(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दाखल केलेले संपुर्ण कागदपत्र तसेच कंपनीचे अधिकृत इसमाकडून गाडीचा तीन वेळा केलेला सर्व्हे रिपोर्ट सामनेवाला यांना कोर्टात दाखल करण्याचा आदेश व्हावा, वाहनाचे इस्टीमेटप्रमाणे रिपेअरींगसाठी येणारा खर्च रक्कम रु.5,50,275/-, लेबर चार्ज रु.60,400/- व मानसिक शारिरीक त्रासाबाबत रु.50,000/- असे एकूण रक्कम रु.6,60,675/- इतकी मागणी सामनेवाला यांचेकडून असली तरी देखील सदर वाहनाचा विमा रु.3,50,000/- इतका असल्याने पर्यायाने जास्त खर्च होत असल्याने तक्रारदाराने सदरची गाडीच दुरुस्त न करता गाडीचा संपुर्ण डॅमेज क्लेम रक्कम रु.3,50,000/- मिळावा, सदर रकमेवर रक्कम अदा करेपावेतो द.सा.द.शे.15% व्याज मिळावे व या अर्जाचा खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी पान क्र.25 लगत लेखी म्हणणे व पान क्र.26 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः तक्रार क्र.167/2011 मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय. 2. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे काय?- होय. 3. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-होय. 4. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय. 5. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय. 6. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.40 लगत व सामनेवाला यांचे वतीने पान क्र.42 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे. अपघातग्रस्त वाहनास सामनेवाले यांनी विमा पॉलिसी दिलेली आहे ही बाब सामनेवाले यांनी त्यांचें लेखी म्हणणे कलम 3 मध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.9 लगत विमा पॉलिसी दाखल केलेली आहे. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व पान क्र.9 लगतची विमा पॉलिसी याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. “अर्जदार यांचा तक्रार अर्ज दोन वर्षाचे कालावधीत दाखल केलेला नाही. तक्रार अर्ज मुदतीत नसल्याने नाकारण्यात यावा.” असे कथन सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 8 मध्ये केलेले आहे. परंतु या कामी अर्जदार यांनी पान क्र.3 लगत विलंब माफी अर्ज, पान क्र.4 लगत डॉक्टरांचे सर्टिफिकेट व पान क्र.6 लगत विलंब माफी अर्जाबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. विलंब माफी अर्जातील कारणे, पान क्र.4 चे सर्टिफिकेट, पान क्र.6 चे प्रतिज्ञापत्र याचा एकत्रीतरित्या विचार होवून पान क्र.3 चा विलंब माफी अर्ज दि.21/07/2011 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक संबंध नाही. वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा अपघातसमयी वैध परवाना नव्हता. तसेच अपघातग्रस्त वाहनात 11 शिट (माणसे) तक्रार क्र.167/2011 बसविलेली होती. वाहनाची परवानगी केवळ 10 लोकांचीच होती व आहे. त्यामुळे विमा पॉलिसीचे शर्ती व अटींचा भंग झालेला आहे. त्यामुळे तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देणे सामनेवाला लागत नाही. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे. पान क्र.16 लगतचे सामनेवाला यांचे दि.17/6/2011 चे पत्रानुसार अर्जदार यांचेकडून कागदपत्रांची पुर्तता झाली नाही या कारणावरुन सामनेवाला यांनी अर्जदार यांचा क्लेम नाकारलेला आहे असे दिसून येत आहे. परंतु अर्जदार यांनी पान क्र.15 लगत दि.25/4/2011 रोजी त्यांचे पत्र दाखल केलेले आहे. हे पत्र सामनेवाला यांना मिळालेले आहे. या पत्रानुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. लेखी म्हणण्यामध्ये सामनेवाला यांनी “वाहनाची परवानगी केवळ 10 लोकांची होती व अपघातग्रस्त वाहनामध्ये 11 लोक बसवलेले होते त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे.” असा उल्लेख केलेला आहे. परंतु या कामी परवानगीपेक्षा फक्त एकच व्यक्ती जास्त म्हणून वाहनामध्ये बसलेली आहे असे सामनेवाला यांचे कथनावरुनच स्पष्ट दिसून येत आहे. पान क्र.39 चे सामनेवाला यांचे रविंद्र अलूरकर यांचे सर्वे अहवालामध्ये अपघाताच्या कारणाबाबत कोणतेही विवेचन केलेले नाही. केवळ वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या परवानगीपेक्षा एक व्यक्ती वाहनामध्ये जास्त म्हणून बसणे यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीच्या मुख्य अटीचा (Fundamental breach) भंग होत नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने 2009 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 518. पी.बी.वेंकटरेड्डी विरुध्द न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि. या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्ज विनंती कलम 11 मध्ये रिपेअरींग कामी येणार खर्च व लेबर खर्च अशीच मागणी केलेली आहे. यावरुन वाहन टोटल डॅमेज झालेले नसून वाहन दुरुस्त करता येणे शक्य आहे असे दिसून येत आहे. व त्याप्रमाणेच अर्जदार यांनी पान क्र. 17 लगत दुरुस्तीचे इस्टीमेट दिलेले आहे. सामनेवाला यांनी पान क्र.39 लगत जो सर्वे अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दुरुस्तीचे पोटी खर्चाची रक्कम रु.2,59,000/- इतकी दिलेली आहे. पान क्र.39 चा सर्वे अहवाल हा चुकिचा आहे किंवा योग्य व बरोबर नाही हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणतीही योग्य ती कागदपत्रे व पुरावा दिलेला नाही. पान क्र.39 सर्वे रिपोर्टचा विचार होता अर्जदार हे तक्रार क्र.167/2011 सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.2,59,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने 2011 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 445. न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि. विरुध्द डॉ.एम.एम.कृष्णा या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. सामनेवाले यांचेकडून अर्जदार यांना विमा क्लेमपोटी रक्कम रु.2,59,000/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. अर्जदार यांनी आय.सी.आय.सी. आय.बँक शाखा नाशिक यांचेकडून कर्ज घेवून वाहन खरेदी केलेले आहे ही बाब पान क्र.9 चे विमा पॉलिसीवरुन स्पष्ट होत आहे. सर्वे रिपोर्टपासून दोन महिन्याचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम मंजूर करणे गरजेचे होते, याचा विचार होता पान क्र.39 चे सर्वे रिपोर्टची तारीख दि.26/12/2007 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.27/02/2008 पासून अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.2,59,000/- या रकमेवर संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहेः 1. 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान क्र.186. ओरीएंन्टल इन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल. 2. 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी. सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवालेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. सामनेवाले यांचे कृतीमुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची तक्रार क्र.167/2011 निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः 2.अ. विमाक्लेमपोटी रक्कम रु.2,59,000/- दयावेत व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रक्कम रु.2,59,000/- या रकमेवर दि.27/02/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याज दयावे. 2.ब. मानसिक त्रासापोटी रु.15,000/- दयावेत. 2.क. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत. |