Maharashtra

Satara

cc/14/213

Shri Ramesh Raghunath Nikam - Complainant(s)

Versus

The New India Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

Jagdale

14 Mar 2016

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. cc/14/213
 
1. Shri Ramesh Raghunath Nikam
1B, Mayur Chambers,near Income tax Office, Satara
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Co. Ltd
Jeevantara, first floor, infront of collector office, Satara
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:Jagdale, Advocate
For the Opp. Party:
ORDER

                             तक्रार  क्र. 213/2014.

                             तक्रार दाखल दि.29-12-2014.

                                                   तक्रार निकाली दि.14-03-2016.

 

श्री. रमेश रघुनाथ निकम,

रा. 1 ब, मयुर चेंबर्स,

इन्‍कम टॅक्‍स ऑफीससमोर, सातारा.                    .... तक्रारदार.

             

       विरुध्‍द

 

सिनियर डिव्‍हीजनल मॅनेजर,

दि न्‍यू इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि.,

सातारा मंडल कार्यालय (151700),

जीवनतारा’, 513, एल.आय.सी. बिल्‍डींग,

कलेक्‍टर ऑफीस समोर, सदर बझार, सातारा.            .... जाबदार.

                                                           

                    .....तक्रारदारतर्फे- अँड.व्‍ही.पी.जगदाळे.                              

                    .....जाबदार तर्फे- अँड.आर.एन.कुलकर्णी.             

                             

न्‍यायनिर्णय

 

(मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्ष यांनी न्‍यायनिर्णय पारित केला.)

 

 

 

1.   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्‍तुत तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

     तक्रारदार हे सातारा येथील रहिवाशी आहेत.  तक्रारदाराने  सन 2007 साली टाटा इंडिका रजि.नं.एम.एच.11 एम.1829 ही गाडी खरेदी केली होती.  प्रस्‍तुत गाडी ही दुरिस्‍ट परमीटची होती.  सदर गाडीचा परमीटचा विमा जाबदार यांचेकडे पॉलीसी क्र. 15170131100100014409 अन्‍वये उतरविला होता.  तक्रारदार प्रस्‍तुत चारचाकी गाडी त्‍यांचे शिर्षकात नमूद रहात्‍या पत्‍त्यावरुन दि.19/1/2010 रोजी चोरीस गेली होती.  त्‍याबाबत तक्रारदाराने सातारा शहर पोलीस स्‍टेशन येथे गु.र.नं. 46/2010 अन्‍वये फिर्याद दाखल केली.  तसेच सदर वाहनाच्‍या चोरीबाबत वर्तमानपत्रामध्‍ये बातमी प्रसिध्‍द करुन त्‍याबाबतची बातमी वाहनाची विमा कंपनी व फायनान्‍सर यांना दिलेली होती.  प्रस्‍तुत वाहनाचा शोध घेत असताना प्रस्‍तुतचे वाहन गजानन अँटो मोबाईल्‍स, सातारा यांचेकडून जप्‍त करुन कोर्टाने सातारा पोलीस स्‍टेशनचे ताब्‍यात दिलेने सदरचे वाहन तक्रारदार यांच्‍या ताब्‍यात दिले होते. मा. मुख्‍य दंडाधिकारी यांनी प्रस्‍तुतच्‍या गु.र.नं. 46/10 मध्‍ये आदेश पारीत केला होता.  प्रस्‍तुतची गाडी सन 2012 मध्‍ये सापडली सदरची गाडी सापडलेनंतर सदर गाडीचे बरेच पार्टस् चोरीस गेलेचे तक्रारदाराचे लक्षात आले.  गाडी चालविणेच्‍या स्थितीत नव्‍हती.  याबाबत जाबदार यांचेकडे प्रस्‍तुत चारचाकी वाहनाचा नुकसानीबाबत विमाक्‍लेम तक्रारदाराने दाखल केला होता.  प्रस्‍तुत तक्रारदार यांनी दि.19/12/2012 रोजी प्रस्‍तुत वाहनाचा क्‍लेम वाहनाच्‍या चोरीबाबत जाबदार विमा कंपनीस इंटिमेशन तक्रारदाराने दिली नाही या कारणावरुन विमा क्‍लेम नाकारला आहे.  वास्‍तवीक पाहता, तक्रारदार हे गाडी चोरीस गेल्‍यापासून गाडीचे शोधात होते व त्‍यांना गाडी चोरीस गेलेची माहिती जाबदार विमा कंपनीस देणे आवश्‍यक असते ही बाब माहिती नव्‍हती त्‍यामुळे तक्रारदाराने जाबदाराला गाडी चोरीस गेल्‍याची इंटिमेशन दिली नाही. मात्र विमा कंपनीने प्रस्‍तुत क्षुल्‍लक कारणावरुन तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारलेला आहे व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे.  सबब जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम मिळणेसाठी प्रस्‍तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मे मंचात दाखल केला आहे.

 

2.    तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार विमा कंपनीकडून तक्रारदाराचे वाहनाच्‍या विमा क्‍लेमची रक्‍कम रु.76,780/- (रुपये शहाहत्‍तर हजार सातशे ऐंशी मात्र) व्‍याजासह वसूल होऊन मिळावी, प्रस्‍तुत रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याज देणेबाबत जाबदाराला आदेश व्‍हावेत, तक्रारदाराला झाले नुकसानभरपाई व सेवेतील त्रुटीबाबत जाबदाराकडून रक्‍कम रु.7,00,000/- (रुपये सात लाख मात्र) वसूल होवून मिळावेत, तक्रारदाराला मानसिक, शारिरीक त्रासापोटी जाबदारकडून रक्‍कम रु.30,000/-, तसेच अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.40,000/- वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केलेली आहे.  

 

3.   प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्‍हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/11 कडे अनुक्रमे जाबदार विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, रजिस्‍टर पोष्‍टाची पावती, मोटर क्‍लेम फॉर्म, गाडी दुरुस्‍तीचे जॉब कार्ड, विम्‍याचे प्रमाणपत्र, वाहनाच्‍या चोरीनंतर वाहन सापडलेवर प्रस्‍तुत वाहनाचा केलेला (पोलीस स्‍टेशनमार्फत) पंचनामा, कार्पोरेशन बँकेचे अकौंट स्‍टेटमेंट, तक्रारदाराने जाबदाराला दिलेले पत्र, हिंदुस्‍थान टायर्सचे बील, पंडीत ऑटोमोटीव्‍हचे टॅक्‍स इनव्‍हाईस व प्रोफॉर्मा इनव्‍हाईस, नि.12 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि.13 कडे लेखी युक्‍तीवाद, नि.18 कडे तक्रारदाराचा जादा लेखी युक्‍तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.  

 

4.   प्रस्‍तुत कामी जाबदार विमा कंपनीने नि.11 कडे  म्‍हणणे/कैफीयत, नि.15 चे कागदयादीसोबत नि.15/1 कडे विमापॉलीसी सहीशिक्‍क्याची नक्‍कल, (अटी व शर्तींसह), नि. 15/2 कडे सर्व्‍हेअर श्री. कुदळे यांचा अहवाल, नि. 16 कडे सर्व्‍हेअर कुदळे यांचे अँफीडेव्‍हीट, नि.17 कडे पुरावा संपलेची पुरसीस  वगैरे कागदपत्रे जाबदार यांनी याकामी दाखल केली आहेत.

      जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराची तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  जाबदारांनी तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.

i         तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.

ii     तक्रारदाराचे वादातीत वाहनाचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता.  त्‍याचा पॉलसी नंबर 15170131090100207330 ने ता.23/12/2009 ते दि.22/12/2010 या कालावधीसाठी विमाकृत केलेले होते.

iii     प्रस्‍तुत विमा पॉलीसीतील अटी व शर्थीनुसार सदर विमाकृत वाहन चोरीस गेल्‍यास त्‍याची फिर्याद ताबडतोब पोलीसांकडे दाखल करणे व सदर चोरीची घटना जाबदार कंपनीस ताबडतोब कळविणे आवश्‍यक आहे.  प्रस्‍तुत अटी व शर्थी यांची माहिती तक्रारदारास पूर्वीपासून होती व आहे.  तसेच प्रस्‍तुत अट ही विमापॉलीसीतील मुलभूत अट आहे.  असे असताना तक्रारदाराचे वादातीत वाहनाची चोरी झालेनंतर तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस ताबडतोब चोरीची माहिती व सूचना जाबदार विमा कंपनीस दिलेली नाही.  प्रस्‍तुत चोरीची माहिती तक्रारदाराने दि.24/9/2012 रोजी विमाक्‍लेम फॉर्म देऊनच दिली.  तक्रारदाराचे कथनानुसार प्रस्‍तुत वाहनाची चोरी दि.19/1/2010 रोजी झाली. तथापी त्‍याबाबतची माहिती तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस दि.24/9/2012 रोजी म्‍हणजे सुमारे 2 वर्षे 8 महिनेनंतर दिली.  प्रस्‍तुत तक्रारदाराने वाहनाचे चोरीनंतर ताबडतोब जाबदार विमा कंपनीस सदरची चोरीबाबत माहिती कळविणे अत्‍यावश्‍यक असतानाही तक्रारदाराने ती कळविली नाही.  त्‍यामुळे वाहन चोरीस गेलेनंतर तिचा शोध करणे व वाहनातील भाग चोरीस जाणेपासून वाचवणेची संधी जाबदाराला मिळाली नाही. तक्रारदाराने सदरची वाहन चोरीची घटना जाबदार यांचेपासून लपवून ठेवली व वेळेत सूचना/माहिती जाबदाराला कळविली नसल्‍याने विमा पॉलीसीतील मूलभूत अटी व शर्थींचा तक्रारदाराने भंग केला आहे.  सबब प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेवर तक्रारदाराला विमाक्‍लेमची रक्‍कम देणेची कोणतीही कायदेशीर जबाबदारी येत नाही त्‍यामुळे तक्रारदाराचा प्रस्‍तुत तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्‍हणणे/कैफीयत जाबदार विमा कंपनीने दिले आहे.       

 

5.   वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे  काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने प्रस्‍तुत कामी पुढील मुद्दयांचा विचार केला.        

           मुद्दा                                      उत्‍तर

1. तक्रारदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व

   सेवापुरवठादार असे नाते आहे काय?-                             होय.

2. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?-            होय.

3. तक्रारदार हे वादातीत वाहनाचा विमाक्‍लेम

   मिळणेस पात्र आहेत काय?-                                    होय.

4. अंतिम आदेश काय?-                                 खाली नमूद केले

                                                      आदेशाप्रमाणे

विवेचन-

6.  वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांची चार चाकी गाडी टाटा इंडिका रजि. नं. एम.एच.11-एम.1829  ही गाडी जाबदार विमा कंपनीकडे पॉलीसी नं. 15170131100100014409 अन्‍वये उतरविला होता व आहे.  तसेच वाहनाच्‍या चोरीची घटना घडली त्‍याकाळात सदरचा विमा चालु होता व आहे ही बाब जाबदार विमा कंपनीने मान्‍य व कबूल केली आहे.  सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून जाबदार विमा कंपनी ही तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहे ही बाब निर्विवाद सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.  तसेच प्रस्‍तुत तक्रारदार यांची वादातीत गाडी ही दि.19/1/2010 रोजी चोरीस गेली.  तक्रारदाराने सातारा शहर पोलीस स्‍टेशनला गु.र.नं.46/10 अन्‍वये फिर्याद दाखल केली होती.  प्रस्‍तुत गाडी सन 2012 मध्‍ये पोलीसांना सापडली.  गाडी सापडल्‍यानंतर मा.मुख्‍य दंडाधिका-यांकडून आदेश घेऊन प्रस्‍तुत गाडी तक्रारदार यांनी ताब्‍यात घेतली त्‍यावेळी सदरची गाडी ही चालविणेच्‍या स्थितीत नव्‍हती तसेच गाडीतील बरेचसे पार्टस् चोरीस गेलेचे तक्रारदाराचे लक्षात आले.  त्‍यामुळे पोलीसांनी तसा सापडलेल्‍या सदर वाहनाचा पंचनामा  केलेला आहे.  यावरुन गाडी चोरीस गेलेचे व वादातीत गाडीतील बरेचसे पार्टस् चोरीस गेलेचे व गाडी चालविणेच्‍या स्थितीत नसलेचे स्‍पष्‍ट व सिध्‍द होत आहे.  प्रस्‍तुत गाडीचे झाले नुकसानीबाबतचे जॉब कार्ड नि.5/4 कडे तसेच नि. 5/9 कडे हिंदुस्‍थान टायर्सचे बील नि.5/5 कडील जॉबकार्ड, नि.5/10/ व नि.5/11 कडे पंडीत ऑटोमोटीव्‍हची Tax Invoice तक्रारदाराने दाखल केली आहेत.  यावरुन  तक्रारदाराला जवळ-जवळ रक्‍कम रु.76,780/- (रुपये श्‍याहत्‍तर हजार सातशे ऐंशी मात्र) एवढा खर्च तक्रारदाराचे वाहनाचे दुरुस्‍तीसाठी आला आहे हे स्‍पष्‍ट होत आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍याचे वाहनाचा विमा हा जाबदार कंपनीकडे उतरविला होता व घटनेवेळी चालू होता त्‍यामुळे गाडीचे पार्टस् चोरीस गेलेचे लक्षात आलेवर व गाडी चालवणेच्‍या स्थितीत नाही हे लक्षात आलेवर विमा क्‍लेम फॉर्म भरुन जाबदाराने विमा क्‍लेम सादर केला.  परंतू जाबदारांना तक्रारदार यांनी गाडी चोरीस गेलेची माहिती/सूचना जाबदार विमा कंपनीस ताबडतोंब दिली नसलेमुळे पॉलीसीतील अटी व शर्थीचा तक्रारदाराने भंग केलेने जाबदाराने विमा क्‍लेम फेटाळलेला आहे असे पत्र तक्रारदाराला पाठवले व तक्रारदाराचा विमा क्‍लेम जाबदाराने फेटाळला. वास्‍तविक तक्रारदाराला ही गोष्‍ट माहिती नव्‍हती किंवा जाबदार विमा कंपनीने पॉलीसी उतरविताना तक्रारदारांना समजावून सांगितली नव्‍हती की गाडीची चोरी झालेवर किंवा अपघात झालेवर ताबडतोब विमा कंपनीस सूचना/माहिती देणे अत्‍यावश्‍यक असते.  त्‍यामुळे तक्रारदाराने जाबदाराला माहिती दिली नाही.  मात्र तक्रारदाराने गाडी चोरीस गेलेबाबत सातारा शहर पोलीस स्‍टेशन येथे फिर्याद  दिली व गु.र.नं.46/2010 ला गुन्‍‍हा नोंद केला.  तसेच वर्तमानपत्रात बातमी प्रसिध्‍द झालेने जाबदार यांना प्रस्‍तुत गाडीची चोरी झालेचे माहिती मिळाली असावी असे वाटलेने तक्रारदाराने जाबदार कंपनीस गाडी चोरीची माहिती दिलेली नव्‍हती.  मात्र  प्रस्‍तुत गाडी सन 2012 मध्‍ये पोलीसांना सापडली व ती मे. कोर्टामार्फत तक्रारदाराचे ताब्‍यात मिळाली असता प्रस्‍तुत गाडीचे बरेचसे पार्टस् चोरीस गेलेचे तक्रारदाराचे लक्षात आले व सदर गाडी चालविणेचे स्थितीत नव्‍हती असे पंचनामा नि.5/7  वरुन स्‍पष्‍ट होते.  तसेच  प्रस्‍तुत गाडीला दुरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाच्‍या पावत्‍या व टॅक्‍स इन्‍व्‍हाईस, जॉबकाडे याकामी वर नमूद केले निशाणीकडे तक्रारदाराने दाखल केले आहेत.  सबब यावरुन वादातीत गाडी दुरुस्‍तीस आले खर्चाची स्‍पष्‍ट कल्‍पना येते.  प्रस्‍तुत बाबतीत जाबदाराने सर्व्‍हेअर कुदळे यांचा सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे.  तसेच सदर सर्व्‍हेअर यांचे अँफीडेव्‍हीट दाखल केले आहे.  प्रस्‍तुत सर्व्‍हे रिपोर्टवरुन तक्रारदाराच्‍या गाडीस दुरुस्‍तीस फक्‍त रु.24,005/- खर्च आलेचे सर्व्‍हेअरने म्‍हटले आहे.  परंतू प्रस्‍तुत सर्व्‍हे रिपोर्टवर अवलंबून व त्‍यावर पूर्णपणे अवलंबून न्‍यायनिर्णय देणे न्‍यायोचीत वाटत नाही.  प्रस्‍तुत कामी आम्‍ही मे. सुप्रिम कोर्टाने खालील न्‍ययानिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेत आहोत.

2009 Law Suit (SC) 1035

New India Assurance Co. Ltd., V/s. Pradeep Kumar

Head Note :-     Consumer Protection Act 1986  Sec. 21 (b) – Insurance Act]1938 – Sec. 64 UM (2) – deficiency in service- accident with insured truck- surveyor’s report – complainant not satisfied with investigation- National Commission dismissed revision petition- assessment of loss by approved surveyor is pre-requisite for payment or settlement of claim of twenty thousand rupees or more by insurer but surveyors report is not last  and final word- it is not that sacrosanct  that it can not be deposited from – it is not conclusive- approved  surveyor’s report may be basis of that foundation for settlement of claim by insurer in respect of loss suffered by insured but surely such report is  neither binding upon insurer nor insured- claim of complainant has been accepted by consumer for a as it was duly supported by original vouchers bills & receipts- insurance company would have been well advised is not spending public money unnecessarily an avoidable ad wholly frivolous litigation such as this- appeal dismissed.  

      वरील सर्व बाबीचा ऊहापोह केला असता तक्रारदार यांचा वाहनाचा विमा क्‍लेम जाबदार विमा कंपनीने फेटाळून तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्‍पष्‍ट व निर्विवाद सिध्‍द होते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

6.  प्रस्‍तुत कामी आम्‍ही मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.- कारण जाबदाराचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराने प्रस्‍तुत वादातीत वाहनचोरी गेलेची सूचना जाबदार विमा कंपनीस ताबडतोब देणे हे विमा पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार अत्‍यावशक असून ही मूलभूत अट आहे.  परंतू तक्रारदाराने वादातीत वाहन चोरीस गेलेची सूचना जाबदार विमा कंपनीस ताबडतोब न दिलेने विमा पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग तक्रारदाराने केलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराचा विमा क्‍लेम जाबदार विमा कंपनीने फेटाळलेचे स्‍पष्‍ट होते. परंतू सदर कामी मे. सुप्रिम कोर्टाच्‍या खालील नमूद न्‍यानिवाडयामध्‍ये विमा पॉलीसीतील कोणत्‍याही अटींचा व शर्थींचा भंग तक्रारदाराने/ विमाधारकाने केला असेल तर विमाधारकाचा‍ विमा क्‍लेम  हा 75 टक्‍के द्यावा असे म्‍हटले आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांनी जरी जाबदार विमा कंपनीस वादातीत वाहन चोरीस गेलेची सूचना दिली नाही. त्‍यामुळे विमा पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग केला असला तरीही तक्रारदार हे प्रस्‍तुत मे. सुप्रीम कोर्टाचे  खालील आदेशातील दंडकाप्रमाणे विमा  क्‍लेम मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सदर न्‍यायनिवाडा खाली नमूद केला आहे.

    2010 CJ (SC) 1936  Amalender Sahoo V/s. Oriental Insurance Co. Ltd.,

     वर नमूद केलेप्रमाणे प्रस्‍तुत तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून वादातीत वाहनाचा विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब प्रस्‍तुत मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

    सदर कामी जाबदाराने खालील प्रमाणे मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवडे याकामी दाखल केले आहेत.

1. (2012) 4 CPR (NC) 595

      Veranda Kumar V/s. New India Assurance Co. Ltd.

2.  (2014) CPR (NC) 735

     Ram Prasad V/s Bajaj Alliance

    परंतू प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने दाखल केलेल्‍या मे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्‍या न्‍यायनिवाडा मे. मंचाने विचारात घेतला आहे.  सबब जाबदार यांनी दाखल केलेले वर नमूद न्‍यायनिवाडे याकामी मे. मंचाने विचारात घेतलेले  नाहीत.

    वर नमूद विवेचनानुसार व मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे तसेच नैसर्गिक न्‍यायतत्‍वांचा विचार करता प्रस्‍तुत जाबदार विमा कंपनीकडून तक्रारदार यांना त्‍यांचे वादातीत वाहनाचा विमा क्‍लेम मिळणे न्‍यायोचीत होणार आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.

 8.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.

आदेश

1.  तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमची रक्‍कम रु. 76,780/- (रुपये श्‍याहत्‍तर हजार सातशे ऐंशी मात्र) अदा करावी.  प्रस्‍तुत विमा क्‍लेम रकमेवर जाबदार विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारलेचे तारखेपासून रक्‍कम तक्रारदाराचे प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदाराला अदा करावे.

4. तक्रारदाराला झाले मानसीक त्रासपोटी  व सेवेतील त्रुटीबाबत नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) जाबदारानी तक्रारदाराला अदा करावेत.

5. जाबदाराने तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र)  तक्रारदाराला अदा करावेत.

6.  वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात करावे.

7.  विहीत मुदतीत आदेशाचे पालन करणेत जाबदारांनी कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

9.  प्रस्‍तुत आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य द्याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 14-03-2016.

 

सौ.सुरेखा हजारे    श्री.श्रीकांत कुंभार     सौ.सविता भोसले

सदस्‍या            सदस्‍य        अध्‍यक्षा

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.