Maharashtra

Solapur

cc/09/586

Ashini Uttam Shinde - Complainant(s)

Versus

The New India Insurance co. - Opp.Party(s)

06 Jan 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. cc/09/586
1. Ashini Uttam ShindeR/o Tanmbave Tal. madha ...........Appellant(s)

Versus.
1. The New India Insurance co. Park chowk solapur SolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :

Dated : 06 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 586/2009.

                                                     तक्रार दाखल दिनांक : 05/11/2009.     

                                                    तक्रार आदेश दिनांक : 06/01/2011.   

 

1. श्रीमती अश्विनी उत्‍तम शिंदे, वय 29 वर्षे,

   व्‍यवसाय : घरकाम, रा. तांबवे, ता. माढा, जि. सोलापूर.

2. कु. अपर्णा उत्‍तम शिंदे, वय 10 वर्षे,

   व्‍यवसाय : शिक्षण, रा. वरीलप्रमाणे.

3. कु. वैशाली उत्‍तम शिंदे, वय 8 वर्षे,

   व्‍यवसाय : शिक्षण, रा. वरीलप्रमाणे.

4. कु. शिवराज उत्‍तम शिंदे, वय 5 वर्षे,

   व्‍यवसाय : काही नाही, रा. वरीलप्रमाणे.

   (तक्रारदार क्र. 2 ते 4 अज्ञान. त्‍यांचेतर्फे अज्ञान

   पालन करणार आई तक्रारदार क्र.1)

5. श्री. शंकर गणपत शिंदे, वय 69 वर्षे,

   व्‍यवसाय : काही नाही, रा. वरीलप्रमाणे.

6. सौ. ठकुबाई शंकर शिंदे, वय 66 वर्षे,

   व्‍यवसाय : काही नाही, रा. वरीलप्रमाणे.                        तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

दि न्‍यू इंडिया अश्‍युअरन्‍स कंपनी लि., पार्क चौक, सोलापूर.

(नोटीस विभागीय व्‍यवस्‍थापक यांचेवर बजावण्‍यात यावी.)                विरुध्‍द पक्ष

 

      गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                      सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                  सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  एस.जे. पाटील

          विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे अभियोक्‍ता : आर.एन. शेख

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार क्र.1 यांचे पती, तक्रारदार क्र.2 ते 4 यांचे पिता व तक्रारदार क्र.5 व 6 यांचा मुलगा उत्‍तम शंकर शिंदे (संक्षिप्‍त रुपामध्‍ये 'मयत उत्‍तम') यांनी सन 2005 मध्‍ये दुध वाहतुकीकरिता खरेदी केलेल्‍या टॅन्‍कर (ट्रक) क्र.एम.एच.45/0110 चा विरुध्‍द पक्ष (संक्षिप्‍त रुपामध्‍ये 'विमा कंपनी') यांच्‍याकडे पॉलिसी क्र.151300/31/05/03632 अन्‍वये दि.5/8/2005 ते 4/8/2006 कालावधीकरिता सर्वसमावेश विमा उतरविण्‍यात आलेला आहे. दि.26/6/2006 रोजी मयत उत्‍तम हे दुध घेऊन मुंबईकडे जात असताना पुणे-मुंबई जलदगती मार्गावर टँकरचा अपघात झाला. अपघातामध्‍ये मयत उत्‍तम यांचा मृत्‍यू झाला आणि टँकरचे पूर्ण नुकसान झालेले आहे. अपघातानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे क्‍लेम फॉर्म व आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु दि.21/10/2008 रोजीच्‍या पत्राद्वारे विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारला आहे. ट्रक पूर्ण निकामी होऊन त्‍याचे पूर्ण नुकसान झालेले असून त्‍याची दुरुस्‍ती करता येत नाही. मयत उत्‍तम यांनी ट्रक खरेदी करताना टाटा फायनान्‍स कंपनीकडून कर्ज घेतलेले होते. विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारुन सेवेमध्‍ये त्रुटी केलेली आहे आणि प्रस्‍तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून रु.9,73,750/- नुकसान भरपाई व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे.

 

2.    विमा कंपनीने रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार मयत उत्‍तम यांचे नांवे ट्रक क्र.एम.एच.14/110 करिता दि.5/8/2005 ते 4/8/2006 कालावधीकरिता गुडस् कॅरिईंग कमर्शियल पॅकेज इन्‍शुरन्‍स पॉलिसी अटी व शर्तीस अधीन राहून जारी केलेली आहे. विमा संरक्षीत ट्रकचा दि.26/6/2006 रोजी अपघात झाला आणि नुकसानीची सूचना मिळताच त्‍यांनी श्री.उत्‍पल शर्मा, सर्व्‍हेअर अन्‍ड लॉस असेसर यांच्‍यामार्फत स्‍पॉट सर्व्‍हे केला. तक्रारदार यांच्‍याकडून क्‍लेम फॉर्म, पोलीस पेपर्स, वाहनाची कागदपत्रे व अंदाजपत्रक मागवून घेण्‍यात आले. विमा कंपनीने अभियोक्‍ता श्री.प्रतापराव डी. देशमुख यांच्‍यामार्फत केलेल्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेशनमध्‍ये मयत उत्‍तम हे अपघाताच्‍या वेळी 4 प्रवाशांसह ट्रकमधून अनधिकृतपणे वाहतूक करीत असल्‍याचे निदर्शनास आले. रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेटप्रमाणे वाहन चालकासह एकच व्‍यक्‍ती त्‍या वाहनामध्‍ये प्रवास करण्‍यास पात्र असताना 5 व्‍यक्‍तींची अनधिकृतपणे ट्रकमध्‍ये प्रवाशी वाहतूक करण्‍यात येत होती. त्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग झाला आणि त्‍यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारला आहे. सर्व्‍हेअरने ट्रकचे टोटल लॉस तत्‍वावर रु.7,73,750/- र‍कमेचे असेसमेंट केलेले आहे. तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र नसल्‍यामुळे व त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नसल्‍यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विमा कंपनीने विनंती केलेली आहे.

 

3.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                 उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                               होय.

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?            होय.

3. काय आदेश ?                                       शेवटी दिल्‍याप्रमाणे.

निष्‍कर्ष

 

4.    मुद्दा क्र. 1 ते 3 :- मयत उत्‍तम यांचे नांवे असलेल्‍या ट्रक क्र.एम.एच.14/0110 चा विमा कंपनीकडे दि.5/8/2005 ते 4/8/2006 कालावधीकरिता विमा उतरविल्‍याविषयी विवाद नाही. विमा संरक्षीत ट्रकचा दि.26/6/2006 रोजी अपघात झाल्‍याचे आणि अपघातामध्‍ये मयत उत्‍तम यांचा मृत्‍यू झाल्‍याविषयी विवाद नाही. तसेच अपघातामध्‍ये  ट्रकचे संपूर्ण नुकसान झाल्‍याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा क्‍लेम दाखल केल्‍याविषयी व त्‍यानंतर विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्‍लेम हा दि.21/10/2008 रोजीच्‍या पत्राद्वारे नाकाल्‍याविषयी विवाद नाही.

 

5.    प्रामुख्‍याने, विमा कंपनीने क्‍लेम नाकारणा-या दि.21/10/2008 च्‍या पत्रामध्‍ये टँकरमध्‍ये चालकासह आसन 3 व्‍यक्‍तीची आसन व्‍यवस्‍था असताना अपघाताच्‍या वेळी चालकासह 4 व्‍यक्‍ती प्रवास करीत असल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झाल्‍यामुळे विमा रक्‍कम देय होत नसल्‍याचे कळविलेले आहे.

 

6.    विमा संरक्षीत वाहन क्र.एम.एच.14/0110 मध्‍ये अपघाताच्‍या वेळी आर.टी.ओ. कार्यालयाने वाहनामध्‍ये बसावयाच्‍या व्‍यक्‍तींच्‍या आसन व्‍यवस्‍थेच्‍या मर्यादेपेक्षा 1 जास्‍त व्‍यक्‍ती ट्रकमधून प्रवास करीत असल्‍याचे निदर्शनास येते.

 

7.    विमा कंपनीने पॉलिसीच्‍या निश्चित कोणत्‍या अटीचा भंग झालेला आहे, हे कागदोपत्री पुराव्‍याद्वारे सिध्‍द केलेले नाही. तसेच क्‍लेम नाकारण्‍यासाठी त्‍यांना कोणत्‍या अटीचा लाभ होतो, हे स्‍पष्‍ट केलेले नाही. त्‍याशिवाय, विमा संरक्षीत ट्रकमध्‍ये अपघाताच्‍या वेळी प्रवास करीत असलेले जास्‍त प्रवाशी अपघातास कारणीभूत असल्‍याचे सिध्‍द करण्‍यात आलेले नाही. यदाकदाचित, तशी अट असल्‍याचे गृहीत धरले तरी, अशाच प्रकारच्‍या प्रकरणांमध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयासह, मा.राष्‍ट्रीय व राज्‍य आयोगांनी अनेक निवाडे दिलेले आहेत. त्‍यातील न्‍यायिक तत्‍वे विचारात घेणे आवश्‍यक ठरतात.

 

8.    मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने 'बी.व्‍ही. नागाराजू /विरुध्‍द/ मे. ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि.', 2 (1996) सी.पी.जे. 18 (एस.सी.) निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

      Para. 7 :  It is plain from the terms of the Insurance Policy that the insured vehicle was entitled to carry 6 workmen, excluding the driver. If those 6 workmen when traveling in the vehicle, are assumed not to have increased any risk from the point of view of the Insurance Company on occurring of an accident, how could those added persons be said to have contributed to the causing of it is the poser, keeping apart the load it was carrying. Here, it is nobody’s case that the driver of the insured vehicle was responsible for the accident. In fact, it was not disputed that the oncoming vehicle had collided head-on against the insured vehicle, which resulted in the damage. Merely by lifting a person or two, or even three, by the driver or the cleaner of the vehicle, without the knowledge of owner, cannot be said to be such a fundamental breach that the owner should, in all events, be denied indemnification. The misuse of the vehicle was somewhat irregular though, but not so fundamental in nature so as to put an end to the contract, unless some factors existed which, by themselves, had gone to contribute to the causing of the accident. In the instant case, however, we find no such contributory factor.

 

9.    आमच्‍या मते, मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने विषद केलेल्‍या न्‍यायिक तत्‍वानुसार विमा कंपनी तक्रारदार यांचा विमा क्‍लेम नाकारता येणार नाही. तसेच तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले 2009 (1) सी.पी.आर. 313 (एन.सी.), 2007 (3) 163 सी.पी.आर., 2009 (1) सी.पी.आर. 156 (एन.सी.) या तक्रारीमध्‍ये निश्चितच लागू पडतात.

 

10.   त्‍यापैकी मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि. /विरुध्‍द/ शेषेराव अंबदास हातिसकर', 2009 (1) सी.पी.आर. 156 (एन.सी.) निवाडयामध्‍ये असे मत नमूद केले आहे की,

 

      Para. 7 : Hon'ble Supreme Court had an occasion to deal with a similarly placed situation case, in Dharmendra Goel v. Oriental Insurance Co. Ltd. in which it was held that once the insurance company had accepted the value of vehicle at the time of issuing insurance cover and had charged the premium amount accordingly, therefore, it could not claim that its value on total loss basis on the date of accident has come down to almost half. Hon'ble Supreme Court in the case (supra) specifically observed that "it was unbelievable that it could have depreciated to the extent of Rs.1,80,000 within a span of seven months" whereas the insurance cover obtained only sever months earlier was for Rs.3,54,000 in the cited case. In view of this, Hon'ble Supreme Court held that the Insurance Company was bound by the value of insurance put on by it on the vehilce while issuing the policy. However, the insurance company will be entitled to deduct depreciation for the use of the vehicle after issue of insurance policy.

 

11.    विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्‍लेम नाकारुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते. त्‍यामुळे तक्रारदार हे विमा कंपनीकडून विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र ठरतात. विमा संरक्षीत ट्रकचे पूर्ण नुकसान (टोटल लॉस) झाल्‍याविषयी विवाद नाही. ट्रकला रु.9,73,750/- विमा संरक्षण होते आणि सर्व्‍हेअरने सॅल्‍व्‍हेज व्‍हॅल्‍यु रु.2,00,000/- गृहीत धरलेली आहे. अपघातग्रस्‍त ट्रक तक्रारदार यांच्‍या ताब्‍यात आहे. उपरोक्‍त न्‍यायिक तत्‍वाचे अवलोकन करता, सॅल्‍व्‍हेजची किंमत वजा जाता उर्वरीत रु.7,73,750/- विमा रक्‍कम क्‍लेम नाकारल्‍याच्‍या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास तक्रारदार हक्‍कदार ठरतात, या मतास आम्‍ही आलो आहोत.

 

 

 

 

 

 

 

12.   शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.7,73,750/- दि.21/10/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                            (सौ. संजीवनी एस. शहा)

         सदस्‍य                                           सदस्‍य

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

(संविक/स्‍व/6111)

 

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER