra

Gondia

CC/14/34

SMT. PUSHPA SUKHARAM BRAHMANKAR - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE CO.LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

MR.UDAY KSHIRSAGAR

29 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/14/34
 
1. SMT. PUSHPA SUKHARAM BRAHMANKAR
R/O.POST-IRRI, TAH.GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA INSURANCE CO.LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER
R/O.DIVISIONAL OFFICE NO.130800, NEW INDIA CENTER, 7 TH FLOOR, 17-A, KUPREJ ROAD, MUMBAI-400001
MUMBAI
MAHARASHTRA
2. THE NEW INDIA INSURANCE CO.LTD., THROUGH REGIONAL MANAGER
R/O. M.E.C.L. BUILDING , SEMINARY HILLS, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI SHRI. BHAURAO RAMAJI KOKODE
R/O.TAH.GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. सदस्‍या, कु. वर्षा ओ. पाटील)

 

- आदेश -

(पारित दि. 29 जानेवारी, 2015)

 

तक्रारकर्तीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्‍द पक्ष 1 यांनी फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्ती ही मौजा इर्री, तालुका जिल्‍हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. सुखराम सापकु ब्राम्‍हणकर यांच्‍या मालकीची मौजा इर्री, तालुका - जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 1081 या वर्णनाची शेतजमीन असल्‍यामुळे ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचे लाभधारक आहेत.      

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 3 हे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्‍याचे काम करतात.

 

4.    तक्रारकर्तीचे पती श्री. सुखराम सापकु ब्राम्‍हणकर हे दिनांक 01/01/2013 रोजी मित्राच्‍या मोटरसायकलवर बसून जात असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने त्‍यांना धडक दिल्‍याने जखमी होऊन जागेवरच त्‍याचा मृत्‍यु झाला.

 

5.    तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्‍याने व अपघातात त्‍यांचा मृत्‍यु झाल्‍याने तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे दिनांक 29/01/2014 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला व वेळोवेळी दस्‍तऐवजांची पूर्तता केली.  परंतु आवश्‍यक ते दस्‍तऐवज दिल्‍यानंतरही विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या पतीच्‍या दाव्‍याबाबत दिनांक 15/04/2014 रोजी पत्र पाठवून "दिलेल्‍या कागदपत्रानुसार सदर दावा आपण कां उशीरा दिला याचे सबळ कारण नमूद न केल्‍याने हा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे" असे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला कळविल्‍यामुळे तक्रारकर्तीने विमा दाव्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- मिळण्‍यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रू. 30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्‍यासाठी दिनांक 07/07/2014 रोजी मंचात तक्रार दाखल केली.   

 

6.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 31/07/2014 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 12/08/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी हजर होऊन त्‍यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.  विरूध्‍द पक्ष 3 यांना नोटीस मिळूनसुध्‍दा ते सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे तसेच लेखी जबाब सुध्‍दा दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 23/12/2014 रोजी मंचाद्वारा पारित करण्‍यात आला.  

 

7.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा जबाब दिनांक 10/11/2014 रोजी दाखल केला व तो पृष्‍ठ क्र. 56 वर आहे.  विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीचा विमा दावा हा मुदतीबाहेरचा आहे, इन्‍शुरन्‍स पॉलीसी दिनांक 22/09/2013 रोजी रात्री संपली आणि दावा अर्ज दिनांक 29/01/2014 रोजी केला असल्‍यामुळे दावा पॉलीसी संपण्‍याच्‍या 90 दिवसांच्‍या आंत करावयास पाहिजे होता असे त्‍यांनी त्‍यांच्‍या सदरहू लेखी जबाबात म्‍हटले आहे.  तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज मुदतीत दाखल केलेला नसल्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी. 

 

8.    तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना 2012-13 पृष्‍ठ क्र. 12 वर,  तलाठ्याचे प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 21 वर, 7/12 उतारा पृष्‍ठ क्र. 27 ते 29 वर, धारण जमिनीची नोंदवही पृष्‍ठ क्र. 30 ते 33 वर, मर्ग खबरी पृष्‍ठ क्र. 34 वर, घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 35 वर, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 37 वर, मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 45 वर, शाळा सोडल्‍याचा दाखला पृष्‍ठ क्र. 47 वर आणि तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्‍ठ क्र. 60 वर, तक्रारकर्तीच्‍या वकिलांचा लेखी युक्तिवाद पृष्‍ठ क्र. 62 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.           

 

9.    तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद पृष्‍ठ क्र. 62 वर दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या दाव्‍याबाबत दिनांक 15/04/2014 रोजी पत्र पाठवून "दिलेल्‍या कागदपत्रानुसार सदर दावा आपण कां उशीरा दिला याचे सबळ कारण नमूद न केल्‍याने हा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे" ह्या शे-यासह फेटाळला.  शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्‍या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार शेतक-याच्‍या अपघाताबाबत केवळ अपघात झाला ह्या कारणास्‍तव दावा मंजूर करावा व विहित मुदतीत प्रस्‍ताव सादर केला नाही ह्या कारणास्‍तव दावा नाकारता येणार नाही असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या लेखी युक्तिवादात सांगितले.  करिता तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर करण्‍यात यावे.

 

10.   विरूध्‍द पक्ष 1 व 2 च्या वकील ऍड. श्रीमती इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात दाखल केलेला त्‍यांचा लेखी जबाब हाच त्‍यांचा युक्तिवाद समजण्‍यात यावा अशी पुरसिस दिनांक 23/12/2014 रोजी दाखल केली असून ती पृष्‍ठ क्र. 64 वर आहे.  तदनंतर दिनांक 28/01/2015 रोजी त्‍यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला व त्‍यात असे  म्‍हटले की, सदर दावा मुदतीत नसल्‍यामुळे व 90 दिवसात न आल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांनी विमा दावा खारीज करणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी नाही.   

 

11.   तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्‍ही पक्षांचा लेखी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

- कारणमिमांसा

 

12.   तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक 01/01/2013 रोजी झाला.  तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज कागदपत्रांसह विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे सादर केला.  तक्रारकर्तीची त्‍यावेळची मानसिक स्थिती आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्‍यासाठी तिला लागलेला वेळ व घरातील एकमेव सज्ञान व्‍यक्‍ती या बाबींचा विचार करता तक्रारकर्तीस विमा दावा अर्ज दाखल करण्‍यासाठी विलंब लागल्‍याचे संयुक्तिक कारण आहे.  त्‍यामुळे महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसानंतर सुध्‍दा विमा दावा संयुक्तिक कारण असल्‍यास दाखल केल्‍या जाऊ शकतो व तो मंजूर होण्‍यास पात्र आहे. 

            सदर प्रकरणात तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी माननीय राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र, परिक्रमा खंडपीठ, नागपूर यांनी पारित केलेल्‍या आदेशाची प्रत सदरहू प्रकरणात विलंबासाठीच्‍या मुद्दयांसदर्भात दाखल केलेली आहे.  त्‍यामधील Para. No. 13 Last line – The Insurance Company will condone the delay if sufficient cause for the delay is given. आणि Para No. 14 – In our opinion the complainants claiming that they had no knowledge of the insurance scheme and had submitted the insurance claim as soon as they got the knowledge.  This can be said to be a sufficient cause for condoning the delay.  The condition also nowhere mentions that insurance claim submitted after delay would not be granted or would fall within the scope of breach of policy condition.

 

13.   विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी दिनांक 23/12/2014 रोजी पुरसिस देऊन लेखी जबाब हाच त्‍यांचा युक्तिवाद आहे असे म्‍हटले. परंतु त्‍यानंतर दिनांक 28/01/2015 रोजी विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केला.  त्‍यात त्‍यांनी असे म्‍हटले की, सदर विमा दावा मुदतीबाहेर आहे व त्‍यांची सेवेमध्‍ये कुठलीही त्रुटी नसल्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  परंतु सदरहू प्रकरणात विरूध्‍द पक्ष यांनी सदर दावा मुदतीबाहेर आहे याबद्दल कोणतेही दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. 

 

14.   तक्रारकर्तीने सदर प्रकरणात सर्व दस्‍तऐवज व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट दाखल केलेला असून सदरहू रिपोर्टमध्‍ये तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा डोक्‍याला मार लागल्‍यामुळे अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे.  त्‍यामुळे संपूर्ण कागदपत्रांचा विचार करता तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे हे सिध्‍द होते.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 

      करिता खालील आदेश.             

-// अंतिम आदेश //-

 

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक पतीच्‍या अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर विमा दावा दाखल केल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 29/01/2014 पासून ते संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्‍याज द्यावे. 

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.   

 

4.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्‍त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्‍या अथवा वैयक्तिकरित्‍या करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.   

 

7.    विरूध्‍द पक्ष 3  च्‍या विरोधात ही तक्रार खारीज करण्‍यात येते.   

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.