View 8452 Cases Against New India Insurance
DATATRAY NIKAM filed a consumer case on 11 Feb 2015 against THE NEW INDIA INSURANCE CO. LTD. in the Satara Consumer Court. The case no is CC/13/156 and the judgment uploaded on 05 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 156/2013.
तक्रार दाखल दि.1-10-2013.
तक्रार निकाली दि.11-2-2015.
श्री.दत्तात्रय कृष्णराव निकम,
रा.प्लॉट नं.12, रांगोळे कॉलनी,
शाहपुरी, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.
जीवनतारा बिल्डिंग,
513 एल.आय.सी.बिल्डिंग,
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,
सदर बझार, सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एम.एच.ओक.
जाबदारातर्फे– अँड.आर.एन.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे 'न्यू सुजाता फार्मा' या औषध डिस्ट्रिब्यूटर कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तक्रारदाराने इंडिका व्हीस्टा हे वाहन क्र.एम.एच-11/एके-9825 हेम एजन्सीज सातारा यांचेकडून खरेदी घेतलेले आहे. सदर वाहन खरेदीसाठी तक्रारदाराने टाटा फायनान्स सातारा यांचेकडून कर्ज घेतलेले आहे. सदर वाहनाचा विमा तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला आहे. विम्याचा कालावधी दि.4-11-2011 ते दि.3-11-2012 असा आहे. सदर कालावधीची विमा पॉलिसी जाबदारांनी तक्रारदारास दिली आहे. दि.5-11-2011 रोजी तक्रारदारास दुकानाची औषधे खरेदी करणेची होती, सदर औषध खरेदी करणेसाठी तक्रारदाराने त्यांचे वाहन ज्ञानेश्वर रघुनाथ जाधव यांचे ताब्यात दिले व त्यांना मुंबई येथून औषधे घेऊन येणेस सांगितले. सदर ज्ञानेश्वर जाधव हा प्रस्तुत वाहन घेऊन मुंबई येथे औषधे आणणेसाठी गेला व दि.5-11-2011 रोजी रात्री उशीर झाल्याने वाहन पारसी कॉलनी, टिळक रोड, दादर येथे रस्त्यावर पार्क केले होते. पूर्वी ज्ञानेश्वर जाधव हा साईराज कन्स्ट्रक्शन्स येथे नोकरीस असल्याने व सदर कंपनीचे ऑफिस दादर येथे असलेने सदर कंपनीचे बाहेर रस्त्यावर सदरचे वाहन पार्क केले व सदर ज्ञानेश्वर जाधव हा कोपरखैरणे येथे पाहुण्यांकडे गेला. दि.7-11-2011 रोजी दादर येथे पुन्हा वाहन नेणेसाठी आला असता त्याठिकाणी वाहन दिसून आले नाही त्यामुळे सदरचे वाहन चोरीस गेलेची फिर्याद तक्रारदाराचे ड्रायव्हर ज्ञानेश्वर जाधव याने माटुंगा पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.468/2011 ने दाखल केली. सदर तक्रारीची दखल घेउुन माटुंगा पोलिस स्टेशनचे तपासी अधिकारी यांनी तपास चालू केला तथापि चोरीस गेलेल्या वाहनाचा तपास न लागल्याने सदर प्रकरणाची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा पोलिस स्टेशन यांनी बंद केली व चोरीची तक्रार खरी परंतु शोध न लागल्याने असे तक्रारीचे वर्गीकरण करणेत येऊन सदरची तक्रार A समरी करणेसाठी कुर्ला न्यायालयात पाठवून कुर्ला न्यायालयाने A समरी मंजूर केली.
तक्रारदाराचे वाहन चोरीस गेल्यानंतर तक्रारदाराने जाबदारांचे कार्यालयात रक्कम रु.2,84,958/- (रु.दोन लाख चौ-याऐंशी हजार नऊशे अठठावन्न मात्र) इतकी विमा रक्कम मिळणेसाठी विमा क्लेम फॉर्म भरुन सर्व कागदपत्रांसह जाबदार कंपनीस सादर केला परंतु जाबदार विमा कंपनीने दि.21-8-2013 रोजी तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला. जाबदाराने त्यांचे पत्रात म्हटले आहे की, तक्रारदाराने त्याचे वाहन मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनी दादर मुंबई यांचेकडे भाडयाने लावले होते. खाजगी वाहन भाडयाने लावून तक्रारदारानी विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला आहे, त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम फेटाळला. वास्तविक तक्रारदाराचे वाहन साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनीमध्ये कधीही भाडयाने लावले नव्हते व नाही. तरीही जाबदाराने खोटे कारण देऊन तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे, त्यामुळे तक्रारदारास जाबदाराने सदोष सेवा दिली आहे, म्हणून तक्रारदाराने जाबदाराकडून विमा क्लेम रक्कम व नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी वाहनाच्या चोरीचे नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.2,84,598/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत, सदर रकमेवर चोरी झालेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळावे, तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, अर्जाचा खर्च रु.10,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र , नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 ते नि.4/8 कडे अनुक्रमे तक्रारदारास जाबदाराने पाठवलेले पत्र, ड्रायव्हींग लायसेन्स, वाहन तपासणीचे कागदपत्र, गु.र.नं.468/2011 मधील फिर्याद, ड्रायव्हींग लायसेन्स झेरॉक्स मोटार क्लेम फॉर्म, नि.12 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.14 कडे तक्रारदाराचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर रघुनाथ जाधव याचे प्रतिज्ञापत्र, व मे.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे वगैरे कागदपत्रे सदर कामी दाखल केली आहेत.
4. जाबदारानी सदर कामी नि.16 कडे त्यांचेविरुध्द झालेला नो से आदेश रद्द होऊन मिळणेबाबतचा अर्ज, नि.16 अ कडे जाबदाराची कैफियत/म्हणणे, नि.16 कडे म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र, नि.18 चे कागदयादीसोबत नि.18/1 कडे विमा पॉलिसीची प्रत, नि.18/2 कडे विंग्ज सर्व्हेअर यानी जाबदाराकडे सादर केलेला इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट वगैरे कागदपत्रे जाबदारानी मंचात दाखल केली आहेत.
जाबदारांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी त्यांचे कैफियतीत पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत-
1) तक्रारअर्ज खोटा व लबाडीचा आहे, त्यातील मजकूर मान्य नाही.
2) तक्रारदाराने त्यांचे वाहनाची विमा पॉलिसी क्र.15170031110100012211 ही दि.4-11-2011 ते 3-11-2012 या कालावधीसाठी सदर पॉलिसीमध्ये दिलेल्या अटी व शर्तीवर जाबदार विमा कंपनीकडे उतरवलेली होती. तक्रारदाराने सदर गाडीचा विमा खाजगी वाहन म्हणून उतरविला होता. सदर विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार प्रस्तुत वाहन केवळ खाजगी वाहन म्हणून वापर करणेचे होते व वाहनाचा वापर भाडोत्री वाहन म्हणून करणेचा नव्हता. सदरची अट ही विमा पॉलिसीतील प्रमुख अट होती. तक्रारदाराने मालवहातुकीचा किंवा भाडोत्री प्रवासी वाहतुकीचा परवाना घेतलेला नव्हता तरीही संबंधित घटनेचे वेळी प्रस्तुत वाहन भाडोत्री प्रवास वाहतुकीसाठी वापरले जात होते व ते वाहन भाडोत्री प्रवास वाहतुकीसाठी तक्रारदाराने साईराज कन्स्ट्रक्शन्स टिळक रोड दादर-पूर्व, मुंबई 14 या कंपनीकडे भाडयाने वापरासाठी कंत्राटी पध्दतीने दिले होते. सदर बाब वाहन चोरीला गेलेची फिर्याद दाखल झालेनंतर पोलिस तपासाकामी तसेच जाबदाराने नेमलेल्या विंग्ज सर्व्हेअर यांचेकडून प्राप्त अहवालावरुन स्पष्ट झालेली आहे.
3) तक्रारदाराने विमा पॉलिसीतील मुख्य अटीचा भंग केलला आहे, त्यामुळे प्रस्तुत वाहन चोरीला गेल्यामुळे तक्रारदारांची झालेली नुकसानभरपाई देणेची कोणतीही जबाबदारी जाबदार विमा कंपनीची नाही, तसेच तक्रारदाराने सदर वाहन पार्क करताना आवश्यक ती योग्य काळजी घेतलेली नव्हती ही जबाबदारी तक्रारदाराने पार न पाडल्याने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झाला आहे, तसेच तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे वाहन चोरीस गेलेले आहे, त्यामुळे त्याची नुकसानभरपाई मागण्याचा तक्रारदाराला हक्क नाही व तक्रारदाराला नुकसानभरपाई देणेची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही.
4) वाहन चोरीला गेलेनंतर ताबडतोब फिर्याद दिली नाही तर दोन दिवसांनंतर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे, म्हणजेच तक्रारदाराने विमा पॉलिसीतील मुख्य अटीचा भंग केला आहे. त्यामुळे तक्रारदारास नुकसानभरपाई देणेची जबाबदारी जाबदार विमा कंपनीवर येत नाही, तसेच चोरीची माहिती तक्रारदाराने ताबडतोब जाबदार विमा कंपनीस कळवणे आवश्यक असतानाही त्यास विलंब लावल्याने पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला आहे, त्यामुळे जाबदार विमा कंपनीवर तक्रारदारास नुकसानभरपाई देणेची जबाबदारी येत नाही. अशा प्रकारे कैफियत जाबदार विमा कंपनीने सदर कामी दाखल केली आहे. जाबदाराने मे.राष्ट्रीय आयोगाकडील पुढील न्यायनिवाडा मे.मंचात दाखल केला आहे. रिव्हीजन पिटीशन क्र.4749/2013 Shriram General Insurance V/s. Mahender Jat.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा देणार आहेत काय? होय.
2. जाबदार क्र.1 ने तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे जाबदार विमा कमंपनीकडून नुकसानभरपाई मिळणेस
पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील नमूद आदेशाप्रमाणे.
विवेचन मुद्दा क्र.1 ते 3
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी त्यांचे मालकीचे वाहन इंडिका व्हीस्टा रजि.नं.एम.एच-11-एके-9824 चा विमा जाबदार कंपनीकडे विमा पॉलिसी क्र.151700/31/11/01/000122211 ने उतरवला असून त्याचा कालावधी दि.4-11-2011 ते दि.3-11-2012 असा आहे. ही बाब जाबदारानी नि.18 चे कागदयादीसोबत नि.18/1 कडे दाखल विमा पॉलिसीवरुन सिध्द होते. तसेच जाबदाराने प्रस्तुत वाहनाचा विमा होता ही बाब मान्य केलेली आहे. म्हणजेच तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीसोबत विमा करार केलेला होता म्हणजेच तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवदपणे सिध्द होते म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांचे वाहन दि.5-11-2011 रोजी तक्रारदाराचे औषध दुकानाची औषधे खरेदी करणेसाठी तक्रारदाराचे ड्रायव्हर ज्ञानेश्वर रघुनाथ जाधव हे मुंबई येथे घेऊन गेले होते व प्रस्तुत वाहन रात्री पारसी कॉलनी, टिळक रोड दादर येथील मे.साईराज कन्स्ट्रक्शनचे बाहेर रस्त्यावर पार्क केले होते. सदरचे वाहन चोरीस गेलेचे दि.7-11-2011 रोजी वाहन आणणेसाठी ड्रायव्हर ज्ञानेश्वर जाधव सदर ठिकाणी गेले असता लक्षात आले. प्रस्तुत वाहनाच्या चोरीची माहिती तक्रारदाराने पोलिस स्टेशन व जाबदार विमा कंपनीस दिली. त्यानंतर वाहन सापडले नाही म्हणून पोलिसांनी तक्रार A सनदी करणेसाठी कुर्ला न्यायालयात पाठवणेत आली. कुर्ला न्यायालयाने A सनदी मंजूर केलेनंतर तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे रीतसर विमा क्लेम रक्कम रु.2,84,958/- मिळणेसाठी मोटार क्लेम फॉर्म भरुन दिला, परंतु जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराच ाविमा क्लेम चोरीला गेलेली गाडी तक्रारदाराने भाडयाने दिलेली होती, तसेच मे.साईराज कन्स्ट्रक्शन कंपनीत गाडी भाडयाने लावली होती, सदरचे वाहन पार्किंग करताना तक्रारदाराने योग्य ती काळजी घेतली नाही वगैरे कारणे देऊन तक्रारदाराचा विमा क्लेम जाबदार विमा कंपनीने फेटाळला आहे. जाबदाराने फक्त इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टवर विश्वास ठेवून सदर विमा क्लेम नाकारला आहे. प्रत्यक्षात जाबदाराने मे.साईराज कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जाऊन चौकशी केलेली नाही. तसेच गाडी मे.साईराज कन्स्ट्रक्शन कंपनीत भाडयाने लावली होती याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदाराने मंचात सादर केलेला नाही म्हणजेच जाबदाराने चुकीची व मोघम कारणे देऊन तक्रारदाराचे गाडीचा विमा क्लेम फेटाळणे ही सेवेतील त्रुटीच आहे. सबब तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा पुरवली असून सेवेत त्रुटी केली असल्याच्या निष्कर्षाप्रत मंच येत आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे कारण तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस वाहन चोरी झालेचे कळविले आहे तसेच तक्रारदारानी वाहन चोरी झालेनंतर दोन दिवसांनी संबंधित पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली म्हणजेच विलंब लावला, तसेच तक्रारदारांचे वाहन खाजगी वाहन म्हणून नोंदणी झालेले असताना तक्रारदाराने सदरचे वाहन मे.साईराज कन्स्ट्रक्शन कंपनीकडे भाडयाने लावले होते त्यामुळे तक्रारदाराने विमा पॉलिसीतील मुख्य अटींचा व शर्तीचा भंग केला असल्याने जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे, असे असले तरीही तक्रारदाराने त्यांचे मालकीचे वाहन मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडे भाडयाने लावले होते याबाबत जाबदार विमा कंपनीने कोणताही कागदोपत्री पुरावा किंवा मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडून प्रस्तुत गाडी सदर कंपनीकडे भाडयाने लावली आहे यासाठी मे.साईराज कन्स्ट्रक्शनचे प्रतिज्ञापत्र किंवा गाडीमालक व मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स यांचेत झालेला करार किंवा संदर्भातील कोणताही करार मे.मंचात दाखल केलेला नाही, त्यामुळे इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की, सदरची गाडी मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडे भाडयाने लावली होती परंतु सदर इन्व्हेस्टीगेटरने सदर बाब एफ.आय.आर.वरुन लक्षात येते असे म्हटले आहे. एफ.आय.आर.चे अवलोकन करता सदर गाडी तक्रारदाराने मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडे भाडयाने लावली होती असे कोठेही म्हटलेले नाही तर प्रस्तुत गाडी कामानिमित्त मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कडे लावली होती असे म्हटले असले तरीही सदर एफ.आय.आर.मधील मजकूर खरा व बरोबर आहे हे सिध्द करणेसाठी जाबदारानी सदर ड्रायव्हर श्री.ज्ञानेश्वर रघुनाथ जाधव यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदारानी सदर ड्रायव्हरचे प्रतिज्ञापत्र नि.14 कडे दाखल केले आहे. प्रस्तुत प्रतिज्ञापत्रात सदर ड्रायव्हरने स्पष्टपणे म्हटले आहे की, सदर वाहन मे.साईराज कन्स्ट्रक्शन्स कंपनीत कधीही भाडयाने कामाला लावलेले नव्हते. पूर्वी मी सदर कंपनीत कामाला असल्याने लोकांच्या ओळखी होत्या, त्यामुळे सदर वाहन कंपनीचे ऑफिसचे रस्त्यावर बाहेर पार्क केले होते. तसेच मी गाडीमालक दत्तात्रय कृष्णराव निकम यांचे प्रस्तुत गाडीवर ड्रायव्हर असून दि.5-11-2011 रोजी श्री.निकम यांनी त्यांचे दुकानाची औषधे खरेदी करणेसाठी मला मुंबईला पाठविले होते. मी मुंबईला औषधे आणणेसाठी गेलो होतो असे शपथेवर कथन प्रतिज्ञापत्रात केले आहे, त्यामुळे सदर प्रतिज्ञापत्र विश्वासार्ह वाटते. त्यामुळे जाबदारानी ज्या कारणासाठी विमा क्लेम फेटाळला आहे ते पहाता जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळून सदोष सेवा पुरवली असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारदार हे विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. सदर कामी आम्ही मे.वरिष्ठ न्यायालयांच्या पुढील न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेत आहोत-
1. Supreme Court of India- (D.B.)
Amalendu Sahoo V/s. Oriental Insurance Co.Ltd.
2010 lawsuit (SC)413
Head Note- Vehicle Insurance- repudiation of claim- appellant/original complainant took comprehensive insurance policy for his private car- handed over the vehicle for a few hours for urgent use by the employees of the tenant Bank by way of a good gesture and did not take any rent- vehicle met with an accident- the surveyor reported that the vehicle was given on a hire basis though no payment for hiring charges proved- National Commission dismissed the complaint on the ground that at the time of the accident the car was used for hire and it was not given as a gesture of goodwill- appeal- this Court observed the guidelines issued by the insurance Company about settling of all non-standard claims where 75% of the admissible claim settled where condition of policy including limitation as to use was breached, thus held that the insurance company cannot repudiate the claim in toto- respondent/Insurance Company directed to pay a consolidated amount of Rs.2.5 lac to the appellants- appeal allowed.
ii) 2014 (2) ALL MR (JOURNAL)61
Consumer Dispute Redressal Commission , Maharashtra State, Mumbai. Smt. Savitri Dattatraya Powar & Ors. V/s. Divisional Officer, National Insurance Co.Ltd.& Ors.
Head Note- Consumer Protection Act.(1986)S.2.13- Insurance claim- Repudiation- claim towards damage to the insured vehicle repudiated- Ground that private- vehicle was used to carry passengers on rental basis- Insurance company relied on statement of certain persons recorded by police- However, such statements were not tendered in evidence as per S.(13)(4) of act- Held such bare statements cannot be relied upon to repudiate the insurance claim- Repudiation amounts to deficiency in service- Insurance company directed to settle insurance claim at 75% of insured declared value (IDV) of vehicle.
iii) 2011 ALL SCR 532
Civil Appeal No.1926 of 2011- Ravi V/s. Badrinarayan & Ors.
A) Motor Vehicle Act (1988)S.166- claim petition- Mere delay in loading of FIR is not fatal to claim case- Authenticity of FIR assumes much more significance for delay in loading thereof supported by cogent reasons.
वरील नमूद कारणमीमांसा, मे.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे वगैरे सर्व कारणांचा विचार करता सदर तक्रारदार हे विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणेस पा9 आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. सबब प्रस्तुत जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराना त्यांचे विमा क्लेमची रक्कम रु.2,84,958/-(रु.दोन लाख चौ-याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न मात्र) क्लेम फेटाळले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने अदा करणे न्यायोचित होईल, तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/-जाबदाराने तक्रारदारास अदा करणे न्यायोचित होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब सदर कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदाराना जाबदार विमा कंपनीने विमा क्लेमपोटी रक्कम रु.2,84,958/-(रु.दोन लाख चौ-याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न मात्र)विमा क्लेम फेटाळले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पउेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने अदा करावी.
3. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- तर अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4. सदर आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
5. सदर आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.11-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.