Maharashtra

Gondia

CC/14/37

SMT.PRATIMA PRUTHVIRAJ RAHANGADALE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE CO.LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI.MOHAN DIGAMBER LIMYE - Opp.Party(s)

MR.UDAY KSHIRSAGAR

29 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/14/37
 
1. SMT.PRATIMA PRUTHVIRAJ RAHANGADALE
R/O,SITEPAR, POST-NAWEZARI, TAH.TIRODA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA INSURANCE CO.LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI.MOHAN DIGAMBER LIMYE
R/O.DIVISIONAL OFFICE NO.130800, NEW INDIA CENTER , 7 TH FLOOR, 17-A, KUPREJ ROAD, MUMBAI-400001
MUMBAI
MAHARASHTRA
2. THE NEW INDIA INSURANCE CO.LTD., THROUGH REGIONAL MANAGER SHRI.GURUNATH REDDY PATIL
R/O. DR.AMBEDKAR BHAWAN, M.E.C.L. BUILDING , SEMINARY HILLS, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI SHRI. PREMESH YUVRAJ CHIMALWAR
R/O.TAH.TIRODA, DISTT. GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. सदस्‍य, श्री. वामन वि. चौधरी)

 

- आदेश -

(पारित दि. 29 जानेवारी, 2015)

     

तक्रारकर्तीने तिचे पती श्री. पृथ्‍वीराज ब्रिजलाल रहांगडाले यांच्‍या अपघाती मृत्‍युबद्दल दाखल केलेला विमा दावा विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघात हा दोन चाकी वाहनाच्‍या अपघातात झालेला आहे व अपघाताचे वेळी वाहनावर तिघेजण बसलेले होते हे कायद्याचे उल्‍लंघन असल्‍यामुळे नामंजूर केला आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार विद्यमान न्‍याय मंच गोंदीया येथे दाखल केलेली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्ती ही मौजे सितेपार, पो. नवेझरी तालुका तिरोडा, जिल्‍हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. पृथ्‍वीराज ब्रिजलाल रहांगडाले यांच्‍या मालकीची मौजा सितेपार, पो. नवेझरी, ता. तिरोडा, जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 297 ही शेत जमीन आहे.  शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर तक्रारकर्तीचे पती त्‍यांच्‍या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते.  त्‍यामुळे ते शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये समाविष्‍ट होतात.      

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 3 हे शासनाचे वतीने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्‍याचे काम करतात.

 

4.    तक्रारकर्तीचे पती श्री. पृथ्‍वीराज ब्रिजलाल रहांगडाले हे दिनांक 21/01/2013 रोजी त्‍यांच्‍या मित्रांसोबत मोटरसायकलने जात असतांना एका टँकरने त्‍यांच्या मोटरसायकलला धडक दिल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीचा जागेवरच मृत्‍यु झाला. 

 

5.    तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्ती महिलेच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे दिनांक 16/05/2013 रोजी विमा दावा मिळण्‍याकरिता सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला.  तसेच विरूध्‍द पक्ष यांनी मागितलेल्‍या दस्‍तऐवजांची वेळोवेळी पूर्तता केली.    

 

6.    तक्रारकर्तीने रितसर अर्ज सादर केल्‍यानंतर व आवश्‍यक ते दस्‍तऐवज दिल्‍यानंतरही विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्ती महिलेचा दावा अपघात दोन चाकी वाहनाचा झाला त्‍यचावेळी वाहनावर तिघेजण बसलेले होते त्‍यामुळे कायद्याचे उल्‍लंघन झाले म्‍हणून दावा नामंजूर करण्‍यात येत आहे ह्या शे-यासह दावा फेटाळला.  शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत केवळ अपघात झाला या कारणास्‍तव शेतक-यांच्‍या कुटुंबाला मदत देणे आवश्‍यक आहे असे निर्देश असतांना अकारण विरूध्‍द पक्ष 1 यांनी दावा फेटाळला.  ज्‍या उद्देशाने शासनाने मृत शेतक-याच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरू केली त्‍याच उद्देशाला विरूध्‍द पक्ष हे तडा देत आहेत.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांची सेवेमधील त्रुटी आहे असे तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे. 

 

7.    विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला आवश्‍यक ती सेवा प्रदान करण्‍यामध्‍ये कसून केल्‍याने सदरचा अर्ज विद्यमान न्‍याय मंचामध्‍ये नुकसानभरपाई रक्‍कम  रू. 1,00,000/- मिळण्‍यासाठी तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रू. 30,,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्‍यासाठी दिनांक 07/07/2014 रोजी न्‍याय मंचात तक्रार दाखल केली आहे.    

 

8.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 31/07/2014 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 12/08/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्‍यांचा लेखी जबाब सदर प्रकरणात दाखल केला आहे. 

 

9.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी सदर प्रकरणात त्‍यांचा लेखी जबाब दिनांक 10/11/2014 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात तक्रारीतील मुद्दा क्रमांक 1 ते 5 माहितीअभावी अमान्‍य केला असून मुद्दा क्रमांक 6 ते 16 नुसार तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघात दुचाकी वाहनाचा झालेला आहे.  अपघाताचे वेळी वाहनावर तिघेजण बसलेले होते व वाहन स्‍वतःच्‍या निष्‍काळजीपणाने चालविल्‍यामुळे अपघात झालेला आहे.  सदर अपघातात मोटार वाहन कायद्याचे व विमा पॉलीसीतील अटी व शर्तींचे उल्‍लंघन झालेले आहे त्‍यामुळे सदर विमा दावा विरूध्‍द पक्ष 1 व 2 च्‍या सेवेतील कुठलीही त्रुटी नसल्‍यामुळे नामंजूर करण्‍यात येऊन फेटाळण्‍यात आलेला आहे. 

      विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांची सेवेतील कुठलीही त्रुटी नसल्‍यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी विमा दाव्‍यापोटी रू. 1,00,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू. 30,000/- तसेच तक्रारीच्‍या खर्चापोटी रू. 10,000/- मिळण्‍याबाबत दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी असे लेखी जबाबात म्‍हटले आहे.  

 

10.   विरूध्‍द पक्ष 3 यांनी त्‍यांचा लेखी जबाब दिनांक 20/12/2014 रोजी दाखल केला असून त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीचा दावा त्‍यांच्‍या कार्यालयास दिनांक 04/06/2013 रोजी प्राप्‍त झाला व पडताळणी करून दिनांक 04/06/2014 रोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर केला.  तालुका कृषि अधिकारी कार्यालय फक्‍त शेतक-यांचे जनता अपघात विम्‍याबाबतचे प्रस्‍ताव स्विकारतात व पुढील कार्यवाहीकरिता उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडे सादर करतात.  त्‍यामुळे त्‍यांचेकडून सेवेतील कुठलीही त्रुटी झालेली नाही. 

 

11.   तक्रारकर्तीने सदर तक्रारीसोबत विरूध्‍द पक्ष 1 व 2 हे आवश्‍यक पक्ष असल्‍यामुळे त्‍यांना तक्रारीत जोडण्‍याची परवानगी मिळणेबाबतचा अर्ज पृष्‍ठ क्र. 1 वर दाखल केला आहे.  तसेच शेतकरी जनता अपघात विमा योजना शासन निर्णय पृष्‍ठ क्र. 12 ते 15 वर, सात/बाराचा उतारा पृष्‍ठ क्र. 26 वर फेरफार नोंद पृष्‍ठ क्र. 27 वर, गाव नमुना 8-अ पृष्‍ठ क्र. 31 वर, F.I.R. (पहिली खबर) पृष्‍ठ क्र. 33 ते 36 वर,  घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 39 ते 40 वर, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 41 ते 48 वर, मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 49 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.           

 

12.   तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला असून त्‍यात असे म्‍हटले आहे की, शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्‍या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार शेतक-याच्‍या अपघाताबाबत केवळ अपघात झाला या कारणास्‍तव दावा मंजूर करावा व अनावश्‍यक धोका पत्‍करला या कारणास्‍तव दावा नाकारता येणार नाही असे शासन निर्णयात स्‍पष्‍ट नमूद केले आहे.  शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार गुन्‍ह्याच्‍या दृष्‍टीने केलेला कायद्याचा भंग हाच फक्‍त विमा पॉलीसीच्‍या वगळलेल्‍या बाबीमध्‍ये येतो.  तक्रारकर्तीच्‍या पतीने कोणताही गुन्‍हा करण्‍याच्‍या हेतूने कायद्याचा भंग केलेला नाही.  म्‍हणून तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर करावा असे म्‍हटले आहे.

 

13.   विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांचेतर्फे ऍड. इंदिरा बघेले यांनी त्‍यांचा लेखी युक्तिवाद दिनांक 16/01/2015 रोजी दाखल केला.  तसेच दिनांक 23/01/2015 रोजी तोंडी युक्तिवाद केला.  विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा दोन चाकी वाहनावर तिघेजण बसलेले होते व वाहन स्‍वतः निष्‍काळजीपणे चालवित होते त्‍यामुळे त्‍यांनी विमा पॉलीसीतील अटी व शर्तींचे उल्‍लंघन केलेले आहे.  तसेच मोटार वाहन कायद्याचे सुध्‍दा उल्‍लंघन केले आहे.  तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु हा त्‍यांच्‍या निष्‍काळजीपणाने झाला असून त्‍यांनी शेतकरी जनता अपघात विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तींचे उल्‍लंघन केल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेत कुठलीही त्रुटी नाही.  त्‍यामुळे सदर विमा दावा नामंजूर करण्‍यात येऊन फेटाळण्‍यात आला आहे. 

 

14.   तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्‍ही पक्षाच्‍या वकिलांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

- कारणमिमांसा

 

15.   तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या नावाने मौजे सितेपार, पो. नवेझरी ता. तिरोडा, जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 297 ही शेत जमीन असल्‍याबाबतचा 7/12 चा उतारा सदर प्रकरणात दाखल केलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचे पती शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये समाविष्‍ट होतात.  तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक 21/01/2013 रोजी झाला हे दाखल केलेल्‍या मृत्‍यु प्रमाणपत्रावरून सिध्‍द होते.  दिनांक 21/01/2013 रोजीच्‍या पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्ट वरून अपघातात मेंदूला जखम झाल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला असे नमूद आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु अपघातामुळे झाला हे सिध्‍द होते.

 

16.   तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी माननीय राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, परिक्रमा खंडपीठ, नागपूर यांचा खालील न्‍याय निवाडा सदर प्रकरणात दाखल केलेला आहे.

First Appeal No. A/09/452

(Arisen out of Order Dated 31/03/2009 in Case No. CC/09/18, District Forum, Akola)

 

National Insurance Company Limited  versus  Smt. Jyoti Gopal Khudiniya

 

First Appeal No. A/09/453

(Arisen out of Order Dated 31/03/2009 in Case No. CC/08/308, District Forum, Akola)

National Insurance Company Limited  versus  Smt. Gayatri Omprakash Sharma

 

8.         So also we find that the condition specified under policy that the company will not liable for payment of compensation arising or resulting from insured committing any breach of law with criminal intent, is not applicable to the present case since the deceased insured committed no such breach of law with criminal intent so as to invoke the aforesaid condition of the policy.  

 

      वरील न्‍याय निवाड्यानुसार सदर प्रकरणी सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या पतीने कोणताही गुन्‍हा करण्‍याच्‍या हेतूने कायद्याचा भंग केलेला नाही.  तसेच शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत मुद्दा क्र. 7 मध्ये अपघाती मृत्‍युसंदर्भात दुर्घटना घडल्‍याचे सिध्‍द झाल्‍यास अनावश्‍यक धोका पत्‍करला या कारणास्‍तव एकही प्रकरण नाकारता येणार नाहीत, अपघातग्रस्‍त शेतक-याचा केवळ अपघात झाला या कारणास्‍तव विम्‍याचे दावे मंजूर करावे असे निर्देश दिले आहेत.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांची सेवेतील त्रुटी आहे हे सिध्‍द होते.

 

17.   तक्रारकर्तीने शेतीचा 7/12 उतारा पृष्‍ठ क्र. 26 वर व मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 49 वर दाखल केलेले आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

     

करिता खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.               

 

-// अंतिम आदेश //-

 

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक पतीच्‍या अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 21/01/2013 पासून ते संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्‍याज द्यावे. 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.   

 

4.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्‍त आदेशाचे पालन संयुक्तिकरित्‍या अथवा वैयक्तिकरित्‍या करावे.

 

7.    विरूध्‍द पक्ष  3 च्‍या विरोधात ही तक्रार खारीज करण्‍यात येते.    

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.